कुणी आपल्याला आपलं म्हणावं हा अट्टहास हवाच कशाला ? देण्यातच स्वर्गीय आनंद आहे तर घेण्याचा ऐहिक हव्यास कशाला ?
|
Meenu
| |
| Friday, March 24, 2006 - 2:24 am: |
|
|
रस्त्यावरच्या त्या भिकारणीनं कुत्र्याचं पिल्लू होतं पाळलं असावं कुणी आपलं वाटणं सांग कुणाला टळलं?
|
Meenu
| |
| Friday, March 24, 2006 - 2:35 am: |
|
|
खरं म्हणतोस देण्यामध्ये सुख आहे त्याच सुखामागे धावले होतं नव्हतं ते सारं सारं दिलं माझं सर्वस्व तो चाफाही दिला देण्यासारखं जेव्हा उरलं नाही काही दुसर्या कुणा सुखवायला तो त्यांच्या दारी गेला
|
Meenu
| |
| Friday, March 24, 2006 - 2:39 am: |
|
|
तुझ्या अश्रुंवरही राजा तुझा ताबा आहे माझ्या आसवांनी मात्र माझ्याशी मांडला उभा दावा आहे
|
Shyamli
| |
| Friday, March 24, 2006 - 2:46 am: |
|
|
अश्रुंच काय घेऊन बसलिस होत नाही त्याला जराही अडकायला आपणच वेड्या रडत बसतो तो केंव्हाच गर्दीत हरवलेला श्यामली!!!
|
अश्रूंच्या त्या जलशाला माझे अश्रु गेलेच नाहित मीच एकटा राहीन म्हणुन गात राहिले काही बाही
|
अश्रु सुख असो वा दुख सोडत नाही साथ... सुखात धरतात हाथ, तर दुखात येतात गाणं गात..
|
व्वा... झकास...मजा आली वाचून..सगळेच...मस्त सगळेच ताटवे सुंदर पण भासवे एकच देखणे बागेतल्या ह्या भ्रमराला शिकवा कुणी हो गुंतणे जास्वन्द...
|
सगळेच ताटवे सुंदर भासति सर्वची देखणे भ्रमरास ना ठावूक रे कमी कुणाला लेखणे
|
भ्रमरास त्या कळलेना कसे अडकले पद्मजात धुंद झाली रात्र, भानवर आले तेव्हा समजले गुपीत मात्र!
|
Meenu
| |
| Friday, March 24, 2006 - 4:28 am: |
|
|
फांदीवर एक पान एकल वाळलं गळण्याची वाट पाहणं त्यालाहि नाहि टळलं
|
फांदीवरचं वाळलं पान गिरक्या घेत खाली आलं डवरलेल्या झाडाकडे त्रुप्त पणे पहात राहिलं
|
Himscool
| |
| Friday, March 24, 2006 - 7:06 am: |
|
|
झाडावर आता एकच पान शिल्लक आहे खाली पडायची वाट पहात आहे
|
गळते ते सोनेरी आयुष्याच्या अखेरी.. मनोहर ते द्रुष्य परीपुर्ण आयुष्याच्या समाधानाचे, मज भावते ते रुप नविन आयुष्याच्या, नविन सुरवातीचे!!!
|
काय वैभव खुप दिवसानि छानच लिहितायेत सर्वजन शामलि मीनु देवदता खरच एकदम सही
|
Niru_kul
| |
| Friday, March 24, 2006 - 11:41 pm: |
|
|
आसवे किती गाळावित, यालाही शेवटी बंधन आहे; अश्रुच तर माझ्या या, जगण्याचे इन्धन आहे. पार्थसारथी......
|
Sarivina
| |
| Saturday, March 25, 2006 - 12:10 am: |
|
|
सारे सारे बंध संभाळून जगताना खुप कसोशीने बांध घातला मी माझ्या आसवांना
|
Niru_kul
| |
| Saturday, March 25, 2006 - 12:15 am: |
|
|
माझ्या अश्रुना मी, पापण्याखाली लपवलयं; वेदनेनेच तर माझ्या, या हास्याला जगवलयं. पार्थसारथी.....
|
Sarivina
| |
| Saturday, March 25, 2006 - 12:26 am: |
|
|
आठवणींनी साद घातली अन मग अश्रूही आले धावून त्या दोघांच्या संभाषणात मी गेले अगदी हरवून
|
Jo_s
| |
| Saturday, March 25, 2006 - 5:14 am: |
|
|
आश्रू, आसवं, डोळ्यातील पाणी याशिवाय नेत्रांचा उपयोग नाहीकाग राणी? तुझ्या नजरेसाठी बघ आतुरल्ये सृष्टी बघ जरा इतरत्र मिळव नवि दृष्टी
|
Heartwork
| |
| Saturday, March 25, 2006 - 5:31 am: |
|
|
अश्रु ढाळले मी आणि वेदनाही उरात साठवली पण रात्रिन्चा दिवस ढळताना पुन्हा कालची स्वप्ने आठवली!!
|
Heartwork
| |
| Saturday, March 25, 2006 - 7:12 am: |
|
|
अश्रुन्ची फुले असतात पण त्या फुलान्चा गुलकन्द नसतो कुठेहि जाउन बरसायला चाफा काहि स्वच्छन्द नसतो
|
Shyamli
| |
| Saturday, March 25, 2006 - 8:00 am: |
|
|
वा सगळेच छान.... .. .. ..
|
Shyamli
| |
| Sunday, March 26, 2006 - 12:15 am: |
|
|
कितिही टाळु म्हणले तरी परत परत डोळे भरुन येतात आसु आणि आठवणिंची घट्ट सांगड जाणवुन देतात श्यामली!!!
|
Shyamli
| |
| Sunday, March 26, 2006 - 12:25 am: |
|
|
कुणितरी आपल्याला आपल म्हणाव हे मागण का चुक आहे उद्या म्हणशिल माणसाचा जन्म मिळाला हे सुध्दा खुप आहे श्यामली!!!
|