Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 05, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » विनोदी साहित्य » घरचा बाॅस » Archive through May 05, 2006 « Previous Next »

Athak
Thursday, May 04, 2006 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या कुवेत महाराष्ट्र मंडळाचा १ मे चा प्रोग्राम , त्यात मिष्किलमधे ' घरचा बॉस ' या विषयावर मी केलेले विनोदी भाष्य

नमस्कार मंडळी
तुम्ही संधी देताच घरच्या बॉसची परवानगी न घेता इतके दिवस मनात साठवुन ठेवलेले बोलुन दाखवण्यास स्टेजवर धावत आलो ,
मंडळाचे अध्यक्ष , तसेच आजी माजी अन पाजी कार्यकारी मंडळाचे सभासद यांना माझी घरची केविलवाणी परिस्थिती माहित झाल्यामुळे हा विषय त्यांनी ठेवला असावा . या संधी बद्धल मी मंडळाचा ऋणी आहे . आज घरी परत गेल्यावर माझे काय हाल होतील यास मंडळ सर्वस्वी जबाबदार राहील :-)

इथे आप आपल्या बॉस जवळ बसलेल्यांकडे बघुन माझी या विषयावर बोलायची हिम्मत होत नाही , पण जे एकमेकांपासुन दुर बसले त्यांच्याकडे बघुन धीर वाटतोय .

बॉस म्हटल की तुम्हाला ऑफिसातला बॉस वाटतो , पण घरचा बॉस ऑफिसच्या बॉसपेक्षा किती भारी असतो हे मी स्वत : चे बोल स उदाहरण देउन सांगतो
माझा ऑफिसचा बॉस लई डाम्बिस , लई खडुस , वाट्टेल ते बोलतो ओरडतो , बॉसच तो he is always right पण मी त्याला सरळ केला . रोज तो चिडला ओरडला की मी माझ्या खिश्यातुन वालेट काढतो , उघडुन बघतो अन शांतपणे काम सुरु ठेवतो . तो चिडतो पण मी आपला शांतच . एक दिवस त्याने हिम्मत करुन विचारले ' अरे मी तुझ्यावर इतका चिडतो रागवतो पण तुझ्यावर काहीच कसा परिणाम होत नाही , काय असे बघतो त्या वालेट मधे ? मी म्हटले ' मी माझ्या घरच्या बॉसचा फोटो बघतो आणि स्वत : ला बजावतो " ये इतने बडे बॉसको इतने साल झेल रहा हु , तु किस झाडकी पत्ती "
ऑफिसातल्या बॉसला हे एकदम पटल अन आता तोही तेच करतो त्याचा बॉस ओरडला की :-)




Athak
Thursday, May 04, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बॉसगिरीचा वारसा आमचेकडे वडिलोपार्जीत , पिढ्यानपिढ्या सुरु आहे . आमची आज्जी , आमच्या मातोश्री अन आता सुन चालवताहेत . आमच्या आजोबांची हालत काय होती काही विचारु नका , अजुनही त्यांचे हाल आठवले की अंगावर शहारे येतात . एकदा आमच्या आजीने त्यांना लाडात येउन म्हटले ' अहो मला किनी एक सुंदरस पातळ आणा ' आजोबा म्हणाले ' माझीच तर पातळ व्ह्यायची वेळ आली तुला कुठण आणु पातळ ' तर यावरुन तुम्हाला कल्पना आली असेल हा पातळवारसा कसा सुरु आहे याची . आजोबा नंतरची पिढी म्हणजे आमचे पप्पु बाबा , मातोश्रींच्या समोर त्यांची परिस्थिती म्हणजे .... नकोच सांगायला
त्यानंतरची पिढी आमची तर ऐका आमची कहाणी
आम्हा भावंडांची लग्न ... सुना कश्या हव्यात याच्या अटींची यादी बघुन चक्कर आली होती मला लग्ना अगोदर .
मातोश्री म्हणाल्या ' मैने क्या कहा तुमने सुना ? मी म्हणालो सु ना सुना म्हणजे सुटका नाही :-)
ज्या ज्या अटी आठवतात त्या सांगतो
१ ) वयाची अट नाही , वजनाची आहे , कमीत कमी ७० किलो
२ ) रंग गोरा नको , काळा पडतो , ब्लॅक ब्युटीस प्राधान्य
३ ) खेळात प्राविण्य हवे , गोळाफेक भालाफेक तसेच भांडीफेकेची भरपुर प्रक्टिस करणारी
४ ) शिक्षण , जास्तीत जास्ती ७ वी , नापास , पण BhD हवी ..... अहो BhD म्हणजे Doctorate in भांडाभांडी
तर अश्या सर्व अटी पुर्ण करुन आमचे गळ्यात माळ पडली अन आम्ही आयुष्यभरासाठी लटकलो



Moodi
Thursday, May 04, 2006 - 5:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथक...
आता कळले की तू फक्त happy चाच मुखवटा का टाकतोस ते..


Athak
Thursday, May 04, 2006 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तर ऐका घरच्या बॉससोबत आमची दिनचर्या
१ ) पहाटे ५ ला उठतो , बॉसला बेड टी करुन द्यावा लागतो , सोबत ब्रेड बटर लावले तर बॉस आणखी खुष
२ ) मुलांचा ब्रेकफाष्ट बनवुन ठेवणे
३ ) रात्रीच्या उरलेल्या चपात्या भाजी डब्यात भरणे , आता ८ , १० तासांकरीता का होईना सुटका झाली या विचारत घराबाहेर पडणे व हापिसकडे आनंदाने प्रस्थान करणे
४ ) हापिसात पोचल्यावर दर १ तासाला घरी फोन करुन बॉसची ख्यालीखुशाली विचारीत राहणे , कधी ऑफिसच्या कामात नाही वेळ मिळाला तर घरी परतल्यावर " कुठे भटकत होता , काय करत होता , माझी काही आठवणच येत नाही अश्या शब्दांचा भडीपार सहन करणे
घरी फोन करतांना चुकुनही सकाळी १० चे आंत करत नाही ना याची काळजी घेणे :-)
५ ) जेवणा अगोदर घरी फोन करुन बॉसचे जेवण झाले ना याची खात्री करणे नाहीतर घश्याखाली घास उतरत नाही हो :-)

माझी संध्याकाळ मात्र खुप सुखावह असते
रोज आमचे घरचे बॉस आतुरतेने वाट बघत असतात हो आमची , छान make up करुन , चेहर्‍यावर पिठाचा थर लेपुन , केसाला भरपुर तेल लावुन , डोक्यावर फुलांची कुंडी माळुन बसलेली , आमच्या वाटेकडे डोळे लावुन बसलेली आमची घरची बॉस
खुप बर वाटत हो ,
गाडी भरधाव पिटाळत , रस्त्यातल्या गर्दीतुन वाट काढत आम्ही सुटतो घराकडे तेव्हड्याच ओढीने
उशीर झालेला तिला अजिबात सहन होत नाही , ५ , १० मिनिट जरी उशीर झाला तरी किती ऐकुन घ्यावे लागते
' कित्ती उशीर हा , केव्हाची वाट बघतेय .......... चहाची :-)


Karadkar
Thursday, May 04, 2006 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अथक, तुम्ही हे लोकांसमोर सादर करुन इथे लिहायला आलात म्हणजे हाडे वगैरे जागेवर असावित. डाॅक्टरने काय सांगितले? कित्ती दिवसात बरे व्हाल म्हणे?
:-)


Chinnu
Thursday, May 04, 2006 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथक तुम्ही अखंड जिवंत आहात ना? काळजी घ्या हो स्वत:ची!!

Kmayuresh2002
Thursday, May 04, 2006 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेठजी, काही खरं नही आता तुमचं.. घरच्या बॉसविषयी अशी चार चौघांत चर्चा

Badbadi
Thursday, May 04, 2006 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथक , मला अजूनही वाटतंय कि तुम्हे हे सगळं स्वप्नात बोललं असणार... एरवी असं काही बोलणार नाहीत तुम्ही :-)
या सगळ्यावर सौ. अथक ची प्रतिक्रिया वाचायला आवडेल :-)


Limbutimbu
Thursday, May 04, 2006 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय अथकशेठ! अगदी डोळ्यासमोर चित्र उभ केलत!
पण सकाळी दहाच्या आधी काबरे फोन करायचा नाही घरी?


Sushya
Thursday, May 04, 2006 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथकशेठ, छान. काळजी घ्या, अजून काय सांगू :-)

Smi_dod
Thursday, May 04, 2006 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार अथक,
खरोखर धाडसी प्रयत्न आहे हा.. येवढे धैर्य दाखवणे म्हणजे चेष्टा नाही.. बरे आहात ना?


Krishnag
Friday, May 05, 2006 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथकशेठ.. ..

सदरचे भाषण देतांना बॉस रंगमंचावर तुमच्या मागे होत्या का?


Psg
Friday, May 05, 2006 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथक, सही लिहिल आहे!

Manuswini
Friday, May 05, 2006 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच daring आहे
अथकभाऊ कसे झेलले हे सगळे?


Shyamli
Friday, May 05, 2006 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथक वहिनी आल्या होSSSSS

Seema_
Friday, May 05, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही ही ...... खी खी खी खी खी . एवढ बोलुन झाल्यावर घरात घेतल ?
अस लिहा bOsa - बॉस

Athak
Friday, May 05, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी , सहानुभुतीबद्धल धन्यवाद , आता तुमचाच सहारा :-)
सीमा , धन्यवाद . बॉस शब्द लिहितांना हात थरथरत होता अन बाॅस असे लिहील्या गेले :-)


Chinmay
Friday, May 05, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेठ...
आता दर १ तासाला HG वर खुशाली कळवत रहा...:-)


Deemdu
Friday, May 05, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथकभाऊ .. .. ..

Jo_s
Friday, May 05, 2006 - 2:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्ता कळल नाव "अथक" का घेतलं ते. अथक परीश्रम करुन एवढाच शब्द पटकन सुचला असेल. अथक हेल्मेट, प्रुफ़ जाकेट वगैरे घालूनच घरी जारे बाबा. . . .





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators