|
बडबडी छानच लिहिल आहेस ग. माझे ही सायकल शिकण्याचे असफ़ल प्रयत्न आठवले... पण मी एकदाही पडली नाही, ती सायकल मात्र फ़ार वेळा आदळली...
|
Ekrasik
| |
| Tuesday, April 04, 2006 - 4:18 pm: |
|
|
मस्त वाटले वाचुन सायकल भटकन्ती आठवली सगळी. चालवत नसुनही अनेक वर्श सायकल ठेवुन दिली होती.
|
Jit
| |
| Wednesday, April 05, 2006 - 11:08 am: |
|
|
मस्त वाटल बडे वाचून. मी अमेरिकेत येइपर्यन्त सर्वत्र सायकलच घेउन फ़िरायचो. मुंबैच्या ट्रॅफ़िक मधे सायकलच बेस्ट. २ वर्षापुर्वी पर्यन्त होती ती घरी. भारतात गेलो की रोज चालवायचो.
|
ब ताई. मस्तच ग. मलाही माझी सायकल आठवली. इतर मुलं ३री ४थीत शिकतात. सगळ्यांचे सायकल शिकवण्याचे प्रयत्न हाणुन पाडत, मी ७ वीत सायकल चालवायला शिकली. सगळे टिन्गल करायचे अरे हिला सायकल येत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे सोलापुरला गेली. तिकडे ताईची जुनी सायकल अशीच पडुन होती. आजुबाजुच्या मुली सन्ध्याकाळी सायकल खेळायचा मी ही जायला लागले. मग माझी मीच सायकल चालवायला शिकली. रोज येवुन मावशिला सान्गायची आज इतकी इतकी प्रगती झाली. पाव पायडल मारण्यापासुन सुरवात केली. गम्मत म्हणजे मी शिकतान्ना कधीच पडली नाही नन्तर मात्र बरेचदा ... मग १० वीला लुना मिळाली. सायकल तशीच पडुन होती. मधेच लहर आली की टायर ट्युब बदलुन आणायची पण पुन्हा ती पडुन राह्यची. विकायच म्हणलं की मन नाही मानायच. माझी पहिली सायकल ना ती. आणि सेम लुना साठी ही. अजुनही लुना आहे. ती विकावी वाटत नाही. पण नुसतीच पडुन असते. कधितरी दुरुस्ती करुन आणते. पुन्हा ....
|
Milya
| |
| Sunday, April 23, 2006 - 4:55 am: |
|
|
बडे छानच लिहिले आहेस गं.. कित्येकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या ह्यातच काय ते आले
|
|
|