Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 21, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » विनोदी साहित्य » अपराध » Archive through April 21, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Wednesday, April 19, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

-हॆलो .. जोशी बोलताय का?
-बोलतोय खरा पण कुठले जोशी हवे आहेत?
-ते कविता वाले
-कविता वाले? अहो काय वडेवाले जोशी सारखं आहे की काय ?
-तेच हो कविता लिहीणारे वैभव जोशी
-हं.. बोला ! मीच तो , आपण?
--मी मॊडरेटर ...
-काय काय नावं निघालित ना आजकाल? तुमचे आईवडील मी माझा
वाचायचे का?
-ओ .. नाव नाही मी मायबोलीचा मॊडरेटर बोलतोय
-(उठून उभा रहात) ओ हो हो .. आधीच नाही का कळवायचं तुम्ही फोन
करणार आहात म्हणून . घरी थांबलो असतो
-अहो हा मोबाईल आहे ना?
-अरे हां ! विसरलोच . माफ करा बरं का. पण जरा विचित्रच आहे हे
-काय? विचित्र काय?
-नाही , मोबाईल च्या स्क्रीनवर लाल पाटी नाही आली आज.
-हां हां ते होय , तो मोड ऒफ़ आहे आज
-मग घेऊ का टाकून ?
-काय?
-चारोळ्या हो . धडाधड !
-नको नको . आधी ऐका
-वा वा ! तुम्ही पण का? ऐकवा ऐकवा !
-(हताश ) अहो चारोळी नाही . बोलणं ऐका
-अस्सं होय , मला वाटलं इतक्या वाचून आपोआप रिमिक्स तयार झालं की काय
-फोन अशासाठी केलाय की आजकाल आम्हाला खूप फोन येतायत .
-वा ! काय सुटसुटीत बोलता तुम्ही
-तुम्हाला गद्य समजतच नाही का? पूर्ण ऐकून घ्या आधी
-ओके ओके , बोला
-तर आजकाल आम्हाला खूप फोन, मेल्स येतात
-मला फॆनमेल्स येतात
-जोशी , प्लीज ! अश्याने बिल वाढेल . आयएसडी कॊल आहे
-सांगता काय? तिकडून बोलताय?किती नं चे मॊड तुम्ही?
-मी तीनतेरा
-म्हणजे?
-दिवसा तीन रात्री तेरा
-म्हणजे आमच्या दिवसा कुठला नं?
-ते मह्त्त्वाचं नाहिये हो .
-असं कसं म्हणता साहेब?आपल्या बाजूचे कुठले कळायला नको?
-जोशीSSS प्लीज ऐकून घ्या.
-ओके ओके . सॊरी ! (पण जाण्यापुर्वी 'बाजू' स्पष्ट केलीत तर...)
-हं. तर तुमच्याबध्दल तक्रारी वाढल्या आहेत.
-हो? तक्रारी? असं काय केलं मी?सांगा तरी तक्रारी
- एक का दोन , ऐका
१)तुम्ही कवितेच्या बीबीवर दादा , गिरी करता
-२)मूडी वागता
-३)ही एक स्पर्धा समजून कायम वि'जया' कडे लक्ष असतं
-४)बीबी चे बापू असल्यासारखं वावरता
-५)तुमची ही छपाई बघून लोकांना तुम्ही 'मुद्रा' राक्षस वाटताय
-६)दिवसातून कितीतरी वेळा लोकांना कवितेचा 'प्रसाद' देता
किती सांगू ..
- ह्या सगळ्या तक्रारींच्या मेल्स निनावी असणार
-प्रश्ण तो नाहिये . आम्हाला ह्यात तथ्य आढळलंय आणि त्याचं कारण ही शोधलंय आम्ही.
-काय सांगता? म्हणजे... सांगता का कारण?
-हं. तर कारण आहे तुमचा कविता पोस्ट करण्याचा सपाटा
-हे? हे कारण?
-हो हेच कारण
-मग तुम्ही ह्यावर उपायही शोधला असेलच
-अर्थात.फोन करायचं कारण तेच आहे
-ते? मग इतका वेळ काय बोललो आपण?
-अहो , म्हणजे हे सगळंच मह्त्त्वाचं आहे
-ओके . बोला.
-तुम्हाला एक वाहता बीबी दिला जाईल. सेपरेट. तिथे तुम्ही
पोस्ट करायच्या कविता.
-काSSSSSSSSSSSय? अहो..
-ऐकून घ्या. तुमच्या कविता जनरली लांबलचक असल्याने तुम्ही
पोस्ट केल्याकेल्या एका प्रतिक्रियेपुरता वेळ देण्यात येइल. मग
गाडी पुढे सरकेल.
-म्हणजे?
-म्हणजे कविता वाहून जाईल. प्रतिक्रिया राहील. इतरांना ती वाचून
प्रतिक्रिया देता यावी म्हणून.
-ओ मॊड. हे काय काढलंय. हा अन्याय आहे.
-अन्याय काय त्यात. आम्ही तुम्हाला स्पेशल जागा देत आहोत.
-अहो पण प्रतिक्रिया वाचून काय लिहीणार लोक?
-का? जनरली तसंच घडतं. पूर्ण कविता कोण वाचत बसतंय?
-मला काही सुचेनासं झालंय.
-काय सांगता? मग ठीकच झालं. हे कष्ट वाचले आमचे.
-अहो सुचेनासं म्हणजे बोलायला सुचेनासं.
-ओह ! असं होय. मी किती खुश झाले होते.
-झालेSSSSSS होतेSSSSSS? बाई, माणूस?
-हो. दोन्ही. आवाज मोड्युलेट केलाय. आम्हाला गुप्तता
पाळावी लागते.
- अगम्य, अतर्क्य घडते आहे
-हे पद्य आहे की गद्य?
-गद्यच हो. असं काय विचारताय?
-नाही. बोलायचं की ऐकून सोडून द्यायचं कळायला नको?
-बोला बोला म्हणजे बोलून घ्या. तुमचे दिवस आहेत आणि हो तुमच्याच रात्री
पण आहेत. काय हो? एक प्रश्ण विचारू का?
-लवकर. बिल वाढतंय.
-असू द्या हो . पहिल्यांदातर बोलतोय आपण.काय हो , तुम्ही असं
रात्रंदिवस पडीक असता. मSSSSSSSSSग भागतं कसं?
- तुम्हाला कशाला हव्या आहेत चांभारचौकशा?
-अहो असं चिडताय काय? काळजी वाटली. शेवटी आपण फ़ॆमिलीमेंबर ना
-असो ते मह्त्त्वाचं नाहिये. तर मी जे काही सांगतोय ...
-सांगतोय? अहो इतका वेळ कुणीतरी सांगत होती. गोची आहे.
तुम्ही कोण आता? सात बारा का?
-अहो मी तीन तेराच आहे.विसरले होते की तुम्हाला कळलंय ते.
-तुम्हाला खरं सांगू का? तुम्हाला ही गुप्तता जमत नाही. लोकांना
स्टोर्वी...आपलं स्टोरी कळून जाते
-एक मिन. तुम्ही आत्ता काय नाव घेतलंत?
-नाव? अहो नाव नाही काही. लोकांना खरी गोष्ट कळून जाते
इतकंच म्हणालो मी.
-हुश्श ! घाबरलो मी.
-घाबरलो ! आता हे परस्पर पंच्चावन्न कधी झालं?
-शट अप ! धिस एंट फनी.
-एंट? यूरेका SSSS आपलं यू.एस का?
-हं. तुम्ही कवीपण आणि हुशार पण असं कसं?
-असू शकतं की. तुम्ही नाही का ? तीन पण आणि तेरा पण?
बाईपण आणि बुवापण?
-बाई गं ! अवघड आहे बुवा !
-आयला तुम्हाला कसं कळलं?
-आता काSSSSSSSSSय?
-माझं लाडाचं नाव बुवा आहे ते?
-मला कुठे कळलं? मी सहज म्हणालो ले , ली , लं , लः
-लू
- प्लीSSSSSSज जाऊन या. त्यात सांगायचं काय
-नाही नाही. ते ल च्या बाराखडीतलं राहिलेलं...
-देवा
-त्याची पण आली का तक्रार?भेटू दे कोथरुड्वर , गज़लनेच मारतो
-नो नो. तुम्ही अशक्य आहात.
-आता तुमच्यापासून काय लपून राहिलंय. माझाच हा पण आय डी..
-अय्या ! सॊरी , आयला ! मरू दे ..अय्याच ! अहो मी आयडी चं
काही बोललेच नाही.
-अरेच्च्या ! असं झालं होय. मी तेच म्हणणार होतो "माझाच हा पण
आयडी ह्याचा काय पुरावा आहे?
- व्हेरी क्लेव्हर
-हा नाही. इंग्लिश नाही आवडत मला.
-अशक्य जोशी ,मूळ मुद्दा बाजूलाच राहिला
-ओ बाई/साहेब , ऐका ना, असं नका करू . मी असं करू का?
तासाला एकच टाकेन कविता.
-नो म्हणजे नॊट.आमचा निर्णय झालेला आहे.
-ठीक आहे . निर्णय झालाच म्हटल्यावर मी काय बोलणार?

--------
-------
------
-हॆलो ... जोशी का?
-हो आपण?
-मी एक नं मॊडरेटर
-हो का? तुमच्यात पण असते का मॊडरेटर चॊईसची स्पर्धा?
-नो. नो. मी मॊडरेटर नं एक.
-काय हो?म्हणजे तुम्ही खरे डेव्हिड धवन का?
-विनोद !!!
-काहीतरी लोच्या आहे लाईनमध्ये. अहोSSSS,डेव्हिडSSSSS.
विनोद नाही.
- अल अत्र हुल्ल हुश्शे हबीबी
- आयला ! तिकडून बोलताय ? मग तर पत्ताच नाही लागणार कुणी बुरखा घेतलाय ते
पण एक सांगा. ह्या कानात ज्या गोळ्या घुसल्या त्याचा अर्थ काय?
-म्हणजे चुप बसा आणि ऐका नाहीतर...
-
-
-जोशी , ओ जोशी
-फुस्स
-जोशीSSSSS बोला ! नाहीतर..
- हे बरंय. दोन्हीकडून.. ओह ! म्हणूनच मला मॊडच्या पोस्टची ऒफर येत
नाही होय !
-अजून बरेच क्रायटेरियाज आहेत.
-उदा?
-तुम्ही भारत सोडायला तयार आहात का?
-नाही. भारत माझा देश आहे ...
-मग विषय मिटला.
-तुमची प्रतिद्न्या वेगळी आहे.
- तसं समजा. आणि ऐकाSSSSSSS.
-लावणी आहे? फक्कड रे !टिण टिण टिण टिण ,टिणटिण टिणटिण
-अहो तसं ऐका नाही , नुसतं ऐका
-हे जरा जाचक होतंय असं वाटत नाही? असं बोला, तसं ऐका
इथे लिहा , तिथे लिहू नका. तुम्ही जी यु आय बेस्ड का वागत नाही?
युजर फ्रेंडली?
-ओके. मेरे भाई ...
-एक मिन. तुम्ही ती असाल तर असं म्हणू नका आणि तो असाल
तरीही असं घाबरवू नका
-तुमचे कविता बीबी वरचे हक्क आधीच काढून घेतले आहेत आणि आता
नव्या नियमाप्रमाणे सर्व वाहते बीबी बंद करायचे ठरले आहे त्यामुळे ह्यापुढे
तुम्ही दुसरीकडे काळं करा. इतकंच सांगायला आलो , ली . हुश्श दम्लं
शब्द संप्लं.
- हे शेवटचं कळालं नाही.
-ते महत्त्वाचं नाहिये.
-भाई बहन माता पिता पुत्र पुत्री , तुम्हा सर्वांचं मिळून मला हे रेगिस्तान..
आपलं कारस्थान वाटतंय, नव्हे खात्रीच आहे
-कसलं कारस्थान? काय बोलताय काय तुम्ही
-नक्की. माझा असा अंदाज आहे की आता जे कविता बीबी वर वावरतायत
ते सगळे तुमचेच आयडी आहेत. तुमच्या कविता टाकायला हव्या म्हणून
तुम्ही माझा काटा काढलात. अरे हो , नक्की , असंच ....
परवा मी एक उजवीकडून डावीकडे लिहीलेली कविता पाहिली
तुमचीच असणार ती.
-मि. जोशी.
?
-मला तीन तेरा ने सावध केलंच होतं तुमच्या कल्पना अचाट असतात
म्हणून . असो. जाण्यापुर्वी एखादी कविता ऐकवा. पण छोटी. वेळ नाहिये.
- वा वा ! नक्की. ऐका.
"अन मग तुझ्यासोबतच्या
एका क्षणांत एक एक आयुष्य जगताना
विसर पडत जातो
आयुष्य क्षणभंगूर असल्याचा ..."
-वा ! मस्त आहे. पण असा विसर पडू देऊ नका
-???
-एक मिन. मी दुसरया फोनवर बोलतोय. हॆलो? सातच्या आत घरात?
एक्का बोलतोय. तीनतेराचा अंदाज खरा निघालाय. कळलंय त्याला
कारस्थान. तू आहेस ना तिथे? उडव.
-अहो एक , दोन , तीन , चार , शंभर...
-भरली रे जोश्या , शंभरी भरली. क्षणभंगूSSSSSSSर, हा हा हा
ढिच्क्यांव .
डन ...



Moodi
Wednesday, April 19, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव ssssss
मला कशाला मध्ये घेतलरे? घेतले ते घेतले अन जाम तीन तेरा चार बारा वाजवुन सात बाराचा उतारा दिला..
rofl

Ninavi
Wednesday, April 19, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मस्तच... ... ...

Lopamudraa
Wednesday, April 19, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.... काय म्हणु तुला...

Milindaa
Wednesday, April 19, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला यात शब्दच्छलच जास्त दिसला. थोडीफार करमणूक झाली हे ही खरं.

Anilbhai
Wednesday, April 19, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अय्या, I mean च्यायला, अपुनके साथ पंगा?. व्ह्याय भौ? I mean वैभव, ये दुश्मनी बहोत महंगी पडेगी :-)

Vaibhav_joshi
Wednesday, April 19, 2006 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बस क्या अनिल्भाय !!! बच्चेने मजाक किया तो कायकू डरा रहे हो .
मेरेकू इधर वावरना मुश्किल होयेगा . अकेले को खिंड में मत गाठो हां ...


Kmayuresh2002
Wednesday, April 19, 2006 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,जबरी रे भो.. आवडलं आपल्याला:-)

Devdattag
Wednesday, April 19, 2006 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव..:-).. माझी तक्रार नाही रे काही..:-)

Kandapohe
Thursday, April 20, 2006 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्दच्छल नव्हे रे भावु (मिलींद) शब्द वैभव म्हण. क्लिपआर्ट (नाक पुसत असलेला कांदा)

Psg
Thursday, April 20, 2006 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय गोंधळ घातलाय एकट्यानीच!!!

Cool
Thursday, April 20, 2006 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कवितावाले जोशी
वैभव सहीच


Sanghamitra
Thursday, April 20, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव
म्हणजे कविता बीबीनंतर आता विनोदी साहित्यावर स्वारी का?
झकास जमलंय.


Maudee
Thursday, April 20, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यान्चे reply वाचून मला खूप उत्सुकता आहे हे नक्की काय लिहिले आहे त्याची. माझ्या इथे font नीट दिसत नाहीये. कोणी brief करु शकेल का?

Prajaktad
Thursday, April 20, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा! एकदम झक्कास बर का!
मूडे!तुला इतक्या चांगल्या स्माईली कुठुन मिळतात?.


Ameyadeshpande
Thursday, April 20, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव काय रे <\ clipart{office madhlya cube madhe aavaj na karta khadakhada hastoy}

Giriraj
Friday, April 21, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय रे,इतके दिवस कविता पाडायचे software होते आता गद्या लिहायचेही develop केलेले दिसते तू तर!
तू ऑफ़िसात नसतांना उडवतो बघ ते s/w आता मी!


Vaibhav_joshi
Friday, April 21, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे गिरया तुला आठवत नाहिये का ? मागच्या आठवड्यात तू स्वतःसाठी दोन चार कविता बनवून घेऊन गेलास
तेव्हापासून ते s/w करप्ट झालंय ... घाबरू नकोस आता . :-)


Ramachandrac
Friday, April 21, 2006 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवभाई. सही है भिडु बोले तो एकदम झक्कास्SSSS

Jo_s
Friday, April 21, 2006 - 4:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

-हॆलो .. कवितावाले जोशी बोलताय का?
-हो, तुम्ही कोण
-मी? त्याच्याशी तुम्हाला काय करायचय?
-अरे व्वा, माझी शंभरी भरवता तेही शेवटची इच्छा न विचारता. आता सगळे मोड्युलेटेड आवाज ओळखतो मी. तुम. . .
-हो मग, तुम्ही परत कविता पोस्ट करायची इच्छा व्यक्त केलीत तर.
-मग आता सुटलात अस वाटल की काय. आता अतृप्त कविता सॉरी इच्छा पुर्ण करायला येणारच. आता नुसत्या कविताच नाही गद्यही. एक नमुना बघीतलाच आहे वरती. .. . .
-(स्वगत बापरे आता आॅन्टी वैभव पाॅकेज टाकाव लागणार)

दिवे घ्यारे भो

वैभव लै खास.

जोशी सॉरी सुधीर सॉरी






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators