Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
झुळूक

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » चैत्र » काव्यधारा » झुळूक « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 02, 200625 04-02-06  3:38 am
Archive through April 06, 200625 04-06-06  5:02 am
Archive through April 09, 200625 04-09-06  10:28 am
Archive through April 10, 200624 04-10-06  10:01 am
Archive through April 12, 200620 04-12-06  9:50 am
Archive through April 13, 200620 04-13-06  3:58 am
Archive through April 13, 200620 04-13-06  10:51 am
Archive through April 17, 200620 04-17-06  8:47 pm
Archive through April 18, 200620 04-18-06  6:44 am
Archive through April 21, 200620 04-21-06  5:27 am
Archive through April 24, 200620 04-24-06  2:22 pm
Archive through April 25, 200620 04-25-06  7:49 am
Archive through April 25, 200620 04-25-06  4:09 pm
Archive through April 25, 200620 04-25-06  4:43 pm
Archive through April 26, 200620 04-26-06  8:18 am

Devdattag
Wednesday, April 26, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आगळ्या चंद्रास अमुच्या
राहू कधी ना छळतो
क्षयही होतो कधी
आसवांना आम्ही ढाळतो


Rupali_rahul
Wednesday, April 26, 2006 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवसेची रात्र होती
काळाकुट्ट आंधार होत
पण मनात मत्र माझ्या
पौर्णिमेचा भास होता

जगी निरव शांतता
पणा मनात मात्र वादळ होत
कारण त्या रात्रि हातात माझ्या
प्रेयसीचा हात होता...

रुप


Devdattag
Wednesday, April 26, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रात्रीस वेगळ्या माझ्या
लाभलि किनार रुपेरी
चांदणे ओविले अंबरात
नेसलि स्वप्ने जरतारी


Devdattag
Wednesday, April 26, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलतो आम्हि कधीना
आज आम्हि बोलतो
बोलण्या साठी अम्हाला
शब्द मुक्याचा लागतो


Rupali_rahul
Wednesday, April 26, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या झुळुख़ मस्तच, सहीच

Devdattag
Wednesday, April 26, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद.. तुझिही झुळूक सुरेख़च

एक हलकी फुलकी

वळतिल सगळ्या नजरा
हे आम्हांसही माहित होते
तिच्याबरोबर चालण्यात तसे
आमचेही थोडे हित होते

वात्रट अमुचे मित्र होते
आता हरेक सुधारला होता
दुसर्‍या दिवसापासून गल्लीत
आमचा भाव वधारला होता



Smi_dod
Wednesday, April 26, 2006 - 11:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाणिवा संपल्या, संवेदना बोथट झाल्या
पण.....
काट्यांसाठी संवेदना गोठल्या
फुलांचा स्पर्श जाणवतोय कि अजुन


Gandhar
Thursday, April 27, 2006 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटेवरच्या काट्यांची आता
पावलांना सवय झालीय
तुझ्याविना चालण्याची मात्र
नव्यानेच ओळख झालीय


Rupali_rahul
Thursday, April 27, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळख जुनीच आपली
पण वेदना नव्या
तुझ्याविना जगतानाच्या
संवेदना नव्या…

रुप


देवदत्त, गंधार, वैभव, श्यामली, जयावी, निनावी अशा अनेक प्रतिभावंतांपुढे मी कोण??? तुम्ही आपल्यात सामावलत हिच खुप मोठी गोष्ट आहे.


Meenu
Thursday, April 27, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा हलकी फुलकी झुळुक छान रे..

Jayavi
Thursday, April 27, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली अगं काय हे ? आपण सगळेच शिकतो आहोत इथे. मायबोलीचे आभार मान.

ओळखीच्या वेदना
जरा जास्तच ठसठसतात
मोरपीसाच्या स्पर्शानेसुद्धा
भळाभळा वाहतात


Ninavi
Thursday, April 27, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, बरी आहेस ना?

जया, मस्त. सुरेश भटांच्या या ओळी आठवल्या..
' प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला?
ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते..'


Princess
Friday, April 28, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा एकदा भेट गड्या... खरच खुपच छान लिहितोस तू. बंगलोरला असशील तर एकदा मैफ़िल जमवेन सगळ्या मराठी दोस्ताची... मी, माझा नवरा आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी जाम खुश होतील तुला भेटुन.

कसे सुचते रे तुला इतके छान लिहायला निनावी, लोपा, अमेय सगळेच महान आहात तुम्ही. हा ग्रुप जोडुन माझा मराठीपण धन्य झाले असे वाटते अतिशयोक्ती नाही मनापासुन सान्गतेय.

मनापासुन तुम्हा सर्व कवी मित्रान्चे आभार.


Lopamudraa
Friday, April 28, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिंसेस...., धन्यवाद,

अश्याच प्रोत्साहनाने तर सुचते सगळे..!!!


Ruchita
Friday, April 28, 2006 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळखीच्या वेदना
जरा जास्तच ठसठसतात
मोरपीसाच्या स्पर्शानेसुद्धा
भळाभळा वाहतात......

स्पर्श मोरपिसान्चा पण
ना सावरे तयाना
कशा आवरु सान्ग
या तु दिलेल्या वेदना
...जया माझी झुळुक आलीय का ग बरोबर..जरा घाबरतच टाकलीय


Ruchita
Friday, April 28, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस अगदी मनातले लिहिले आहेस... मायबोलिवरचे हे एकापेक्शा एक प्रतिभावन्त कलाकार आहेत. मी दोन महिने फक्त या मन्डळीन्चे लिखाणच वाचत होते. मलाही खुप आनन्द होतोय या दोस्तान्ना लिखाणाद्वारे भेटताना(वैभव, दिनेश, लोपा, सुधिर, निनावी, मीनु, दिमडु, अज्जुका,देवा, स्मिता, गिरी) ...मी स्वत्: एका मराठी चनेल मध्ये काम करते, एव्हढ्या स्क्रिप्ट जातात नजरेखालुन पण माझ्या या दोस्तान्च्या कथा, कविता, ललित, विनोद सारे काही अप्रतिम..सुरेख... क्रुपया हि अतिशयोक्ति समजु नये.


Rupali_rahul
Friday, April 28, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु दिलेल्या वेदना
आत्ता नेहमीच्याच झाल्या
का कुणास ठाउक त्या
मनाला पण भावल्या

रुप...

रुचिता आणि प्रिंन्सेस तुम्हाला अनुमोदन...


Jo_s
Friday, April 28, 2006 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कश्या कळणार तुला
माझ्या मनीच्या वेदना
त्या साठी हवीरे
मनासही संवेदना

Ameyadeshpande
Friday, April 28, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिंसेस माझं नाव कुठून घातलं आहेस त्यात :-)
हे म्हणजे एवढ्या सगळ्या सूर्यांच्या पंगतीला काजव्याला बसवणे. (सखाराम गटणे असलंच काहीतरी म्हणतो ना )


Ninavi
Friday, April 28, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए बायांनो, काय चालवलंय तुम्ही हे?

प्रिन्सेस, आम्ही सगळेच इतके महान असताना आमंत्रण एकट्या वैभवलाच काय म्हणून?

अमेय,

उधळली कोणी इथे ही लाख तेजाची फुले
उमटली किंवा धरेवर तारकांची पावले
किर्र अंधारास त्याने जिंकलेले पाहुनी
पंगतीचे सूर्य सारे काजव्याला लाजले..



Dineshvs
Friday, April 28, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळी कविमंडळी ग्रेट आहेत, प्रिन्सेस.
पण माझे नाव या यादीत म्हणजे,
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा बरं का.

जोक्स अपार्ट,
तुमच्या कविता अवश्य लिहा, हि सगळी मंडळी पण ऊत्सुक असतील त्या वाचायला.


Ameyadeshpande
Friday, April 28, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी,

माझा हा खेळ चाले
रजनीच्या संगतीने
संध्येस येई जन्मा
आरुशीस मुक्त होणे

लीनता पाहुनी ही
अजुनीच लाजतो मी
तळपत तेजणार्‍या
सूर्यांस वंदितो मी

नक्षत्र लाख तारे
सूर्या जैसेच सारे
असतील दूर म्हणुनी
तेजात अल्प ना रे

असती निनावी तारे
परी त्यास नाव द्या रे
नक्षत्र येती जन्मा
तव स्वाती म्हणोन आले

चु. भु. द्या. घ्या. :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators