मलाही असाच भ्रम होतोय बहुधा... श्र, कर ना लवकर पूर्ण!
|
Maitreyee
| |
| Tuesday, January 17, 2006 - 12:40 pm: |
|
|
मस्त लिहित आहेस श्र! आता लवकर पूर्ण कर. ए, मला Hound of Baskerville ची आठवण आली
|
Yog
| |
| Tuesday, January 17, 2006 - 1:34 pm: |
|
|
श्र, लवकर सर्वांचे संभ्रम दूर करून टाक बरे..
|
Storvi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 1:55 pm: |
|
|
झालं या मैत्रेयी ने सगळ्यांच्या भ्रमाचा भोपळा फ़ोडला
|
Jit
| |
| Tuesday, January 17, 2006 - 3:25 pm: |
|
|
Ea lavakr puNa- kr ga
|
Megha16
| |
| Wednesday, January 18, 2006 - 9:20 am: |
|
|
श्र खरच ग खुपच उत्सुकता लागली आहे. लवकर पुर्ण कर कथा. मेघा
|
Bhagya
| |
| Wednesday, January 18, 2006 - 7:08 pm: |
|
|
श्रद्धे. please लवकर लिहि ग! बाबा कदमांची कादंबरी वाचतेय असं वाटतय.... सहीच आहेस ग!
|
Shraddhak
| |
| Thursday, January 19, 2006 - 6:38 am: |
|
|
.... धैर्यशील परत आला का त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी संपतला पाठवलं होतं. तो तिसर्या चौथ्या दिवशी दुपारी धापा टाकत धावत आला आणि धैर्यशील दुपारच्या बसने गावात आल्याची बातमी त्याने मला सांगितली. माझं काम आत्ता कुठे सुरु होत होतं. मी तयार होऊन बाहेर पडलो. गेले तीन चार दिवस गावात भटकून मला गावातली बरीच माहिती झाली होती. ... त्याच्या दोन्ही भावांप्रमाणेच धैर्यशीलचा देखील बराचसा वेळ सूर्याच्या संगतीत जात असे. दादासाहेबांच्या मालकीच्या असलेल्या एका आमराईत सूर्याने आपला अड्डा बनवला होता. गावात इनामदारांच्या असलेल्या दरार्यामुळे असेल कदाचित्; पण सूर्याने या जागेच्या सुरक्षेचा काही फार मोठा बंदोबस्त केलेला नव्हता. त्यामुळे मला या ठिकाणी त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणं सहज शक्य होतं. रावसाहेबांनी त्यांची खास विश्वासू माणसंदेखील माझ्या सोबत दिली होती. जर हातघाईचा प्रसंग आला तर सूर्यापासून धैर्यशीलचं रक्षण करताना आमचं बळ कुठे कमी पडू नये, म्हणून केलेली उपाययोजना होती ती... ही माणसं आमराईच्या आसपास असणार्या शेतांमध्ये विखुरलेली राहणार होती. गरज पडताच मी त्यांना ताबडतोब मदतीला बोलावू शकलो असतो. ... संध्याकाळी धैर्यशील वाड्यातून बाहेर पडला तेव्हा योग्य अंतर राखून मी त्याचा पाठलाग सुरु केला. तो आमराईत पोचला; तेव्हा चांगलाच अंधार पडला होता. अंधाराचा फायदा घेत आता मला सूर्याच्या ठिकाणाच्या जास्तीत जास्त जवळ जाता आलं असतं. त्यांच्यात नक्की काय बोलणं होतं, तेदेखील ऐकता आलं असतं. मी सूर्याच्या खोलीच्या खिडकीखाली बसून कान देऊन ऐकू लागलो. " या धाकले इनामदार, कशी काय झाली यावेळेस तालुक्याची ट्रीप? " हा आवाज नक्की सूर्याचा होता. " काही खास नाही. आजकाल ती पूर्वीची मजा नाही राहिली तालुक्याला जायला. तालुक्याला जाऊन पोलिस स्टेशनात पण गेलो होतो. अजून प्रल्हाद अन महादेवदादांच्या खुन्यांचा पत्ता लागलेला नाही. आम्हाला आमच्या जिवाचीपण शाश्वती वाटत नाही. ते खुनी उद्या आमच्याही जिवावर उठले म्हणजे.... " " लागेल हो पत्ता, धाकले इनामदार. मारेकरी असतील गावतलंच! कुठे जातील; एक दिवस गावतीलच.... पण आता त्यांच्या कामाची जबाबदारी तुम्हाला घ्यायला हवी. मी एकट्यानं हे सगळं सांभाळू शकणार नाही. इनामदारांच्या माणसांना मी कसा हुकूम देणार? त्यांना तुमच्याच आज्ञेत राहायला हवं.... आणि तुमच्या सुरक्षेची फिकीर करू नका इनामदार... हा सूर्या कशाला आहे मग? " हे वाक्य सूर्याच्या तोंडून ऐकून मात्र मी चमकलो. म्हणजे अजूनही दादासाहेब इनामदारांचे नोकर त्यांच्याच आज्ञेत होते तर! मग रावसाहेबांनी वर्तवलेली शक्यता.... " प्रल्हाद आणि महादेव बरोबर सतत असल्याने त्यांच्या कंपूत सूर्याचा त्यांच्याच तोडीचा दरारा आहे. आणि तो जर धैर्यशीलच्या जिवावर उठला तर ती माणसं सूर्याला साथ देतील. " तिचं काय? कदाचित सूर्याने प्रल्हाद आणि महादेवचा काटा काढल्यावर दादासाहेबांच्या इमानी नोकरांचा अंदाज घेऊन पाहिला असावा.. आणि ते अजूनही फक्त इनामदारांचंच ऐकतील ही खात्री झाल्यामुळे त्याने धैर्यशीलला संपवण्याचा विचार लांबणीवर टाकला असावा. त्यालाही अखेर त्याचा जीव प्यारा असणार. सद्यपरिस्थितीत मला हीच अटकळ बांधता आली. म्हणजे सध्या धैर्यशीलच्या जिवाला धोका नव्हता का? ... धैर्यशीलमागोमाग मी दादासाहेबांच्या वाड्याकडे परतलो; आणि तो पुन्हा कुठेही जात नाही, ही खात्री झाल्यावर रावसाहेबांच्या वाड्यावर. रात्रीचे साडे अकरा झाले असावेत. रावसाहेब जागत बसले होते. " सर्व काही ठीक.... " असं त्रोटक सांगून मी माडीवरच्या माझ्या खोलीमध्ये गेलो. तिथे माझं जेवणदेखील वाढून झाकून ठेवलेलं होतं. ते खाऊन मी मध्यरात्री केव्हातरी झोपी गेलो. क्रमशः
|
Shraddhak
| |
| Thursday, January 19, 2006 - 6:46 am: |
|
|
... एकामागून एक दिवस चालले होते. माझं काम आता निरर्थक झाल्यासारखं वाटत होतं. सूर्या खरोखरच धैर्यशीलच्या सुरक्षेची काळजी घेत होता. आणि सध्यातरी त्याचा धैर्यशीलचा काटा काढण्याचा काहीही इरादा दिसत नव्हता. धैर्यशीलने बहुधा कामात लक्ष घालायला सुरुवात केली असावी. कारण तो सकाळी सकाळी वाड्याबाहेर पडत असे आणि रात्री किमान अकराच्या आधी कधी परतत नसे. दादासाहेबांच्या आपल्या धाकट्या पोराच्या दिमतीला जवळपास सगळे विश्वासू गडी देऊन ठेवले असावेत. कारण तो वाड्याबाहेर पडताना देखील एक - दोघेजण त्याच्या सोबत असत... आणि ते त्याची रात्री परतेपर्यंत सोबत करत. दादासाहेबांचा सूर्यावर रावसाहेब म्हणाले तितका भरोसा खरोखर नव्हता तर... मग मी धैर्यशीलचा अंगरक्षक म्हणून काम करावं अशी रावसाहेबांची इच्छा का होती? अचानक मला नार्याचं बोलणं आठवलं आणि कुणीतरी खाडकन थोबाडीत मारून शुद्धीवर आणावं तसं झालं. " रावसाहेब सोडणार न्हाईत. बदला घेतल्याबिगर राहनार न्हाईत. परलाद आन म्हादेवला मारलं त्येंनी... धैर्यशीलला बी ते सोडायचं न्हाईत..... " धैर्यशीलच्या दैनंदिन कार्यक्रमांवर नजर ठेवून एकदा ते पक्कं माहीत झाल्यावर मग ' तो नेमका कुठल्या वेळेला एकटा किंवा कमीत कमी माणसांबरोबर असतो याचा पत्ता आपसूक लागला असता. मग ते त्याचा काटा काढणार होते की काय? माझी खरी कामगिरी हीच होती का? पण अजूनही मला रावसाहेबांना धैर्यशीलच्या दिनक्रमाबद्दल एका अक्षरानेही विचारलं नव्हतं. ते माझाही अजमास घेत होते का? कुठल्या प्रकारे माझ्याकडून ती माहिती, मला संशय न येऊ देता काढता येईल असं पाहत होते का? रावसाहेबांना याबद्दल पुन्हा जाब विचारण्यात फारसा अर्थ नव्हता. त्यांचं उत्तर कायम असणार हे मला माहीत होतं. मी या कामगिरीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याच दुपारी मी रावसाहेबांशी बोलायला गेलो. धैर्यशीलच्या सुरक्षेचा दादासाहेबांनी किती व्यवस्थित बंदोबस्त केला आहे हे मी त्यांच्या कानावर दहा दहादा घातलं. ते ऐकून त्यांच्या चेहर्यावरचे भाव बदलतात का ते मला पाहायचं होतं. पण ते तसेच निर्विकार राहिले... " ... उद्या पौर्णिमा आहे रावसाहेब... मला येऊन एक महिना होईल. उद्या मी इथून निघेन म्हणतो. " मी समारोप करत म्हणालो. " ठीक आहे अर्जुनराव... जशी तुमची मर्जी! कामाशिवाय तुम्हाला इथे थांबवून ठेवून तुमचा वेळ वाया घालवू इच्छित नाही आम्ही! उया तुमच्या बिदागीचं पाकीट तयार ठेवतो; संध्याकाळच्या बसमध्ये रिझर्वेशन करून ठेवतो. " मी निघणार जरी दुसर्या दिवशी होतो तरी आजची रात्र ठरल्याप्रमाणे मला धैर्यशीलवर नजर ठेवायला हवी होतीच! मी संध्याकाळी उशिरा पुन्हा बाहेर पडलो. आमराईमध्ये मी पोचलो तेव्हा सूर्याच्या खोलीमध्ये चक्क पार्टी चालल्याचं माझ्या लक्षात आलं. " अहो धाकले इनामदार... घ्या की अजून राव! तुम्ही आता आमचे भागीदार.. आजची पहिलीच कामगिरी तुम्ही लई चांगली पार पाडलीत. वाईच घ्या अजून! " बहुधा तो धैर्यशीलला दारू पाजत असावा. धैर्यशीलचा अडखळता आवाज माझ्या कानावर येऊ लागला. " सूर्या गड्या ही कसली कामगिरी? खरी मोठी कामगिरी अजून करायची आहे आम्हाला... " " मोठी कामगिरी? आन ती कसली? " नकळत सूर्याचा स्वर चौकस झाला. " इनामदारांच्या खजिन्याबद्दल माहीत आहे का? " मी चमकलो. अजूनही तो शापित खजिना याच्या डोक्यातून गेला नव्हता का? " त्याचं काय? " " तो इनामदारांचा खजिना आहे. विश्वासराव इनामदारांना पत्ता लागला होता की पौर्णिमेच्या रात्री जो कुणी इनामदार सतीच्या देवळापाशी जाईल आणि सतीची प्रार्थना करेल त्याला तो खजिना त्या रात्री बारानंतर अगदी स्पष्ट दिसतो. खोदून काढता येतो. मात्र हे खजिना शोधण्याचं काम इनामदारांनीच करायचं असतं. इतर कोणाला तो दिसत नाही. " ... मी श्वास रोखून ऐकत राहिलो. " विश्वासरावदेखील त्या पौर्णिमेच्या रात्री खजिना शोधायला म्हणून सतीच्या देवळापाशी गेले. प्रल्हाद आणि महादेवदादांसोबत मीदेखील गेलो तिथे... प्रल्हाद दादानी वाटा मागितला विश्वासरावांना... विश्वासराव नाही म्हटले.. त्यावरून जुंपलं त्यांचं भांडण... प्रल्हाददादाच्या साथीला मग आम्ही आणि महादेवदादा देखील धावून गेलो.... विश्वासरावांच्या बरोबर महिपत होता आणि त्यांचा तो कुत्रा, वाघ्या... विश्वासरावांना आणि महिपतला संपवलं आम्ही पण वाघ्या.... आम्हाला त्याला मारता आलं नाही... तो एकटा झुंजत होता... पण विश्वासराव कोसळले तेव्हा ते ओरडले वाघ्याच्या नावानं... वाघ्या जा इथून! भलतंच इमानी जनावर. त्याने ती आज्ञा ऐकली. आणि म्हणूनच वाचला.... शूर कुत्रा म्हणे! शूर??? आता नुसता वाड्यावर पडून असतोय म्हणे... " " पण त्या खजिन्याचं आता काय? " सूर्याने मुख्य मुद्दा सोडला नव्हता. " उद्या पौर्णिमा आहे ना? आम्ही उद्या तो खजिना शोधायला जाणार आहोत. " दारूच्या पुरत्या अंमलाखाली गेलेल्या धैर्यशीलने हे जाहीर केलं आणि माझ्या काळजाच्या ठोका चुकला. किमान हे त्याने सूर्यासमोर तरी जाहीर करायला नको होतं असं मला वाटून गेलं. धैर्यशीलचं बरळणं चालूच होतं... " ... त्यांचं अपूर्ण काम आम्ही करू पूर्ण... इनामदारांचा खजिना आमच्याच घरात येईल.... आम्ही त्या खजिन्याचे वारस आहोत आता... अपूर्ण काम... पूर्ण करायचंय.... " आणि शुद्ध हरपता हरपता ते बोलले.... प्रल्हाद दादा अन महादेव दादा त्या रात्री त्या खजिन्याच्या शोधातच तर गेले होते.... " क्रमशः
|
Shraddhak
| |
| Thursday, January 19, 2006 - 7:04 am: |
|
|
मी रात्री एक दीडच्या पुढे कधीतरी घरी परतलो. इनामदारांची सारी माणसं केव्हाच निद्राधीन झाली होती. कुणालाच जागं न करता मी माडीवरच्या माझ्या खोलीत गेलो. अन्नावर तर वासना नव्हतीच... जेमतेम पाणी पिऊन मी बिछान्यावर आडवा झालो. पौर्णिमा उलटेपर्यंत मी गावातून जाऊ नये असं माझं मन मला सांगत होतं. दुसर्या दिवशी सकाळी इनामदारांशी सविस्तर बोलायचं ठरवून मी झोपी गेलो. ... दुसरा दिवस उजाडला तोच एका अशुभ शकुनाने! रात्री उशिरा झोपलो तरी मला पहाटेच जाग आली. लौकर जाग आली तर फिरायला जाण्याची माझी सवय होती. बाहेर पडल्यावर माझे पाय आपसूक सतीच्या देवळाकडे वळले. सगळीकडे दाट धुकं पसरलं होतं. सतीच्या देवळाच्या पायर्यांवर कुणीतरी पडलेलं आहे असं मला वाटलं म्हणून मी भराभर तिकडे गेलो. नार्या तिथे अंगाचं मुटकुळं करून पडला होता. मी त्याला हलवून बघितलं. " इनामदारांचं पावनं... " तशाही स्थितीत त्याने मला ओळखलं. त्याच्या वाचण्याची शक्यता दिसत नव्हती. तो थंडीने पुरता गारठला होता. अस्पष्ट होत चाललेल्या आवाजात तो मला म्हणाला... " काही मान्सांना बी दिसतात.. पन त्येंना.. त्येंना.. आत्मे दिसतात बी आणि त्येंचा आवाज बी ऐकू येतो... त्येंना सपस्ट दिसतात. त्येंना समदं समजतं... समदं... " त्याने मान टाकली. त्याच्या त्या उद्गारांची काहीच संगती लागत नव्हती. पण त्यावर विचार करायला मला वेळ नव्हता. रात्री धैर्यशीलने खजिना शोधण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला त्यानंतर उद्भवणार्या प्रत्येक संकटातून बाहेर काढायला हवं होतं. मी रावसाहेबांच्या शिवारात काम करणार्या गड्यांना हाका मारल्या आणि नार्याबद्दल सांगितलं. ते मार्गी लावून मी ताबडतोब वाड्याकडे परतलो. आदल्या दिवशी ऐकलेलं सगळं संभाषण मी इनामदारांच्या कानावर घातलं. " ... त्याला त्या वेडापासून परावृत्त तर नाही करता येणार पण मी तुमच्या माणसांच्या मदतीने मिळून त्याचं रक्षण करू शकतो. मला तरी खजिना ही एक नुसतीच अफवा वाटतेय. तिथे काहीही मिळालं नाही तर धैर्यशील पुन्हा खजिन्याच्या भानगडीत पडणार नाही.. आणि खजिनाच नसेल तर सूर्यादेखील धैर्यशीलच्या जिवावर उठणार नाही. " मी माझ्या योजनेचा समारोप करत म्हणालो. " ठीक आहे अर्जुनराव. तुमचं बोलणं पटलं आम्हाला. आमच्या माणसांमधून हवी तितकी माणसं घेऊन जा. पण धैर्यशील जिवंत राहिला पाहिजे. " .... संध्याकाळ झाली. रावसाहेबांच्या माणसांतून मी तगडी अशी पंधरा माणसं निवडली आणि त्यांना शिवारात जागा नेमून देऊन लपून बसायला सांगितलं. मी सगळ्यात पुढे, सतीच्या देवळाच्या अगदी जवळ दबा धरून बसलो. घड्याळाचा काटा हळूहळू बाराकडे सरकू लागला. ' धैर्यशीलला इकडे न येऊ दे. ' अशी प्रार्थनाही मी करत होतो. पण तसं व्हायचं नव्हतं. पावणेबाराला माळरानावरून बोलण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. धैर्यशील येत होता. सुरक्षेला म्हणून त्याने एक दोनच माणसं बरोबर आणली होती. देवळापाशी आल्यावर त्याने त्यांना परत जायला सांगितलं. कदाचित आपण इनामदारांच्या घराण्यातल्या नसलेल्या व्यक्तीला सोबत घेऊन खजिना शोधायला लागलो तर सतीचा कोप होईल अशी भीती त्याला वाटत असावी. ते दोघं वळले आणि निघून गेले. धैर्यशील मंदिरात जाऊन प्रार्थना करत असावा. दहा एक मिनिटांत तो बाहेर आला आणि एका विशिष्ट दिशेने चालू लागला. खरोखर त्याला खजिना दिसला होता की काय? आता तो माझ्या दृष्टीच्या टप्प्याबाहेर जात होता. मी क्षणभर घोटाळलो. मी त्याचा मागे गेलो तर इतर गड्यांच्या आवाजाच्यादेखील टप्प्याबाहेर गेलो असतो. मदतीला कुणाला हाके घालण्याएवढाही वेळ माझ्याकडे नव्हता. मी तसाच उठलो आणि थोडं अंतर राखून धैयशीलचा पाठलाग करू लागलो. तो अजून थोडा पुढे गेला असेल नसेल... तो अचानक थांबलेला मला स्पष्ट दिसला. दचकल्यासारखा... तो संकटात असावा हे जाणून मी पुढे धावलो आणि... माझे पाय पुढे पडेनात. ... धैर्यशीलच्या समोर उभा होता.. वाघ्या! पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश इतका स्वच्छ होता की त्यात वाघ्याचा हिंस्त्र चेहरा मला स्पष्ट दिसला. वाघ्याचं नुसतं दर्शनदेखील उरात धडकी भरवणारं होतं... या क्षणाला तो केवळ भयावह दिसत होता. धैर्यशीलची किंकाळी देखील घशात अडकली असावी. एका क्षणात माझा निश्चय झाला. वेळ पडली तर वाघ्याशी झुंज घ्यायची मनाची तयारी करून मी पुढे जाऊ लागलो. " थांब... तिथेच थांब. तू कितीही प्रयत्न केलास तरी तू त्याला वाचवू शकत नाहीस. " आता वाचा जायची माझी पाळी होती. मी गर्रकन वळलो. उजवीकडे काही अंतरावर विश्वासराव उभे होते. माझ्या डोक्यात वीज चमकून गेली. " काही मान्सांना बी दिसतात.. पन त्येंना.. त्येंना.. आत्मे दिसतात बी आन त्येंचा आवाज बी ऐकू येतो... त्येंना सपस्ट दिसतात. त्येंना समदं समजतं... समदं... " त्यांना स्पष्ट दिसतात... कुत्र्यांना... बर्याच पूर्वी कधीतरी ऐकलेली ती गोष्ट आठवली... कुत्र्यांना आत्मे दिसतात. त्यांचं अस्तित्त्व जाणवतं. म्हणूनही कधी कधी कुत्री रात्रीबेरात्री रडतात. आता धडाधड सर्व गोष्टींची संगती लागत होती. पौर्णिमेला बाहेर पडलेले प्रल्हाद आणि महादेव, विश्वासरावांना बघू शकणारा वाघ्या... दर पौर्णिमेला व्याकूळ होऊन रडणारा वाघ्या... केवळ तिसरी शिकार तावडीत येत नव्हती म्हणून! आणि आज इथे माळरानावर धैर्यशीलला संपवायच्या इराद्याने मालकाच्या हुकुमावर इथे आलेल्या वाघ्या... " इमानी जनावर आहे ते... " माझ्या डोक्यात रावसाहेब इनामदारांचे शब्द घुमू लागले. " मार वाघ्या त्याला संपवून टाक! तुझ्य मालकाला मारलं त्याने वाघ्या. संपव. आम्हाला मारून ते तिघेही जित्ते राहणार नाहीत. त्याचे दोन्ही भाऊ गेले. यालाही त्याच वाटेनं पाठव वाघ्या... " विश्वासराव ओरडत होते. माझे पाय जागेवरून हलत नव्हते.... त्याच जागी खिळून मी ते भयाकारी नाट्य बघत होतो. धैर्यशील आणि वाघ्याची जोरदार झुंज चालली होती. वयाने कोवळा असला तरी धैर्यशील अंगाने धिप्पाड होता. मृत्यू समोर दिसत असताना त्याची जिवंत राहण्यासाठी निकराची धडपड चालली होती. विश्वासरावांच्या आरोळ्या, वाघ्याचं कान फाडून टाकणारं गरजणं आणि धैर्यशीलने जिवाच्या आकांताने केलेला आक्रोश... माझी शुद्ध केव्हा हरपली मलादेखील कळलं नाही. ... किती वेळ मी तसाच पडून होतो; मला ठाऊक नाही. पण भानावर आलो तशी चोहोकडे भयाण शांतता दाटली होती. मी पिसाटल्यासारखा सतीच्या देवळाच्या दिशेने धावलो. ... देवळाच्या पायर्यांवर दोन मृतदेह पडले होते. एक धैर्यशीलचा आणि दुसरा.. वाघ्याचा! वाघ्याच्या अंगावर ठिकठिकाणी चाकूचे खोल वार होते. त्याच्या धन्याच्या खुनाचा सूड घेताना त्या इमानी प्राण्याने आपले प्राण गमावले होते. धन्याने सांगितलेलं काम पूर्ण करून वाघ्यादेखील धन्याला साथ द्यायला निघून गेला होता. त्याचं ते अजस्त्र धूड चांदण्यात चमकत होतं, रक्ताने माखून अजूनच भेसूर दिसत होतं. ..... सतीमाय साक्ष होती. दादासाहेबांचा निर्वंश झाला होता. समाप्त
|
Champak
| |
| Thursday, January 19, 2006 - 7:18 am: |
|
|
.. .. .. ..
|
Aj_onnet
| |
| Thursday, January 19, 2006 - 7:22 am: |
|
|
श्रद्धा, छानच आहे कथा.
|
Ammi
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:28 am: |
|
|
सुन्दर होती कथा. मस्त.
|
Phdixit
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:48 am: |
|
|
श्र नेहमीप्रमाणेच मस्त, शेवट मात्र अनपेक्षित
|
Milindaa
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:56 am: |
|
|
in fact , शेवट अगदीच अपेक्षित झाला असं म्हणावं लागेल. कथेचं नाव वाचलं आणि निम्मी कथा झाली की काय होउ शकेल याच लगेच अंदाज आला होता. कथा चांगली आहे पण नेहमीसारखी शेवटपर्यंत रंगली नाही असं माझं मत आहे.
|
Lalu
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:03 am: |
|
|
कथा वेगळी आणि चांगलीच आहे. भाई आणि pk च्या म्हणण्याप्रमाणे एकदम टाकली असती तर बरं झालं असतं. थोडी थोडी टाकल्यामुळं लोकाना वेळ मिळाला पुढे काय होईल याचा अन्दाज बांधायला आणि त्यामुळं अपेक्षित शेवट झाला असं वाटलं
|
Gandhar
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:06 am: |
|
|
मिलिंदाला अनुमोदक...... कथा छान आहे! पण शेवट रंगला नाही.. बाकी लेखनशैली छानच आहे तुझी.. बारकाव्यांचे वर्णन छान केले आहेस.. आता पुढची गोष्ट येऊ दे
|
Maitreyee
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:22 am: |
|
|
हो खरय अन्दाज येत गेला पुढे काय होईल. शेवटी विश्वासरावाचा आत्मा नसता आला तरी चाललं असतं गं.(पण श्र ची कथा म्हटल्यावर दिलखेचक लव ष्टोरी किन्वा आत्मा काहीच नाही असे झाले असते तर चुकल्या चुकल्या सारखे वाटले असते) ~D~D असो पण पूर्ण कथा छानच लिहिली आहे.
|
Nalini
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:40 am: |
|
|
श्र. कथा खुपच सुरेख होती. पुढच्या कथेची वाट पहायला सुरवात केलीय आता.
|
Paragkan
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:47 am: |
|
|
श्रद्धा, लिखाण अधिकाधिक सराईत आणि सहज व्हायला लागलं आहे तुझं. आवडली कथा. अर्थात एकदम सगळी कथा टाकली असतीस तर तर्कवितर्क करायला वेळ मिळाला नसता आणि शेवट अधिक परिणामकारक झाला असता.
|
Charu_ag
| |
| Thursday, January 19, 2006 - 12:11 pm: |
|
|
श्र, छान होती कथा. मी पुर्ण होइपर्यंत वाचली नव्हती, सलग वाचल्यामुळे शेवटही अनपेक्षीत वाटतोय.
|
PK AaiNa imailanda laa AnaumaÜdk
|
Maitreyee
| |
| Thursday, January 19, 2006 - 1:37 pm: |
|
|
हवे मला पण दे की एक मोदक :P
|
Prajaktad
| |
| Thursday, January 19, 2006 - 3:49 pm: |
|
|
श्र!छान लिहलस ग!पुढचि कथा लिही आता
|
Storvi
| |
| Thursday, January 19, 2006 - 6:22 pm: |
|
|
yes yes, pk and milindaa आणि पर्यायाने ह. ह. आणि मैत्रेयी आणि लालू सगळ्यांना मोदक
|
Kandapohe
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:12 pm: |
|
|
मोदक खाण्यत मी का मागे पडावे बरे!! श्र नावावरूनच बराच अंदाज बांधता आला होता. पण लिखाणाची शैली मस्तच होती. एकूण हवापालट मानवत आहे तुला. MT, Hound of Baskerville असते तर कथेचे नाव भास्कर व्हीलाचे श्वान ठेवता आले असते.
|
Shraddhak
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:47 pm: |
|
|
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. एकदम सलग टाकायला हवी होती हे खरंय. पण पूर्ण करून टाकू म्हणत न पोस्ट करता ठेवली असती तर माझ्या आळशीपणामुळे कदाचित पूर्णच झाली नसती. तेही बरंच झालं असतं, असं म्हणायचंय का कुणाला? भास्कर व्हीलाचे श्वान <<<<< केपि.. पुढच्या कथेची वाट पहायला सुरवात केलीय आता. आता पुढची गोष्ट येऊ दे <<<<<<<< बाप रे! \ clipart{धास्तावलेला चेहरा }
|
Lalu
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:02 pm: |
|
|
श्र, मग काय तर. 'मिश्टरी' गोष्ट. त्यात थोडी थोडी टाकायची, आम्ही अन्दाज बान्धणार आणि ते बरोबर येतात म्हणजे काय! किती ते अपेक्षाभन्गाचं दुःख सहन करायचं? ~D~D
|
Shraddhak
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:18 pm: |
|
|
आम्ही अन्दाज बान्धणार आणि ते बरोबर येतात म्हणजे काय! किती ते अपेक्षाभन्गाचं दुःख सहन करायचं?<<<<<< घ्या. म्हणजे आपले अंदाज अचूक यायला लागले याचं कौतुक नाही; पण अपेक्षाभंगाचं दुःख करत बसायचं. त्या psg च्या म्हणण्याप्रमाणे शेवटी माळरानावर एक लावणी टाकली असती तर जरा अनपेक्षित झाला असता शेवट.
|
खरंय... शेवट अगदीच अपेक्षीत झाला... पण तुझी लेखनशैली खरच जबरी आहे श्र! आणि MT ला माझाही मोदक... शेवटी आत्मा यायलाच हवा होता का?
|
Psg
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:43 pm: |
|
|
श्र, बघ बघ तरी मी तुला सांगत होते, एक लावणी होऊन जाउदे म्हणून.. छान लिहिली आहेस ग कथा.. एकदम पकड घेतली होती.. keep it up
|
श्र,कथेची मांडणी सुरेख.. पण मिलींदा म्हणतोय त्याप्रमाणे तू नावातच कथेचा शेवट सुचवुन गेलीस गं.
|
श्र, जबरी ग, मुद्दाम स्गळी झाल्यावर वाचली. पण गूढकथा आणि कथेचे नाव वाचून च मलाही मोदक मिळायला हरकत नव्हती
|
Deemdu
| |
| Friday, January 20, 2006 - 1:21 am: |
|
|
श्र, महान उच्च -- -- -- --
|
श्र, गोष्ट चान्गली लिहिले हे हे बर्याच जणानी आधिच सान्गुन झाल हे तवा मी वेगळ सान्गतो! बाबुराव अर्नाळकर किन्वा अशाच कित्येकान्च्या काळापहाड टाइप डिटेक्टिव्ह गुढ कथात गोष्टीच्या नायक व कथेची जडणघडण नेहेमी तो अस करत होता किन्वा ती अशी करीत होती या पद्धतीने होते! लेखकाला त्याचे भान वेगळे असावे लागते, जपावे लागते. मीच अस करत होतो अशा अर्थाने लिहिताना लेखकाला अधिकच काळजी ग्यावी लागते आणि ते भान तुझ्या वरल्या कथेत नीट पाळले गेल हे अस जाणवते! त्यात मला शोधुनही चूका सापडल्या नाहीत! एकदोन तपशीलात जरा शन्का आली की इनामदारान्च्या वाड्याला फाटक कस असेल, भला थोरला दिन्डी दरवाजा असायला हवा, तो काय बन्गळुरातला बन्गला हे की टीचभर जागेला घातलेल्या कम्पाऊण्डला फाटक असायला? हो क्की नाही? बर तर बर अर्जुन म्हणतो की मला शेतीतल्या पीकाची काही जाण नाही तर त्याच्या दृष्टीने तो केवळ हिरवा गालीचा! क्षणभर हे वाक्य लेखिकेचे स्वतःचे तर नाही ना अशी शन्का येवुन गेली! अन शेवटी जाड जाड बन्दिस्त लोखण्डी बारान्मध्ये बन्दिस्त असलेला तो कुत्रा बाहेर कसा पडला? कोणी सोडला? त्याच्या हल्ल्याच्या वेळेस, अर्जुनने आधीच जमा केलेली वावरातली पाचधा हट्टीकट्टी माणसे कुठे धुम पळुन गेली की काय? अशा प्रश्णान्च्या फैरी मनात ठेवुन कथा सम्पते! तर कथा छानच लिहिलीहेस! या पोस्ट करता दिवे द्यायला लागु नयेत अस आपल माझ मत, तुझ ठाव नाही! DDD
|