|
mich majha ekataa suryaparee... chaan!!! .. .. .. ..
|
उठु लागली शिरशिरी रोमारोमातुन... वार्याची चुंबने फ़ुलाच्या पाकळी.... पाकळीतुन, स्वप्निल कळ्यांना कोवळ्या किरंणानी... सजवलेले पानावर थेंबाथेंबात इंद्रधनु अवतरलेले.. अवचीत या..... घायाळ.. पाखरांच्या कुजबुजीने भ्यालेले.. झाड वयात आलेले... बरसताहेत चांदण्या पायाशी... नभही झुकले सौदर्य लेण्या क्षितीजाशी...... मधुरसास आसक्त उषेचे.. आरक्त ओठ उष्ण झाले.... परी खबर नाही त्यास स्वताच्याच मस्तीत उभे नादावलेले... सलसळती विज अंगी ल्यालेले.. झाड वयात आलेले.....!!!
|
भरतीला आलेल्या सागरात शिंपल्यातील मोती.. शोधतांना... डोळ्यांच्या ओलसर कडा सुकवायला खारा वारा कमी पडतो तेव्हा कोमेजलेल्या स्वप्नांना उराशी कवटाळुन दोन मुक हुंदक्यांचे शिंपण घालते, कधी वाटते त्या भरतीस करावे नखशिखांत समर्पण, जावे खोल खोल त्या गडद अंधार्या पाण्याच्या गर्भात बुडुन सोडुन द्यावे अस्तीत्वाशी लढणे पण.. परत भानावर येउन शोधत राहते किनारा... मिसळत रक्तात ते खारे पाणी...
|
Jayavi
| |
| Thursday, April 13, 2006 - 9:59 am: |
|
|
वा.........काय सुरेख !! डॉ.आशुतोष, खूपच सुरेख ! गाणं ऐकायला नक्कीच आवडेल mmkarpe खूप भावुक !! चाणक्य, आपका जवाब नही ! मीच माझा सूर्यापरी आधार आहे.......... एकदम सही !! लोपा, तुझी दुसरी कविता जास्त आवडली.
|
Ninavi
| |
| Thursday, April 13, 2006 - 10:16 am: |
|
|
झाड, सराईत छान आहे. लोपा, मलाही दुसरी जास्त आवडली. डॉ. अशुतोष, छान आहे उपक्रम. गाणं ऐकायला आवडेल.
|
धन्यवाद दोस्तांनो ... सर्वांचेच मनःपूर्वक आभार ... लोपा , झाड , कर्पे , निखिल सुंदर कविता आहेत , डॉ . आशुतोष , गाणं ऐकायला आवडेल
|
ज्याचा त्याचा चंद्र ... आपल्या बंगल्याच्या टेरेसवर एकमेकांचं चांदणं पांघरून रात्र रात्र जागायचो आपण.. आठवतंय? अन तुला ऐकायला हवी असायची चंद्रावरची नाविन्यपूर्ण कविता ... रोज कधी पटकन सुचायची .. कधी पहाट होईस्तोवर नाहीच ... मग रेस्ट्लेस होत जायचो मी अन मला कुशीत घेऊन थोपटत रहायचीस तू ... पण काहीही करून .. रोज पहाटे खाली जाताना ... तुझ्या श्वासांत माझी एक ना एक कविता घेऊनच जायचीस तू... अन मग त्या रात्री , अचानक तुझा तुझा चंद्र घेऊन मला सोडून निघालीस तेव्हा त्या चंद्राला ओझरतं बघून सुचलेली ही शेवटची कविता .... आता माझ्याकडे उरलेल्या चंद्राला मागावी तर तो म्हणतो .... कवितेचं नाव काढू नकोस ... तुला कविता सुचवणारा चंद्र.......... आता ह्या नभात नाहिये !!!
|
Shyamli
| |
| Friday, April 14, 2006 - 1:13 am: |
|
|
!!! ... ... .. ..
|
Zaad
| |
| Friday, April 14, 2006 - 1:46 am: |
|
|
निनावी,वैभव धन्यवाद. वैभव, काय लिहू.........??
|
सान्गा आता काय कराल मित्र दारात येतो घरात येत नाही मित्र बोलत राहतो कळू देत नाही मित्र ओळख नाकारतो दिवसाच्या कोलाहलात मित्र आठवण नाकारतो रात्री एकट अन्धारात मित्र शत्रुसारखाच होत जातो दिवसागणिक आणि पूर्ण विचारान्ती नाही आवेगात क्षणिक दु:ख याचे खरे नुसत्या दुराव्याचे नाही असुयेचे गाणे म्हणे असेच जन्म घेई अशा मित्रास तहान लागेल सहवासाची तो दाबेल अशा मित्रास जायचे असेल पुढे पुढे तो जिन्केल अशा मित्रास द्याल तुम्ही हिरवा चारा तो फ़सणार नाही अशा मित्रासाठी तुम्हीच व्हाल निवारा तो थाम्बणार नाही तो चालत सुटेल अशा वेगात की तुम्ही ऐलतीराशी तर तो क्षितीजापार जाताना नेइल तुमचे असे एकच गाणे की तुम्ही निराधार तर तो निर्विकार मित्र जसजसा शत्रू होत जाईल तसे तुम्ही काय कराल मित्र ओळख नाकारेल दुखावले जाल पण मग घ्याल समजूतीने मित्र आठवण नाकारेल एकान्तातही हराल तुम्ही समग्रतेने मित्र जाऊ लागेल क्षितीजापार तुम्ही हसाल नुसते अन क्षितीजापार असलेल्या लाटेवर मित्रावर उतरेल दिवस-रात्रीच्या पलिकडली सायन्काळ आणि मग जेव्हा मित्र हलेल, हरेल बोलावेल तुम्हाला पुन्हा एकदा कवळेल तुम्हाला पुन्हा एकदा अशा बोलीत की जणू हीच तुमची पहिली भेट --- तेव्हा काय कराल सान्गा तेव्हा काय कराल आशुतोष
|
Ninavi
| |
| Friday, April 14, 2006 - 2:15 am: |
|
|
वैभव, ज्याचा त्याचा चंद्र मस्त. आशुतोष, आम्ही बहुतेक हाकेला ' ओ' देऊ.
|
Shyamli
| |
| Friday, April 14, 2006 - 2:15 am: |
|
|
वा!!!!.. .. आशुतोष सुंदर
|
वैभव चंद्र छानच आहे आशुतोष अप्रतिम!!!
|
ashutosh.... hmmm. great.!!!!.. .. .. .. .. ..
|
vaibhav khupach chaan aahe re kavita ...
|
वैभव!!! Dr आशुतोष, hats off to you ! सिम्पली ग्रेट! मी पण आधी इतकाच कडकडून भेटीन!
|
कधी कधी कधी कधी.. मी एकटी एकटी होते.. उजाड मनाला घेउन भटकत राहते, माझीच मी कीव करते... मग नवा मुखवटा रंगवायला घेते.. उसन्या हास्याच्या चार लकेरी कोरते, खर्या चेहर्याला विसरुन जाते.. कधी कधी मी माझं दुख.. उसवत बसते.. चिंध्या चिंध्या त्या इतस्तता पसरतात.. त्यापरत गोळा करुन, मी मनाची वीण घट्ट करते... जुनेच वस्र घालुन मी नव्याने वावरते....!!!
|
वैभवा,चंद्र सहीच रे.. तुसी ग्रेट हो
|
धन्यवाद दोस्तांनो .... ब्लॅंक कॅन्व्हास हे असं ब्लॅंक कॅन्व्हास समोर बसलं की तुझे डोळे आठवतात अन हुबेहूब उतरायला लागतात मनातल्या चित्राची सगळी डिटेल्स ... बाहू पसरून थांबलेला मनमोहक हायवे तारुण्याच्या लाटेवर स्वार मोटरसायकल बिलगून बसलेली एक सुंदर मुलगी वारयाची लाडिक तक्रार करत .. भुरुभुरु उडणारे रेशमी केस उगाच कुजबुजायला पुढे वाकलेला आरक्त चेहरा मिररमध्ये दिसणारे फक्त ते ... तेच ते खट्याळ डोळे अन न दिसलेली मागून येणारी कार अंधःकार !!!
|
Shyamli
| |
| Saturday, April 15, 2006 - 8:03 am: |
|
|
>>>>जुनेच वस्र घालुन मी नव्याने वावरते waa vashaalii!!! वैभव नको रे बाबा अस लिहुस.....
|
|
|