|
श्यामलि , लोपा , देवा , मस्त चाललंय !!! निनावी ... सुंदर ... विषय निघालाच आहे म्हणून कृष्णावरची एक छोटी कविता पोस्ट करतोय .. मोरपीस ... व्योमाला तू दिली निळाई हरित्र दिधला ह्या धरतीला सोनसळी देऊन प्रकाशा भवतीचा अंधार उजळला कृष्ण कृष्ण सर्वत्र कृष्ण मज विराट दर्शन घडले रे रंगहीन ह्या डोळ्यांवरुनी मोरपीस तव फिरले रे
|
Milindaa
| |
| Wednesday, May 03, 2006 - 6:19 am: |
| 
|
Jo_s, काय आहे की एका थ्रेड मध्ये एकच पोस्ट असेल आणि ते डीलीट झाले तर तो पूर्ण थ्रेडच डीलीट होतो. आता आहे तो थ्रेड तेथे.
|
काळजातली जख़म भरुन कशी येणार तुझ्या आठवणीनी ती आणख़ी चिघळतच जाणार या आठवणीना मी दुर कसे करणार कारण, त्याच्याशिवाय मला आधार कोण देणार - शैलेन्द्र
|
Ninavi
| |
| Wednesday, May 03, 2006 - 12:21 pm: |
| 
|
धन्यवाद, दोस्त्स. वैभव, मोरपिसाच्या रंगांचं एवढं छान interpretation मी तरी प्रथमच वाचलं. ' जे देखे कवी' म्हणतात ते हेच बहुधा. सुंदर.
|
Smi_dod
| |
| Wednesday, May 03, 2006 - 11:16 pm: |
| 
|
अचानक आलेल्या सरी सारखा आलास,.. बरसुन गेलास चिंब भिजवले मला आता मात्र...... सावळ्या उन्हात तु आठवतो ओल्या पावसात तुच भासतोस पापणी आड माझ्या उनपावसाचा खेळ चालु असतो कृष्णमेघ होउन बरसत असतोस
|
आसमंताच्या या काळी वाट पाहतो तुझी दिवस जाता सरुनी ह्रदय येते भरुनी मनी येता हुरहुर क्षणात माजते काहुर वाटते भेटावे तुला सर्व सान्गावे तुला ह्रदयाशी मेळ घालताना मनी तुझे चित्र दिसे येता भानावरी पाहता माझे लोचनी पाणी असे - शैलेन्द्र
|
Shriramb
| |
| Thursday, May 04, 2006 - 5:59 am: |
| 
|
उदास संध्या उदास संध्या अनवट गाणे दाटुन येती भाव विराणे दूर अंबरी तिमिरोदय, अन आत अंतरी विकल तराणे काळोखाची हलकी चाहुल अगतिक करते, जागविते सल खिन्न शांतता, स्तब्ध चराचर थांबतेच जणु सजीव जगणे डोळ्यांपुढती विरळ आकृति फेर धरोनी नाचतात स्मृति कधिकाळी त्या संध्यानंदी खळखळलेले तुझे हासणे
|
Smi_dod
| |
| Thursday, May 04, 2006 - 6:09 am: |
| 
|
शैलेन्द्र,श्रीराम... सुंदर आहे कविता
|
Milindaa
| |
| Thursday, May 04, 2006 - 7:12 am: |
| 
|
श्रीराम, चांगली आहे कविता
|
Moodi
| |
| Thursday, May 04, 2006 - 7:15 am: |
| 
|
स्मिता, श्रीराम अन शैलेंद्र खुपच छान अन तेवढेच मनाला भिडणारे पण. शैलेंद्र तुम्ही कोणता font वापरता? काही जणांना तो नीट दिसत नाही. \dev 2 मध्ये टाका ना तुमच्या कविता.
|
Zaad
| |
| Thursday, May 04, 2006 - 7:25 am: |
| 
|
devdatta, lavani fakkad jamali ahe, ajun yeu dya. shriramb, chhan ahe 'udas sandhya'
|
Shyamli
| |
| Thursday, May 04, 2006 - 11:02 am: |
| 
|
देवा, लावणि फक्कड निनावि...... राधा(हे असे मला कधि जमणार) शैलेन्द्र, तुमच्या दोन्हि कविता छानच आहेत अगदि सहज वाटतात, श्रीराम उदास सन्ध्या....... आहा टचिन्ग
|
Ninavi
| |
| Thursday, May 04, 2006 - 11:08 am: |
| 
|
श्यामले, बास का? श्रीराम, सुंदर आहे कविता तुमची. ' तिमिरोदय' शब्द पण interesting आहे.
|
Paragkan
| |
| Thursday, May 04, 2006 - 5:37 pm: |
| 
|
खास रे श्रीराम!
|
Smi_dod
| |
| Thursday, May 04, 2006 - 11:23 pm: |
| 
|
धन्स मुडी, कविता प्रथमच लिहितेय.. ईथल्या माननिय कविवरां पुढे अगदिच सामान्य आहे. तरिही तुझ्या छान म्हणण्याबद्दल परत धन्यवाद
|
इथल्या भारी भारी कवितान्सारखी नाहीये पण हा माझा सुध्दा एक प्रयत्न
|
Jo_s
| |
| Friday, May 05, 2006 - 2:33 am: |
| 
|
धन्यवाद मिलींदा माहीती दिल्याबद्दल आणि थ्रेड चालू केल्याबद्द्ल
|
परदेशात रमलेल्या माझ्या मुलास.. बरं झालं असतं बघ.. जर जमलं असतं मलाही तुझ्यासारखंच गेलेल्या काळावर निश्चलपणे माती लोटुन देणं आताशा मला जरा कमीच दिसतं बघ जवळचं लांबच्या गोष्टी लख्ख दिसाव्यात ना अगदी तसंच.. उंबरठ्या अलीकडची तुझी घुंगुरवाळ्याची चाल नी अगदी परवा परवाच कोण्या दूरदेशी अभ्यासातली नवनवीन शिखरं बिखरं सर करायला पडलेली तुझी चाल आणि या दोन्हीची एकत्रित न बांधता न येणारी चाल.. अलीकडे जरासं कमीच ऐकायला येतं बघ मला म्हणूनच की काय असेल लागलेला मला हा नाद आजूबाजूच्या अशा जिवंत कोलाहलातदेखील तुझ्यासोबतच परागंदा झालेले तुझे बोल स्वत:शीच आठवत राहण्याचा... बाबांबद्दल लिहावं म्हंटलं तर तेही आता थकलेत रे निसटू पहाणारा काळ आणि बदलती मूल्यं यांची दुबळी कावड बांधताना ते असतात स्वत:तच मग्न सुरकुतलेल्या आठवणींची एकुलती एक पुरचुंडी स्वत:शीच कुरवाळत ..घुसमटत कुढत... मान्य आहे रे आम्हालाही, की कर्तुत्वाची दोरी छाटून बुध्दीला वेसण घालुन का असेना पण राहून गेले तुझे भाऊबहिण इथेच या देशी मातीमध्ये रुजली फोफावली त्यांची रोपटी स्थिरावली याच ओबडधोबड स्वदेशी मातीची चाड आपल्या अंगांगात भिनवत, नसतीलही त्यांच्याकडे व्यावहारिक गणितातले हातचे मिळवायला काही आकडे.. पण आयुष्याच्या एकाच सूत्राभोवती आहेत ते इमान राखून की जन्मभूमीला कर्मभूमी मानणं म्हणजे नेहमीच नसतं काही स्वप्नांची वीण उसवणं किंवा कर्तुत्वाची बीजं दडपणं शेवटी फार काही मागायचं नाहीये किंवा तू रागेजुन जावंस यासाठीही नाहिये रे हे सारं बोलणं पण आठवण करुन देतेय की.. तू गेलास रे पण जाता जाता इथेही ठेवून गेलासच चार दोन आठवणी चुकार सध्या याच मिळकतीवर जमेल तशी गुजराण पण शेवटी अडकलेली कुडी आणि कंठाशी आलेले प्राण - तुझ्या आईकडून
|
वाह .... अप्रतिम . गेल्या कित्येक दिवसांत(?) मी वाचलेली एक सुंदर कविता.
|
|
|