Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 02, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » काव्यधारा » झुळूक » Archive through April 02, 2006 « Previous Next »

Sanghamitra
Thursday, March 30, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वादळ प्यावे, वादळ ल्यावे.
धुंद मनाने वादळ गावे.
अवघड आता वाट पहाणे,
तूच होऊनी वादळ यावे.


Shyamli
Thursday, March 30, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटे वादळासम धुंद व्हावे
जुनेच गीत नव्याने गावे
सावरण्या तरी मला
तु ही वादळ होउन यावे

श्यामली!!!


Shyamli
Thursday, March 30, 2006 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलगद चैत्र उमलावा
पानापानात फुलावा
मनालाहि चैत्रासारखा
हलकेच मोहोर यावा

श्यामली!!!


Meenu
Thursday, March 30, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुळुकही छान मित्रा, श्यामली मस्त..

Meenu
Thursday, March 30, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझे नुसते येणे सुद्धा वादळ असते
तुझे मुक रहाणे सुद्धा वादळ असते
तुझे नुसते बघणे सुद्धा वादळ असते
तुझ्या विरहाची कळ मात्र जीवघेणी असते..


Meenu
Thursday, March 30, 2006 - 7:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु येवुनही आज न आल्यासारखा
तु असुनही आज नसल्यासारखा
तु जवळ असुनही परका..............
श्वास थांबल्यावर सोबत केल्यासारखा


Jaaaswand
Thursday, March 30, 2006 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे मित्रांनो.. I mean मैत्रिणिंनो..
व्वा मजा आली.. चालू द्या जोरात :-)

नवीन वर्षाबद्दल थोडेसे...

हे वर्षा ! एवढीच इच्छा
जीर्ण फ़ुलाने कळीत राहावे
तुझ्याबद्दल लिहिता लिहिता
शाईच्या आधी पान संपावे

जास्वन्द...


Meenu
Thursday, March 30, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी शांता शेळकेनी केलेला गुलजार यांच्या कवितांचा अनुवाद त्रिवेणी वाचला... त्या प्रकारात लिहीण्याचा एक प्रयत्न चु. भु. देणे घेणे...

दिवस एक असा उजाडावा
ज्यात नसावा तुझ्या आठवांचा मेळावा
जसा पुर्ण चंद्र नाही ज्यावर डाग काळा...


Lopamudraa
Thursday, March 30, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतीसुन्दर.....................
श्यामली,मित्रा, मीनु, जास्वन्द!!!!


Shyamli
Thursday, March 30, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळेच मस्त....

शिशीर संपलाय.....
बहरावे म्हणतेय मीही
नको आता येऊस परत
नकोच वेडी आशाही!

श्यामली!!!


Meenu
Thursday, March 30, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्वासभर मोगरा
मनभर तू
आभाळही भरलय
सैरभैर मी.. सैरभैर मी...


Meenu
Thursday, March 30, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्याशी भांडता भांडता
आत्ता निरोप घ्यायची वेळ येईल
जातानाही भांडीन तेव्हा मात्र
तुझ्याकडे पाठ असेल
डोळे भरल्यावर नाहितरी मला काय दिसेल?


Meenu
Thursday, March 30, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण हे उसासे सोडतय..
कुणाचे हे शेवटचे श्वास..
अरे नव्हे हा नव्हे भास..
हि तर आपली मैत्री खास


Chaukatcha_raja
Thursday, March 30, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहि रे.....

जोरात चालु द्या असच......


चौकटचा राजा

Shyamli
Thursday, March 30, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुढणं सोडाव
मस्त जगावं
छाटलेलेच पंख घेउन
उंच उंच उडावं

श्यामली!!!


Jo_s
Friday, March 31, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वीचीच पण परत
अगदी मनापासून

गुढी पाडवा घेउन आला
वर्ष नवे हे आपले
सुखात जाओ पुर्ण होऊनी
स्वप्न मनी जे जपले

सुधीर


Kandapohe
Friday, March 31, 2006 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!! चैत्राची सुरुवात चारोळ्यांच्या वादळाने झाली तर. :-)

Niru_kul
Friday, March 31, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेव्हा तुझ्या ओठांवरच्या,
मोहक हास्याला बहर येतो;
खरं सांगु तेव्हा,
तेव्हा सौंदर्याचा कहर होतो.

पार्थसारथी......


Niru_kul
Friday, March 31, 2006 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला सारखं वाटत असेल,
मी तुझ्यावर प्रेम का करावं?
पण तू आहेचस अशी की,
तुझ्यावर कोणीही मरावं.

पार्थसारथी....


Champak
Friday, March 31, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोईवर कळशी
कळशीत पाणी
अन ती
... अनवाणी!


Chinnu
Friday, March 31, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. अन चंप्स ची अवस्था दीनवाणी!
ए राग नको मानु रे, गंमत केली. छान आहे तिनोळी, लिहित जा असच!


Krishnag
Saturday, April 01, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिशिर संपला वसंत आला
अजूनी कुरकुरतो पायाखाली
जुनाच ओला पाचोळा


Heartwork
Saturday, April 01, 2006 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवे वर्ष, नवी आशा
स्वप्नांची चैत्रपालवी
वेदनांना माझ्या लाभो
संजीवनी नवी


Heartwork
Saturday, April 01, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभाळाची भाषा आणि पंखांचे भय
तुला हवंय स्वप्नांच पाठबळ
पंख असतात सर्वांनाच,
आकाशात भरारतं बघ मनाचं बळ


Rashmirathi
Sunday, April 02, 2006 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नांना नख लावणं,
ही त्याची जुनीच सवय;
पण माझी स्वप्नंही आहेत वेडी,
त्यांना त्याचंच नख हवंय.

रश्मिरथी........





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators