Ninavi
| |
| Tuesday, March 14, 2006 - 11:36 am: |
|
|
शब्दांमधल्या रिक्त जागा वाचण्यातच रात्र सरली आणि मग मजकूर वाचायची गरजच नाही उरली..
|
Jaaaswand
| |
| Tuesday, March 14, 2006 - 11:54 am: |
|
|
मस्त गं निनावे तुझ्या धाकधुकीला नेहेमीच चांदण्यांचा छंद आहे श्वास तुझे जपून ठेव त्यांना कस्तुरीचा गंध आहे जास्वन्द...
|
Shyamli
| |
| Tuesday, March 14, 2006 - 11:56 am: |
|
|
नीनावी काय सुन्दर लिहितेस ग!
|
Ninavi
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:15 pm: |
|
|
कसचं.. कसचं.. नाही, नाही, सगळेच चांगले लिहीत असतात तेव्हाच असं सुचत जातं. आणिहे काय श्यामली, चारोळीला उत्तर चारोळीच हवी. नुसतं कौतूक नाही. माझी पत्रं कोरी नाहीत.. मायना लाजेने पुसट झालाय मजकूर.. त्याची आपल्यात कधी गरजच नव्हती.. आणि खरं सांग, पाकीट उघडताक्षणीच तुला आला होता ना गंध ' फक्त तुझीच' फुलतानांचा..
|
Shyamli
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:25 pm: |
|
|
मी फक्त तुझीच असं मनाताच म्हणत होते तुझ्या गीतांमधे मात्र दुसरेच सुर होते श्यामली!!!
|
Shyamli
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:30 pm: |
|
|
तरीही...... कधीकधी सुर निघतात माझ्याही ओळखीचे त्यालाच म्हणते मी गाणे माझ्यासाठीचे श्यामली!!!
|
Jaaaswand
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:32 pm: |
|
|
वाह निनावी..वाह.. खरच मजा आली..मस्त लिहिलयेस.. हे एवढे काही जमत नाही बुवा आपल्याला पण काहीतरी लिहितोय बघा हं माझ्या पत्रात मजकुराचा कसलाच कधी नेम नसतो तुझ्या पत्रात " तुझीच " नंतर पुसलेला एक थेंब असतो श्यामले..खास तिकडच्या वाळूच्या Touch मधलं काही येऊ दे
|
Mavla
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:36 pm: |
|
|
माझी पत्र कोरिच होती... शब्द डोळ्यात, तु पत्रात वाचत होती, नाहीच कळली तुला कविता जी मेघदुतात साचत होती, तु कोरडीच राहिलीस तिथे जिथे मी अश्रुन्नी फुले वेचली होती.
|
Shyamli
| |
| Tuesday, March 14, 2006 - 12:43 pm: |
|
|
माहीत असत मला की तु फक्त "तुझीच"ला गोंजारणार हळुच माझ्या शब्दांवर हळवे ओठ उमटणार श्यामली!!! आधिच तेच तेच होतय का?
|
दिवस संपता संपत नाही रात्र ही जागुन जाई तुझ्याविना आता मला काहिच सुचत नाही एकची प्रश्ण पडे मजला तुला ही होते कधी असे काही की मी एकटी वेडी तुझी आस लावून वाट पाही -वेडी
|
एक एक क्षण एक एक दिवस मी मोजत होते, अश्रुंना ही मी अशीच समजावत होते हा दिवस गेला उद्या ही जाईल तरीही दिवस संपता संपत न्हवते फिरुनी येतो तोच दिवस, रोज तोच ध्य्यास आज ही असाच जाईल संपेल एक दिवस कशी समजावु अश्रुना रोज किती दिवस आता तेच थांबता थांबत न्हवते -वेडी
|
तुला आता जमवायला हव अश्रुंना आवरायला पावलं माझी वळनार नाहीत.. सखे तुला सावरायला.....
|
"प्रिय , .... " लिहीताना हात थरथरलेला दिसतोय... तुझीच " च्या आधीचा " फ़क्त ..." चिंब भिजलेला वाटतोय
|
दिवसा असे विचारी विचारी कोंडाळे त्या रात्री मात्र मी, माझी आतली, पोकळी कवटाळे पटल स्म्रुतींचे सरते, मागे पुढे सारे वळते त्या तिथे दिशाहीन रानी, शून्य मला उलगडते घालावी कुणी खूर्-मांडी, अन नाक मुठीत धरावे न कळे मला, तरीही कसे हे, गूढ उमजून जावे कधी कधी रात्र अशी मिळावी मनाचा पारवा नागवा करुनि जावी
|
वेडे शब्द भाबडे प्रश्न... सार सार तेच आहे ती काळजी ती ओढ.. घालमेल ही तीच आहे
|
Jo_s
| |
| Wednesday, March 15, 2006 - 12:42 am: |
|
|
उन्हाची आग, पावसाचा पूर हिवाळाही अती थंड हे का निसर्गाचं बंड?
|
Jo_s
| |
| Wednesday, March 15, 2006 - 12:55 am: |
|
|
कोण जाणे काय तुझ्या मनात पत्र तुझच, मजकूर तुझाच मी, फक्त पत्त्यातल्या नावात
|
Manuswini
| |
| Wednesday, March 15, 2006 - 2:39 am: |
|
|
दिवस नी दिवस मी झुरुन जाई तरीही आस मनी उरुन राही कधीतरी तुला मी आठवते का रे? .. का खोटी ही आस तुटे जसा जसा दिवस सरे
|
Shyamli
| |
| Wednesday, March 15, 2006 - 2:43 am: |
|
|
अरे वा मनु....काय ग?
|
Manuswini
| |
| Wednesday, March 15, 2006 - 2:46 am: |
|
|
काय श्यामली काय ग मी तुझीच वाट पहात होते खरे ग login ही केले तुला काय intution झाले का ग? आज दुर कुठे कुणी तारा अश्या छेडल्या असे आहे आज gmail वर ये ना
|
Shyamli
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:00 am: |
|
|
जरा एकट वाटल की आधार शोधतो जीव अश्यावेळी तरी तुला येत नाही का रे माझी कीव श्यामली!!!
|
Jaaaswand
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:01 am: |
|
|
राईतली भेट, बकुळीचे फ़ुल राहून राहून आठवत आहे तेव्हाचा हुंदका मोती होऊन रुमाल माझा भिजवत आहे जास्वन्द...
|
Devdattag
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:21 am: |
|
|
मला तुमच्या चारोळ्यांवरून मी इथे टाकलेली जूनी कविता आठवलि.. गौर नार देखणि उभी करुनी श्रुन्गार हाय घरि ना तिचा अजुनि भर्तार नजर तिचि स्थिर नयन पाणिदार उडे ध्यानी ना पदर तिचा हिरवागार कातरवेळ जाहली सय एकमेव साथिदार दाटे कंठ कधिचा नयनि अश्रु अनिवार रण सम्पले कधिचे इकडुन वेळ जाहली फ़ार कुजबुजती कानी कोणी होता शूर फ़ार सरदार
|
Chingutai
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:52 am: |
|
|
थरथरत्या पापणीने चिंब भिजविले शब्द आणि अर्थ त्या मजकूराचा डोळ्यात तरळू लागला
|
Jo_s
| |
| Wednesday, March 15, 2006 - 5:27 am: |
|
|
कीव परक्याची करतात आपल्या माणसाची काळजी करतात म्हणूनतर एकटं असो वा समुहात आपल्या माणसाना नेहमीच स्मरतात
|