|
Badbadi
| |
| Thursday, March 30, 2006 - 11:21 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
"ताई..." संध्याकाळी office च्या बस मधून उतरले आणि हाक आली. "वनिता तू, कशी आहेस? पेपर कसे गेले?" वनिता ही आमच्याकडे भांडी घासणार्या मावाशींची दहवीतली मुलगी. "चांगले गेले" "छान. मग आता सुट्टित काय करणार?" मी "अजून नीटसं ठरवलं नाही.. पण ताई, तुम्ही सायकल दिली आणि क्लास चे पैसे भरले म्हणून चांगल्या मार्कांची अपेक्षा आहे. ताई, खरच thanks " "ए वेडे, तू अभ्यास केलास तर सायकल च काय त्यात?" "अस कसं, सायकल नसती तर किति अवघड होतं सगळ मला" आणि मग पाच एक मिनिटे इतर गप्प मारून वनिता गेली.. पण खरcंच सायकल नसती तर किती अवघड होतं मला पण सगळं.. अजून हि आठवते ती दिवाळी... मी सातवीत होते. एव्हाना माझ्या बर्याच मैत्रिणी सायकल चालवण्यात तरबेज होत्या... पण मल मात्र ते जमल नव्हतं. paddale मारताना handle तिरकं आणि handle सरळ धरताना paddle स्थिर बाबा, दादा आणि काका सगळे जण प्रयत्न करून दमले होते.. पण ही कमाल माझ्या एका मैत्रिणीने केली.. एक दिवस तिने फ़र्मान सोडले.. "स्नेहल, तू सायकल शिकल्याशिवाय आपण badminton खेळायचं नाही आणि तुला सायकल मी शिकवणार" झालं.. सुट्टित मस्त badminton खेळाचं म्हणून बाबां कडून १ racket ३ shuttles सगळं आणलं होतं आणि आता तेच जर खेळायच नसेल आणि तेहि सख्ख्या मैत्रिणीशी तर काय अर्थ आहे? मनात म्हणलं.. जाउ दे.. एक दोन दिवस ती प्रयत्न करेल आणि मग देइल सोडून. म्हणून मग पुन्हा एकदा सुरू झाल सायकल शिकणं पुन्हा तेच.. handle आणि paddle यांचा कहि मेळ बसत नव्हता.. वर आणि हसायला माझा दादा आणि तिचा चुलतभाउ होतेच. पण अगदि चमत्कार घडावा तसा सुरूवातीच्या अर्ध्या आसानंतर जरा ताल जमून आला... मग एक एक पुढची पायरी... डावा, उजवा ब्रेक कधी लावयचे, सायकल कशी वळवायची वगैरे झालं.. उजवीकडे वळताना हात दखवून वळताना तर जाम धमाल आली.. उजवीकडे वळून परत लगेच handle सरळ करताच आलं नाही आणि मी सायकल सकट पानवलकर आजींच्या कंपाउंड ला जाउन धडकले सायकल एकदम हळू होती म्हणून जास्त लागलं नाही.. हा माझ्या अयुष्यातल पहिला अपघात मैत्रिणीने अगदि चंग च बांधला होता... त्यामुळे सधरण 4-5 दिवसात मी बर्यापैकी सुटी सायकल चालवू शकले.. घरी तर आश्चर्याचा धक्काच बसला होता. आणि माझ्यापेक्षा जास्त कौतुक माझ्या मैत्रिणीचं होत होतं... मग दिवाळी सुरू झाली. पाडव्यादिवशी फ़राळ करताना बाबा नी एकदम विचरल.. "स्नेहल, सायकल शिकल्यावर कसं वाटतय?" "मस्त बाबा, पण आता शाळा सुरू झाली कि परत माझी practise नाही रहणार ना" "का? आपल्या सायकल वर करायची practise " "दादाच्या?? ती खूप जड आणि उंच आहे.. मला नाही जमणार" "दादाच्या का? तुला घेउ कि.." "काय????" मी आश्चर्याने उडालेच होते. आता या घडीला मला कोणी कितीहि मोठ गिफ़्ट दिलं तरी या क्षणा इतका आनंद होणार नाही. फ़राळ करून लगेच मी, बाबा आणि दादा बुधवार पेठेत गेलो आणि सायकल घेउन घरी आलो. १०८० रुपयची सायकल आनि त्याला ४० रुपयचे कुलूप अशी ११२० रुपयाची माझ्या नावावर पहिली संपत्ती. हो संपत्तीच. कारण या आधी वह्या पुस्तक सोडल तर अशी एकहि वस्तू नव्हती ज्यावर माझं नाव होतं दिमाखात सायकल घरी आणली (दादाने... कारण मल बुधवर चौकातून घरी आणण्याइतपत जमत नव्हती अजून) आई ने छान पूजा केली.. मला जेवणात वगैरे interest नव्हताच.. त्यादिवशी पाय दुखेपर्यंत सायकल फ़िरवली.. मग सुट्टीत दुसरा उद्योग च नव्हता..त्या सुट्टीत badminton ची racket कधीच हातात घेतली नाही.. शाळा सुरू झाली.. माझ्या घरापसून शाळा ४ - ५ कि.मी. वर होती.. आत्ता सारखे school bus सारखे चोचले हि नव्हते.. मी आपली PMT ने जायचे.. पण सायकल आहे म्हणल्यावर बस चा अचानक कंटाळा आला.... पण आई च्या मनात जरा धाकधूक होती.. त्यामुळे सायकल वार लगेच जा अस ती काहि म्हणत नव्हती.. मग एक दिवस मी मुद्दाम बस चुकवली आणि घरी परत आले.. आई ला सांगितलं "बस गेली आत सायकल ने च जावं लागणार.." कमीत कमी १० वेळा सावकाश जा, डावीकडून जा अशा सूचना करून आई ने सायकल वर शाळेत जायला होकार दिला... बास!!! मला अगदी आकाश ठेंगण झालं होतं त्या दिवशी जी सायकल हातात घेतली ती पुढे ८ वर्षे आमची गट्टी होती.. माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस मी या सायकल बरोबर जगले... दहावीचा क्लास, परिक्षा, result ते अगदि TY BCS पर्यंतच्या सगळ्या प्रवासाची साक्षीदार आहे ती. शाळेत असताना मैत्रिणीं बरोबर लावलेली सायकल रेस, मैत्रिणीला दिमाखात डबल सीट घेउन जाताना बरोबर सारास्बागेच्या समोर गणपतीला घातलेलं लोटांगण, पोलिसाने पकडू नये म्हणून त्याच्या समोर रडायचं केलेलं खोटं नाटक. एक ना दोन किती आठवणी १२ वी चे वर्ष अमच्य दोघींसाठी पण महत्वाचे होते. माझ्यासठी कारण college आणि क्लास मिळून माझं रोज २१ कि.मी. सायकलिंग व्हायचं आणि तिच्यासाठी अशाकरता कि या सगळ्यात कधी पंक्चर होउन रुसणे तिला शक्य नव्हते. पण केवळ १२ वी तच काय.. माझ्या सायकल ने मला खरच कधी त्रास दिला नाही.. अगदि आयत्यावेळी पन्क्चर झाली, valve गेला असं कधीच झालं नाही.. कित्येकदा तर दोन दोन दिवस मी साधं फ़डक हि फ़िरवायचे नाही.. पण त्या बिचारीने कधी त्याचा बदला घेतला नाही. खरी मजा यायची पावसाळ्यात.. पाउस पडला कि ती एकदम बेधुंद व्हायची... आणि मग कितीहि प्रयत्न करा ती ब्रेक ला न जुमनता चालत राहायची. अशाच एका पवसाळ्यात टिळक रोड च्या खड्ड्यात आम्ही दोघी पडून डुंबलो होतो. माझा रेनकोट फाटला.. पायाला खरचटल आणि सायाकल च handle वाकडं झालं. पावसाळ्यात ब्रेक न लाआल्यामुळे समोरच्याला धडक वगैरे तर बर्याचदा मरली... उन्हाळ्यात सायकल वर येउन उसाचा रस पिण्याची मजा तर अहाहा!!! मी आणि माझ्या सायकल ने बरच enjoy केलं.. college च्या पार्किंग मध्ये सावलीत च सायकल लावयची म्हणून केलेलं भांडण, college days मध्ये पहिल्यांदा एका मुलाने propose केलेला क्षण, lecture बंक केल आणि एकदा पकडले गेले तेंव्हा सायकल पन्क्चर झाल्याचं केलेलं नाटक अश बर्याच गमतीशीर प्रसंगाची माझी सायकल साक्षीदार आहे. बर्याच गोष्टी अशा आहेत कि ज्या मी सोडून फ़क्त तिला माहित आहेत. कारण मी बाहेर कुठेहि गेले तरि ती माझ्यासोबतच असायची तिच्याबरोबर मला एकदाच खूप भिती वाटली.. क्लास वरून घरी येत होते.. रात्री ८ ची वेळ असेल.. आणि अचानक रस्त्यावरचे light गेले... (अंधारा ची मला आज हि प्रचंड भिती वाटते..) आणि त्यातच कुठून तरी २ - ३कुत्री पळत आली.. झालं.. माझी अशी तंतरली होती... अंधार आणि कुत्री.. घाम च फुटला होता मला... पुढे मग graduation पूर्ण झालं.. masters ला University मध्ये admission मिळाली. University बरीच लांब होती आणि मला आता गाडी छान चालवता येत होती. म्हणून मग PG पासून सायकल ची साथ तूटली.. अधून मधून कधीतरी एखादी चक्कर मारायचे पण मग नंतर practicle, projects या धावपळीत काहिच जमेनासं झालं. college संपलं कि मग लगेच job .. चक्र चालू होतं.. सायकल वार धूळ च काय, जळमट जमा झाली होती.. हवा जाउन टायर पार बसले होते. बागेत काम करताना आई ला दर वेळी सायकलची अवस्था दिसायची.. एकदा चिडून ती म्हणाली "तू वापरत नाहीस तर विकून तरी टाकूयत सायकल" सायकल विकायची?? मला अशक्यच होतं.. ८ वर्षे जिने साथ दिली तिचा बाजार.. नाही. नेमका त्याच दरम्यान एकदा वनिता भांडी घासयला आली.. तिच्या आई ला बरं नाही म्हणून परिक्षेच्या वेळी अभ्यास सोडून तिला यावं लागलं होतं. तिच्याशी बोलता बोलता कळलं कि ती ८ वी त आहे आणि चालत शाळेत जाते. मी विचरलं "तुला सायकल चालवता येते?" "हो. पण सायकल घेणे परवडणार नाही." "माझी सायकल आहे. तू चलवशील?" "ताई, पैसे किती लगतील?" "खूप म्हणजे असं आहे.. सायकल एका अटीवर मिळेल.. दर व्रषी चांगल्या मार्क मिळवायचे आणि मल पेढे आणून द्यायचे." "नक्की" वनिताचा चेहरा उजळला.. लगेच दुसर्याच दिवशी तिच्या वडिलांबरोबर येउन सायकल घेउन गेली. माझी सायकल आता तिला मदत करतेय.. वनिता ची पण ५२% टाक्यावरून ५८% पर्यंत प्रगती झाली आहे. १० वी त ती first claas ची अपेक्षा करतेय.. सायकल सुटली, मग बाईक चालवू लागले.. आता अधून मधून कार.. पण कशातहि सायकल ची मजा नाही.. कदाचित वयाचा दोष असेल.. गाडीवर मी कायमच एकटी राहिले... सायकल वर माझ्या सोबत नेहमी मित्र मैत्रिणी असायच्या... आता सगळंच बदललं... कदाचित परत सायकल चालवायची म्हणलं तर मला पहिल्यासारखीच भिती वाटेल. पण सायकल मात्र तशी च आहे.. तिने वनिताला पण कधी त्रास दिला नही... तो तिचा स्वभाव च नाही
|
१०८० रुपयची सायकल आनि त्याला ४० रुपयचे कुलूप अशी ११२० रुपयाची माझ्या नावावर पहिली संपत्ती. >>> बडे छान लिहीले आहेस. एकदम अनेक वर्ष मागे गेले मन. Nostalgic माझी सायकल ही ६० रुपयाची होती. Herculas. आधी वडीलांनी वापरली. मग जेंट्स सायकलची दांडी कापुन लेडीज करण्यात आली. ती दोन्ही भगिनींनी वापरली मग मी. लेडीजची जेंट्स करता ना आल्याने तशीच. खूप हसायची बरोबरची मुल मला पण पर्याय नव्हता. माझ्या जन्माच्या वेळी घेतलेली सायकल ३० वर्ष वापरुन ९० रुपयांना विकली खरी पण आजवरच्या अयुष्यात केलेला सर्वात घाट्याचा सौदा होता तो. ![](/hitguj/clipart/sad.gif)
|
Champak
| |
| Friday, March 31, 2006 - 5:37 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
लिखान मस्त आहे एकदम! मी काॅलेजला, ११ वी १२ वी ला सायकल वर जात असे. ३ कि मी रस्ता लै खराब असायचा, अगदी बांधा बांधा नी सायकल पळायची! आम्ही ४ मित्र असायचो! मग मोटो क्राॅस सारखी सायकल क्राॅस स्पर्धा करायचो!
|
Psg
| |
| Friday, March 31, 2006 - 6:02 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बडे, खरच छान लिहिल आहेस! अगदी मनापासून!
|
Meenu
| |
| Friday, March 31, 2006 - 6:33 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मस्त लिहीलय अगदी.... .. .. ..
|
बडे सही लिहिलंय. खरंच सायकलीशी ते दिवस असतात ना जोडलेले. ती अटॅचमेंट नंतरच्या possessions शी नाही होत.
|
Lampan
| |
| Friday, March 31, 2006 - 8:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सायकल सगळ्यात आवडतं वाहन आहे माझं .. आवाज नाही गोंगाट नाही .. सही मजा येते चालवताना .. १दा मी आणि माझे २ मित्र .. आम्ही औरंगाबाद ते भंडारदरा प्रवास केल होता थंडीत ती हाडं गोठवणारी थंडी गडद काळोखी रात्र लांब पसरलेला पिवळा गवताचा माळ आणि आमचा छोटासा टेंट असं सगळं डोळ्यासमोर आलं ...
|
Zelam
| |
| Friday, March 31, 2006 - 8:28 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मस्तच लिहिलं आहेस ग बडे
|
मस्तच लिहिल आहेस ब. मी सायकल चालवायला चौथीत शिकले. ते पण मैत्रीण शिकली आणि मला कशी जमत नाही म्हणून.. हाफ़ पायडलींग करता करता चुकुन सीटवरच बसले आणि सायकल जोरात पळत सुटली. कारण अजून ब्रेक कसा मारायचा शिकले नव्हते. खुप धडपडले मी माझ्या सायकलवरून.. सही ग जुने दिवस आठवले परत
|
Gautami
| |
| Friday, March 31, 2006 - 11:26 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बडी, खुपच छान लिहले आहेस. एकदम मला २० वर्ष मागे नेऊन सोडलसं. मी सायकल माझी माझीच शिकले. खुप वेळा पडले. दोन्ही ढोपरं फोडुन घेतली होती. माझ्या सासुबाई ची गोष्ट मात्र तुझ्यासारखी आहे. मैत्रिणी च्या हट्टाखातर त्या सायकल शिकल्या. अजुनही तिची आठवण काढतात तिच्या मुळेच मी शिकले म्हणून.
|
Ninavi
| |
| Friday, March 31, 2006 - 11:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बडबडी, छान लिहीलंयस... ... ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
बडे, मस्तच.. शाळा कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली... पुण्यात सायकलने सिग्नल तोडला तर पोलीस चाकातली हवा काढायचे.. रडायचं नाटक?... हम्म् चांगली कल्पना आहे...
|
Maanus
| |
| Friday, March 31, 2006 - 3:07 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मस्त लिहीले आहेस ग... माझी पहीली सायकल कोणीतरी चोरली, अजुन सापडली नाही.
|
Chinnu
| |
| Friday, March 31, 2006 - 3:42 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बडी.. तुल काय हव ते बक्षिस! माझी लाडकी सायकल आठवली. माणसा, माझीपण पहीली सायकल चोरिला गेली रे.. दुसरी आणली पण पहीली सायकल ती पहीलीच!
|
बडे,सहीच.. एकदम छान वाटले वाचुन.. मै और मेरी सायकल अक्सर ये बाते करते थे...
|
Madhurag
| |
| Saturday, April 01, 2006 - 5:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बडी, छानच लिहीलं आहेस. माझी सायकल आठवली जिच्याबरोबर मी पण अशीच ६ वर्ष बागडले आहे.
|
Dineshvs
| |
| Saturday, April 01, 2006 - 10:18 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बडबडी, आज गुलमोहर मधे सगळे छान लेख वाचायला मिळाले.
|
Saj
| |
| Saturday, April 01, 2006 - 5:44 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बड बडे खूप छान लिहिलेस. ४ चा चहा पिताना वा चाय ला मजा आली. आणि हो माZए सायकल शिक्ण्याचे असफ़ ल झालेले सग्ळे प्र य त्न आठविले आणि मला अजुन ही साय कल चाल व ता येत नाहि ग.
|
बडे, छानच लिहीलयंस! मी पण माझ्या सायकलशी किती attached होते ते इतके दिवस जाणवलच नव्हतं! आज हे वाचल्यावर मलाही एकदम सायकलवरचे दिवस आठवले... ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
Jayavi
| |
| Sunday, April 02, 2006 - 9:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बडबडी, खूप छान लिहिलं आहेस गं ! खरं म्हणजे आपल्या किती छोट्या छोट्या गोष्टीत जीव अडकला असायचा ना त्यावेळी..........तसा अजूनही असतोच म्हणा, पण त्यावेळची गोष्टच वेगळी होती ना. मी सायकल माझ्या आईकडून शिकली.....माझी लेक पण तिच्याकडूनच आणि आता lastly माझा मुलगा पण तिच्याचकडून सायकलनंतर लुना, मग चेतक, मोटरबाईक अशी प्रगती झाली पण सायकल हाणण्यातली मज्जा काही वेगळीच. माझी निळी होती हर्क्युलस. खूप गोड आठवणी जाग्या केल्यास.
|
Badbadi
| |
| Sunday, April 02, 2006 - 11:32 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सगळ्यांना धन्यवाद माझ्या पहिल्या वहिल्या लिखाणाचं इतकं कौतुक केल्याबद्दल
|
Krishnag
| |
| Monday, April 03, 2006 - 1:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बडी, छानच!! उत्तम लिहलय!! ![](/hitguj/clipart/happy.gif)
|
वा! चान्गल लिहिल हे! कान्द्या, हल्ली दर तासाला भाड किती असत रे सायकलीच? ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Gs1
| |
| Monday, April 03, 2006 - 5:28 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बडबडी, छानच लिहिले आहेस
|
|
|