|
mast g! ninavi.. .. .. .. ... ... dhanyavad chinu!
|
Shyamli
| |
| Friday, March 24, 2006 - 2:34 pm: |
|
|
>>>>तुझ्या हळव्या रुपाला नजरेनच स्पर्शुन घेते..! छान ग वैशालि... नीनावी.. क्या बात है
|
Lalu
| |
| Friday, March 24, 2006 - 2:50 pm: |
|
|
निनावी, सुंदरच आहे गं 'कृतार्थ'. आवडली.
|
Ninavi
| |
| Friday, March 24, 2006 - 2:56 pm: |
|
|
धन्यवाद, लोपा, लालू, श्यामली. मी एडिट करायची तर चुकून डीलीट केली!! पुन्हा टाकते. कृतार्थ... रोज रोज तेच सारे तेच ऊन तेच वारे तेच रोजचे पोळणे आणि रोजचे शहारे झाड पुरते वठले फांदी फांदी सुकी.. मुकी.. बोल फुटाया मुळांत ओल उरे ना तितुकी ऋतू येतात जातात जगरहाटी चालते क्षीण खोड कसेबसे देह आपला तोलते कधी एखादी वेल्हाळ शीळ येते कानावर स्मरतात अंधुकसे गेले हिरवे बहर अर्थशून्य आता उरे सारा फांद्यांचा पसारा नाही पांथस्थां सावली, नाही पाखरां निवारा भार होऊन भुईला नको नको वाटे जिणे परस्वाधीनच सारे, रुजणे वा उन्मळणे आणि शेवटी एकदा तो ही दीस उजाडतो चुलीसाठी कुणी त्याला चार लाकडे मागतो घाव निर्दय तरीही आता वाटतात हवे जळताना जगण्याला अर्थ लाभलेले नवे झाड कृतार्थ हासते राख राख झाल्यावर आता त्याचे गाणे गाते चुलीवरची भाकर....
|
अप्रतिम .... ही असली कविता चुकूनसुध्दा डिलिट व्हायला नको बरं का निनावी लोपा मस्तच गं !!!
|
वा उच्चच लिहिताय सर्व जण! लोपाची मनकवडी, वैभव ची मातृभाषा आणि निनावी ची कृतार्थ एक से एक आहेत अगदी. अप्रतिम!
|
Chinnu
| |
| Friday, March 24, 2006 - 3:36 pm: |
|
|
निनावी फार छान कविता ग!
|
Dha
| |
| Friday, March 24, 2006 - 4:42 pm: |
|
|
Ninavi, Apratim! khupach chan kavita ahe
|
Yog
| |
| Friday, March 24, 2006 - 6:43 pm: |
|
|
निनवी, वाह! सुन्दर रुपक आहे!
|
Niru_kul
| |
| Saturday, March 25, 2006 - 12:11 am: |
|
|
पानिपत १७६१..... निस्तब्ध आकाश, तुटलेला कडा; भळभळती जखम, अश्रुचा सडा; अस्ताचा सूर्य, गळालेले पान; कचकन घाव घालुन, कापलेली मान; विझलेल्या दिशा, थाबलेल्या वेळा; क्षितीजावर उभा, चंद्र रक्ताळलेला; डागाळळेला सदरा, करपलेली काया; निःशब्द रान, आकसलेल्या छाया; पिसाट मने, सुसाट वारा; फुटके नशीब, तुटलेला तारा; विरलेले दोन मोती, अनेक पाचू गळती; रुपड्याचा खुर्दा उडाला, त्याची नाही गणती. श्रीयुत विश्वास पाटील यान्च्या पानिपत या कादंबरीवर आधारीत पार्थसारथी.........
|
पार्थसारथी अजोड आहे हे वर्णन... त्या काळ्या संक्रांतीच्या संध्याकाळचे सदाशिवभाऊ, विश्वासराव, जनकोजी शिंदे, समशेर, इब्राहीम गारदी सगळ्यांनाच जिवंत केलस तू... थेट आत जाईल अशी कविता आहे...मस्तच! जमलं तर ही विश्वास पाटील ह्यान्ना पाठव.
|
पार्थसारथी .... सुंदर कविता
|
डायबेटिस ... तू जगाला सांगत फिरतेस ... माझी तब्येत जपण्यासाठी तू स्वतःच्याही जेवणात गोडधोड कमी केलंयस ... सलाम तुला .... पण आजकाल मोट्ठ्या मुश्किलिने पानात पडणारया एखाद्या गोड क्षणाची चवही रेंगाळू न देण्याची " काळजी " घेतेस इतक्या थराला खरंच नाही पोचलेला गं ... माझा डायबेटिस अजून तरी ......!!!
|
vaibhav...!!!!!!!!!!!!!!!!!.. .. . ,.. ..
|
Heartwork
| |
| Saturday, March 25, 2006 - 5:43 am: |
|
|
Mr. samikshak, तुम्हाला अजुनही असे वाटत नाहि का कि आपण चुकलो. मला तर असे वाटते कि तुमच्या अतिसुन्दर समिक्षणाचि प्रतिक्रिया म्हणुन तुम्हाला खुप खुप वाइट शब्दान्ची सप्रेम भेट द्यावि पण काय करु मला शिव्या देता येत नाहित. मि तुमच्यासारखा समिक्षक नाहि ना!!!!!
|
Giriraj
| |
| Saturday, March 25, 2006 - 5:45 am: |
|
|
निऽऽनाऽऽवीऽऽ! कृतर्थ अगदी! वैभवा,डायबिटिस,मातृभाषा दोन्ही ज़बरी. सारंग,क्या बात है.कल्पना आणि तुझ्या आवडीची वृत्तकल्पना दोन्ही एकत्रित आल्यावर काय पण बहार येते.(गरीबाला शिकवा राव दोनतीन वृत्त!)
|
Heartwork
| |
| Saturday, March 25, 2006 - 5:53 am: |
|
|
निनावि कृतार्थ सुन्दरच!! वैभव डायबेटिस नेहमिप्रमाणे [मस्तच]!!
|
डायबेटीस चा आशय छानच आहे. निनावी कृतार्थ आवडली. हार्टवर्क अरे कुणाच्या तोंडी लागतो आहेस तू?
|
Divya
| |
| Saturday, March 25, 2006 - 9:30 am: |
|
|
निनावी कृतार्थ नावा प्रमाणेच झाली आहे. अतिशय छान मनापासुन आवडली
|
सोबत सखे तुख्यासंगे तुडवली किती वाट, वाटले, वाट नव्हे, हा तर ताटवा. रेंगाळले थोडेसे पाय,नव्हे हा थकवा, घेऊ या का क्षणभराचा एक विसावा? हात असाच आश्वस्त हाती बन्दिस्त रहावा, उबेंत सोबतीच्या शिरावा सावलीचा गारवा. मिट्ट चादरीत लपेटून खुशाल भागलेल्या जनांनी निवांत व्हावे पिठूर लोण्याचा करत शिडकावा त्याने मात्र पहारा चोख द्यावा. तुझ्या अर्ध्या डोळ्यात धीट डोकवावे, माझे प्रतिबिंम्बी सावकाश मावळावे. किंचित अलग अधर, अबोल व्हावे, नि:स्तब्ध हुंकार तृप्त पापण्यांवर घुमावे. आणखी थोडी नागमोडी वळणे,आड बाकी, कोवळ्या उन्हांनी अशीच उलगडावी असले काटे-कुटे अथवा निर्लज्ज खळगे पायताणांवरचे प्रेमळ पान्ढूर असेच उजळावे. बापू करन्दिकर }
|
Giriraj
| |
| Sunday, March 26, 2006 - 1:32 am: |
|
|
वाह बापू! काल झाडे च्या प्रयोगाला आला नाहीत!
|
गिरि,धन्यवाद. काल एका लग्नाच्या रिसेप्शनला जावे लागले. झाडेचा प्रयोग कसा झाला? बापू.
|
माझ्या आडनावाची एक नवी व्युत्पत्ती एका आडवाव-बन्धुंनी दिली. कर,आनन्दी, कर=करन्दिकर.त्यामुळे आता मझ्यावर फारच जबबदारी येऊन पडली आहे. बापू
|
Agasti
| |
| Sunday, March 26, 2006 - 10:38 am: |
|
|
व्यथांना अता आवडू लागलो खुषीने पुन्हा बागडू लागलो मला बोलणे सुचत नव्हते सखे तुला वाटले आखडू लागलो तसा शांत होतो चितेवर तरी तुला पाहता धडधडू लागलो दिसेना कुणीही स्मशानी तसा स्वत: राख मी सावडू लागलो नसे थेंबही घेतला मी अजुन तरी का असा बडबडू लागलो? 'अगस्ती'स घे जवळ तू वेदने तुझ्यावाचुनी तडफडू लागलो अगस्ती
|
Giriraj
| |
| Sunday, March 26, 2006 - 10:51 am: |
|
|
अगस्ती,मायबोलिवर स्वागत! अश्याच गज़ला येऊ द्यात!
|
|
|