Yog
| |
| Saturday, March 04, 2006 - 4:04 am: |
|
|
Diiptie, खूप सुन्दर.. शेवटचा विरोधाभास तर खास आहे!
|
Prem869
| |
| Saturday, March 04, 2006 - 5:04 am: |
|
|
निनावी वाह! फ़ारच सुन्दर कविता.!! वैभव समर्पक की सडेतोड.
|
Devdattag
| |
| Saturday, March 04, 2006 - 5:17 am: |
|
|
वैभव तुच लिहिलस म्हणून चांगलं झालं दिनेशदा.. इथे निनावि व्यतिरिक्त वैभव, पमा, प्रसाद, बापू, सारंग, सुमतिजी असे बरेच चांगले कवि देखील आहेत त्यांच्या कविता वाचल्यावर हे तुमच्या लक्षात येइलच. त्यामूळे पूर्वग्रह न बाळगता इतरांच्याही कविता वाचून त्यावर अभिप्राय दिल्यास इतरांनाही प्रोत्साहन मिळेल
|
नाही नाही , प्रेम तुम्ही नवीन दिसताय इथे , दिनेशदांना विनंती केलिये फक्त , त्यांना सडेतोड वगैरे लिहीण्याचा प्रश्नच येत नाही .. प्लीज ...
|
Giriraj
| |
| Saturday, March 04, 2006 - 6:32 am: |
|
|
वाह! निनावी सुंदर! तुला पाच गाव बक्षिस! अमृता,प्रत्येकजण जर तुझ्याईतकाच संवेदनशील झाला तर...... ?
|
Ninavi
| |
| Saturday, March 04, 2006 - 7:15 am: |
|
|
माझं वैभवला २००% अनुमोदन. खरंतर मीच हे म्हणायला हवं होतं, दिनेशदा प्रथम असं म्हणाला तेव्हाच. हा बीबी कवितांचा आहे आणि इथे कविताच appreciate झाल्या पाहिजेत. कवी नव्हे.
|
माझे अनुमोदन वैभवला, निनावीला आणि गिरिराजलासुद्धा, निनावीची कविता सुन्दरच आहे. प्रश्नच नाही. बापू
|
दिप्तीची कविता कुठाय? बरेच दिवसात तीने काही लिहेल नव्हत? बापू.
|
Diiptie
| |
| Saturday, March 04, 2006 - 10:48 am: |
|
|
वैभव बरोबर आहे निनावि शाश्वत आवडलीच! Yog dhanyavaad , khara prashna tocha hotaa
|
मण्डळी, हितगूज च्या पद्या सेक्शनला मी मनोहर सप्रे यान्ची कविता आणि भाष्य टाकलय. तुम्हाला आवडेल अस वाटतय. बापू.
|
Mmkarpe
| |
| Sunday, March 05, 2006 - 12:49 pm: |
|
|
होतो आज वेगळ्याच धुनित मांडवं म्हटलं आयुष्याच गणित... सुखांची बेरिज दुःखांची वजाबाकी आशांचा गुणाकार निराशांचा भागाकार घेउन जोडिला स्वप्नांचे हातचे मांडले समिकरण यश अपयशाचे आले उत्तर दोन अंक जीवन अपुर्णांक मृत्यू पुर्णांक
|
Athak
| |
| Sunday, March 05, 2006 - 1:24 pm: |
|
|
महादेवा , गणिताचे उत्तर अगदी बरोबर , फ़ुल मार्क्स
|
दीप्ती पहिल्यांदाच तुझी कविता वाचली. सुरेख कल्पना आणि प्रभावी भाषा. अतिशय परिणामकारक. निनावी सुं.. द.. र...
|
Urmila
| |
| Sunday, March 05, 2006 - 11:55 pm: |
|
|
घाट वळणा वळणातुन, घाटा घाटा मधुन पाण्याचे झरे मुक्तपणे वाहती. नयन मनोहर ते दृश्य पाहुनी मन माझे आनन्दुन जाई. झाडा झाडातुन शीळ ती ऐकू येई मन माझे येथुन घेई भरारी. खोल खोल त्या दर्या इवली इवली ती झाडे मनुश्य दिसती किती ठेन्गणे ठेन्गणे. निसर्गात महादेवाचे ते असे देऊळ त्यास हात जोडीता मनात माझ्या येई हसू. वारे देवा हे तुच रे ओळखले नको कोठे जाणे निसर्गातच रमणे! -सुमन
|
Bee
| |
| Monday, March 06, 2006 - 12:57 am: |
|
|
ही कविता मी खूप पुर्वी लिहिलेली आहे. अंदाजे २००१ मध्ये. पाहिली दुसरीच कविता असेल. काल जुन्या कात्रणांचे ढीग उपसताना एकाएकी हाती लागली. इथे नविन असताना कविता लिहिण्याचा मी सपाटाच घेतला होता. आपल्या कविता दिवसेंदिवस अधिक चांगल्या होत जातिल अशी एक छोटीशी अपेक्षा होती पण झाले मात्र उलटच.. आता अवस्था ह्याहूनही वाईट आहे की दोन ओळींची देखील अभिव्यक्ती उरलेली नाही. हे अस का झाल ही खूप खेदाची बाब आहे. सपना मेरा तूट गया.. अरे तू न रहा कुछ न रहा.. उन, मन आणि पान... ---------------------------- कोवळ्या उनाचे कवडसे एक हिरवस पान आणि अस्वस्थ मन उनाचे सौम्य किरण पानाची सळसळ आणि मनाची तळमळ उनाचे सोनेरी रूप पानाचा पिवळा रंग आणि मनाचे नैराश्य उनाची वाढती रणरण पानाची घनदाट छाया मनी दाटलेला काळोख उनाचे तप्त किरण पिवळे पिकलेले पान जळक्या मनाची चाळणी अखेरचा मंद प्रकाश गळून पडलेले पान मनाची घोर व्यथा पुन्हा एक नविन कवडसे पानाचे नवे अंकूर मनाचे गुदमरत जगणे...
|
Prem869
| |
| Monday, March 06, 2006 - 1:32 am: |
|
|
नाही नाहीहो वैभव मी नविन नाही इथे, परन्तु मी फ़क्त कविताच वाचलेल्या आहेत सहसा अभिप्राय लिहिलेले नाहीत. तरीहि चु.भु.द्या.घ्या. प्लीज अहो वैभव अहो जाहो नकोच नको एकतर मी तुम्हासर्वान्हून लहान आहे. म्हणून फ़क्त अरे तुरे. बी ए फ़्रेन्ड.
|
Prem869
| |
| Monday, March 06, 2006 - 1:39 am: |
|
|
कर्पे घाट सुन्दरच........ बी खरच उन्हाने पानन्ची मने आणि मनाची पाने दोन्ही उलगडली.... अप्रतिम!
|
bee, kavita chaan ... try again parat purvisarakhyaa suchaayala lagteel... mi hi navin navin kavitancha sapata lavala hota , mag konitari kavina julare mhatale aani mi kavita dene band kele . aata vaibhav chya pratikriyenatar parat kavita denyacha hurup aala!!!
|
Zaad
| |
| Monday, March 06, 2006 - 3:56 am: |
|
|
थोडे भरलेस रंग तूही अन थोडा झालो मीही दीवाणा, थोडे वठवले सोंग लटके थोडा होता खरा बहाणा. थोडा तुझ्या डोळ्यांत उतरलो तूही उचलली जरा पापणी, थोडे थोडे जुळवता शब्द इथे बहरली जरा लेखणी. थोडे क्षितीज, थोडी संध्याकाळ कुणी गाई त्यात विराणी. थोडे अंगण, थोडा पाऊस नाचून गेली निळी मोरणी. थोडे थोडे करता करता आलो आपण इतके जवळ थोडे हसता डोळ्यांत पाणी थोडे नसता व्याकूळ केवळ. थोडेसेही जे होते काही अता वाटते तेही नव्हते! त्या तसल्या थोडेपणाचे दु:ख सांग का इतके छळते....?
|
Shyamli
| |
| Monday, March 06, 2006 - 4:00 am: |
|
|
>>>>>थोडेसेही जे होते काही अता वाटते तेही नव्हते! त्या तसल्या थोडेपणाचे दु:ख सांग का इतके छळते....? वा झाड! मस्तच.. ..
|
अनाघ्रात क्षितिज ... तू नेहेमीच राखत आला आहेस एक सुरक्षित अंतर सर्वच गोष्टींमध्ये ... अन मला वाटतं हाच फरक असावा समजूतदारपणा अन कलंदरीमध्ये ... एक विशिष्ठ पातळी गाठून तू नेहेमीच जातोस थांबून तेव्हा पुढचं क्षितिज लांब नसतं ... एका इच्छेहून .. पण तू नुकतंच गाठलेलं आभाळ पांघरून .. किती प्रसन्न हसतोस .. तुझ्यापुरतं .. तृप्त तृप्त अन मी मुसमुसत राहते कवटाळून ते अनाघ्रात क्षितिज .. तुझ्या पूर्ततेमुळेच ... रिक्त रिक्त ....
|
Shyamli
| |
| Monday, March 06, 2006 - 4:28 am: |
|
|
>>>>नुकतंच गाठलेलं पांघरून .. हे कळल नाही रे... सांगशिल का? बाकी नेहमिप्रमाणेच सुन.दर
|
श्यामली ... गडबडीत आभाळ शब्द राहुन गेला होता , धन्यवाद
|
Sarang23
| |
| Monday, March 06, 2006 - 6:12 am: |
|
|
निनावी शाश्वत छान... कर्पे बढिया है! झाड छान! वैभव... तुझ्या पुर्ततेमुळेच ... रिक्त रिक्त .... वा!!!
|
Zaad
| |
| Monday, March 06, 2006 - 6:31 am: |
|
|
वैभव, कविता सहीच आहे.... 'अनाघ्रात' चा अर्थ नक्की काय होतो सांगशील का?
|