Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 22, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » काव्यधारा » कविता » Archive through April 22, 2006 « Previous Next »

Savani
Thursday, April 20, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा फ़ारच छान... निरोपाचा क्षण..
का कुणास ठाऊक डोळे भरून आले..


Dr_ashutosh
Thursday, April 20, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़क्त मिटून घ्यावा हा क्षण नकोसा झालेला
वा लोपा

निनावी अजून काही राहील नसेल तर आता कविता लिहायला हरकत नाही

वैभव
तट तट तुटतच की काळीज
छान रे


Ninavi
Thursday, April 20, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशुतोष, हा एवढा चहा घेऊन झाला की मग लिहीन की कविता.

Dineshvs
Thursday, April 20, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, खुप दिवसानी, हरल्ये, सरल्ये असे शब्द वाचले. कविता छान आहे.
पण चहा घेऊन झाला कि नाही ?


Nilyakulkarni
Thursday, April 20, 2006 - 11:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि वैभवा शैलेन्द्रा खुप छान आहेत सर्वच कविता....
आणि लोपा घरुन निघताना निरोप घेतो ना तेच सर्व एकदम डोळ्यासमोर आले खरच नकळत कडा ओल्या झाल्या...


Smi_dod
Friday, April 21, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवणी चे सुर..
आसमन्तात बरसतात
कधी अलवार मोरपीस फ़िरवतात..
कधी अनावर करतात..
आणि.........
कधी चिम्ब भिजवतात...


Ruchita
Friday, April 21, 2006 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुज़ी आठव मज दिनराती
सान्ग याचेच नाव का प्रीती

श्वासान्चे जुळले नाते
आता तुज़े नि माजे
तोडु नको कधिही
हे बन्ध रेशमाचे


Zaad
Friday, April 21, 2006 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ninavi, kavita khoop awadali..

Bkshailendra
Friday, April 21, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाळ्वंटातल्या रेतीवर
सूर्य डोकावतो आहे
तळ्पत्या उन्हाने तीचे
प्राण शोषतो आहे

पाण्याच्या थेंबापायी
धरणी ठाय रडती आहे
प्रभाकर मात्र तीला
मरणयातना देतो आहे

शितलतेच्या छायेखाली
चंद्र उगवतो आहे
प्रभाकराला दूर सारून
धरणीला दिलासा देतो आहे

- शैलेंद्र कुलकर्णी

Neela
Friday, April 21, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

www.geocities.com/bluecrescent06 ही वेबसाइट मी बनवली आहे.प्रयत्न कसा वाटला ते कळवा.

Lopamudraa
Friday, April 21, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साद

काळोख संपत नाही,
सुर्यही उगवतो निस्तेज..
उदासीच्या सावल्या होत जातात गडद..
अंधाराचही पणतीशी साटलोटं आहे,
घेउन पदरी राजहंस कावळाही गात आहे..
वणवण सारी नशिबी, जीवन का इतके महाग आहे..!!
म्हणुन
आज विचारणे भाग आहे..
देवा माझा का इतका राग आहे..

ओंजळीत राहिले किती निसटले किती..
काही मोजदाद नाही..
अंतरंगाला माझ्या... प्राक्तन माझे ठाव नाही,
जगण्याची धडपड केविलवाणी झालि आहे..!
सगळीकडे सीमारेषा क्षितीजाला वाव नाही....
विस्तारुन त्यांना आता स्वप्नांचा काढायचा माग आहे...
म्हणुन..
आज विचारणे भाग आहे...

कवटाळुन एकांताला, माझ्या देहाची धग..
आयुष्य पेटवते आहे...
लपवलेली वेदना आता विस्तारते आहे..
वरुन वरुन शांत मी आतुन आतुन आग आहे..
म्हणुन..
आज विचारणे भाग...... आहे

मन मेले तरी देहाला थोडी जाग आहे..
तुटलेल्या पंखाना भरारीची आस आहे..
जरी प्रत्येक क्षण डसणारा नाग आहे..
सुखाच्या दोन दाण्यांची घातली तुला साद आहे..
म्हणुन..
आज विचारणे भाग आहे
देवा माझा का तुला इतका राग आहे..!!!


Champak
Friday, April 21, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

why mee???

माझा का तुला इतका राग आहे !!!

Lopamudraa
Friday, April 21, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

cha.npak.. ...tula konatyaa bhashet sangu kalale nahi re...!!! mhanun tar kavita keli


Ninavi
Friday, April 21, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दोस्त्स.
नीला, वेबसाईट मस्तच झाल्ये.. देखणी एकदम आणि कविताही छान आहेत श्री. मकरंद यांच्या.

लोपा, ' अंधाराचं पणतीशी साटंलोटं'.. सहीच.

रुचिता, शैलेंद्र, तुमचं गुलमोहोरावर स्वागत.
Keep it up.

Pama
Friday, April 21, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! छान लिहिताय सगळे..
वैभवा.. दूरध्वनी, भ्रमणध्वनी जिवंत असतील तुझे तर फोन कर..


Ameyadeshpande
Friday, April 21, 2006 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपामुद्रा(केवढं छान पण थोडं मोठं नाव आहे घ्यायला) मस्त लिहिलीयेस कविता.. "तुटलेल्या पंखाना भरारीची आस आहे" मस्तच...

निनावी किती वेळ चहा पिणारेस... "उद्या श्वासांचे ध्यास उरतील.. स्पर्शांचे नुसतेच भास उरतील" :-) आवडलं एकदम!


Smi_dod
Friday, April 21, 2006 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीला,वेब साईट मस्तच झाली आहे.एकदम देखणी.... तु वेब डिजायनर आहेस का?

Jayavi
Saturday, April 22, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, निनावी, लोपा.........एकदम सही ! रुचिता, शैलेन्द्रा........तुमचं मनापासून स्वागत ! मस्त फ़ुलतोय कवितांचा फ़ुलोरा :-)

Ruchita
Saturday, April 22, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज़या, निनावी, देवा, हिम.. प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद.. असेच भेटत राहु

Mmkarpe
Saturday, April 22, 2006 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


स्फुर्ती....
भटकत राहिलो पोटापायी
दरवेशासारखा
मुक्काम दर मुक्काम
शहर शहर
देशात,... परदेशात
तरीही;
एक गीत गुणगुणतेय
अजुनही
थकलेल्या मनात
एक सुगंध दरवळतोय
अजुनही
खोल अंतरात
एक ज्योत तेवतेय
अजुनही
विझलेल्या हृदयात
गावच्या मातीचा एक कण वाहतोय
अजुनही
स्फुर्ती बनुन माझ्या रोमारोमात...







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators