|
Devdattag
| |
| Thursday, January 12, 2006 - 5:53 am: |
|
|
निनावि' 'एकटा' उत्तम सारंग.. 'निर्बोध प्याला' छान सारंग मी पण पोस्ट एडिट केल रे..
पण पहिल्या कडव्यात' निघा' शब्द आहे का' निगा' आहे निगाह रखो' या अर्थी
|
सारन्ग, निर्बोध प्याला उत्तमच आहे आणि मला तरी निघा हाच शब्द बरोबर वाटला पण निर्बोध प्याला ही प्रतिमा जर बम्पर गेली. थोडे स्पष्ट करशील का? बापू.
|
मित्रान्नो, हिन्साचार, मग तो वैयक्तिक, कोउटुम्बिक किम्वा सामूहीक असो, मनाला अस्वस्थ करणारा, विषण्णता देणारा प्रकार असतो. सारन्गची प्याला वाचून गुजरातच्या दन्गलीन्च्या अनुषन्गाने केलेल्या दोन कविता(नव्हे सावल्या)पोस्ट कराव्याशा वटल्या. त्यातली एक आज आणि एक उद्या.(देवनागरीत टाईप करणे कठीण जाते अजून). (१) स्वाहा:कार माझी सावली धडाडून पेटली, तेम्व्हा मी चान्गलाच दचकलो. 'हे काय भलतेच?' किन्चाळलो, 'तू तर सावली, तू पेटलीसच कशी?' 'काय करणार मी तरी? मणसान्नी माणस पेटवली, माळावर, शाळेत, रेल्वेच्या डब्यात. माणसान्नी माणस भोसकली, गल्ली-बोळात, बेकरीत,रस्त्यान्वर. आया-बहिणीन्ची टान्गली इज्जत, बिनदिक्कत,हताश वेशी-वेशीन्वर. इमले, दुकाने, झोपड्या-टपर्यान्चा जोहार पडला राखेच्या अभद्र ढिगार्यात. रक्ताची, अश्रुन्ची, आतड्या-काळजान्ची, आहुती साण्डली धर्माच्या यज्ञात. वर धरलीत धार, तुमच्या थोर सन्स्कृतीच्या तुपाची, हृदय सम्राटान्च्या निर्लज्ज राजसूयात. तुम्हा मानवान्ची तथाकथित मूल्ये, सम्वेदना,सभ्यता, इन्द्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा. त्या स्वाहा:क्कारात तूदेखील सामील, तुझ्याहि हातान्वर रक्त आणि राख आहेच, कारण तूहि पळालास, जीव घेऊन, सुरक्षित आडोश्याच्या शोधात. काय करणर मी तरी? तू पेटतच नाहीस.' बापू.
|
Ninavi
| |
| Thursday, January 12, 2006 - 9:19 am: |
|
|
बापू,'काय करणार मी तरी?..तू पेटतच नाहीस..' अप्रतीम!!!! सारंग, निर्बोध प्याला मलाही दुर्बोध वाटला रे. पण तू सांगशील समजावून. म्हणजे अगदी त्यांनाही इतरांनी'बोधामृत पाजायचा प्रयत्न केलाच' असं म्हणायचंय का तुला? 'इथे सूर्य येऊनही रात्र होते' सहीच!!
|
Aaftaab
| |
| Thursday, January 12, 2006 - 10:45 am: |
|
|
मंडळी, चांगले काव्य वाचण्याची एक भूक असते. ती भूक इथे अगदी पंचपक्वान्नांनी भागवली जात आहे.. तुम्हा सर्वान्ना शतश: धन्यवाद. असेच लिहीत रहा आणि आम्हाला तृप्त करत रहा
|
Ninavi
| |
| Thursday, January 12, 2006 - 5:13 pm: |
|
|
ती... शोधायची दिशा तू, ती आंधळीच होती की सावलीच होती, पायातळीच होती रानावनात केली काट्यांत भागिदारी द्यूतात रे तरीही गेली बळीच होती लोकापवाद घाली भीती तुलाहि देवा आगीसही न भ्याली ती वेगळीच होती तो देह त्यागुनीही हो लाडका प्रभूचा ती राहिली तरीही गेली सुळीच होती ना सोसली तयांना स्वप्ने तिची सुगंधी जी छाटली मुळाशी, साधी कळीच होती....
|
निनावी शेवटच्या २ ओळी खूपच touching !
|
hi how are you Sandesh
|
निनावी, अतिशय सुन्दर कविता. लिहित रहा. बापू.
|
(२) प्लीज माझ्यासाठी भूताच्या पायाची बोटे असतात, उ फराटी. भूताला सावली नसते म्हणे, अजिबात. लहानपणी अगदी ठाम, ठसलेली समजूत. आता वाटते, तेम्व्हा विचारायला हवे होते, 'भूतान्चे, एक वेळ ठीक, पण देवादिकान्चे काय? देवान्च्या पायाला किती बोटे? त्यान्ची सावली किती लाम्ब?' मला कधी भूत नाही दिसले, ना देव कुठे भेटला, तुम्हाला दिसलेय का भूत, केम्हा? किम्वा, निदान, गेला बाजार, देव तरी? पडलीच चुकूनमाकून गाठ कुठे, तर एव्हढी माहिती काढाल का, प्लीज माझ्यासाठी? बोलता आले तुम्हाला देवाच्या सावलीशी, तर विचाराल का तीला, प्लीज माझ्यासाठी? म्हणावे, ' विसरलीस का ग तुझ्या लहान बहिणीला? तूच भिरकावलेल्या चार* प्राचीन विटान्च्या गजा आड, ती बिचारी गुदमरलीय, तडफडतेय. तीच्या शुष्क स्तन्नान्शी धटिन्गण झुम्बडतायत, स्तन्य राहू दे, उसासे मिळाले तरी गिळतायत. तीच्या हाडकलेल्या माण्ड्या जबरदस्तीने, फाकव-फाकवतायत, अहमिहीकेने. खपाटीला गेलेल्या तीच्या पोटातले कोथळे काढून, शिजवतायत ऊन्धियू. केम्हा सम्पणार ग, तुझ्या बहिणीचे नष्टचर्य?' एव्हढे कराल का तुम्ही? प्लीज माझ्यासाठी? बापू. * वेद
|
सही लोक्स,हा कवितांचा बी बी झक्कास बहरला आहे.. नविन लोक्स एक्दम सुरेख कविता करत आहेत शिवाय नेहमीचे यशस्वी लोक्स पण जोरात आहेत..ब्राव्हो वैभव,देवदत्त,बापू,करपे,सारंग,निनावी,प्रसाद आणि नाव न घेतलेले पण छान कविता करणारे सगळेच
|
Kshipra
| |
| Friday, January 13, 2006 - 1:05 am: |
|
|
सारंग, मस्त जमली आहे गझल. 'मनाचे श्लोक' झिंदाबाद
|
Jo_s
| |
| Friday, January 13, 2006 - 3:43 am: |
|
|
शेवटी सारेच होतात वजा एकदा बघीतलं जाता जाता सावळा गोंधळ चालू होता शब्द सारे आम्ही, आपण पळवून लावले मारून गोफण मी माझा मी माझी म्हणणारे शहणेच सारे होते भक्त सारे अद्वैताचे काहो ते वेडे होते कळत का नाही या सार्यांना शेवटी सारेच होतात वजा रहात नाहीत म्हणायलाही मी माझा, मी माझा सुधीर
|
Devdattag
| |
| Friday, January 13, 2006 - 6:08 am: |
|
|
निनावि सुरेख कविता... बापू.. सावल्या नेहमीप्रमाणेच अप्रतिम
|
सुधीर, वजा= खूप वेगळी आणि अर्थपूर्ण कविता. 'शब्द' याच विषयावरची माझी एक कविता पेशे-खिदमत है: बापूला शब्दांचे का वावडे? मझ्या विष्वाचा आवाका तो केवढा? त्यालाही कोंडून घालणारे शब्द. वळवळणारे, सरपटणारे किडे, निसरडे, शेवाळी बुडबुडे. चलाख, चटपटीत, रंगीत फुगे, शब्दांचीच चिलखते, शब्दांचेच मुखवटॅ. मयसभेची गुळगुळीत फरशी, सांदी-कोपर्यातली कुबट बुरशी. लखखणार्या झुम्बरांचे लोलक आरसे, म्हणे ही शब्द-लेणी अन शब्द-शिल्पे. मला चिंता अर्थाची, त्यांना हवे व्याकरण, भिडायचे कसे,विरामचिन्हांची जागा चुकते. त्यांच्या-माझ्या मधे उभ्या भिंती शब्दांच्या, त्यांच्या-माझ्या शब्दांमधे दर्या अर्थांन्च्या. शब्दांनी घ्यावा वेध, अबोध अमूर्ताचा, अबोला शब्दांशी, माझ्या आतुर आवेगाचा. बापू.
|
Sarang23
| |
| Friday, January 13, 2006 - 6:19 am: |
|
|
मित्रहो वैभव समोर बसुन ही गझल लिहीली त्यामुळे थोडी वैभव छाप आल्यासारखी वाटेल. .....collaborated म्हणा हव तर. काही शेर वैभवने सुचवलेले आहेत हे वेगळ सांगायला नकोच. म्हणुन दोघांच्या वतीने मी इथे टाकतोय. वळण वळण आले थांबलो मी ये पुढे दाव रस्ता ध्येय माझे जेवढे अटळ झाले चालणे मी चालतो सोबती तू , भाग्य माझे केवढे थांबवू शकतेस का मज तू तरी राहिले ना श्वास माझे तेवढे राखरांगोळीप्रमाणे पसरलेले घेवुनी जा स्वप्न माझे एवढे नयन ओले पाहुनी हेलावले श्वास घ्याया लागले माझे मढे
|
Devdattag
| |
| Friday, January 13, 2006 - 7:26 am: |
|
|
बापू मस्त.. सारंग वैभव अप्रतिम
|
Shyamli
| |
| Friday, January 13, 2006 - 7:38 am: |
|
|
व्व्वा बापु सारग श्वास घ्याया लागले माझे मढे मस्तच निनावी सुंदर जो, मी माझा पटले अगदि
|
Ninavi
| |
| Friday, January 13, 2006 - 9:08 am: |
|
|
धन्यवाद, दोस्त्स!! सुधीर,'वजा' मस्तच. बापू,'मला चिंता अर्थाची.. विरामचिन्हांची जागा चुकते' खासच!
|
परवाच्या आईवरच्या कवितान्च्या रेफ़्ररन्स नी
|
Megh
| |
| Saturday, January 14, 2006 - 12:42 am: |
|
|
तुझ माझ नात आले भरुन आभाळ आसु झेलाया डोळ्यात रान रंगाच भुलाळ तुझ माझ नात झाल मोकळ आभळ दवावर पांघरली उन्ह कोवळी सकाळ तुझ माझ नात नाहि हिशोब पावसाचा सडा टाकितो प्राजक्त ओला सुगंध मातीचा तुझ माझ नात जीवा भावाच फ़ुलण स्वछंद पाखराचे पुन्हा घरट्यात येण Megh
|
Jo_s
| |
| Saturday, January 14, 2006 - 2:16 am: |
|
|
बापू, श्यामली, निनावी धन्यवाद नेहमिच करायच्या गोष्टी ज्या विसरून जातो आपण त्या आठवण देण्या आम्हा त्यांची योजना ही संक्रांतीची तिळगुळ देऊ आथवा घेऊ आपण सदा गोड बोलू सुधीर
|
अमेय, अतिशय सुन्दर आणि आशयघन कविता. नेहमी का लिहीत नाहीस? बापू.
|
देवदत्त, श्यामली, निनावि, धन्यवाद. बापू.
|
Diiptie
| |
| Saturday, January 14, 2006 - 7:34 am: |
|
|
rangalela shabdancha khel, kitida pahate me haluch dokaun, manacya ardhya ughdya kavadatun tari kasa shodhalata tumhi mala...? ata alech ahe tar anin mihi kahi athavanichi,lapavaleli gathodi....
|
दिप्ती, वा! शाबास!! पहिलीच सलामी दणक्यात केलीस की. बापू.
|
Ninavi
| |
| Saturday, January 14, 2006 - 5:22 pm: |
|
|
अमेय, मस्तच. दीप्ती, सुरेख. पुढे वाचायला उत्सुक आहे.
|
स्त्रीलिंगी सावली मी तर पुरुषासारखा पुरुष, मग माझी सावली का बाईमाणूस? नि:सन्कोच नग्न ती पूर्ण सदोदित, मग का नाही करत कधी उद्दिपीत? अंगाखांद्यावरून माझ्या, तीचा मुक्त वावर तरी कशी ती कोरडी, स्पर्शानिराळी? विकारहीन, उडालेला अत्तराचा फाया, चैतन्यहीन चेतना, तिची चन्चल काया. माझे म्हणून जे जे अभिमानी आभास, एकूण एकाचे ती नकारात्मक प्रश्नचिन्ह. माझी स्त्रीलिंगी सावली माझ्या पोउरुषाचा नकारडन्का? की व्याकरणाने लिन्गवलेला निर्हेतुक अपवाद? की गूढ, गहन, अर्थाची अगम्य टोचणी? बापू.
|
दिप्ती, कविता देवनागारीत वाचायला जास्त सोपी जाते. प्लीज पुढच्यावेळी देवनागरीत लिहिशील? गाठोडी [दिप्तीची कविता] रन्गलेला शब्दान्चा खेळ, कितीदा पहाते मी हळूच डोकावून, मनाच्या अर्ध्या उघड्या कवाडातून तरी कस शोधल आता तुम्ही मला...? आता आलेच आहे तर आणीन मीहि काही अठवणींची,लपवलेलि गाठोडी.... बापू. [दिप्ती, गुलमोहर म्हणजे निव्वळ शब्दान्चा खेळ आहे याच्याशी मी तरी नाही सहमत होऊ शकत.]
|
Sarang23
| |
| Sunday, January 15, 2006 - 10:26 pm: |
|
|
दोस्तांनो धन्यवाद... निर्बोध प्याला बद्दल फक्त एकच म्हणु इच्छितो... अनुभव हाच गुरु... क्षिप्रा, भुजंगप्रयात जमला वाटत मला... धन्यवाद. आणि बापरे!!! काय एकेक कविता आहेत...! बापु हे पान तुमच आहे बघा... जबरी कविता... एकाहुन एक... अमेय तुझ्या मुळाशी केलेल्या हितगुजाने झटका बसला... सुरेख!!! निनावी न थांबता लिही... माझ्या शुभेच्छा...
|
Milya
| |
| Monday, January 16, 2006 - 1:08 am: |
|
|
वा सर्वांच्याच कविता सहीच
|
कधी वाटले होते अन्धार फ़िटेल हा सारा आमच्या स्वप्नान्वरचा सम्पेल हा पहारा तपे लोटली त्याला अन्धार तसाच आहे अन आमच्या सुरान्चे कत्तलीत रक्त वाहे तरिही स्वप्न आहे तरिही आस आहे जातील छेडले सूर जोवरी श्वास आहे
|
Sarang23
| |
| Monday, January 16, 2006 - 3:23 am: |
|
|
good one Salil!
|
Shyamli
| |
| Monday, January 16, 2006 - 3:56 am: |
|
|
जाणारी ती तीच्या वेळेवर गेलेली माझी मात्र वेडी आशा ऊरलेली अशी कशी ती गेली? मला न भेटता, माझी चवकशिही न करता, रात्रि मी ऊठुन बसते तीच्या दिव्यापाशि जाते आषाळभुतपणे दिव्यातच बघते आई म्हणुन हाका मारते वाटत ती दिव्यातुन येईल बाळा म्हणुन पोटाशी घेईल परत परत मी हाका मारते पण ती काहि येत नाही माझ्या हाकेला आणि तीच्या वात्सल्याला तो काहि दाद देत नाही कारण ती गेलेली आणि मी मात्र मागे उरलेली श्यामली
|
वा ... एकाहून एक सुंदर कविता ...
|
|
|