काहीना माझ्या कविता वाचता येत नाही तरी मला फ़ॉन्ट कोठुन लोड करावा लागेल व कसा करावा याकरीता मदत कराल काय अथवा लिन्क मिळु शकेल काय?
|
पोरका .... तू " निघायला हवं " म्हणू लागतेस त्या क्षणापासूनच जाणीव होऊ लागते आता आपण काही काळासाठी... पुन्हा पोरकं होणार ह्याची अन भेदरल्या नजरेवर मी कसाबसा पाण्याचा पडदा टाकतो . जाता जाता तुला वाटतही असेल परत भेटणार तर आहोत इतकं काय सेंटी होतो हा ? वगैरे पण कमीतकमी तुला असं तरी वाटायला नको की काही क्षणांसाठी का होईना माझं लेकरू ह्या जगात एकटं पडतंय कारण मग कुठल्याही आईचा पाय निघत नाही गं आणि मी तुला कधीच सांगणार नाहिये की तुझ्या पदरात मी माझं बालपण सुध्दा शोधत असतो
|
Shyamli
| |
| Saturday, May 06, 2006 - 2:19 am: |
| 
|
मुलं अशी सेंटी होतात???? नाही पटलं 
|
श्यामली ... कवितेतली ती म्हणजे माझी सखी आहे , जिच्यात मी आईचंही रूप बघतोय ... थोडक्यात .... रात्रीच्या उबदार कुशीत स्वतःला संपवून टाकणारा आजचा दिवस ... सकाळी तिच्या मुशीतून तावून सुलाखून जन्मतो तेव्हा कळतं .... स्त्री ही क्षणभराची प्रेयसी अन आयुष्यभराची माता आहे
|
Jayavi
| |
| Saturday, May 06, 2006 - 5:16 am: |
| 
|
ऋतू हिरवा, अगं काय सुरेख लिहिली आहेस...... डोळ्यात पाणी तरळलं गं. तुझ्या ह्या कवितेमुळे मनातलं दडवून ठेवलेलं guilt feeling पुन्हा त्रास द्यायला लागलं.
|
Milya
| |
| Saturday, May 06, 2006 - 5:36 am: |
| 
|
ऋतु हिरवा सही कविता.... बापु आरसा concept आवडली
|
बापू तुमच्या स्पष्टीकरणाने आरसा कविता तर कळलीच पण इतरही बरेच शिकायला मिळाले . मनापासून आभार
|
Moodi
| |
| Saturday, May 06, 2006 - 3:35 pm: |
| 
|
शैलेंद्र कविता लिहीताना कंसाच्या( bracket ) च्या आधी \dev2 असे लिहुन त्यात कविता लिहून तो कंस पुर्ण करा. म्हणजे इतराना पण नीट दिसेल, तशी भारताबाहेर दिसते अन वाचता पण येते हो, पण बहुतेक भारतातच काही जणाना प्रॉब्लेम येतोय. नाहीतर इथे बघा फॉंटसाठी. /hitguj/messages/1/92765.html?1132600909 हा बीबी वाचुन बघा आधी. अन तुमच्या कॉम्प्यु. वर unicode किंवा baraha font download करुन घ्या.
|
ऋतुहिरवा, आत्तापर्यंत, 'या चिमण्यांनो' हे गाणं ऐकलं की गलबलून यायचं, येतं.. पण तुझी कविता वाचली आणि या गाण्यासारखं झालं बघ. वेळ लागला बराच.. डोळे पुसत वाचताना.
|
Ninavi
| |
| Sunday, May 07, 2006 - 9:04 pm: |
| 
|
वैभव, सुंदर. आपल्या जिवलगांबद्दल ( कोणत्याही नात्याने जवळ आलेल्या) स्त्रीच्या मनात मातृत्वाची भावना (maternal instinct) काही प्रमाणात तरी असतेच माझ्या मते. फक्त त्याचा सन्मान करू शकणारे पुरुष किती असतात कोण जाणे. वैभव, तू हे समजू शकतोस म्हणून तुझं स्पेशल अभिनंदन. कविता म्हणून या दोन्ही सुंदर आहेतच, पण त्यातून माणूस म्हणून दिसणारी तुझी उंची जास्त विलोभनीय आहे. ( तुझी सखी भाग्यवान आहे बाबा.) 
|
Meenu
| |
| Monday, May 08, 2006 - 12:30 am: |
| 
|
दिवस उन्हाचे.. दिवस उन्हाचे.. झळाळणार्या रवी किरणांचे दिवस उन्हाचे.. तहानलेल्या किती क्षणांचे दिवस उन्हाचे.. अनवाणी पायी चटक्यांचे दिवस उन्हाचे.. कोरड पडलेल्या नेत्रांचे दिवस उन्हाचे..
|
दिवस उन्हाचे.. कोरड पडलेल्या नेत्रांचे .... आवडले मिनु . धन्यवाद निनावि ...
|
वाह! सगळ्यांच्या उत्स्फ़ूर्त प्रतिक्रिया वाचून खूपच छान वाटतेय.. अजून काहीतरी टाकायचा उत्साह दुणावतो आहे प्रोत्साहनाबद्दल सगळ्यांची आभारी आहे..
|
Zoom
| |
| Monday, May 08, 2006 - 3:53 am: |
| 
|
Rutu_hirawa , ख्ररचं अति सुंदर!
|
Princess
| |
| Monday, May 08, 2006 - 5:48 am: |
| 
|
नमस्कार ऋतु हिरवा... कविता खुप खुप खुप्पच छान लिहिलीयेस. परदेशात गेलेल्या मुलान्च्या आई बाबाना काय वाटत असते ते तु किती समर्पक शब्दात मान्डलस. मी भारतातच आहे पण आई वडिलापासुन दुर...एक मुल म्हणुन तुला सान्गतेय आम्हालाही आई बाबान्ची आठवण येते ग... तुमची कविता वाचुन माझ्या मनात उत्स्फुर्तपणे जे विचार आले ते मी लिहुन पाठवते आहे. पण हे मी अगदी सहज लिहिते आहे. कृपया राग मानु नका आई, रोजच आठवते तू आणि थकलेले बाबा, आणि मग डोळ्यासमोरचे काहीही दिसत नाही मला मला आठवते उन्बरठा ओलान्डताना माझ्या चिमुकल्या हातातला तुझा हात, आणि आठवते, परदेशी मी जाताना तुम्ही दिलेली शाबासकीची थाप सतत आठवत राहतात मला तू शिकवलेली गाणी आणि बाबानी सान्गितलेल्या गोष्टी पण मग आजुबाजुच्या कोलाहलात हरवुन घेतो मी स्वतला, तुम्हाला सोडुन आल्याचे दुःख विसरण्यासाठी तुमच्या आठवणीन्ची पुरचुन्डी मी हताशपणे असतो कुरवाळत, बसतो नन्तर घुसमटत, कुढत स्वतलाच बेइमान ठरवत मिळणारा पैसा वजा करुन, स्वप्नाना चुरगाळुन दडपुन कर्तुत्वाचे बीज येइन मी परत.... जर होणार असेल थोडे तरी माझ्या बुद्धीचे चीज.
|
प्रिन्सेस छानच ग हे विचार अगदी मनापासून वाटतात हेच तुझे यश
|
जीवनाच्या या वाटेवरती पाउले सदा दु:ख़ाची मात करता त्यावर पायवाट मिळते सुख़ाची मनामनाच्या शब्दझुल्यात तुझे माप घ्यायचे नन्तर मात्र तुझ्या आठवणीनी कासाविस व्हायचे. - शैलेन्द्र
|
Poojas
| |
| Monday, May 08, 2006 - 7:41 am: |
| 
|
घरटे.." आपुले घरटे सख्या ते चन्द्रमोळी.. पावसातून कालच्या वाहून गेले, सान्धण्याचा डावही फ़सवा निघाला.. भग्न्न त्या खाणाखुणा पाहून गेले, आसवानी कोरडा आकान्त केला.. गोठल्या रक्तात मी नाहून गेले, घाव जखमान्चे उराशी साचलेले.. गन्जल्या वज्रापरि साहून गेले, मीच माझे एकटीने सोसले जे.. ते तुला सान्गायचे राहून गेले...!!!
|
Moodi
| |
| Monday, May 08, 2006 - 7:49 am: |
| 
|
वा पूजा!! गझलेसारखा वाटतोय ग हा मायबोलीवरचा पहिला छान प्रयत्न. 
|
Ninavi
| |
| Monday, May 08, 2006 - 8:54 am: |
| 
|
शैलेंद्र, जमलं तर! पूजा, मूडी म्हणत्ये ते बरोबर आहे. थोडं काम केलंस या कवितेवर तर चांगली गज़ल होऊ शकेल. गुलमोहोरावर तुझं स्वागत. प्रिन्सेस, छान गं.
|