Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 11, 2006

Hitguj » Health » सुंदर मी होणार.. » Beauty » Archive through January 11, 2006 « Previous Next »

Moodi
Tuesday, January 03, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नखांचे आरोग्य.

आठवड्यातुन एकदा एका बाऊलमध्ये कोमट ऑलिव्ह तेल व लिंबु रासाचे ५ ते ६ थेंब घेऊन त्यात नखे बुडवा त्यामुळे नखे मजबुत होतील.

कात्रीने नखे कापु नका.

नखाना महिन्यातुन एक आठवडा नेलपेंट लावु नका.

लोह, calcium, potassium, vitamin A an B युक्त असा आहार घेतल्यास नखे मजबुत रहातात.

नखे, बोट व क्युटीकल्सना कोमट ऑलिव्ह वा बदाम तेलाने मालीश करा. किंवा बदाम अन E vitamin युक्त पोषक क्रीमने मालीश करा. तसेच दुध, दही, सेलरी,गाजर, सोया, अंडी व यीस्ट नखांकरता चांगले.

बदाम तेलामुळे क्युटीकल्स मऊ होतात.

नख चमकदार राहावीत म्हणुन त्यावर चंदन तेल चोळा.

गिसरीन अन बदाम युक्त क्रीमने हाताला खालुन वर अशी मालीश करा.

गुलाबपाणी, गिसरीन अन ताज्या लिंबाचा रस असे एकत्र करुन बाटलीत भरुन ठेवा अन नियमित हाताला लावा.

हाताच्या काळ्या झालेल्या कोपरावर लिंबाचा रस अन दही लावा.

नेलपॉलिश पटकन नीट बसाव याकरता हात थोडा वेळ फ्रीझमध्ये धरा.


Moodi
Tuesday, January 03, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओठांचे सौंदर्य.

रोज रात्री झोपताना ओठाना पेट्रोलीयम जेली, पोषक क्रीम वा साधा मध लावावा. भेगा पडलेल्या ओठाना ग्लिसरीन थेंबानी मालीश करावी.

लिपस्टीक लिप ब्रशनेच लावावी.

लिपस्टिकवर ग्लॉस जरुर लावावा.

लिपस्टिक जास्त टिकण्यासाठी ते आधी टिपुन घ्या मग फेस पावडर लावुन परत लिपस्टिक लावा.

जास्त पाणी प्या म्हणजे ओठ कोरडे रहाणार नाही.

ओठांवरुन वारंवार जीभ फिरवु नका.

गडद रंगाचे लिपस्टिक वापरण्या आधी पांढर्‍या रंगाची लिपस्टिक लावली की तो गडदपणा कमी होतो, मात्र हीच लिपस्टिक गडद रंगावर लावली की मोतिया चमक येते.


Moodi
Tuesday, January 03, 2006 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दातांचे आरोग्य

मजबुत दातांसाठी calcium तसेच Vitamin c , vitamin D हे आहारात असावेत.

झोपण्यापुर्वी कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. व हिरड्याना मालीश करावे.

दाणे, फळे, ऊसाचे करवे अन गाजरासारख्या भाज्या नियमीत खाव्यात.

लिंबु पाण्याने गुळण्या केल्यास दात अन जीभ स्वछ रहाते.

जेवणानंतर दुपारी एक सफरचंद खावे.

आवळा व लिंबु वर्गातील फळांनी दात चमकदार बनतात.

मजबुत व निरोगी दातांसाठी गरोदर स्त्रियाना तसेच डिलीव्हरीनंतर भरपुर दुध अन vitamin D and calcium युक्त आहार द्यावा.

ब्रश दर तीन ते ४ महिन्यानी बदलावा. टोके वाकडी झाल्यास लगेच बदलावा.

दात ठणकत असेल तर लवंग तेल डायरेक्ट न वापरता थोड्या पाण्यात घालुन गुळण्या कराव्यात.

पिकलेला टॉमेटोचा तुकडा दातात धरुन थोडा वेळाने थुंकुन टाकावा ठणकणे थांबते, नंतर मात्र डेंटीस्टला दाखवावे.

चहा कॉफी गरम पिऊ नये.

बाभुळ, नीम, डाळींब साल शुद्ध वस्त्रगाळ स्वरुपात घेऊन त्याने दात घासावेत, मजबुत रहातात.

होमियोपथी मध्ये सिलिका नावाचे औषध दात अन हिरड्यांकरता फाराच चांगले आहे. याने दात ठणकणे थांबुन हिरड्या घट्ट होतात. मात्र डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली घ्यावे.

दात पांढरे राहावे म्हणुन थोडा बेकिंग सोडा लिंबु रसात घेऊन दात घासावेत, मात्र नेहेमी करु नये.

माऊथवॉश म्हणुन लिंबु किंवा मीठ घातलेल्या कोमट पाण्याने गार्गल करावे.

भरपुर पाणी पिण्याने तोंडाची अन श्वासाची दुर्गंधी दूर होते.

जर डाएटींग केले जात असेल तरी पाणी खुप प्यावे कारण या प्रक्रियेत शरिरातील चरबी जळुन ती श्वसावाटे बाहेर येते.

पोट जास्त रिकामे ठेवु नये.

सफरचंदातील acid दातातील किटाणुना प्रतिबंध करते अन दाताला अन्नकणही चिकटुन रहात नाहीत.


Jayavi
Tuesday, January 03, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई गं, मुडी, अगं असा माहितीचा कुठला खजिना आहे जो तुला माहित नाही? great !! खूपच उपयुक्त माहिती देते आहेस तू.

ए, चेहेर्‍यावरच्या pigmentation साठी काय उपाय आहे गं?


Moodi
Tuesday, January 03, 2006 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया हे पुढील मिश्रण लावुन बघ. आंबेहळद + कोरफड + अनंतमुळाची पावडर सायीत वा मलईत फेटुन लाव. सध्या थंडीमुळे साय वा दही बरे. दुधही चालेल.

आंबेहळद नसल्यास साधी पण चालेल, मात्र कोरफड जेल किंवा पावडर बघ मिळाली तर. अन आता अशोक आहेत ना भारतात, जमल्यास त्याना डॉ. उर्जिता जैनच्या या पावडरी आणायला सांग.
अनंतमुळ, गुलाब, चंदन, मंजिष्ठ, लोध्र, वेखंड या पावडरी सांग त्याना आणायला. मी इकडे घेऊन आलेय.

ताज्या पपईचा गर अन टॉमेटो गर एकत्र चालतो, त्याने पण कमी होईल. पण दुध वापराच या फेशियलमध्ये.


Arch
Tuesday, January 03, 2006 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, अग छान माहिती देते आहेस. पण मला वाटत तू जे उपाय सांगते आहेस न ते रापलेल्या उन्हाने आणि वार्‍याने) त्वचेसाठी आहेत. आणि जया विचरते आहे ते pigmentation साठी म्हणजे वयानुसार शरिरावर काळे डाग पडतात किंवा discoloration होत त्यासाठी. जया चुकल असेल तर माफ़ी

Moodi
Tuesday, January 03, 2006 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च अग मला लक्षात आलय जया कशाबद्दल विचारतेय ते. काही वेळा डिलीव्हरीनंतर अन पस्तीस ते चाळिशीच्या आसपास हर्मोन्स बदलले की असे काळे अन चॉकलेटी डाग चेहेर्‍यावर येतात. अन रहातात. आंबेहळद, अनंतमुळ अन मंजिष्ठा याचकरता आहे.

अनंतमुळ कोरड्या त्वचेकरता अन मंजिष्ठ रक्त साफ नसल्यास जे डाग उमटतात त्याकरता आहे.

जया तुझी ऑईली त्वचा असेल तर दुधात वा पाण्यातही पेस्ट चालेल, साय वा मलई वापरु नकोस.


Jayavi
Wednesday, January 04, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, मूडी, u got me right . आता ह्या सगळ्या पावडरी मिळवणं म्हणजे कठीणच आहे गं. पपई आणि tomato चा गर वापरणं जास्त सोपं वाटतंय. माझी skin प्रचंड oily आहे.



Moodi
Thursday, January 05, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया मुलतानी माती आहे का तुझ्याकडे? नसेल तर मग संत्र्याचा अन टॉमेटोचा रस एकत्र करुन तो दररोज लावत जा. त्याने छान ब्लीच होईल, अन तेलकट त्वचा असल्याने स्वछ होईल, पण खाज वगैरे येणार नाही.
मुलतानी माती असेल तर त्यात चिमुटभर हळद अन वरील फळांचे रस घालुन दुधात वा पाण्यात पेस्ट कर अन मग ते लावुन थोडे सुकले की कोमट पाण्याने धुवुन टाक. मुलतानी मातीच्या ऐवजी बेसन किंवा मैदा पण वापरु शकतेस.


Jayavi
Thursday, January 05, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, आहे मुलतानी माती. पण हे रोज लावायचं का गं?

Sharmila_72
Thursday, January 05, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या चेहर्‍यावर हल्ली बारीक चामखिळी येत आहेत. म्हणजे अगदी टिपीकल चामखिळीसारख्या बाहेर डोकावत नाहीत पण तीळ कसे दिसतात तश्या दिसतात त्या. मी dermatologist ला भेटले. तो म्हणाला कि आम्ही एका instrument ने काढतो पण त्याचे scars चेहर्‍यावर राहू शकतात. काही दुसरा नैसर्गीक उपाय आहे का यासाठी?

Shyamli
Thursday, January 05, 2006 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला
ह्याला बहुदा वान्ग अस म्हणतात,
ह्यावर अर्जुनसाल पावडरीचा लेप लाउन बघ


Sharmila_72
Thursday, January 05, 2006 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you श्यामली. कसा लावायचा हा लेप? पाण्यातुन कि दुधातुन?
आणि श्यामली हे नुसतेच डाग नाही आहेत. skin growth आहे. म्हणजे मस कसे असतात तसं दिसतय ते. आकाराने खसखशीच्या दाण्याएवढे आहेत. दोन तीन जरा मोठे आहेत.


Moodi
Thursday, January 05, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला उपळसरी,गुलाब अन चंदन पावडर एकत्र करुन लाव.
शर्मिला इथे बघ.

/hitguj/messages/34/92937.html?1132740613

या वरील मेसेजमध्ये मी जो दुर्वांचा उपाय सांगीतलाय तो करुन बघ.

जया रोज नाही लावले तरी चालेल, पण पोट साफ ठेव,सध्या जास्त तेलकट खाऊ नकोस अन जमल्यास रात्री झोपताना त्रिफळा चुर्ण घे. हे चुर्ण चेहेर्‍याला दुधात कालवुन लावले तरी चालते.

Neelu_n
Thursday, January 05, 2006 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी तु डॉक्टर आहेस का ग?

Moodi
Thursday, January 05, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही ग निलू, पण मला आयुर्वेदाची खुप आवड अन माहिती पण आहे. मात्र मी घरात वापरल्या जाणार्‍या भाज्या, फळे यापासुन होणार्‍या उपयोगांचीच माहिती देते, जेणे करुन कुणाला काही त्वचेचा त्रास होणार नाही.
मी स्वता याचा फार चांगला अनुभव घेतलाय, अन वरील लिंकमध्ये मी जो दुर्वांचा उपाय सांगीतलाय त्यामुळे माझ्या २ मैत्रिणीना खुप फायदा झाला कारण त्यांच्या चेहेर्‍यावर तेलकट त्वचेमुळे खुप डाग, फोड होते ते त्यानी फोडल्याने खड्डे पडले तर हा लेप त्या दोघीनी ३ ते ५ वेळा लावला, त्यामुळे ऐन लग्नाच्या आधीची त्यांची जी धावपळ झाली होती ती वाचली अन चेहेर्‍यावरचे ते डाग अन खड्डे पण बुजले.

दुर्वा उष्णता कमी करतात ग. मात्र माझी त्वचा कोरडी आहे त्यामुळे मला पिंपल्सचा त्रास फार कमी झाला.

मात्र अवघड अन ईमर्जन्सी केसमध्ये आश्विनीचा सल्ला जरुर घ्यावा कारण ती डॉक्टर आहे.


Sharmila_72
Thursday, January 05, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, तुसी ग्रेट हो !

Sharmila_72
Thursday, January 05, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, किती वेळा लावायचा लेप? आणि उपळसरी+चंदन+गुलाब पावडर हा एक व तु दिलेल्या लिन्क मधला दुर्वांचा एक असे दोन लेप मी आलटुन पालटुन लावायचे बरोबर ना?

Moodi
Thursday, January 05, 2006 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला या दुर्वांच्या लेप मध्ये उपळसरी अन चंदन मिक्स करुन आठवड्यातुन २ दा लावुन बघ. पाहिजे तर अगदी चमचाभर तयार करुन चेहेर्‍यावर लावुन बघ टेस्टकरता, याने अपाय नाही होणार काही पण काही जणांची त्वचा जरा sensetive असते ना म्हणुन म्हटले.
अन कौतुक कसच ग? आपल्याच अयुर्वेदाची देण ना ही.



Sharmila_72
Thursday, January 05, 2006 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते तर आहेच गं मूडी. पण तु इतका इंटरेस्ट घेऊन हे सर्व अभ्यासतेस आणि मनमोकळेपणाने share करतेस म्हणून कौतुकाची थाप तुझ्या पाठीवर माराविशी वाटली. लागलं नाही ना, हळुच मारलं गं मी !

Moodi
Thursday, January 05, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही ग प्रेमाने मारलेली थाप कधी लागते का?

Jayavi
Friday, January 06, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, अगदी मनापासून धन्यवाद !! आता वठम करुन हे करुन बघायलाच हवं नाहीतर तुझ्या इतक्या छान माहितीचा अपमान होईल :-)

Moodi
Friday, January 06, 2006 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे प्रयोग किती छान झाले असतील ना.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1333478.cms

Maayboli
Monday, January 09, 2006 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Majhya cheharya var ekdum achanak pimples yevun tyache daag rahile aahet. pahili tvacha clear hoti pan aata, pimples che daag aahet, gharatla upay koni sangal ka? karan jo hi mala bhetato to mala mhanto ki kay jhale he, mhanje aksharsha ek mulagi mala mhalali ki devi che vran aahet ka....please mala kahi gharelu upay sanga....majhi tvacha dry/oily mhanje combinationa ch aahe bahuda....jast karun naka var tel sutate.

Thank you !

Renushahane
Tuesday, January 10, 2006 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hello moodi,
tu tujhya eka post madhe durva chi paste karun lavayala sangitla ahes..mala suddha pimples ani khadde ahet..mala avadel karun baghyala,pan mi US la aste..ithe kuthe milnar durva,,any other equally good method?

renu

Moodi
Tuesday, January 10, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेणु तु जायफळ उगाळुन किंवा त्याची पावडर पाण्यात कालवुन लाव, सुकले की धुवुन टाक. ते हाताने फोडु नकोस.उद्या लिहिते बाकीचे.


Moodi
Tuesday, January 10, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोली तू पण जायफळ वापरु शकतेस. चेहेरा मात्र साध्या पाण्याने धु किंवा मग पॉंडस, निविया यांचे oil free फेसवॉश वापर.

Renushahane
Tuesday, January 10, 2006 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jayfal powder indian store madhe milte ka...sadhya mi neem powder anliye ..tyat limbu pilun lavtiye..1 week nantar farak kalto..niyamit lavla ki..


Moodi
Wednesday, January 11, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग रेणू जायफळ पावडर जगात कुठेही कुठल्याही दुकानात मिळते, अगदी तुमच्या कडील अमेरीकन सुपरस्टोअर्स मध्ये ही मिळेल. हे लोक जायफळ पावडर पुडिंग्ज,केक्स इत्यादीत वापरतातच. नटमग नाही का त्याचे नाव? ते अख्खे सुद्धा मिळते पण तुझ्याकडे सहाण नसल्याने कशावर उगाळणार म्हणुन पावडर वापर. ती नीम पावडरीबरोबर मिक्स कर.

Moodi
Wednesday, January 11, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढिल उपचारही करावेत.

१ चमचा मध + १ चमचा लिंबु रस एकत्र लावुन सुकले की धुवावे.

लिंबाचा रस + पुदिन्याच्या पानाचा रस + टॉमेटो रस समप्रमाणात एकत्र करुन चेहेर्‍याला लावावा.

पिंपल्स बोटाने वा नखाने फोडु नयेत.

मुलतानी माती + चंदन पावडर + गुलाबपाणी एकत्र फेटुन लावावे. सुकले की धुवावे.

१ चमचा बेसन + अर्धा चमचा लिंबाचा रस + अर्धा चमचा टॉमेटोचा रस असे एकत्र लावावे, नियमीत लावावे, डाग कमी होतील.

शक्य असल्यास तुळ्शीच्या पानांची पावडर मिळाल्यास लावावी. आजकाल Indian, pakistani stores मध्ये पण या Ayur च्या पावडरी मिळतात.

कापराची पुड अर्धा चमच्याहुन कमी + मध १ चमचा + टॉमेटो रस १ चमचा हे एकत्र फेटुन लावावे. सैल त्वचा घट्ट होते.


Maayboli
Wednesday, January 11, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi !

Thank you so much. majhya kade saan aahe, tar jaayphal dudha madhe ki panyamadhe ugalun lavtat. aani je he var kahi upaay suchavale aahet te thandi madhe face la lavu shakto ka.....multarni maati vaigare.

tumche manapasun aabhar !

Moodi
Wednesday, January 11, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोली तुझा चेहेरा खुपच तेलकट असेल म्हणजे तू या थंडीत चेहेर्‍याला क्रीम वगैरे लावुन तुला त्रास होत असेल तर या पावडरी बेसनात मिक्स करुन लाव. मात्र जायफळ सहाणेवर उगाळलेले फार चांगले, त्याचा हा ताजा लेप खुप बरा.
टॉमेटो रसात मध घालावा म्हणजे खाजत नाही, लिंबु रस नाही वापरला तरी चालेल. कारण थंडीत खाजते.
चेहेरा दिवसातुन ३ दा तरी पाण्याने धुत जा. चेहेर्‍याला जर waxing करीत असशील तर लगेच astringent लाव ते किटाणु नाशक आहे त्यामुळे डाग पडणार नाहीत.
संत्र्याचा रस पण दुध मधात मिक्स करुन लावावा.
पपईचा गर पण चांगला, त्याने डाग कमी होतात.


Renushahane
Wednesday, January 11, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks moodi..jaaphal laun baghen..tulsi powder pan anin next time..mala 13 varshanchi aslyapasun pimples ahet..ata daag bharun nighnyachi kahi asha ahe ka?

Prajaktad
Wednesday, January 11, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेहरयावर जास्त तिळ असणे किंवा येणे हे कशामुळे होते? मागे एकदा डॉक्टरला विचारले तर त्यांनी bleaching करु नकोस हा सल्ला दिला.( ज्यांचि त्वचा कोरडि आहे त्यांनी bleach करु नये. )
समजा त्याने तिळ येणे थांबले तरि आधिच असलेल्या तिळांवर काहि उपाय करता येइल का?


Maayboli
Wednesday, January 11, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you Moodi....Aga majha chehara combination aahe mhanje phakta nakavar telkut hoto baki chin var dry asato. mi moisturizer lavayla ghabarte karan pimple yetat. mhunun mi cheharyavar kahich lavat nahi cream etc. jayphal dudha madhe ugalu ki panya madhe aani jayphal ne daag jatil ka.....karan baryach kahi goshti tu ithe dilya aahes. :-)

Phar abhar tujhe moodi :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators