Ldhule
| |
| Monday, April 10, 2006 - 3:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
'जे न देखे रवि ते देखे कवि' हे अगदी खर करुन दाखवलात सगळ्यानी. सुंदर चित्रांवर कविता करणारे हजारो पण अश्या कविता विरळाच. धन्यवाद.
|
Ldhule
| |
| Monday, April 10, 2006 - 3:21 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ही एक चित्रकविता आहे. माझी नाही.. याची नोंद घ्यावी.
![ck](/hitguj/messages/119403/106339.jpg)
|
Jo_s
| |
| Friday, April 14, 2006 - 1:36 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चला दोस्तहो या चित्रावर बोलू काही प्रयत्न एक जरा त्यावर केलाय मीही - - - - - - - - - - आयुष्यातील अडचणींच्या गुंतलेत गुंती की भाग्यरेखा बहरून आल्या होत्या ज्या हाती त्या रेषांना रंग देऊन गेली फुले की त्यांनी रंग जगाचे या ल्याले असोत कसले रंग असोत कसल्या रेषा कशी कळावी कोणा त्यांची गूढ भाषा कळूनही ते काय उपयोग त्या कळण्याचा ज्याचा त्यालाच आहे हा गुंता हाताळायचा सुधीर
|
Shyamli
| |
| Friday, April 14, 2006 - 4:30 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझाहि एक प्रयत्न.. हाती फुलले इन्द्रधनु रंगांचा सोहळा जणु कुणावाटे गुंता धाग्यांचा कुणा वाटे पीसारा नाचर्या मोराचा फुलेल्या रंगातुन अन सुटलेल्या गुंत्यातुन पहावे जग माझ्याही नजरेतुन पाहिल तर कोडं नाहीतर हे आयुष्य आहे हो फारच थोड श्यामली!!!
|
Smi_dod
| |
| Friday, April 14, 2006 - 5:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्यामली,मस्त जमली ग...तु नेहमी करते का कविता...मला आवडली
|
सुधीर, श्यामली छान!! ... ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Krishnag
| |
| Friday, April 14, 2006 - 5:17 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सुधीर, नेहमी प्रमाणे छान!! श्यामली, छानच यशस्वी प्रयत्न!!
|
नेहमी प्रमाणेच सुंदर कवीता श्यामली... ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
श्यामलीऽऽऽ अप्रतिम ग.. .. .. ![](/hitguj/messages/119403/106600.gif)
|
सुधीर श्यामली, खरच खुप छान लिहीलय तुम्ही. अमोल
|
sudheer, shyamali mast.., laadule... chitrakavitesaarakhaa prayatn karun baghayalaa hava.!!!
|
Ldhule
| |
| Friday, April 14, 2006 - 11:09 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शामली, खुप सुंदर कविता. तुझ्या चारोळ्या तर अप्रतीम असतात. सुधिर, की भाग्यरेखा बहरून आल्या होत्या ज्या हाती ! वा नेहमी प्रमाणेच खुप छान. Lopa नक्की प्रयत्न करुन बघ. बाकी तुझ्या कविता छान असतात हं. ए.भा.प्र. हल्ली कवितेला शिर्षक का नाही देत तु ? बळीराजा खुप आवडली होती.
|
हेच असती हात माझे जे कधी ना गोठले शूर या हातांत माझ्या विश्व माझे साठ्ले केली पादाक्रांत मी कितीक चक्रीवादळे हात असती साथीला नशीब माझे आगळे केला दगा जेव्हा जगाने हात पाठी राहिले केली तयांना ढाल माझी मी घाव सारे साहिले मिट्ट त्या काळरात्री वाट त्यांनी शोधली शोषला अंधार सारा मज प्रकाशरेषा दाविली झुगारली जोखडे जगाची मुक्तता मी पाहिली तृप्त या माझ्या करांना मी हृदयसुमने वाहिली
|
Shyamli
| |
| Saturday, April 15, 2006 - 12:36 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा मयुर.... .. .. ..
|
Jo_s
| |
| Saturday, April 15, 2006 - 1:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मंडळी धंन्यवाद, श्यामली छानच जमल्ये मयुरेश सुंदर सुधीर
|
Shyamli
| |
| Saturday, April 15, 2006 - 1:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद लोक्स... खरतर इथल्या लोकांपुढे माझ्या कविता म्हणजे लहान मुलानी केलेली लुडबुड असते...... ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
Psg
| |
| Saturday, April 15, 2006 - 2:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मयुरेश, छानच आहे! good positive attitide श्यामली, लहान मुलीच्या लुडबुडीचे कसे कौतुक करतो, तसे तुझेही करतो बरे!
|
शामली,सुधीर धन्यवाद तुमच्या कविता पण छान आहेत..मगाशी प्रतिक्रिया द्यायची राहुन गेली सुधीर,हे हातांचे चित्र सही आहे रे..
|
वा ... सुधीर , श्यामली , मयुरेश ... मस्त आहेत ... चित्र तर फारच सुंदर आहे
|
Jo_s
| |
| Sunday, April 16, 2006 - 1:16 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वैभव, मयुरेश खरय ते चित्र फारच सुंदर आहे. त्यामुळेच माझ लक्ष त्यानी वेधून घेतलं आणि त्यावर काहीतरी लिहील्याशीवाय रहावेना. सुधीर
|