Shyamli
| |
| Monday, May 01, 2006 - 7:46 am: |
| 
|
नुकतिच जखम भरू लागली होती हळुवार खपली धरू लागली होती आलास परत अन लावलास धक्का दुखावली जखम... उसासले मन..... संपलय ना सगळ मग तरीही का हे आक्रंदतय.... परत परत तेच तेच का बघु पहातय करुन ठेवलायस ना गुंता......... तेवढा तरी सोडवशील का रे आता? .....
|
श्यामली, सुंदरच!! तुला मेल टाकलीय बघ!
|
Ldhule
| |
| Monday, May 01, 2006 - 10:29 am: |
| 
|
शामली, वैषाखाची सुरुवात छानच !!
|
Zoom
| |
| Monday, May 01, 2006 - 12:20 pm: |
| 
|
श्यामली, फारचं छान कविता!
|
Jayavi
| |
| Tuesday, May 02, 2006 - 12:18 am: |
| 
|
अहा श्यामली, मस्तच गं !
|
shyamali very touching!!! how u doing?
|
श्यामली फारच छान. नाव का नाही दिले ग?
|
Pendhya
| |
| Tuesday, May 02, 2006 - 12:55 am: |
| 
|
श्यामले, तुझी ही बाजू मला माहीत नव्हती. छान!
|
छानच जमलिए गं श्यामलि..
|
Shyamli
| |
| Tuesday, May 02, 2006 - 2:52 am: |
| 
|
धन्यवाद मंडळी... वैशाख सुरु केला मी कोणीच लिहित न्हवते म्हणुन 
|
shyamali...!!!.....!!!...!!!.. .. .. .. ... ..
|
तु.... तुला डोळे भरुन बघतांना पापण्या काठोकाठ भरल्या... धुसर झालास तु... दृष्टीआड गेलास.., पण नजरेतल्या पाण्यात प्रतिबिंबत राहिलास, तु नसतांनाही... गुलाबी कमळातुन.. आठवणींची मेघगर्दी ओघळत राहिली, आता तु कधीच दिसणार नाहिस.. तरीही.. पापणी भरुन येतेच मग सारे जगच धुसर होते... अन त्या डबडबत्या डोळ्यात तुझे प्रतीबिंब बुडुन जाते....!!!
|
Shyamli
| |
| Tuesday, May 02, 2006 - 5:14 am: |
| 
|
Vaishali... .. .. ..
|
वैशालि सुंदर... सजले तुम्हांचसाठी श्रुंगार चढविला ख्याता सांगा मैफ़िल का हो तुम्ही सोडूनी जाता माफ करावे जर आगळीक असलि घडलि सजणा तुम्हाच वरति प्रिती असेही जडलि हि प्रीत सांगा झिडकारूनी का देता असति इथले दिलदार लोक ते सर्व होता मजला मम रुपाचाच हा गर्व गर्वास तोडिले तुम्ही दिलवरा नाथा या बसा करा हो तुम्ही तांबुलपान द्या जरा माझ्या विनवासही मान झाले दिन बहू न घडल्या बाता मज ठाउक आहे हि प्रीत जायची वाया हि उदास कोठी सोबतीस दिसाला राया मनी विरहिणी येते ओठ लावणी गाता विटंबला जरी देह दशदा नव्हे शतदा कधी भेटेल मज का ती अनोखी वरदा भोगिनी जरी मी होईन कधीका श्वेता
|
Ninavi
| |
| Tuesday, May 02, 2006 - 12:58 pm: |
| 
|
राधा.. आजही मुरलीतला या सूर राधा आजही ह्रदयातले काहूर राधा आजही वृंदावनी यमुनाकिनारी चोरुनी मज भेटण्या आतूर राधा आजही मी पाहता स्वप्नी तिला का होतसे लाजून तेथे चूर राधा आजही माझी मनाने अन तरीही रेखते भाळी दुजा सिंदूर राधा अक्रुरासंगे निघालो दूर तेव्हा 'थांब'ही वदली न ती निष्ठूर राधा सांगतो मी त्यागण्या आशा फलाची सहज तोडुन बंध झाली दूर राधा जोडुनी कर सौख्य येथे तिष्ठलेले आणि तरिही लावते हुरहूर राधा
|
Yog
| |
| Tuesday, May 02, 2006 - 9:42 pm: |
| 
|
क्या बात है.. मस्त!
|
>>> मनी विरहिणी येते ओठ लावणी गाता देवदत्त छानच रे. श्यामली, लोपा सही. >> सांगतो मी त्यागण्या आशा फलाची सहज तोडुन बंध झाली दूर राधा वा निनावी
|
Giriraj
| |
| Wednesday, May 03, 2006 - 1:26 am: |
| 
|
क्या बात है निनावि! पाच गावं बक्षीस!
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 03, 2006 - 1:38 am: |
| 
|
निनावि, राधा कुणाला कळलीच नाही, कृष्णालाहि नाही, प्रत्येक वेळी ती वेगळीच दिसते, तशीच ती ईथेहि.
|
>>>>> राधा कुणाला कळलीच नाही, कृष्णालाहि नाही अरेच्च्या? पण "साधिभोळी मीरा तुला कळलीच नाही" असही एक गाण हे ना? मीरा अन राधा एकाच व्यक्तीच्या दोन आयड्या हेत का? DDD मण्डळी, छान हेत कविता! तुमच चालु द्या
|