|
धन्यवाद दोस्तांनो ... सन्मे ... मिळेल , मिळेल अजून बरंच वाचायला मिळेल ... अरेच्च्या आज कविताच टाकली नाही मी !! समीक्षण कसं होणार ? छे छे ... टाकायलाच हवी ...
|
समीक्षक ... " काय रे किती पाडल्यास आज ? " काय सांगू किती पाडल्या म्हणून ? काल तुम्ही किती डागण्या दिल्या ... त्यावर नाही का ते अवलंबून ? आणि बघा ना तुम्हीपण काहीतरी लिहून ... की मेल्यात सारया जाणीवा ? पोहोचलात सगळ्यापलिकडे ? मग बसा ... समाधी लावून ... करीत देवाचं ध्यान ... पण आधी पुसा .. असले प्रश्न विचारताना ओसंडणारं ... ते विकृत समाधान
|
Ekrasik
| |
| Wednesday, March 22, 2006 - 10:00 am: |
|
|
वैभव, आसल्या फ़ाल्तू समीक्शका ची बड्बड इतकी मनाला लाउन घेउ नकोस तु जर मनाला लाउन घेतलेस तर त्यचा उद्देश साध्य नाही का होणार
|
Ekrasik
| |
| Wednesday, March 22, 2006 - 10:03 am: |
|
|
वैभव, बजार फ़ारच सुरेख झाली आहे रे. इथे सर्वच कवी सुन्दर लिहितात
|
छड दे यार! वाहवा, बहोत खूब, क्या बात है! उत्स्फूर्त चीत्कार, टाळ्यान्चे कडकडाट. 'पुन्हा एकदा' कुणाचा आग्रह, 'एकच आणखी' कुणाची फर्माईश. 'पुरे झाले आता, सोडा मला, जाऊ दे मला माझ्या घरला. होय, आणल्या होत्या की मी, काही उत्कट, भावूक काव्य पन्क्ती? ज्या तुमच्यासाठी होत्या, भरभरून उधळल्या ना मी त्या? सम्पला साठा सगळा, रिती झाली झोळी उरल्यात अगदी मोजक्या, तुटक्या ओळी त्यातल्या थोड्या राखीव काही, तीच्यासठी, उरल्या-सुरल्या फक्त, माझ्यासाठी. चाहते असलात माझे, म्हणून काय झाले? माझे सगळे नि:श्वास, सगळी स्वप्ने, कन्ठात दाटणारा एकूणएक आवन्ढा, सार्या, सार्यावर का तुम्ही, हक्क सान्गणार आहात, बिनदिक्कत? गरज नाही कुणी मला सान्गायची, नाही येणार ती पुन्हा माझ्या थार्याला. म्हणून काय झाले? तीचा वाटाही मी वाटून टाकू? आणि माझ्या अन्तर्गर्भात खोल, तुम्हाला डोकावू देऊ, खुशाल? माफ करा, नाही जमायचं आपलं, तुम्ही तुमची वाट धरा, माझी मी. ओय, छड दे यार!' बापू.
|
Sarang23
| |
| Wednesday, March 22, 2006 - 10:23 pm: |
|
|
वा! सगळ्याच कविता छान आहेत. क्या बात है!
|
Swasti
| |
| Wednesday, March 22, 2006 - 11:13 pm: |
|
|
अहो वैभव , जाउ द्या की , त्या समिक्षक साहेबान्चा खरचं जीव गुदमरला वाटत ... आम्ही लहान तोंडी मोठा घास घेतो पण ....... " समिक्षांत सख्या या वाद असा घालावा ? भाव सांगतर त्यांसी कणभरं तरी का द्यावा " ...................... ( कुसुमाग्रजांची शतदा क्षमा मागुन )
|
Milya
| |
| Thursday, March 23, 2006 - 12:52 am: |
|
|
आज बरेच दिवसांनी इकडे चक्कर टाकली वैभवा बाजार सहीच
|
Meenu
| |
| Thursday, March 23, 2006 - 1:04 am: |
|
|
बापू, छड दे यार सुंदरच... वैभव तुझ्या सगळ्याच कविता छान आहेत
|
मिल्या .. गुरुवार सकाळच आहे अजून .. विश्वास ठेवायचा कसा ? धन्यवाद दोस्तांनो .. बापू ... मस्त !
|
मातृभाषा ... तिच्यासाठी आणलेली औषधं हातात देताना जे दोन चार क्षण लाभतात तेवढ्यात देखील तिच्या हातावरच्या एकेक सुरकुतीमध्ये बालपणीचं एक एक वर्ष तरळतं ... प्रत्येक शब्दाआड " आई " म्हणणारा एक छोटा मुलगा दिसतो ... मग दोन थेंब पुरात वाहून जातं सगळं ... तरीही त्या भाबड्या पुरात भिजून " आई गोळ्या वेळेवर घेत जा गं ! " ऐवजी " टॅबलेट्स ! " असे कोरडे शब्द फुटतात ... आणि पाठ फिरते आजकाल माझी मातृभाषा बदललीय ...
|
वैभव, खूप सुंदर कविता. इथे उतरणारी तुझी प्रत्येकच कविता दर्जेदार आहे. लिहीत रहा... कुणाची पर्वा न करता...
|
aai, va! va! sundar , touching!!!
|
उध्वस्त मी क्रुर होते मी मग शब्दही निघतात रक्तबंबाळ... डोळे ओकतात आग, मनात पेटतो जाळ.. कसला सुड घेतोय काळ? क्रुर होते मी... दुसर्यांना भोसकतांना मी ही होते.. आतुन बहेरुन उध्वस्त... कसला संघर्ष ते ही रहात नाही लक्षात, फ़क्त उरतो मनस्ताप.. क्रुर होते मी.. भकास वडाच्या पारंब्या आवळतात मला, बघते जेव्हा.. उन्मळुन रडतांना वडाला, दाटतो गळा.. क्रुर होते मी.. वाटते आयुष्याची वाट चालावी कशी.. ठेवुन पाठीचा कणा ताठ.... ....!!!
|
Sarang23
| |
| Thursday, March 23, 2006 - 5:00 am: |
|
|
शरण कळसाचा माज शब्दाची पकड पायीचा दगड सार्थ असे माझा फक्त शब्द अर्थ राही मुक्त प्राक्तनाची सक्त सजा असे अज्ञानाला माझ्या उजळून देवा करू दे ना सेवा शब्दांतुन एका ओळीमध्ये चारच चरण आलो मी शरण सांगु पाहे सारंग
|
झाड वाढतं ते त्यांच्या मुळांमुळे...जर ती नीट निरखून पाहिली तर प्रत्येक मूळ हे असंख्य बारीक बारीक मुळात split होत जातं जसजसं त्याच्या टोका कडे जाऊ तसं... आणि टोकाला असंख्य शिरा दिसतात ज्या मातीत रुजलेल्या असतात, आणि झाडांच्या फ़ळांसठी लागणारी कितीतरी minerals बरोब्बर शोषून घेतात त्या मातीतून...एखाद्या निरोगी झाडावर लगडलेला आंबा पाहिला तर त्यात त्या शेवटपर्यंत मातीत रुजून त्यातून हवं ते शोषून घेणार्या ह्या शिरांची आठवण होते. वैभव, तुझ्या कविता वाचल्या की मला कायम हेच आठवतं...तुझ्या जाणिवा खूप sharp अणि बारीक संवेदना टिपणार्या आहेतच पण त्यातल्या प्रत्येक जाणिवेला ह्या भाषेतून नेमका कुठला शब्द वेचून घ्यायचाय हे अगदी perfect कळतं...त्यामुळे मग अश्या प्रत्येक कवितेतून वाचणार्याला एका मस्त रसरशीत फ़ळाच्या अवीट गोडीची भेट मिळते...
|
Hems
| |
| Thursday, March 23, 2006 - 12:50 pm: |
|
|
वैभव, सुंदर कविता ! होतं खरं असं .. का कोण जाणे ! सारंग , सुरेख आहे अभंग !
|
Zaad
| |
| Thursday, March 23, 2006 - 12:59 pm: |
|
|
echo ameya! echo ameya! (messageLimitError!!)
|
Ninavi
| |
| Thursday, March 23, 2006 - 8:00 pm: |
|
|
वैभव, लोपा, मस्त आहेत कविता. सारंग, अभंग सुंदर जमलाय.
|
वैशाली एकदम कडक कविता आहे छान आहे! सारंग भाऊ अभंग एकदम छान जमलाय आणि मांडलाय ही कल्पकतेने(मधल्या छोट्याश्या gap नी वेगळा ताल येतो वाचण्यात लगेच) निनावी तुझा मागचा अभंग आठवला हा वाचून...
|
vaibhav, Meenu, धन्यवाद. 'मातृभाषा' अगदी सह्ज, सुन्दर. अनलन्कृत सुन्दरीसारखी. कवि-कल्पनेला सार्वत्रिक अनुभवाचा स्पर्श झाला, त्यामुळे फारच मजा आली. बापू.
|
Sarang23
| |
| Thursday, March 23, 2006 - 10:37 pm: |
|
|
मित्रांनो, धन्यवाद. फक्त एक चूक झाली आहे... तिथे एका ओळीमध्ये ऐवजी ओवीमध्ये आहे. वैभवा सुरेख रे!
|
सर्वांचेच मनःपूर्वक आभार ... सारंगा ... आधी म्हटलं गुलाम अली " ऐसी लागी लगन " कसं काय म्हणतोय ... पण सुरेख जमलाय रे ... एका तज्ञ व्यक्तीकडून प्रत्येक ओवीचा अर्थ नीट समजून घेतला मी काल आणि खूप आनंद देऊन गेला हा अभंग
|
मनकवडी मी टपटपत्या पापण्या, झिमझिमता पाऊस... धुसर झाले जग कि माझ्याच मी जवळ येते झरझर डोळ्यासमोरुन सारे सरकुन जाते, उचकुन स्वप्न मी काही पाहुन घेते.. पापण्यांच्या पंखावरुन स्वप्नांच्या राज्यात.. सफ़र करुन येते.. मोगर्याच्या कळ्यांनी अंग माखुन घेते, ओल्या लवलवत्या पात्याचे मोरपिस, ओल्या जख्मांवर फ़िराउन घेते... ओल्या स्रुष्टीच्या ओल्या रंगात... माझ्या जगाला मी सजवुन टाकते! मनाच्या हिंदोळ्यांनी मी नभावर नाचुन येते.. आकाशाच्या निळाईचे मनपंख लावुन घेते, भिजायला सोबत माझ्या सुर्यालाही घेउन येते.. श्रावणधारात मी मनावर इन्द्रधनु कोरुन घेते! स्वप्नांच्या या राज्यात माझ्या आहे उन्हाचाही कवडसा, सावलीसाठी आहे जाईजुईचा आडोसा.. धुक्यात बुडालेला क्षण ओला, त्या चकाकत्या उन्हाने उजळुन घेते.. माझ्या हसण्याचे प्रतीबिंब तुझ्या डोळ्यात पाहुन येते, तुझ्या हळव्या रुपाला नजरेनच स्पर्शुन घेते..! मनकवडी मी त्या घडीत रंगुन जाते.....!!!
|
Chinnu
| |
| Friday, March 24, 2006 - 8:39 am: |
|
|
धुक्यात बुडालेला क्षण ओला.. वाह वा.. खुप छान वैशाली!
|
|
|