|
MY FRNDS: I just wanna wish u Happy Valentine's Day....... काल पुन्हा स्वप्नात आलीस अशीच रोज् येशील का... स्वप्नात येउन "कीस्" घेतला असाच रोज् घेशील का.. रोज मय्चीन्ग् ड्रेस घालत अशीच माझी आठवन काढशील का... सारखे "आईटम्" म्हनत मला रोज् गुद्गुल्या करशील् का.... रोज सकाळी "गुड मोर्नीग्" करत अशीच मला उठव्शील का... उठवत मला "सोनु" म्हनत असेच खुप प्रेम करशील् का... काहीतरी बहाने करुन् फोन करत अशीच् मला "कारटून" म्हनशील का... कधीतरी येउन जवळ माझ्या मला तुझ्या मीठीत घेशील् का... सारखे "मीस् कौल" देउन् मला क्शनोक्शनी माझी आठवन काढशील का... कधीतरी अश्रु डोळ्यातले माझ्या जवळ घेत मला पुसशील का.. जेवढे करते आहे प्रेम् माझ्यावर आज नन्तरही तेवढे करशील् का... जेवढे करते आहे प्रेम् माझ्यावर आज नन्तरही तेवढे करशील् का... Prashant
|
Aschig
| |
| Thursday, June 14, 2007 - 6:19 am: |
|
|
librarything.com: An excellent site to make a list of books you own/have read and get recommendations. Very easy to use too.
|
Maudee
| |
| Thursday, August 02, 2007 - 12:19 pm: |
|
|
Doing nothing is very hard to do, you don't know when you are finished
|
Ram3
| |
| Tuesday, August 07, 2007 - 10:41 am: |
|
|
|
Maanus
| |
| Thursday, August 30, 2007 - 10:01 pm: |
|
|
मास्तर, आमचा देव दगडात नाही. आम्ही दगडात देव पहाणारी माणसं आहोत. दगडात देव असतो, मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे फक्त लक्ष ठेवा. फेकून द्यायच्या भाकाकडे नको. आणि मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टीकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमिन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करयला शिका. ह्याची सुरवात स्वतःपासुन करा. स्वतःतला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापयी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जतो तो आचार, तो विचार, हा टाकयचा भाग... हे कुणी लिहीले आहे माहीत आहे का? मला वाटतेय सामना मधला संवाद आहे निळु फुले डॉ. रांना समजावतानाचा.
|
Runi
| |
| Friday, August 31, 2007 - 2:35 pm: |
|
|
माणुस, पहिले वाक्य हे व.पु. च्या पुस्तकातले आहे. मला वाटते ते वपुर्झा मधले आहे पण नक्की आठवत नाहीये आत्ता.
|
Hkumar
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:12 am: |
|
|
जगातील सर्वात सोपी गोष्ट कोणती तर दुसर्याने काय करावे हे आपण ठरवणे.
|
Little bit of everything When things in your life seem almost too much to handle, when 24 Hours in a day are not enough, remember the mayonnaise jar . . . and the coffee. A professor stood before his Philosophy class and had some items in front of him. When the class began, wordlessly, he picked up a very large and empty mayonnaise jar and proceeded to fill it with golf balls. He then asked the students if the jar was full. They agreed that it was. The professor then picked up a box of pebbles and poured them into the jar.He shook the jar lightly. The pebbles rolled into the open areas between the golf balls. He then asked the students again if the jar was full. They agreed it was. The professor next picked up a box of sand and poured it into the jar. Of course, the sand filled up everything else. He asked once more if the jar was full. The students responded with an unanimous "yes." The professor then produced two cups of coffee from under the table and poured the entire contents into the jar, effectively filling the empty space between the sand. The students laughed. "Now," said the professor, as the laughter subsided, "I want you to recognize that this jar represents your life. "The golf balls are the important things - your God, family, your children, your health, your friends, and your favorite passions - things that if everything else was lost and only they remained, your life would still be full". "The pebbles are the other things that matter like your job, your house, and your car". "The sand is everything else--the small stuff. "If you put the sand into the jar first," he continued, "there is no room for the pebbles or the golf balls. "The same goes for life. "If you spend all your time and energy on the small stuff, you will never have room for the things that are important to you." "Pay attention to the things that are critical to your happiness". "Play with your children". "Take time to get medical checkups". "Take your partner out to dinner" "Play another 18 Hole Golf". "There will always be time to clean the house and fix the disposal." "Take care of the golf balls first, the things that really matter". "Set your priorities". "The rest is just sand." One of the students raised her hand and inquired what the coffee represented. The professor smiled. "I'm glad you asked. "It just goes to show you that no matter how full your life may seem, there's always room for a cup of coffee with a friend."
|
Badamraja
| |
| Wednesday, October 17, 2007 - 8:38 am: |
|
|
I got this in mail and right now im feeling the same miss u mom...
|
Gsumit
| |
| Friday, October 19, 2007 - 8:00 pm: |
|
|
मला हे थॉट्स असलेली मेल आली होती... छान आणी बरोबर वाटले सगळे...
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 06, 2007 - 2:25 pm: |
|
|
साप्ताहीक सकाळचा दिवाळी अंक वाचायला घेतला. त्यात एका श्वासाचं अंतर हा नीता गद्रे ( लेखिकेचा पत्ता ५०२, पराग इमारत क्र. १५, वसंतलीला, घोडबंदर रस्ता, वाघबीळ नाका, ठाणे ( पश्चिम )) यांचा आत्मकथनपर लेख आहे. त्याना जी. बी. सिंड्रोम नावाचा आजार झाला होता आणि त्यातुन त्या पुर्ण बर्या झाल्या. ( शरिराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेनं चुकून स्वतःच्या मज्जासंस्थ्तील ( नर्व्हस सिस्टीम ) पेशींवर हल्ला केल्यानं उद्भवणारा गीया बारे सिंड्रोम, असे याचे स्वरुप आहे. ) हि काही आजाराशी दिलेली लढाई वैगरे नाही. हा आजार झाला हे कळल्यावर, लेखिकेने मुलाकडे आपल्याला जगायचे नाही, मारून टाकावे, अशीच इच्छा व्यक्त केली होती. पण तरिही आधुनिक उपचाराने आणि मह्त्वाचे म्हणजे काहि डॉक्टर्स, नातेवाईक आणि सेवकसेविका यांच्या अथक प्रयत्नाने, लेखिका पुर्ण बरि झाली. हे सगळे मुळातूनच वाचायला हवे. पण लेखिकेने लेखाच्या शेवटी जे चिंतन केलय, ते मला खुपच आवडले. अगदी माझ्या मनातलेच विचार कुणी लिहुन काढलेत, असे वाटायला लागले. कदाचित पारंपारिक श्रद्धाना धक्का देणारे हे विवेचन असेल, तरिही मला ते खुपच भिडले. ( अगदी खरे सांगायचे तर ते इतक्या नेमक्या शब्दात आणि निर्भिडपणे मांडणे मला जमले नसते. ) तर हे सगळे तुम्हीही वाचावे असे मला वाटते म्हणुन ते इथे लिहुन काढतोय. या आजारपणात मला एक प्रश्न पडला. की हे दुखणं मलाच का झालं ? पण हा प्रश्नच किती खुळचट आहे ! हू आऍम आय ? मी अशी कोण लागून गेले, की मला हे दुखणं होता कामा नये ? मला हे दुखणं नको, तर दुसर्या कोणाला ते व्हावं का ? मग त्याला तरी का ? आनंदानं जगण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे, म्हणजे तर्कशास्त्रदृष्ट्या हे दुखणं कुणालाही होण्याची शक्यता किंवा संभावना आहे. मग त्या संभावनेत मी का नाही ? आयुष्यात इतकं सगळं सोसूनही या जगात कोणतंही संकट केव्हाही येऊ शकतं हे मला कळू नये ? मग मी पुर्वानुभवातून काय शिकले ? मला भेटायला आलेले एक गृहस्थ मला म्हणाले, " देवानंच तुम्हाला वाचवलं. तुम्ही पुण्यवान आहात. " मी मनात म्हंटलं, " पण आधी देवानं मला या संकटात टाकलंच का ? " दुसरी एक भेटायला आलेली स्त्री म्हणाली, " तुझ्याहातून काहीतरी पाप घडलं असेल. त्याचं दुःख आजारपणाच्या रुपानं तू भोगलस, तू सुटलीस. " मनात आलं, कोणतं पाप मी केलं ? माझ्या आठवणीप्रमाणे तरी कोणतंच नाही. एवढी मोठी शिक्षा व्हावी असं तर नक्कीच नाही. जाणुनबुजून तर कोणतंच दुष्कृत्य मी केलेलं नाही. चारदोन माणसांशी मतभेद, वादविवाद झाले असतील, पण ते निष्कारण नव्हते. माझी अशी एक बाजू त्यामागे होती. काही प्रसंगात तर माझ्यावरच उघड उघड अन्याय झाला होता. मी त्या अन्यायाचा प्रतिकार केला, इतकंच. सामाजिक बांधिलकीतून दुसर्याला मदत करायची असते.; पुण्य वगैरे मिळवण्यासाठी नाही. माज्य्हा इतकाच दुसर्याला आनंदात जगण्याचा हक्क आहे. असा लॉजिकली विचार करुन मदत करायची असते, हे मी माझ्यावर झालेल्या संस्कारातुन शिकले. माझ्या दादा, वहिनीच्या आचरणातून शिकले. त्यामुळेच मी खुपजणांना शिक्षणासाठी मदत केली. अनेक स्त्रियांच्या, गरीब मुलांच्या बाजूनं त्यांच्या संकटकाळात उभी राहिले, पैसे दिले. आसरा दिला. अनेक अनाथाश्रमाना, वृद्धाश्रमाना, शैक्षणिक संस्थाना मदत केली. हा माझा मोठेपणा वगैरे मुळीच नाही. आपल्यापैकी पुष्कळजण दुसर्याला काही ना काही मदत करत असतात, तशीच मीही केली. माझ्यापुढे असलेले उत्तुंग आदर्श बघता, त्या मानानं मी माझ्या आयुष्यात खूपच कमी चांगलं काम करू शकले, याची मला खंत वाटते. कोणत्या पापाचं फ़ळ म्हणून मला हा प्राणघातक आजार व्हावा ? यावर एका माझ्याच वयाच्या माणसाचं उत्तर, " हे पाप गेल्या जन्मीचं आहे ! " हाच तो आम्हाला अभ्यासात आलेला 19 कर्मविपाकसिद्धांत 19 . व्यक्तीचं प्रारब्ध, प्राक्तन, पुर्वसंचित ! गेल्या जन्मी तुम्ही जी कर्मे करता, त्याचे फळ तुम्ही या जन्मी भोगता. या जन्माच्या कर्माची फळं तुम्ही पुढच्या जन्मी भोगता. अर्थात असं मानण्याला कोणताही आधार, तर्कसुसंगत ठोस पुरावा मला तरी दिसत नाही. या जन्मी माणसाला विशिष्ठ दुःख का भोगावी लागतात याचं सयुक्तिक कारण उमगत नसल्यामुळे, ही उपपत्ती जन्माला आली असावी, असं मला वाटतं मी गेल्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल तर त्याचे परिणाम मी या जन्मी भोगावेत असा त्या तथाकथित देवाचा शिरस्ता असेल तर तो तर्कदुष्ट आहे. मी कोणता गुन्हा केला किंवा पाप केलं, हे मला समजलं पाहिजे. प्रत्येक गुन्ह्याला नियमानुसार घालुन दिलेली, म्हणजे नियत अशी शिक्षाच मला मिळाली पाहिजे. माझा न्यायनिवाडा माझ्यासमक्ष झाला पाहिजे आणि मला माझी बाजू मांडायची संधी मिळाली पाहिजे. हे काहीच न घडता मला शिक्षा होणं हा माझ्यावर अन्याय नाही का ? माणसाच्या न्यायदानात दिरंगाई होते ते आपण अनुभवतो. वर्षानुवर्षे खटले रेंगाळतात. आपण असंही म्हणतो, 19 जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड 19 ; मग देवाच्या न्यायालयात या जन्मींच्या पापाबद्दल पुढच्या जन्मी शिक्षा होणार असेल तर ही दिरंगाई भलतीच लांबड लावणारी आणि वेळखाऊ आहे म्हणायची ! शिवाय असं समजायचं का, कि देशासाठी तुरुंगात खितपत पडून अनन्वित छळ सोसलेल्या क्रांतिकारकांनी गेल्या जन्मी केलेल्या पापाचं फळ म्हणून ती शिक्षा भोगली ? आणि ब्रिटिशांच लांगूलचालन करून सुखात राहिलेले भारतीय, पुण्यवान ? मग या न्यायानं गोरगरीबाना, रोगग्रस्ताना, दुःखिताना मदत कशाला करायची ? ते गेल्या जन्मीच्या पापाचं फळ भोगताहेत. लेट देम सफ़र आऍंड फ़िनीश देअर पनिशमेंट. अशानं कोणत्याच विधायक कामाला काही अर्थच उरत नाही. आणखी एक पुढचा जन्म मनुष्याचाच मिळेल असं नाही. पुढच्या जन्मी तो कुत्रा किंवा मांजर झाला तर. ? खास माणसानंच केलेलं पाप, उदाहरणार्थ खासदाराना लाच देऊन आपलं बहुमत सिद्ध करणं तो कुत्रा होऊन कसं भोगणार ? शिवाय जो गेल्या योनीत पुण्य करतो, त्यालाच दुर्लभ असा नरदेह प्राप्त होतो, असंही म्हणतात. जर गेल्या योनीत पापच केलेलं नाही, तर या मनुष्ययोनीत शिक्षा कशासाथी ? आणि समजा, कुटुंबनियोजनाची मोहीम अगदी काटेकोरपणे राबवली तर कित्येक माणसं जन्मालाच येणार नाहीत. मग त्यांच्या गतजन्मीच्या संचिताचं काय ? म्हणजेच कर्मविपाकसिद्धांत हा मला हे दुखणं का झालं याचं मला पटेल असं उत्तर देऊ शकत नाही, असं मला वाटतं देव आहे की नाही मला माहित नाही. पण तो असूही शकेल. मी आहे, मी असू शकते, तर देव का असणार नाही ? माझी खात्री पटली तर त्याच्यावर विश्वास ठेवायला मला आवडेल. आईच्या गर्भात बाळ तयार होणं, हि केवढी मोठी मिस्टरी आहे ? आपली शरीररचना, तसंच या विश्वाची रचना ही केवढी मिस्टरी आहे ? या सगळ्या जगव्याळामागे नक्की एक शक्ती आहे, पण त्याला लगेच तथाकथित देवाचं रूप देण्याची आणि तो आपलं काही बरं वाईट करतो, असं मानण्याची घाई करु नये, हे बरं ! मला तर वाटं, की कुणा तरी एकाला क्रेडिट दिल्याशिवायही हे जग चालू शकतं. देवाबद्दल भितीही बाळगू नये आणि उगीच सुरक्षितही वाटुन घेऊ नये. 19 या जगात भूत नाही, ते नसतंच 19 हे मला ज्या वयात कळलं, त्याच वयात देवही नाही, नसतो, हेही मला कळलं. मला वाटतं माणूस आळशी आहे. तो कमीत कमी विचार करावा लागेल असाच मार्ग निवडतो. चार हातांचा, पंख असलेला, तेजःपुंज असा कुणीतरी एक मानून त्याच्यावर विसंबून राहून धीर येतोय ना; बरं वाटतंय ना मनाला ? चला, मान्य करा मग त्याचं अस्तित्व. उगीच विचार करून गुंतागुंत वाढवू नका ! परमेश्वर ही एक शक्ती असेल, एनर्जी असेल, पॉवर असेल, तर तिला कोणत्याच भावना, विचार, परोपकारी वृत्ती असं काही असणार नाही. आणि या शक्तीनं तरी आपल्याला मदत का करायची ? इट इज नॉट मेंट फ़ॉर दॅट. तुमचं तुम्ही बघा ! देवावर अवलंबून राहू नका. तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहिलात तर अश्रद्ध असा की सश्रद्ध असा, तुम्हाला त्रासच होईल. कारण त्यात विश्वासघाताचं दुःख असेल. माणसाच्या मनात, त्याचा या पृथ्वीवर अवतार झाला तेव्हापासून एक असुरक्षितता आहे. या असुरक्षिततेच्या भावनेतूनच त्यानं देवाची निर्मिती केली. मला तर वाटतं की माणसाच्या मनातल्या सकारात्मक भावना, म्हणजे देव. म्हणुनच देव त्या माणसामध्येच, त्याच्या हृदयातच असतो. तो वाईट, मदत न करणारा, संकट आणणारा असा असूच शकत नाही. कारण संकटात मदत करण्यासाठीच मुळी त्याची निर्मिती माणसानं केलीय. त्यामुळे, 19 देवानं माझ्यावर संकट का आणलं ? 19 हा प्रश्नच गैरलागू आहे. इतका सगळा विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की कर्मविपाकसिद्धांत किंवा देव हि संकल्पना हे जसं एक गृहितक आहे, तसंच माझे हे विचार हे सुद्धा माझं एक गृहितकच आहे. आऍझम्प्शन आहे. मला वाटतं देवाबद्दल, दैवाबद्दल, नशिबाबद्दल असं काहीतरी मत मांडण्यापेक्षा आणि तेच खरं आहे असं मानत बसण्यापेक्षा आयुष्यात अमुक अमुक का घडलं हे मला माहित नाही. मला कळत नाही. हे कबूल करणं जास्त प्रामाणिकपणाचं आहे. अज्ञेयवादाचा, Agnosticism चा स्वीकार करावा, हे योग्य. मी माझ्या आजारात कशी वागले ? खरं सांगायचं तर एखाद्या माणसाला तो बेसावध असताना, अचानक नदीच्या प्रवाहात फेकून द्यावं, तसं मला झालं. मी यातुन असा निष्कर्ष काढला, की आलेल्या संकटाला मनुष्य तोंड देतो, म्हणजे काय करतो ? तर तो ते संकट अनुभवतो. तो ते संकट अंगावर. मनावर घेतो आणि त्या संकटातून आरपार जातो. एव्हरीबडी गोज थ्रू इट, हे करत असताना, माणसाला त्याच्या संस्कारानी दिलेल्या उर्जेनुसार तो त्या संकटाला तोंड देतो. प्रवाहात टाकल्यावर कुणी पोहतो, कुणी गटांगळ्या खातो, कुणी तळाशी जातो, कुणी किनार्याला लागतो. ते त्याच्या कुवतीवर अवलंबून आहे. तो त्या संकटाला तोंड देण्यात मग्न असतो. तो ते संकट अनुभवत असतो. प्रत्येक संकटाला स्वतःचा असा एक वेग असतो. आणी संपुन जाण्याचा स्वतःचा असा एक कालावधीही असतो. तो संपेपर्यंत धीर धरणे महत्वाचे असतं, तो धीर धरता आला की आपण त्यातून आरपार जाऊ शकतो. अशी तनुमनाला व्यापणारी, देहभान हरपवणारी, अनुभव आणि अनुभव घेणारा यांत अद्वैत साधणारी घटना माणसावर येऊन कोसळली ना, तर गणपति अथर्वशीर्ष म्हणायला सूचतच नाही.
|
Slarti
| |
| Tuesday, November 06, 2007 - 4:15 pm: |
|
|
दिनेश, धन्यवाद. सगळेच पटले असे नाही पण भिडण्याची इच्छा आणि त्यातून आलेले विश्लेषणात्मक चिंतन आवडले. शेवटचा परिच्छेद सुंदरच. पहिल्या दोन ओळींनंतर तर स्वतःचे चिंतन सुरू व्हावे... परत एकदा धन्यवाद.
|
Bee
| |
| Wednesday, November 07, 2007 - 5:48 am: |
|
|
chhanach aahet waril utare.
|
Bhagya
| |
| Monday, November 12, 2007 - 11:49 pm: |
|
|
छानच आहेत विचार. सगळे नाही, तरी काही काही तर अगदी माझ्या मनातलेच आहेत. जसे की देव शिक्षा देतो, तारतो किंवा नशीबाला दोष देणे यापेक्षा कर्म करण्यावर विश्वास ठेवलेला बरा.
|
Ladtushar
| |
| Thursday, December 06, 2007 - 4:11 pm: |
|
|
|
Ladtushar
| |
| Thursday, December 06, 2007 - 4:12 pm: |
|
|
|
Ladtushar
| |
| Thursday, December 06, 2007 - 4:12 pm: |
|
|
|
Ladtushar
| |
| Monday, December 17, 2007 - 11:49 am: |
|
|
कुठेतरी छानसे वाचलेले, खूपच छान:
|
Ladtushar
| |
| Monday, December 17, 2007 - 11:49 am: |
|
|
|
Ladtushar
| |
| Monday, December 17, 2007 - 11:50 am: |
|
|
|
|
|