Lalu
| |
| Tuesday, April 25, 2006 - 3:18 pm: |
|
|
नावं सांगायला ती तरी वाचता यायला नकोत का?! ~d
|
नावं म्हणजे कवी / कवयित्रींची नावं रे लालू आणि जरा पुढची मागची कविता पण किंवा date/time stamp
|
आता बघ
|
सुमती, निनावी, गिरिराज..., करपे.. simod. मस्त अजुन लवकर येउ द्या झुळुकेसारख्या.... वाचाकांना काव्यवाचानाचा लाभ घडतो... आणि तुम्हाला पुण्य... इती...
|
thanks ameya..pan tyanchya itar kavita pan nahi vachta yet aahet ..konta font aahe sangu shakal ka pls ..aani yethil kavita copy paste pan kasha karaychya sangal ka...plz
|
bkshailendra ह्यांच्या font कुठला आहे ते मला ठाऊक नाही... ज्या कविता तुला दिसतात नीट त्या सरळ सरळ copy paste होऊ शकतील. माझ्या कडे एक snag it म्हणून software आहे त्यानी मी तेवढी कविता image म्हणून copy केली आत्ता. पण तुला ज्या वाचायला problem आहे त्याच्या permanant soln साठी mod लोकांना साकडं घालावं लागेल. जर कविता शेजारची देवनागरी खिडकी वापरून लिहिली असेल तर right click view source करून सुधा दिसेल बहुतेक. best way BK Shailendra ह्यांना dev2 font वापरायची विनंती कर.
|
!!श्री स्वामी समर्थ !! स्वामी एकवार ! घ्यावे पदरात ! आस ही उरात ! जागलिसे !! जाहले पुरेसे ! जितुके भोगले ! देहाचे चोचले ! उतू गेले !! आता तरी देवा ! व्हावी उपरती ! मार्ग एक भक्ती ! उरलासे !! मानसपुजेची ! अर्पितो सुमने ! डोळे निरांजने ! ओवाळिती !! माळ एक हाती ! नाम स्मरणाची ! पालखी मनाची ! करोनिया !! आत्मा बंदिवान ! देह कारावास ! पक्षी पिंजरयास ! सोडू पाहे !! योगक्षेम माझा ! तूच वाहिलास ! अंतिम प्रवास ! सुखे व्हावा !!
|
Meenu
| |
| Wednesday, April 26, 2006 - 2:45 am: |
|
|
मस्त वैभव... .. .. . ...
|
आर्त.... वैभव...!!!.. .. .. .. .. . ... .. . . .. .. .
|
Smi_dod
| |
| Wednesday, April 26, 2006 - 2:55 am: |
|
|
वैभव, फारच सुंदर...काल स्वामींची पुण्यतिथी होती ना? अगदी सदगदित झाले...
|
नाही स्मिता आज आहे स्वामींची पुण्यतिथी . म्हणूनच पोस्ट केला आज अभंग
|
Devdattag
| |
| Wednesday, April 26, 2006 - 3:08 am: |
|
|
धन्यवाद वैभव.. भक्तीचाच मार्ग| करी अनुनय| वटवृक्ष स्वामी| करी कृपा||
|
वैभवा,सही रे मित्रा.. छान वाटले ही स्वामींची आरती वाचुन
|
Ruchita
| |
| Wednesday, April 26, 2006 - 6:23 am: |
|
|
वैभव.. आरती वाचुन मन अगदि श्रान्त झाले.... आजच्यादिवशी हि आरति पाठविल्या बद्दल मनापासुन आभार
|
Jayavi
| |
| Wednesday, April 26, 2006 - 7:09 am: |
|
|
वैभवानंद महाराज की जय !
|
Ninavi
| |
| Wednesday, April 26, 2006 - 9:57 am: |
|
|
वैभव, छान आहे अभंग. जया, चिन्नू, माझी चोरी पकडलीस तू बरोब्बर. सगळ्या दोस्तांना धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 26, 2006 - 12:18 pm: |
|
|
निनावि, सविस्तर लिहिले आहे, तु समजु शकशील याची आशा नव्हे खात्री आहे. वैभव, छान, ओव्या, अभंग, हल्ली कुठे कोण लिहितो रे ?
|
hey kunala mazya kavita vachayala problem yeto aahe krupaya saanaga ani help kara
|
Krishnag
| |
| Saturday, April 29, 2006 - 2:55 am: |
|
|
सुख... सुख कशात आहे म्हणून आपण शोधत फिरतो साराकाळ ह्याच्यामागे धावत आम्ही जातो सात समुद्र ओलांडून ह्याच्या शोधात जातो धरती कमी वाटते आम्हा आम्ही नभोमंडळ धुंडळतो सुख कुठे असतं माऊलीच्या मायेनं ओथंबलेल्या नजरेत असतं तिच्या वत्सल हाताच्या स्पर्षात ते असतं मावळत्या दिनकराच्या रक्तीम रश्मीत असतं पौर्णिमेच्या चंद्राच्या अमृतश्रावात असतं कोसळत्या प्रपाताच्या रौद्रावतारात असतं उधानी उधदीच्या गंभीर गाजातही असतं निळ्याश्यार अवकाशाच्या अथांगतेत असतं तर खळाळणार्या सरीतेच्या मधूर धारेतही असतं ऋतुराजाच्या आगमनात पिककुजनी असतं तर ग्रीष्माच्या दाहक तेजातही असतं वळवाच्या धारानंतरच्या मृद्गंधात ते असतं तर मृगाच्या थेंबानं तृप्त वसुधेच्या निश्वासात असतं आषाढातल्या काळ्या कभिन्न मेघाच्छादात असततं तसं श्रावणसरीत डोकावणार्या रविकिरणात असतं तान्हुल्याच्या झबल्याच्या गंधात ते असतं प्रियेच्या कचपाशी माळलेल्या मोगर्याच्या सुगंधात असतं एवढे सुखाचे धन हाती आम्ही अजून काय शोधावे ह्याच्या वर्षावी चिंब होऊनी आत्मारामा निववावे
|
Aditi79
| |
| Saturday, April 29, 2006 - 3:00 am: |
|
|
क्रिश सुरेख कविता आहे
|
Shyamli
| |
| Saturday, April 29, 2006 - 3:29 am: |
|
|
>>धरती कमी वाटते आम्हा आम्ही नभोमंडळ धुंडळतो वाह क्रिश.. .. .. ..
|
Mmkarpe
| |
| Saturday, April 29, 2006 - 12:36 pm: |
|
|
वैभव..... अभंग्; अप्रतिम क्रिष सुख छान आहे
|
Mmkarpe
| |
| Saturday, April 29, 2006 - 12:43 pm: |
|
|
नातं.... असं म्हणतात... एक नातं असतं... दोन समदुःख असणारांत... तेच नातं आहे... तिच्यात... आणि; शोभेकरिता दिवानखान्यात 'बोन्साय' करुन ठेवलेल्या वाढ खुंटलेल्या झाडांत...
|