|
Ladtushar
| |
| Monday, December 17, 2007 - 11:51 am: |
|
|
|
Slarti
| |
| Monday, January 07, 2008 - 6:31 am: |
|
|
अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १२ मार्च १९९४ च्या साधनाच्या मुखपृष्ठावर ही कविता छापून आली होती - अनंताचा साक्षात्कार एखादा मास्तर असा भेटतो - शाळेची जाम भीती घालतो उठता बसता मारतो छडी थरथर कापतात चिमणे गडी विद्यार्थी ? छे, गोगलगाय जीवनभर पोटात पाय ! सदा न् कदा छडी हाती शाळेची, जीवनाची भीतीच भीती एखादा मास्तर असा भेटतो - उस्ताद नसला तरी वस्ताद असतो प्रत्येक चोरवाटेची चावी या पठ्ठ्याला अचूक ठावी कुणापुढे वाकावं, कुणा लाथ मारावी पैसे कसे पचवावे, कॉपी कशी करावी सार्या विद्यांचे शिक्षण सोदा देतो सोदाहरण एखादा मास्तर असा भेटतो - जो ज्ञानाचे पंख देतो सात स्वर्गांचे दार उघडतो घरटं बांधायला तोच शिकवतो घरटं उबदार पिलं शानदार आभाळातून सारं सांभाळते घार आभाळाचं मन काही पिलांना ती देत नाही नजर तीक्ष्ण एकच लक्ष्य भक्ष्य भक्ष्य आणखी भक्ष्य ! एखादाच मास्तर असा भेटतो - डोक्यात घट्ट रुतवून ठेवतो, भव्य स्वप्नाचा दिव्य बाण ! अंतर्वेधी दृष्टी त्याची पंखात घालते पंचप्राण ! पंख देतो, देतो शक्ती नाही देत थिजली शांती आकाशातून हिंडत असता भूमीवर खिळवी दृष्टी नजर नेहमी असतेच त्याची खुरडणार्या पायांवर दिगंतातून हिंडता हिंडता दाखवीत असता विश्वाकार एखादाच गुरू घडवी अनंताचा साक्षात्कार - कुसुमावती
|
Mi_anu
| |
| Tuesday, January 08, 2008 - 3:22 am: |
|
|
लाड तुषार, आपल्याला आवडलेला लेख आधी मनोगतावर प्रसिद्ध झाला आहे. लेखकाचे नाव समीर सूर्यकांत, लेखाचे नाव 'मी मागासलेला.' ही लेखाची लिंक. http://groups.google.com/group/manogat_lekh/browse_thread/thread/b1850e578685f742/bf8de143562d3cbf?lnk=gst&q=%E0%A4%AE%E0%A5%80+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE#bf8de143562d3cbf
|
Ladtushar
| |
| Tuesday, January 15, 2008 - 4:58 am: |
|
|
लेखकाच्या माहिती बद्दल धन्यवाद अनु.
|
Dineshvs
| |
| Monday, March 03, 2008 - 4:52 pm: |
|
|
अंतर्नादच्या ऑक्टोबर २००७ च्या अंकात " आपली ढिम्म संस्कृती " या शीर्षकाचा, अवधूत परळकर यांचा एक छान लेख वाचला. या लेखातील काही अंश देशातील नेत्यांवर आणि राजवटीवर जनता मोठ्या प्रमाणावर नाराज आहे हे खरे आहे. ती तशी नेहमीच असते, मग राजवट कोणत्याही पक्षाची असो. या नाराजीचं रुपांतर अराजकात होईल अशी स्थिती अनेकदा निर्माण झाली, पण तिचं पर्यावसान अराजकात झाले नाही. देशात मोठ्या प्रमाणात बंडखोरी माजेल अशी चिन्ह आजच्या घडीला तरी दिसत नाहीत. हे कसं काय ? इतक्या पराकोटीची स्तिथी असून देशात सर्व आलबेल कसं काय ? सत्ताधार्याना पर्याय नाही म्हणुन ? अर्धी जनता मतदानापासून दूर राहते म्हणुन ? चटकन सुचणारं एक कारण म्हणजे -- बंडखोरी इथल्या लोकांच्या रक्तात नाही. कारण क्रमांक दोन : इथली जनता बाह्य घडामोडींविषयी कमालीची उदासिन आहे. आपण बरं, आपलं काम बरं या वृत्तीची. कमालिची आत्मकेंद्रित. - - - - - इथल्या रहिवाश्याना चळवळ, उठाव, आंदोलन वगैरेविषयी फ़ार पुरीपासुन अनास्था आहे., हि गोष्ट खरी आहे, क्रांतीबिंतीचं तर नावच नको. इतरांनी लढायला जावं, सीमेचं रक्षण करावं, इतकंच नाही तर पार सीमेपलिकडे जाऊन अतिरेकांच्या छावण्यात घुसावं, त्यांना कंठस्नान घालावं, प्रसंगी त्यासाठी प्राणाहुती द्यावी लागली तरी बेहत्तर. हे सारं अर्थात शेजारी जन्मलेल्या भगतसिंगानी करावं, हे स्फ़ूर्तिगीतं म्हणणार, लढाईत प्राणाला मुकलेल्या जवानांची स्मारकं उभारणार, पराक्रमी वीरांची नावं रस्त्याला देणार, इतरांनी समाजकल्याणाची कामं करावीत, हे त्याचे फायदे घेणार आणि पुन्हा त्या समाज कार्यकर्त्याना लष्कराच्या भाकर्या भाजणारे म्हणुन हिणवणार ! - - - - अभिव्यक्तिस्वातंत्र्य हि मुळात नेहमीच्या वापरात नसलेली वस्तू. वापरात नसलेली वस्तू चोरीला गेल्यावर कुणाला काय वाटणार ?. - - - - तुरुंगात गेले ते राजकिय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते. सर्वसामान्य लोकांचा या मंडळींशी फ़ारसा संपर्क नसायचा आणि या नेते मंडळींचाही या सर्वसामनय लोकांशी संपर्क नसायचा. त्यांचं जग वेगळं. बायको, मुलं, काका, मामा, दीर, भावजय, चुलते यांनी भरलेली हि कुटुंबं. लग्न, मुंजी, मुला नातवंडांचे वाढदिवस विवाहाचे वर्धापन्दिन हे त्यांचे विष्व. - - - - - लोकांचा पाठिंबा आणीबाणीला नव्हता, तसा आणीबाणीविरुद्धच्या लढ्यालाही नव्हता. या आधी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, तेव्हाचं चित्रही वेगळं नव्हतं. - - - - शहाणा माणुस या प्रश्नाचं भवितव्य ओळखुन आहे. या शहाण्या माणसाची या राज्यातली आणि या भूतलावरची संख्या घटत चालली आहे; नामशेष होत चाललेल्या प्राण्यांसारखी. उत्क्रांतीच्या नियमानुसार नवं वातावरण आवडेल, मानवेल अश्या जमातीच टिकून राहणार. स्मरणरंजनात रमणारी, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी धडपडणारी जनता कोणाहि सत्ताधार्याला हवीहवीशी वाटणार. जनतेच्या या हौसेला उत्तेजन देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्यांच्याकडून होत राहणार. समाजावर सुखेनैव राज्य करण्यासाठी हे आवश्यक आहे, हे शासनाने ओळखले आहे -- मंदिरातले सोहळे, -- उत्सव, -- जत्रा, --- पूजा, --- पुरस्कार. समाजाला मूकबधिर करून सोडणार्या या गोष्टि आहेत. आम जनता म्हणुन आपण जिला संबोधतो असा जनतेच्या आवडीनिवडी, त्यांची मानसिकता, त्यांच्या अस्मिता यांचा इतका सखोल अभ्यास राज्यकर्त्यानी केव्हा केला ते समजत नाही, कि ज्यांचा लोकमानसाचा चांगला अभ्यास आहे तेच या समाजात राज्यकर्ते बनतील अशी आजची व्यवस्था आहे ? --- --- देशापुढिल समस्यांचा विसर पडावा यासाठी शासन अनेक कल्पक उपक्रम हाती घेतं. समाजातल्या या बुद्धिजीवी वर्गाशी सलगी करुन विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतं. राज्यात दुष्काळ पडो वा भूकंप होवो, हा अभिजन्वर्ग ज्यात रमतो, त्या चित्रपट महोत्सव साहित्यसंमेलनं असा सोहळ्याना, लाखोची अनुदानं देतं. देशातल्या पीडितांना सन्माननीय आयुष्य जगता यावं म्हणून तो सेमिनारमधून भाषणं करतो, शासकिय पॉलिसींवर पंचतारांकित हॉटेलातल्या चर्चासत्रावर हल्ला चढवतो; बड्या वृत्तपत्रात अभ्यासू लेख लिहितो. पण ते सगळं इंग्रजीतून, त्यानं काय साधतं, त्यांचं त्याला ठाऊक. या वर्गातले कहि प्रायोगिक नाटकं, कलात्मक सिनेमे दिग्दर्शित करतात. युरोपियम तसेच इराकी, इराणी चित्रपटांच्या समीक्षा लिहितात. विचारप्रवर्तक इंग्रजी नियतकालिकांचं संपादन करतात, तश्या त्या अत्यंत निरुपद्रवी हालचाली. त्यांच्यातले बरेचजण मतदानालाही जात नाहीत. त्यामुळे त्याना घाबरण्याचं वास्तविक कारण नाही. पण सत्ताधारी कोणताही धोका स्वीकारायला तयार नाहीत. ते त्यांच्या हालचालीवर नजर ठेवुन आहेत. डावपेचाचा भाग म्हनून शासनानं आजवर त्यांच्या शासनाविरोधी कलाकृतीना पुरस्कार देऊन त्यांच्या विरोधातली हवा काढायचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. असे पुरस्कार दिले कि हे कलावंत लोक सुखावतात्; मुलाखती, सत्कार समारंभ यांत काहि काळ रमून जातात. त्यांच्या विरोधाची धार बोथट करायला पद्मश्री, पद्मभुषण वगैरे किताब आहेतच, ज्या कोणी पुरस्कार या गोष्टीच्य शोध लावला तो थोरच असला पाहिजे. सत्तेवर असलेली आपल्याकडील नेते मंडळी व्यंगचित्रात, फ़ार्सिकल नाटकात रंगवली जातात तेवढी बावळट आणि मूर्ख निश्चित नाहीत. आपल्या कलावंत, लेखक, पत्रकार मंडळीपाशीच नेते मंडळींचे डावपेच, त्यांची चलाखी ओळखण्याचे कुवत आढळत नाही, असं म्हणावं लागेल. - - - - स्वयंसेवी संघटना वर्षानुवर्षे नुसते सर्व्हे करातहेत. या देशात किती लोक दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत्; किती गावांत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, किती गावांत बोअरवेल खोदल्या आहेत्; त्यातल्या किती बोअरवेलना पाणी लागलय्; शेतकर्यांचे दरडोई उत्पन्न किती या सगळ्यांची आकडेवारी गोळा करणं चाललय. स्वातंत्र्य मिळून साठ वर्ष झाली. तरी देश किती गरीब आहे याचं मोजमाप घेणं चालू आहे. डॉक्टरानी रुग्णावर औषधोपचार न करता दिवस आणि दिवस आजाराची चिकित्स करत रहावं अशातला हा भाग. ---- आता हे सर्व आपल्याला कोठे घेऊन जाणार आहे विचाराल तर कोठेच नाही. आपल्याला आहे तिथेच ठेवण्यासाठीच तर हे सर्व चालू आहे. आणि आपणा कोणाची काही तक्रारही नाही त्याबद्दल. आपली कधी कशाबद्दल तक्रार असते ? - - - हा लेख मला खुप आवडला. तो मोठा असल्याने इथे साराच टाईप केला नाही. लेखकाचा ईमेल पत्ता इथे देत आहे. awdhoot@rediffmail.com
|
दिनेश, संपूर्ण लेख कुठे वाचायला मिळेल ऑनलाइन? इथे अंतर्नाद मिळण्याची शक्यता शून्य (त्यातुनही ऑक्टोबरचा अंक)..
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 04, 2008 - 2:47 am: |
|
|
तान्या, मी खरच आळस केला. नाहितर संपुर्ण लेख टाईप करुन काढला असता. म्हणूनच मुद्दाम लेखकाचा पत्ता दिला आहे. माझ्यासारखे आता जे चाळिशी पंचेचाळीशी मधे आहेत त्यांची व्यथा आहे हि. आमच्यासाठी स्वातंत्र्य चळवळ इतिहास होता, आपणहि काहितरी करुन दाखवु अशी धमक होती, पण जनता पक्ष प्रकरणात आम्ही तोंड पोळून घेतलं. आणि नंतर भारतात कुठलीच वैचारिक चळवळ उभी राहु शकली नाही.
|
Hkumar
| |
| Tuesday, March 04, 2008 - 11:28 am: |
|
|
विनय महाजनांचे हे हिंदी गीत खूप आवडले: धरम धरम चिल्लानेवाले खून बहाये देशमे शैतानोंने डेरे डाले इन्सानोंके भेशमे कैसे कहेंगे सारे जहासे अच्छा हिंदुस्तान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इन्सान को मन्दिर मस्जिद गिरिजाघर मे बाट दिया भगवान को ध.बा.सा. बा.............को.
|
Hkumar
| |
| Tuesday, March 04, 2008 - 11:39 am: |
|
|
वरील गीत त्यांनी गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर लिहीले होते. त्या गीताचे स्टिकर्स मुंबईच्या लोकल्स मध्ये लावण्यात आले होत.
|
"What a woman really wants?" Young King Arthur was ambushed and imprisoned by the monarch of a neighboring kingdom. The monarch could have killed him but was moved by Arthur's youth and ideals. So, the monarch offered him his freedom, as long as he could answer a very difficult question. Arthur would have a year to figure out the answer and, If after a year, he still had no answer, he would be put to death. The question was: What do women really want? Such a question would perplex even the most knowledgeable man, And to young Arthur, it seemed an impossible query. But, since it was better than death, He accepted the monarch's proposition to have an answer by year's end. He returned to his kingdom and began to poll everyone: The princess, the priests, the wise men, and even the court jester. He spoke with everyone, but no one could give him a satisfactory answer. Many people advised him to consult the old witch, For only she would have the answer. But the price would be high as the witch was famous through out the kingdom for the exorbitant prices she charged. The last day of the year arrived and Arthur had no choice but to talk to the witch. She agreed to answer the question, but he would have to agree to her price first. The old witch wanted to marry Sir Lancelot, The most noble of the Knights of the Round Table, And Arthur's closest friend! Young Arthur was horrified. She was hunch-backed and hideous, had only one tooth, Smelled like sewage, made obscene noises, etc. He had never encountered such a repugnant creature in all his life. He refused to force his friend to marry her and endure such a terrible burden, But Lancelot, having learnt of the proposal, spoke with Arthur. He said nothing was too big of a sacrifice compared to Arthur's life. And the preservation of the Round Table. Hence, a wedding was proclaimed and the witch answered. Arthur's question thus: "What a woman really wants?" She said, "Is to be in charge of her own life." Arthur's life spared. And Lancelot and the witch had a wonderful wedding. The honeymoon hour approached and, Lancelot, steeling himself for a horrific experience, entered the bedroom. But, what a sight awaited him. The most beautiful woman he had ever seen lay before him on the bed. The astounded Lancelot asked what had happened. The beauty replied that since he had been so kind to her when she appeared as a witch, She would henceforth be her horrible and deformed self only half the time. And the beautiful maiden the other half. "Which would you prefer? She asked him. "Beautiful during the day ... or at night?" Lancelot pondered the predicament. During the day he could have a beautiful woman to show off to his friends, But at night, in the privacy of his castle, an old witch! Or, Would he prefer having a hideous witch during the day? But by night a beautiful woman for him to enjoy wondrous, intimate moments with? (If you are a man reading this...) What would YOUR choice be? (If you are a woman reading this)What would YOUR MAN'S choice be? What Lancelot chose, is given below: Noble Lancelot, knowing the answer the witch gave Arthur to his question, He said that he would allow HER to make the choice herself. Upon hearing this, she announced that she would be beautiful all the time. Because, he had respected her enough to let her be in charge of her own life.
|
Hkumar
| |
| Saturday, March 08, 2008 - 5:46 am: |
|
|
तेंडुलकरांच्या 'कोवळी उन्हे' मधून्: स्त्रीविना मुखपृष्ठ रंगत नाही, स्त्रीविना कविता स्फुरत नाही, स्त्रीविना चित्रपट चालत नाही आणि राजकारण हलत नाही. स्त्री नसेल तर समारंभाला प्राण नाही, सभेत राम नाही, मिरवणुकीला शोभा नाही, जीवनात चव नाही.
|
लाडतुशार्- very thought provoking and true अर्थात "पुरुषजन्मा-------" चे सदस्य react करतील. -
|
Posted by गुरु., 05/01/2008 - 05:12 ITgurl दिवसभर कितीही दंगा केला तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित शांत झोप कधी लागली नाही कुणी विचारतं .. "तुला घरी जावसं वाटत नाही?" कसं सांगू त्यांना, घरातून निघताना आईला मारलेली मिठी सोडवत नाही आई, तू सांगायची गरज नाही तुला माझी आठवण येते आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो तरीहि तू सहा वाजताच उठतेस तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोळी तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला आता जीभ आसुसली घरापासून दूर ... आई जग खूप वेगळं आहे तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते आता रणरणंत ऊन आहे तू आपल्या पिलांसाठी सगळं केलंस ... एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ... आणि तू त्यांना जाऊ दिलंस आई, तू इथे नाहीस बाकी माझ्याकडे सगळं आहे घरापासून दूर.... .................... ऑर्कुटीन्ग करताना सापड्ली.. मनाला भावली खुप्,आई म्हट्ल की आपोआप केसातुन तिचा मऊ हात फिरल्या सारखा वाट्तो..... ज्यानी कुणी ही कविता लिहिलीय ,त्याच खरच कौतुक....
|
Bee
| |
| Thursday, May 01, 2008 - 4:18 pm: |
|
|
नेमस्तक २, वरील कविता पुन्हा लिहिली गेली. फ़क्त एक पान मागे जर गेलात तर बदामराजानी हीच कविता लिहिलेली आढळेल.
|
Bee
| |
| Thursday, May 01, 2008 - 4:20 pm: |
|
|
हेमन्त कुमार, वर तुम्ही विनय महाजनांचे जे गीत लिहिले त्यात ध. बा. सा. बा. चे पुर्णरूप माहिती असेल तर लिहाल का? आभारी आहे, हेमंत.
|
Shonoo
| |
| Thursday, May 01, 2008 - 4:44 pm: |
|
|
बी जरा नीट वाच ना कविता. त्यातच आहे की!
|
Bee
| |
| Friday, May 02, 2008 - 3:21 am: |
|
|
खरचं वर ओळ आहे.. " धरती बाटी सागर बाटा
|
Hkumar
| |
| Saturday, May 03, 2008 - 5:08 am: |
|
|
बी, सदर गीतासंबंधी थोडेसे. ते खूपच गाजले. धार्मिक सलोखावाढीसाठी त्याचा खूप उपयोग झाला. नंतर ते गुजरातेतील पाठ्यपुस्तकात घालण्यात आले पण.... 'एक लोकगीत' म्हणून व लेखकाच्या नावाचा उल्लेख वगळून!!
|
Trish
| |
| Tuesday, May 13, 2008 - 12:09 pm: |
|
|
|
Trish
| |
| Tuesday, May 13, 2008 - 12:10 pm: |
|
|
|
Rr38
| |
| Friday, January 30, 2009 - 9:49 am: |
|
|
namaskaar. mee khuup varShaa.npoorvee ek kavitaa, bahudhaa lokaprabhaamadhye, vaachalii hotii. ekaa aaiiche manogat hote- mulagaa lahaan asataanaa tila tyaachyaasaaThii kaamaatoon veL miLat nase- ashii kaahiishee. kuNaalaa maahitii aahe kaa?
|
|
|