Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 20, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » काव्यधारा » कविता » Archive through April 20, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Tuesday, April 18, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापु, जयावी... आवडल्या कविता... !!!!

नविन मुलांनो देवनागरीच्या खिडकिवर टिचकी मारा. आणि लिहायला लागा.


Devdattag
Tuesday, April 18, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शैलेन्द्र, जयावि कविता मस्त आहेत..
वैभव कविता पोस्ट करतोयस ना झुळुक वरची इथे..


Vaibhav_joshi
Tuesday, April 18, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे टाकेन देवा नंतर ... मला गिरयाने आठवड्याला एक पोस्ट करायची असा दम भरलाय :-)

Dineshvs
Tuesday, April 18, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, असं गिर्‍याला घाबरुन कसं चाले ? त्याला मी बघुन घेईन. तुला हव्या तितक्या कविता लिहि, सुचत असतील, तर थांबायचे का ?

Ameyadeshpande
Tuesday, April 18, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग कुठे गेला रे???

Vaibhav_joshi
Tuesday, April 18, 2006 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तथास्तु ....

हात जोदुनी सद्भावे
मग बोलतो ईश्वरा
चित्त नसे थारयावर
घ्यावे पोटाशी लेकरा

परी जाणतोस तू ही
असे प्रामाणिक सेवा
मनोभावे दास तुला
रोज आळवितो देवा

मंत्र उच्चाराया जातो
शब्द वेगळे स्फुरती
सुचे नवे नवे काही
म्हणू पाहता आरती

मंद हासुनी तथास्तु
बोले कर्ताकरविता
आणि प्रसाद म्हणूनी
मिळे नवीन कविता


Ameyadeshpande
Tuesday, April 18, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव :-)
अरे ह्याला मस्त चाल लावली तर आरतीच म्हणायची की रे!!!
परत नेहमीसारखीच अप्रतीम :-) अशक्य आहेस तू :-)
नैवेद्य कशाचा दाखवतोस तू सांग बघू जरा?


Dineshvs
Tuesday, April 18, 2006 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, छान आहे. मला नेहमी वाटत आलेय कि कविता आणि गाण्यांच्या चाली, या कुठल्यातरी अलौकिक शक्तिमुळेच स्फुरत असाव्यात.

Suresh_khedkar
Wednesday, April 19, 2006 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' जगी ज्यास कोणी नाही ' ह्या जुन्या भावगीताचे विडंबन

जया अंगी गुण नाही त्यास वशिला आहे
जगी सर्व नालायकीचा, तोच भार साहे

शाळा सोडुनि ती दिधली कुणी प्रायमरीत
तरी राजकारणी तो वाढला जोमात
शिक्षणमंत्री म्हणूनी त्याची कोनशिला आहे
जया अंगी गुण नाही, त्यास वशिला आहे.

प्रा. सुरेश ख़ेडकर, नागपूर


Ruchita
Thursday, April 20, 2006 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,दिनेश, जया,गिरया, लोपा, मिनु..... ए मला पन तुमच्य ग्रुप मध्ये यायचे आहे, मायबोलि वरच्या तुमच्या सगल्या पोस्तिन्ग्स मी वाचल्या आहेत, अगदि कथान पासुन कवितान पर्यन्त. खुप खुप आवदल्य आनि आवदत आहेत. म्हनुनच येथे तुमच्या साथी माज़्या दोन ओली... ... मैत्रि म्हनजे दोन मने जोदनरा सेतु... मैत्रिचा दुसरा अर्थ मी आनि फक्त तु

Giriraj
Thursday, April 20, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुचिता,आमचा वेगळा असा ग्रुप नाहीय काही.तू इथे नियमित येत रहीलीस की आपोआपच ओळखी वाढतील.

ड असा लिही Da
ण Na
अनुस्वार असा दे.. आंबा= aaMbaa


Lopamudraa
Thursday, April 20, 2006 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुचिता... " जो भी मीला प्यारसे हम उसिके हो लीये.. " group वैगैरे कहि नहि ग.!!!

Ruchita
Thursday, April 20, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु दिलेल्या माहितीबद्दल मनापासुन आभार गिरया. मला खरच लिहिताना तो प्रोब्लेम येत होत. पण आता मी तसेच करेन.

तु दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोपा :-)


Vaibhav_joshi
Thursday, April 20, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SEE YOU ....

कारण काहीही असो ...
पण निरोप घेताना
तट तट तुटतंच की काळजात .
पाय निघण्याआधीच
डोळ्यांत साठू लागलेल्या असतात
उद्यापासून त्रास देणार्‍या,
तरीही जपाव्याश्या वाटणार्‍या
कालच्या आठवणी ....
मग अनिवार्य होउन बसतं
त्यांना वाहू न देता
सांभाळून ठेवणं ...
हो ! उद्या कुणी विचारलंच
" काय मिळवलंस ? "
तर
बघता तरी येतं
नजर उचलून ....


Himscool
Thursday, April 20, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो जोशी, तुम्हाला मॉडरेटनी दिलेली सूचना अमलात आणायचा विचार करत आहात काय? एकदम 'सी यू' च्या गोष्टी करायला लागलात!

Lopamudraa
Thursday, April 20, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरोपाचा क्षण

डोळ्यांच्या ओलसर कडा..
लपवता लपवता वेळ येते..
नजरेची भाषा अबोध होउन जाते,
आणि हलणारा हात दिसेनासा
होण्याआधी पाठ वळते..
हळवा श्वास उष्ण झरा बनुन
सगळ्या अडथळ्यांना वळसा..
घालुन वहात राहतो..
थरथरते ओठ खारट होतात..
चिवचिवते मनपाखरु...
पंख मिटुन निश्चल पडते..
काल आणि उद्याही आठवत नाही
फ़क्त मिटुन घ्यावा हा क्षण नकोसा झालेला..
तरी का दाटुन राहावा हा क्षण नकोसा.. झालेला!!!


Bkshailendra
Thursday, April 20, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षण एकान्तातले ......
मनाला घट्ट रुतवणारे,
मनाची कवाडे उघड्णारे,
मनाला दिलासा देणारे

क्षण एकान्तातले ......
मनाला साथ देणारे,
मनातील भाषा
डोळ्यातुन दर्शवणारे

क्षण एकान्तातले ......
मनातील प्रेमाला
जागृत करणारे,
मनातील बॊल
ऒठावर आणणारे

क्षण एकान्तातले ......
प्रत्येक क्षणाला
जतन करणारे
आणी एकटा पड्ल्यावर,
मनालाच सावरणारे



शैलेंद्र कुलकर्णी

Ninavi
Thursday, April 20, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा. छान लिहीतायत सगळेच!

Ninavi
Thursday, April 20, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता..

मला जरा सावरू तर दे..
मग लिहीन की कविता..

अजून कुठे रात्र पुरती हरल्ये
अजून कुठे तहान पुरती सरल्ये
अजून एकदा तुला डोळ्यांनी पिऊन घेऊ दे..
मग लिहीन की कविता..

अजून उजाडलेला नाही उद्याचा दिवस
अजून पुरता फिटायचाय बोललेला नवस
अजून एकदा जीव ओवाळून टाकू दे..
मग लिहीन की कविता..

अजून श्वासांत माझ्या तुझे श्वास दरवळतायत
अजून स्पर्शात तुझ्या कोवळी फुलं चुरगळतायत
उद्या श्वासांचे ध्यास उरतील.. स्पर्शांचे नुसतेच भास उरतील..
अजून काही क्षण जगून घेऊ दे..
मग... लिहीन की कविता....

- निनावी.


Jaaaswand
Thursday, April 20, 2006 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा मित्रांनो
दिलखुष हो गया :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators