|
Saee
| |
| Monday, December 31, 2007 - 10:10 am: |
|
|
ह. मोंचे 'पोहरा' वाचनीय आहे. अगदी आवर्जून. त्यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग. स्वतंत्रही वाचता येईल पण त्याआधी 'बालकांड' वाचले तर संदर्भांसाठी सोपे पडते. 'बालकांड'ही अतिशय परिणामकारक आहे. आनंद यादवांची आत्मचरित्रे अनुक्रमे झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल उत्तम. काचवेल त्यातल्या त्यात जरा सुमार म्हणता येईल. पण पहिले तीन वाचावेच असे भाग. आम्हाला 'भाकरीचा चंद्र' नावाचा धडा होता आठवी की नववीत. तेव्हापासून वाचायची उत्सुकता होती, आत्ता वाचायला मिळाली. माणसे किती धडपडत आयुष्यात वर येतात ते वरच्या दोन्ही उदाहरणांमधून ठळक जाणवतं.
|
Upas
| |
| Monday, December 31, 2007 - 9:16 pm: |
|
|
अपर्णा वेलणकरांच "फॉर हिअर ऑर टू गो?" वाचलं.. आवडलं.. अमेरीकेत स्थलांतरीत मराठी NRI ची सुख दुखे नेमक्या आणि अभ्यासपूर्ण रीतीने मांडलेयत. एकूण पुस्तकाचे स्वरूप ललित उतार्यांच्या संग्रहासारखे झालेय पण एकंदर विषयाची व्याप्ती पहाता अतिशय उत्तम प्रयत्न. मराठी NRI च्या व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवरच्या यशापयाशांचा छान उहापोह केला आहे, अगदी उदाहरणांसकट. तसेच दिलिप चित्रेंची प्रस्तावना विशेष आवडली.. पांढरपेशांच गिरगाव हे मधुसूदन फाटक लिखीत पुस्तक नुकतच वाचलं. ठीक वाटलं. ग़िरगावात जन्मापासून २२-२३ वर्षे राहून काही जुन्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या नीट समजल्या.. जयकर मार्ग, समतानंद अनंत हरी गद्रे अशी चौकांना आणि रस्त्यांना दिलेल्या नावांच कर्तुत्व कळलं. पुस्तकाची मांडणी छान आहे. ऑपेरा हाऊस पासून सुरू होवून, ठाकुरद्वार नाक्यापर्यंतच्या आणि queens neckelss पासून सुरु होऊन माधवाश्रमा पर्यंतच्या २ X २ कीमी च्या इतक्याश्या गिरगावात गेली १५० ते २०० वर्ष इतक्या सामजिक, राजकीय गोष्टी होत असतील हे पाहून मौज वाटली. कालानुरुप बदलणार्या गिरगावची छान चित्रे देखील पुस्तकात आहेत. सच्च्या गिरगावकराने जरुर वाचावे असे हे पुस्तक! आणि हो डोळ्यात पाणी येईपर्यंत nastalgic वाटलं वाचताना माझ्या लाडक्या गिरगावाबद्दल.. येउ घातलेल्या टॉवर संस्कृतीमुळे असं माझ्या आठवणीतलं गिरगाव परत कधीही मिळणार नाही, अगदी गिरगावात राहूनही.. कालाय तस्मै नमः!
|
परदेशात वास्तव्य असणार्या भारतीयान्च्या व्यथा,त्याचे अनुभव यावरील पुस्तकान्ची नावे सान्गाल का? मध्यन्तरी मेहता publishers नी तिथे घटस्फोट झालेल्या व नन्तर खूप struggle करून पुढे आलेल्या लेखिकेचे आत्मचरित्र प्रकाशित केले होते.कोणी सान्गाल काय?
|
तान्या, पुरुषोत्तम बोरकरांचं ' मेड इन इन्डिया' वाचा.
|
तान्या? made in india चे recommendtion माझ्यासाठी ना?
|
Mrinmayee
| |
| Wednesday, January 02, 2008 - 1:54 pm: |
|
|
http://ireadindia.com:8080/apex/f?p=100:1:452030888577012 ही साइट अवश्य बघा. Netflix च्या धरतीवर मराठी पुस्तकं पाठवण्याचा हा आगळा वेगळा उपक्रम छान आहे. पुस्तकांचा संग्रह देखिल मस्तच!
|
रवी, नाही, ते तान्या यांच्या उपहासात्मक पुस्तकांबद्दलच्या विचारणेवरून लिहीलं होतं. तुम्हाला शोभा चित्र्यांचं ' गोठलेल्या वाटा' recommend करते. मृण, मस्त लिंक आहे. पण ही सेवा भारतातच ना?
|
Mrinmayee
| |
| Thursday, January 03, 2008 - 12:07 am: |
|
|
स्वाती, आत्ताच्या भारत भेटीत हा उपक्रम सुरु करणार्या रेवती ताईंना भेटले. तीथे ठाण्याला तर ही सेवा आहेच. पण (बहुतेक) त्यांचा इथे (अमेरिकेत) राहणारा मुलगा इथला कारभार बघतो. ह्या साइटवर जाऊन Contact us वर क्लिक केलं की address भरताना zip code विचारलाय. तेव्हा आपल्याला देखील पुस्तकं घरपोच मिळण्याची सेवा असावी. मी विचारून नक्की सांगते.
|
मला technical शब्दाचे मराठी अनुवाद translation देणारी website वा online शब्द कोष कुठे मिळेल?
|
Psg
| |
| Friday, January 04, 2008 - 8:03 am: |
|
|
मृण, मी त्या लिंकवर जाऊन 'ही सेवा पुण्यात उपलब्ध आहे का' अशी विचारणा केली होती आणि चक्क मला श्री. गोगटेंचा फोन आला होता! सध्या तरी ही सेवा ठाण्यात, मुलुंड आणि कळVआ इथे आहे, आणि लवकरच पुण्यातही सुरु होणार आहे असे त्यांनी कळवले आहे त्यांचा मुलगा न्यूजर्सीत आहे, त्याने ही वेबसाईट तयार केली आहे, म्हणून तिथे डीफ़ॉल्ट सिटी न्यू जर्सी येत आहे (इतकंच). मुलग्यानी मनावर घेतलं तर तिथेही होतील पुस्तकं उपलब्ध..
|
Kshitij_s
| |
| Friday, January 04, 2008 - 3:29 pm: |
|
|
थन्क्स म्रुण्मयी. मी आजच बोललो श्री. गोगटे यान्च्याशी. मेम्बेर होतोय.
|
Lalu
| |
| Friday, January 04, 2008 - 3:39 pm: |
|
|
'रसिक' च्या लायब्ररीसारखा प्रकार आहे वाटतं हा. रसिकची लायब्ररी काही वर्षांपूर्वी चालू झाली होती इथे- http://www.rasik.com/library
|
उपास तुमच्या शिफारसीवरून FOR HERE OR TO GO?| वाचले. अत्यन्त ह्रुदयस्पर्शी असे अनुभव व्यासन्गपूर्ण शैली अशी अती उत्क्रुष्ट रचना आहे.विशेषत्: माझे ,(किम्बहुना अनेक मध्यमवर्गीय कुटुम्बातून स्थलान्तर केलेले ) अनेक नातेवायीक वेळेअभावी अथवा सन्कोचापोटी जे काही सान्गू शकले नाहीत त्यान्च्या वतीने त्यान्च्या मनातील व्यथा आनन्द,सुखे दु:खे या पुस्तकाद्वारे सुन्दरपणे व्यक्त झाली आहे.मराठी वान्ग्मयात एक मोलाची भर्-विशेषत्: पहिल्याच अशा मोठ्या स्वरूपातील प्रयत्नात.लेखिकेस अभिनन्दन आणि "उपास"यान्स धन्यवाद
|
Mrinmayee
| |
| Saturday, January 05, 2008 - 6:39 pm: |
|
|
यु आर वेलकम क्षितिज! पूनम, माझा कॉंटॅक्ट झाला त्यांच्या मुलाशी ऑरकुटातून. तो कॅलीफोर्नियात असतो. (ते NJ का आलं ह्याचं मला न समजणारं टेक्निकल कारण त्यानी दिलय. ) ह्या वेळच्या भारत भेटीत श्री आणि सौ गोगट्यांच्या घरी जाण्याचा योग आला. खुप छान वाटली दोघंही बोलून! (सौरभ, त्यांचा मुलगा, तोही भेटला). USA मधल्या मराठी वाचकांसाठी ही सेवा सौरभ गोगटे उपलब्ध करून द्यायला तयार आहे. कमितकमी ५० तरी मेंबर्स मिळायला हवेत. तेव्हा आपापल्या मराठी मंडळांशी संपर्क साधून, किती लोक तयार आहेत हे ठरवून www.ireadindia.com ह्या वेबसाईटवर जाऊन विचारता येईल. ५० मायबोलीकरच मिळाले तर फार छान!
|
Psg
| |
| Tuesday, January 08, 2008 - 5:53 am: |
|
|
'द काईट रनर' हे खालिद हुसैनी यांचे, वैजयंती पेंडसे यांनी मराठी अनुवाद केलेले पुस्तक वाचले. अप्रतिम पुस्तक. अत्यंत भावस्पर्शी, हेलावून टाकणारे पुस्तक आहे. २ मुलांची, त्यांच्या मैत्रीची, त्यांच्या निरपेक्ष प्रेमाची, पश्चात्तापाची ही कादंबरी.. हातात घेतली की पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही.. आणि नंतरही त्यातली ही दोन प्रमुख पात्र मनात रेंगाळत रहातात. मुद्दाम सांगावेसे वाटते की अनुवादित असूनही मराठी भाषा कुठेही खटकत नाही. फ़्लो फ़ारच समर्थपणे हाताळला आहे वैजयंती पेंडसेंनी.
|
Manjud
| |
| Tuesday, January 08, 2008 - 12:04 pm: |
|
|
'वाचू आनंदे' मी पण सुरू करीन म्हणते फ़ेब्रूवारीपासून... खूपच उपयुक्त आणि सोईस्कर सेवा आहे. आणि मी ठाण्यातच राहते त्यामूळे फारच सोईस्कर अहे माझ्यासाठी..... मृण्मयी, अनेक धन्यवाद.
|
Upas
| |
| Tuesday, January 08, 2008 - 3:31 pm: |
|
|
धन्यवाद स्वाती, नुकतंच शोभा चित्रे यांचं " गोठलेल्या वाटा " वाचलं. विषयाची मांडणी, प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र विषय, त्या विषयाकडे वेगवेगळ्या बाजूने बघण्याची अभ्यासू वृत्ती, मुद्देसूद लिखाण ह्या बाबी मनापासून आवडल्या. बरेच मुद्दे अर्थातच विचार करायला लावणारे आहेत. पण काही वेळा भारतातल्या गोष्टी, माणसे समजून घेण्याची वृत्ती थोडीशी कमी पडलेली दिसते त्यामुळे अर्थातच दरी वाढत जाते! मी For here or to go नंतर लगेचच हे पुस्तक वाचल्याने विशेष मजा आली.. रवी धन्यवाद तुलाही, गोठलेल्या वाटा मिळालं तर जरुर वाच.
|
याच विषयावर स्वदेश नावाचे अजून एक नवीन पुस्तक आले आहे.बराच चान्गला रेव्व्यु आहे.वाचकानी जरूर कळवावे.मी अजून वाचलेले नाही.बाय द वे उपास! ,मिसेस वेलाणकरानी फोन केला होता नाशिकच्या ना त्या! प्रत्यक्ष भेटून आणखी चर्चा करायचे म्हणतो.पण एक प्रश्न सारखा मनात येतो,ज्याना अमेरिकन सन्दर्भ चान्गला परिचित नाही ते या पुस्तकातील सन्वेदना appreciate करू शकतील का? या निकषावर हे पुस्तक universally appealing to human emotions असेल का? चर्चा करूया का?
|
Tulip
| |
| Friday, January 11, 2008 - 5:28 pm: |
|
|
चक्रीवादळ- प्रभाकर पेंढारकर. सुरेख पुस्तक. बरेच दिवस वाचायचं टाळत होते. नाही आवडल रारंगढांग इतकं तर? म्हणून. पण आवडलं. रिव्यू टाकते नंतर.
|
Reading Kite Runner in English,very readable and easy reading too!!!!
|
|
|