Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 27, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » काव्यधारा » कविता » Archive through March 27, 2006 « Previous Next »

Giriraj
Sunday, March 26, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता सावरीची पाने गळून फुलांनी सावरी लालेलाल झाली असणार! काहींना तर कापूसही लागला असेल. अशीच ही एक जुनीच सावरी...



सावरी

एका ग्रीष्माची दुपार
वेड्या वार्याचा कहर
बोंडाबोंडाने सावरी
थरथरे अंगभर

तुट्फुट बोंडं सारी
मलमली दिशा चारी
सारा उडला कापूस
बीजं घेऊन जिव्हारी

जश्या तुझ्या आठवणी
वरी हसल्या फुलुनी
कशा लागती जिव्हारी
बीज विरही घेऊनी

डोळे लागले सागरी
कधी येशील किनारी
वाट पाहुनी थकेना
मन बावरी सावरी.


गिरीराज


Shubhashri
Sunday, March 26, 2006 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन विसावल, गालावरच्या खळीत
मन धडपडल, रस्त्यावरच्या खड्ड्यात
मन भिजल भिजल, पहाटेच्या दवात
मन थिजल थिजल, तुझ्या विपरीत वागण्यात

मन थरथरल, धुवांधार पावसान
मन भरकटल, कोजागिरीच्या चांदण्यान
मन विसकटल, तुझ्या वाकुड्या वागण्यान
मन स्थिरावल, तुच दिलेल्या आधारान

मन बोल बोलल, तुझ्या अबोलपणाशी
मन गप्प गप्प झाल, तुझ्या नसलेपणाशी
मन सुन्न सुन्न झाल, वारा ही पडला
मन खिन्न खिन्न झाल, एकलेपणान

मन उदास उदास, तिन्हिसांजेच्या मारव्यापरी
मन कसनुस, माणसाविना घरापरी
मन अंधारून आले, आषाढाच्या ढगापरी
मन बरस बरसले, श्रावणच्या सरीपरी

मन चाचपडू लागे, तुझा अंदाज घेऊ लागे
मन खंतावू लागे, मनी पाल चुकचुकू लागे
मन सुखावले सुखावले, मोहोराच्या झुळुकीने, कोकीळेच्या सुस्वराने
कारंजाच्या तुषाराने,ओल्या मातीच्या गंधाने
मोगर्याच्या वासाने नि माघातल्या थंडीने

मन आनंदले, तुझ्या नुसत्या येण्याने
तुझ्या होण्याच्या कल्पनेने..

मन मनात मिसळले, मन मनात मिसळले


Pkarandikar50
Sunday, March 26, 2006 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पान्ढूर
हा जुन्या मराठीतला शब्द आहे.पन्डु म्हणजे फ़िक्कट सफ़ेद रन्ग. ह्या शब्दापासून बहुदा आला असावा. ग्रमीण भागात, विशेषत: अवर्षण प्रवण भागात, उडणारी धूळ पान्ढुरक्या रन्गाची असते. ज्या पृष्ठभागावर ही धूळ साठते, तो भाग पान्ढुरका दिसतो.पन्ढरपुर गावाचे नावहि अशाच धूळीच्या रन्गावरून पडले असावे असे काहींचे मत आहे. एरव्ही काळ्या पाषाणातल्या विठ्ठलला पांडुरन्ग हे नावही याच कारणामुळे आणि पन्ढरपुर गावाच्या नावावरून पडले असावे.
बापू.


Ninavi
Sunday, March 26, 2006 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दोस्त्स.
मी कधीकधी कवितांच्या बाबतीत अक्षम्य आळशीपणा वा बेपर्वाई करते. ही ' कृतार्थ' देखील अशीच चार ओळी लिहून बाजूला टाकली होती. एका जवळच्या व्यक्तीच्या प्रेमळ धाकामुळेच ती पूर्ण झाली. त्यामुळे तिचं सगळं श्रेय त्या व्यक्तीचं आहे, माझं नाही.

वैभव, डायबेटिसने छळलं बघ.
गिरी, सावरी मस्त आहे.
बापू, ' पाण्डुरंग' ची ही व्युत्पत्ती विचारात पाडणारी आहे.


Devdattag
Sunday, March 26, 2006 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, निनावि, बापू, गिरि, पार्थसारथि, अगस्ति, शुभश्री सगळेच मस्त



काय वाढते कुणी कुणाला
हरएक दुजाला नडतो
तोडलि बंधनेच ज्यांनी
कारावास तयांना घडतो

हसतिच सारे दुसर्‍याला
प्रत्येक स्वत:वरी रडतो
खुपसतो पाठीत सुरे अन
छायेशीच स्वत:च्या लढतो

हिरव्या झाडावरचा कोंब
ऐन बहरातहि रे झडतो
चाल उधार देता दुजाला
पाऊल उद्याचे खुडतो

माझा जीवही केविलवाणा
स्वत:शीच रे बडबडतो
गोठवले स्वर्गच त्यांनी
मी अधांतरीच का सडतो

स्वप्ने गाळून घेतो तरिही
थरकाप जीवाचा उडतो
कोवळ्या घरट्यांत माझ्या
पाऊस उन्हाचा पडतो


Shyamli
Sunday, March 26, 2006 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है देवा.....
जमके है एकदम.....

बापु सोबत आवडलि


Sanghamitra
Sunday, March 26, 2006 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव एकदम धडाकेबाज कार्यक्रम चालू आहे :-)
सारंग अखंड सुरेख आहे अभंग.
निनावी क्या बात है.
गिरी सावरीची आसमंतभर पसरणारी मलमल डोळ्यापुढं उभी राहीली. अक्षरशः. या अशा मलमलीमागे भर उन्हात धावताना कित्येक दुपारी गेल्यात लहानपणी. :-)
बापू पांढूर नाही ऐकले कधी पण असाच अर्थ असणार त्याचा. तुम्ही म्हणताय तशीच धूळ असते तिकडे.
लोपामुद्रा मस्तच गं.
देवदत्ता सुरेख.
उन्हाळा आला जवळ एकूण :-)


Vaibhav_joshi
Monday, March 27, 2006 - 12:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निष्पर्ण ...

अस्वस्थ भावनांचा आला पुन्हा इशारा
घोंघावला नव्याने देहात शब्दवारा

चाहूल फक्त होती घायाळ वादळाची
इतक्यात काळजाचा झाला किती पसारा

घरट्यास आठवांच्या जपणे कठीण झाले
शाईत लाट आहे अन कागदी किनारा

अश्रूंसमेत सारी स्वप्ने कुठे निघाली ?
रोखायच्या कश्या ह्या नयनांमधील धारा ?

ही भूक वेगळी अन हे चोचले अघोरी
निःशब्दताच मृत्यू अन शब्द हाच चारा

हृदयातल्या तमाची मी का तमा करावी
एकेक शब्द माझा एकेक आज तारा

आता जळूनही मी दिसणार ह्या जगाला
आहे जिवंत माझ्या शब्दांतला निखारा

निष्पर्ण होत जाता मी लागतो फुलाया
माझा शिशिर निराळा , माझा वसंत न्यारा


Ninavi
Monday, March 27, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, अप्रतीम!!!!
जामच म्हणजे जामच आवडली!!


Sanghamitra
Monday, March 27, 2006 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वैभव,
दिसते बरी अशी का वद सारखी प्रशंसा?
मी निरपराध, तुझिया कवितेत दोष सारा.


Ninavi
Monday, March 27, 2006 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा, सन्मी!... ... ... ...

Abhijat
Monday, March 27, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, अप्रतिम! ही एखाद्या संगीतकराला दाखव! एक उत्कृष्ठ गीत होईल याचे!


Lopamudraa
Monday, March 27, 2006 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav.. .. .. .. .. !!!!!!

Giriraj
Monday, March 27, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव!
शेर क्र. १,पावणेदोण आणि साडे अडीच खूपच आवडले.......

अरे सगळी गज़लच सुंदर आहे. अप्रोतिम!

तू वार ठरवून घे बाबा तुझा आणि त्याच दिवशी तू कविता टाकायच्या! इतर दिवस आमच्यासारख्या गरीबासाठी राखून ठेव!


Sarang23
Monday, March 27, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी सही आहे...
अगस्ती छान गझल, पण दुसर्‍या शेरात सहजता जाणवली नाही... पण भाव बिनतोड!
मन बावरी सावरी... गिर्‍या काय लिहीलयस हे!!!? जबरी... अरे मी तुला काय शिकवणार?
वैभव...
घरट्यास आठवांच्या जपणे कठीण झाले
शाईत लाट आहे अन कागदी किनारा
हा शेर आवडला. बाकी शेरही ठीक आहेत....



Niru_kul
Monday, March 27, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मरेन तेव्हा.....

मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?
एकान्तात का होइना, पण माझ्यासाठी, दोन अश्रु गाळशील का?

माझ्या नावाचं मंगळसुत्र, तू नाही घातलं तरी;
माझ्यासाठी एक दिवस, तू वैधव्य पाळशील का?

जन्मभराची साथ, नाही मिळाली तरी चालेल;
पण माझ्या शवयात्रेत, तू दोन पावलं चालशील का?

माझ्यासाठी तू, कोमेजली नाहीसच कधी;
शेवटी माझ्यावर, तू दोन फुलं उधळशील का?

विचार करायला, उसंत मिळाली तर्;
माझ्या आठवणी कधी, उराशी कवटाळशील का?

मी मरेन तेव्हा, दोन क्षण मौन पाळशील का?.....


पार्थसारथी.....


Ameyadeshpande
Monday, March 27, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव अरे नक्की काय खातोस तू :-)
निष्पर्ण अप्रतीमच!


Shubhashri
Monday, March 27, 2006 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर वर्षी त्रिपुरी पोर्णिमा येते.यावर्षीची आपण 'सीमेवर लढणार्या जवानांसाठी १ पणती' लाऊन साजरी करू.


खेड्यामधले एक घर घरापुढे सारवलेले होते एक अंगण
अंगणात सुरेख रांगोळी नि मिणमिणणारी एक पणती..
थरथरणरा हात कमरेवर नि आडवा हात कपाळावर
व्रुद्ध माता वाटेकदे डोळे लावून बसली होती..
नेत्राचा दिवा नि हाताचा पाळणा करून वाढवलेले तिच लेकरू
रणांगणी गेल होत...पराक्रम ते गाजवत होत..
पण दिवस गेले.. रात्री गेल्या महीना गेला वर्ष गेल
अजून परत ते आल नव्हत.. आणी परत ही कधी येणार नव्हत
पण.. पण पणती मात्र तेवत होती
आठवणीनी त्याच्या वार्याबरोबर थरथरत होती
स्म्रुतीने त्या लढवय्यांच्या दाटून येते मना
अभिमानाने उर भरोनी स्फुर्ती येते मना
खुणावते ते शोर्य आणि खुणावते ती पणती
देशासाठी मग खुशाल पदू दे देहाची आहूती
त्या पणतीला स्मरण करून दुसरी पणती लावूया
एक दिलाने एक जिवाने देशसेवा करूया...


Shubhashri
Monday, March 27, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पणती वर अजून एक कविता..

एक पणती मिणमिणती तुळशीव्रुंदावनापाशी तेवत होती,
तिन्हीसांजेला केलेला नमस्कार देवापाशी पोचवत होती..

एक पणती दिवाळीतली ओळीमधे बसली होती,
मनामनातील अंधार दूर करून तेज अपुले पसरवत होती..

एक पणती त्रिपुरी पॉर्णिमेची दीपोत्सवात रमली होती,
भूमीवरती अलगद उतरून सदा चांदण्यांचा घालत होती..

एक पणती न्रुत्यामधली ठेका धरायला लावत होती,
तालावरती नाचता नाचता तोल संभाळा म्हणून सांगत होती..

एक पणती गंगेवरची पाण्यासवे वहात होती,
मनीचे संकल्प पुरे करीन म्हणून दिलासा सार्‍यांना देत होती..


Moodi
Monday, March 27, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा शुभश्री, अतिशय छान. पणतीचा प्रकाश वाटतो इवलासा पण घरदार अन मने उजळवुन टाकतो. नृत्य असे लिही nRutya .

Shubhashri
Monday, March 27, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks..mi ajun navin ahe ithe. purvi kelelya kavita post karatiy..pratikriye baddal dhanyavad.

Niru_kul
Monday, March 27, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता आवडल्यास कळवावे. नविन कविता लिहीण्यास स्फुर्ती मिळते.
पार्थसारथी.......


Dineshvs
Monday, March 27, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, तुला केलेली विनंति वैभवला कशी कळली ?
गिर्‍या, सावरी नुकतीच फुलतेय. कापुस नाही अजुन. तुझ्या अंगणातली सावरी तुला याद करत असेल, जसा मी तुला करतोय तसा.


Ninavi
Monday, March 27, 2006 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरज, शुभदा, छान लिहीताय. आणखी येऊ द्यात.

नीरज, आम्ही आवडल्याचं सांगूच, पण चुकून राहिलं सांगायचं तरी त्यासाठी लिहायचं थांबवणार नाहीस ना?


Vaibhav_joshi
Monday, March 27, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अगस्ती ... मायबोलीवर स्वागत ... गझलांची पर्वणी आहे आता

दिनेश .. डायरेक्ट लिहायचं ना मला .. हे असं निनावि कडून काय उगाच ! पण काय होतं ते कळेल का ? :-)

बापू ... काय म्हणू ? दिवसेंदिवस तुम्हाला भेटण्याची उत्कंठा वाढत चाललिये ... तुमच्याकडे माहितीचं भांडार आहे ...

गिरी ... सावरी मस्त !!! वार तुम्ही ठरवा रे आणि कळवा ... पण तोपर्यंत लिहीतो मी .. चालेल ना ?

शुभश्री ... छान .. मन उदास उदास कडवं मस्तच आहे .

पार्थ .. विषय मस्त होता .. मांडणी मध्ये गडबड वाटली मला .. राग नसावा ..

सर्वांचे मनःपूर्वक आभार





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators