Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
कविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » काव्यधारा » कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 04, 200625 03-04-06  3:29 am
Archive through March 06, 200625 03-06-06  6:31 am
Archive through March 07, 200625 03-07-06  1:31 am
Archive through March 08, 200625 03-08-06  9:18 am
Archive through March 09, 200625 03-09-06  10:00 am
Archive through March 10, 200625 03-10-06  10:05 am
Archive through March 13, 200625 03-13-06  5:54 am
Archive through March 15, 200625 03-15-06  11:34 pm
Archive through March 21, 200625 03-21-06  2:24 am
Archive through March 22, 200625 03-22-06  4:29 am
Archive through March 24, 200625 03-24-06  8:39 am
Archive through March 26, 200625 03-26-06  10:51 am
Archive through March 27, 200625 03-27-06  12:15 pm

Chinnu
Monday, March 27, 2006 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव! शेवटच्या ओळी सुंदर! शुभा छान लिहिलस. सावरी बावरी आणि गिरी! :-) छानच की!

Ashwini
Monday, March 27, 2006 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कवितेच्या bb वर पूर्वीइतकं सातत्याने येणं होत नाही. मधे मधे तर अजिबातच होत नव्हतं. परंतु तुम्ही सगळेच इतकं छान लिहीता की आता परत परत यावंसं वाटतं.
एक काळ असा होता की बेटी, pk , प्रसाद, पेशवा, आणि शमाच्या कवितांनी हा bb बहरून यायचा. त्यानंतर मग तितक्या ताकदीचं लेखन पाहायला मिळालं नाही. यात कुणाचाही अवमर्द करण्याचा हेतू नाही. इथे खरच येणं होत नव्हतं त्यामुळे अनेक जणांच्या दर्जेदार कविता पाहील्या नसण्याचा संभव आहे. तरी राग नसावा.
परंतु आता पुन्हा एकदा हा bb फुलला आहे. इतके देखणे, इतके भावगर्भ शब्द तुम्ही मंडळी कुठून आणता? सगळेच सुरेख लिहीता. नावं तरी कुणाकुणाची घ्यावी?
वैभव तू तर एक आश्चर्यच आहेस. किती सुरेख, आगळ्या कल्पना, आणि त्या साकार करण्यासाठी केवढे समर्थ शब्द. संघमित्रा, निनावी, पमा, आणि इतर सर्व खूप सुंदर लिहीता. इतकं प्रतिभावंत की दुसर्‍यांना इथे कविता टाकायचं धाडसच होऊ नये. :-)
गिरी, तुझी लेखणी अजून चालू आहे पाहून बरे वाटले.


Sarang23
Monday, March 27, 2006 - 10:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू, ते पांढुर नसून पांडुर असावं असं वाटतं...
उदाहरण...
...
केले वरि उदर पांडुर निष्कलंक...
...
खेड्यात बोलीभाषेमधे बहुदा ते अपभ्रंशीत रुपात वापरत असावेत.

बाकी पांडुरंग = पांडुर + अंग
म्हणजे एक दिव्य शुभ्र तेजोवलय, बाकी काहीच नाही! त्यामुळे मुर्ती काळ्या पाशाणात असण्याचा पांडुरंग या नावाशी काही संबंध नाही.
म्हणून म्हटलय...
पांडुरंग कांती
दिव्य तेज झळकती...
म्हणुन पांडुरंग हे नाव कदाचीत पंढरपुर मुळे आलं नसावं.


Ninavi
Monday, March 27, 2006 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, धन्यवाद.
आणि धाडस काय गं! आम्हीही नवोदितच आहोत!! इथे तुझ्यासारखी दोस्त मंडळी वेळोवेळी कौतूक करतात आणि लिहायचा हुरूप येतो.

( तू आमच्या कविता वाचतेस हे गुपित आजच कळलं. मी तू देत असलेली आरोग्यविषयक माहिती नियमीतपणे वाचते हे मी अजून कुण्णाला कळू दिलेलं नाहीये.)


Vaibhav_joshi
Tuesday, March 28, 2006 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनपाखरू ....

देहपिंजरा सोडून
मनपाखरू उडेना
नव्या क्षितिजाची आस
कशी त्याला खुणावेना ?

असे कसे आज त्याचे
शब्दपंख मिटलेले
त्याच त्याच नभी रोज
भराराया विटलेले

आता कुठून मी आणू
नित्य नवे नभ बाळा
काय हट्ट तुझा तरी
किती जीवघेणा चाळा

दिसामाजी बदलते
रंगरूप आकाशाचे
काल व्यापलेस तू जे
आज भास फक्त त्याचे

आहे अथांग रे वेड्या
विश्व देवाजीच्या कृपे
उडायचे सोडू नको
ऐक माझे तू इतुके

जा रे भरारी घेऊन
जिंकून ये चराचरा
गरूडाचा वंश तुझा
तुला शोभेना पिंजरा


Aparnas
Tuesday, March 28, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, परत एकदा खूपच छान कविता.....कुठुन इतक्या नवनवीन कल्पना सुचतात तुम्हाला? खरच ग्रेट......

Aparnas
Tuesday, March 28, 2006 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अनुस्वार कसा लिहायचा हे कोणी सान्गू शकेल का?

Moodi
Tuesday, March 28, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे लिहुन बघ सांगु. saa.ngu .

Aparnas
Tuesday, March 28, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मूडी, मला अनुस्वार लिहित आला आता...... नाहितर ते जोडाक्षर लिहिलेलं खूपच त्रासदायक वाटत होतं डोळ्यांना.....

Ninavi
Tuesday, March 28, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मस्त. अरे, ही तिकडे चित्रकवितेतही चालली असती.

Aavli
Tuesday, March 28, 2006 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GR8 Vaibhavrao Great
EK DAM fine KAVEESHWAR

Chinnu
Tuesday, March 28, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा अप्रतीम कविता आहे ही!

Aum
Wednesday, March 29, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मराठी वाचायला आणि लिहायला खूप छान वाटत आहे.

Kmayuresh2002
Wednesday, March 29, 2006 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा सही रे भाऊ..:-)

Pkarandikar50
Wednesday, March 29, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaibhav
तुझ्या किर्तीला साजेसे मनपाखरू. संयत आणि नेटकी अभिव्यक्ती, योग्य लाम्बी ही मला भावलेली काही वैशिठ्ये. खरे म्हणजे,कविपासून सुरू झालेला तिचा प्रवास काहीसा आत्मकेन्द्रि पण पुढे जऊन विस्तारणारा सार्वत्रिक असा तीचा आवाका. सकारात्मक आणि आशावादी शेवटात घडलेले स्थित्यन्तरहि स्पर्शून गेले.मला खूप आवडली.
बापू.


Ldhule
Wednesday, March 29, 2006 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, खुप छान लिहिलीय कविता.

Himscool
Wednesday, March 29, 2006 - 11:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
हिमांशु


Mi_anu
Thursday, March 30, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होतं का हो तुमचं कधी असं?
वाटतं नशिबच करतंय आपलं हसं..
नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,
सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस
नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू
क्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू
लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट
एरवी वेळेवर धावलात तरी चुकते भेट
वीकेन्डला जोडून कामवाली मारते दांड्या
आणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्या
रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला
पंक्चरायला तुमचेच चाक मिळते पडलेल्या काट्याला
निवांत येऊन टिव्हीसमोर बसता तेव्हाच वीज जाते
देवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला जाते
'व्हाय मी' हा प्रश्न देवाला विचारुन तुम्ही थकता..
रुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न चुकता
मग 'लकी शर्ट' आणि लकी दिवस हेरुन कामं करता
'आजचे भविष्य' पाच पेपरातून जमा करुन ठेवता
गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'
एकवेळ देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वालिटी'
आपल्या आयुष्याची स्टोरी आपण जगत जायची..
का कधी कसं ची उत्तरं त्याच्यावरच सोडायची..





Vaibhav_joshi
Thursday, March 30, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होतं तर ...

सिग्नलला हमखास आपल्यासमोरची गाडी बंद पडते

कौतुकाने मॅच बघायला बसलं की तेंडुलकर लवकर आऊट होतो

एक का दोन ... हजार गोष्टी .. पण कविता मस्त ..

सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रोत्साहनाबध्दल मनःपूर्वक आभार






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators