Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 10, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » काव्यधारा » कविता » Archive through April 10, 2006 « Previous Next »

Pkarandikar50
Wednesday, April 05, 2006 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi,
तू सांगीतलेली साइट पाहिली. गुलमोहोरची क्वालिटी नाही आणि भल्या-बया कॉमेंटसही नसल्याने मजा नाही आली बुवा!
बापू


Moodi
Wednesday, April 05, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू मी ती साईट गंमत म्हणुन दिली होती. जसे काही वेळेस आपण कॉलजच्या मासिकांमध्ये सुद्धा आपले साहित्य देतो तसेच तिथे काहीनी दिलय. शेवटी जे नवीन असतात त्याना आवड असते आपल्या कविता, साहित्य एखाद्या मासिकात, वेबसाईटवर प्रकाशीत करण्याची.
त्या साहित्याचा दर्जा मी नाही ठरवु शकत कारण कळतय कुठे!! अन जे कळतच नाही त्यावर माझे मत मी प्रदर्शीत करतच नाही.
त्यामुळे ती साईट एवढी सिरीयसली घेऊच नका.


Dineshvs
Wednesday, April 05, 2006 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, ब्रुटस यु टु ची आठवण झाली.

Ninavi
Wednesday, April 05, 2006 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैषम्य..

माझ्या घागरीतलं तुझं हसरं प्रतिबिंब
अनिमिष न्याहाळत असताना
आधीच सलत असते
फक्त त्या प्रतिबिंबावरच आपला अधिकार असल्याची जाणीव..
आणि त्यातच एखाद्या चुकार क्षणी
नको नको म्हणताना
तो ही विचार डोकावतो..
अश्या किती घागरींमधे हसली असेल तुझी छबी..?
आणि मग सगळंच
हिंदकळून सांडून जातं.....


Vaibhav_joshi
Wednesday, April 05, 2006 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ! निनावी, मस्त उतरलीय...

Shyamli
Wednesday, April 05, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी..............
छान आहे...... आवडली ग!


Vaibhav_joshi
Wednesday, April 05, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी... बरेच दिवस झाले झुळूकवर जुगलबंदी खेळून, आज तुझ्या ह्या मस्त कवितेने जरा प्रेरित झालोय.
अर्थात (इथेही) हरणार आहे हे सांगणे न लगे. चु.भू.दे.घे.

गढूळ ...

माझ्या हसरया प्रतिबिंबाला
खिन्नतेची गढूळ किनार होती
हे दिसलं नसावं तुला ..
अर्थात तुझा दोष नाही म्हणा
आजकाल तुला काहीच दिसत नाही
अगदी तुझ्याच घागरीच्या तळाशी साठलेलं
शेवाळं सुध्दा ...
संशयाचं !!!


Ameyadeshpande
Wednesday, April 05, 2006 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी इतकं सामावून ठेवलयं ह्याची अचानक जाणीव होते तो हिंदोळा पाहिल्यावर...
आणि मग आठवतं...
मी ही असाच तुझ्या प्रतिबिंबात बुडून राहिलेला एके काळी...
कधीच न आलेल्या हाकेची वाट बघत...
कितिदा तरी वाहून रिती झालेली कळशी मग पुन्हा ओसंडते...
माझ्याही मनात अगदी ह्याच ओळी उमटवत...


निनावी खूप सुंदर!


Shyamli
Wednesday, April 05, 2006 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही.....

वैभव अजुन office ?



Ameyadeshpande
Wednesday, April 05, 2006 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... वैभव झकासच रे :-)

Ninavi
Wednesday, April 05, 2006 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दोस्त्स.

वैभव, जुगलबंदी? चालेल की.


शून्य...

ते समोर झाड दिसतंय?
त्यात लपून रोज पहाटे एक पाखरू गायचं..
अलवार सुरांतून रोज आव्हान द्यायचं...
' बोल, मी दिसलो नाही, म्हणून मी नाहीच आहे असं म्हणशील?'
मग दिवसरात्र छळायचे
ते सूर.. ते प्रश्न..
शेवटी एकदा मी चिडून त्याला म्हटलं,
' नाहीयेस! नाहीच आहेस तू!
असतास खरंच तर दिसला नसतास?
एकदा तरी? चुकून तरी?'

तेव्हापासून
सगळं शांत शांत आहे इथं..
सूर छळत नाहीत.. प्रश्न पडत नाहीत..
सूर्य उगवतो रोज, पण
दिवस उजाडत नाहीत....


Vaibhav_joshi
Thursday, April 06, 2006 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमूर्त ...

मी तुझा अंश होतो?
की तुझी अमूर्त कल्पना?
माहीत नाही..
तुला आवडायचं म्हणून ..
तू जन्माला घातल्यापासून
अस्तित्व नसतानाही ...
अस्तित्व जपत .. लपत छपत ..
जगत होतो मी(?), झाडांच्या पानाआड..
ह्या जगाला मी दिसेन, कळेन ..
अशी माझी अशी वेगळी ओळख कुठे होती?
तसा मी आटोकाट प्रयत्नही केला ..
माझ्या अलवार सुरावटींतुन
अस्तित्व सिध्द करण्याचा...
पण माझे ते सूर सुध्दा शेवटी
तू आळवलेल्या स्वरांचे ..
प्रतिध्वनी होते ...
केवळ ..
प्रतिध्वनी ...
आजकाल तू गात नाहीस वाटतं !!!


Meenu
Thursday, April 06, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव निनावी मस्त... छान चालली आहे जुगलबंदी

Sarang23
Thursday, April 06, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, वैभव सुरेख!

सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा!!!


Lopamudraa
Thursday, April 06, 2006 - 4:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव..!!! निनावी!!!..आणि अमेय..छान..आता सारंग तु कधी सुरवात करतोय.!!!

Dineshvs
Thursday, April 06, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे, साद प्रतिसाद, निनावि आणि वैभव.
जुगलबंदी शब्दामधे जरा चढाओढीची छटा आहे, ईथे ती नाही.


Ameyadeshpande
Thursday, April 06, 2006 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदित्य एखादी कविता / गाणं येऊ घाल इकडे...गायब झालास मला वाटलं सुट्टीवर गेलास की काय...

Soultrip
Friday, April 07, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rat-race


ऑफिस संपताच बाहेर धावतात
जशी बिळामधील उंदरे
गळाठलेली, गांगरलेली,
अडथळ्याच्या शर्यतीतुन
खणलेल्या रस्त्यांतुन
प्रदुषणाचा धुर गिळत
खोकत्-खोकत, उसना धीर आणत
एकमेकाच्या एक इंच पुढे
घुसू पाहणारी अश्राप उंदरे!
कोपर्‍या-कोपर्‍या वरील होर्डिंग वरचे
मस्तवाल पुढारी बोके
पाहत असतात मजा या
दीनवाण्या उंदरांची अन
मिशीवरुन पालथा पंजा फिरवत
गणिते मांडत असतात
इलेक्शनची, गाडीची अन गादीची!


Niru_kul
Friday, April 07, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज काल मी फारच सावध असतो;
तुझ्या गल्लीतून जाताना......
तुझ्या खिडकीकडे पहाताना.......
तुझ्या अंगणात डोकावताना........
तुझी पुसटशी झलक दिसावी म्हणुन थांबताना......
कोण जाणे...
अजुनही तुझा बाप हातात काठी घेऊन उभा असेल फाटकावर......

पार्थसारथी.......


Lopamudraa
Sunday, April 09, 2006 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोज रात्री स्वप्नांचा महाल अवतरतो,
आणि रोज कोसळुन पडतो...
सारे बोचरे तुकडे ते गोळा करते..
हिरवे,निळे, लाल, पिवळे.. आणि चंदेरी
उद्याच्या आशेचे बिलोरी,
सारे असतात काटेरी...
टोचणारे दातेरी!
असे आयुष्याचे झरझर दिवस सरतात,
माझ्यावर जगल्याचे उपकार करतात..
प्रत्येक दिवस माथ्यावर येतो,
उद्या काय म्हणुन त्रास देतो..
प्रत्येक वळणावर ध्येय..
गाठल्याचा भास होतो,
आणि पुढे अजुन न संपणारा रस्ता दिसतो...
न संपणारा रस्ता दिसतो...


Chinnu
Sunday, April 09, 2006 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. nice one LM!

Champak
Sunday, April 09, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kya baat hai .. :-)

Lopamudraa
Monday, April 10, 2006 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बळीराजा

थेंबा थेंबा साठी
आसुसलेली धरती..
उधी लागलेला
आंबा बांधावरती...,
नजरेच्या टप्प्यात....
नाही कुठे हिरवा सडा..,
फ़क्त कोरड्या मातीचा
मुक तडा...!
पोटच्या पोराचा
घास झाला बियाणे..
रिकाम्या खळ्यात.
गुरांचे कोरड्याने चरणे..
आतुरलेली गिधाडे
आणि काही डोमकावळे..
त्याखाली भिरभिरताहेत
बळिराजाचे चैतन्य
हरवलेले डोळे..!!!


Vaibhav_joshi
Monday, April 10, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हां .. इथे योग्य आहे ही कविता लोपा ... बरं झालं शिफ्टलीस ते ... मस्त ...

Lopamudraa
Monday, April 10, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मातीमोल

माझ्या मातीचा राजा,
नाही त्याच्या कष्टाचा गाजावाजा..
माखली चिंब माय..
त्याच्या रक्ताने,
राजकारण करतो..
त्याचे आम्ही सरावाने!
पोट चिकटले पाठीला..
नाही निसर्ग साथीला..
दोन थेंबासाठी
जीव डोळ्यात झाला गोळा..
तुच सांग देवाजी..,
सोनं पिकवणारा लेक तुझा,
सार्‍या दुनियेत अनमोल..
का ठरला मातीमोल...
का ठरला मातीमोल..!!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators