|
|
Thread |
Posts |
Last Post |
| कोणती पुस्तके वाचू? कोठे मिळतील? | 34 | 04-03-08 2:51 pm |
| इतर भाषीय | 67 | 03-17-08 2:04 pm |
| अ - झ | 17 | 07-13-07 4:27 am |
| ट - म | 50 | 03-15-07 6:51 am |
| य - ज्ञ | 36 | 01-25-08 8:59 am |
| अनुवादित | 18 | 04-09-08 5:41 am |
| Archive through February 10, 2003 | 5 | 02-10-03 5:03 pm |
| Archive through August 08, 2003 | 9 | 04-18-03 4:20 am |
| Archive through October 07, 2003 | 2 | 10-07-03 8:14 pm |
| Archive through July 28, 2004 | 19 | 03-03-04 8:46 pm |
| Archive through September 15, 2004 | 18 | 09-15-04 1:07 pm |
| Archive through March 23, 2005 | 21 | 03-23-05 5:46 am |
| Archive through September 16, 2005 | 20 | 09-16-05 4:49 pm |
| Archive through May 24, 2006 | 20 | 04-01-06 2:15 am |
| Archive through June 16, 2006 | 20 | 05-25-06 5:54 am |
| Archive through September 04, 2006 | 20 | 06-08-06 8:46 am |
| Archive through November 01, 2006 | 17 | 06-30-06 8:18 am |
| Archive through February 06, 2007 | 20 | 10-12-06 11:19 pm |
| Archive through January 31, 2003 | 20 | 03-14-07 4:20 pm |
| Archive through April 10, 2003 | 20 | 03-14-07 4:23 pm |
| Archive through March 21, 2007 | 20 | 03-22-07 3:04 am |
| Archive through April 11, 2007 | 20 | 04-11-07 6:36 am |
| Archive through April 16, 2007 | 20 | 04-16-07 9:55 am |
| Archive through May 31, 2007 | 20 | 05-31-07 5:55 am |
| Archive through July 04, 2007 | 20 | 07-04-07 8:28 am |
| Archive through July 05, 2007 | 20 | 07-06-07 12:27 am |
| Archive through July 12, 2007 | 20 | 07-12-07 4:29 pm |
| Archive through August 01, 2007 | 20 | 08-01-07 1:19 pm |
| Archive through August 28, 2007 | 20 | 08-28-07 7:41 am |
| Archive through September 07, 2007 | 20 | 09-07-07 5:35 am |
| Archive through December 07, 2007 | 20 | 12-07-07 11:35 am |
| Archive through January 16, 2008 | 20 | 01-17-08 4:24 am |
| Archive through April 11, 2008 | 20 | 04-11-08 3:09 pm |
Bee
| |
| Friday, April 11, 2008 - 3:29 pm: |
|
|
मला वाटलं चीपर बाय डझन हा सिनेमा ह्याच पुस्तकावरून बनवलेला आहे. बरे झाले माहिती झाले. मुळ निर्मिती ही केंव्हाही जास्त चांगली असते.
|
Bsk
| |
| Friday, April 11, 2008 - 4:29 pm: |
|
|
छान पुस्तक आहे.. मी मराठी मधून वाचले होते. आत्ता माझ्याकडे इंग्लिश इ-बुक आहे.. इथे अपलोड करते.. अर्थात.. इ-बुक मधे ती मजा नाही..! * साईझ जास्त असल्यामुळे अपलोड होत नाहीय. ज्यांना हवय त्यांना मी इमेल करू शकेन..
|
The monk who sold his farrari वाचलय का कोणी?
|
B S K "चीपर बाय डझन" मला हाव आहे. please send on my mail id ravi.ranadive@gmail.com
|
Bsk
| |
| Tuesday, April 15, 2008 - 9:03 pm: |
|
|
चिपर बाय डझन, इथुन डाउनलोड करता येईल.. http://www.sendspace.com/file/2m8xpt
|
Dineshvs
| |
| Friday, May 16, 2008 - 4:52 pm: |
|
|
मीना प्रभुंचे " गाथा इराणी " हे नवे कोरे पुस्तक ( मौज प्रकाशन, किंमत ३०० रुपये, पृष्ठे ३७६ ) नुकतेच वाचून संपवले. खरे तर आम्ही त्यांचे चाहते, रोमराज्यची, गेली दोन वर्षे वाट बघत आहोत, पण हा त्यानी आम्हाला दिलेला सुखद धक्काच आहे. आर्यनाम क्षेत्रम, असे मूळ नाव असणारा हा देश आणि या पुस्तकाच्या शीर्षकातील, गाथा हा शब्ददेखील, मूळ पारसीच. इराणी रेस्टॉरंट्स आपल्याला परिचित. त्या कनवाळु लोकांचा देश कसा आहे, याचा अगदी सुंदर आढावा या पुस्तकात आहे. मीना प्रभुंच्या पुस्तकात छायाचित्र कमी असली, तरी त्यांच्या नेमक्या वर्णतून तो प्रदेश, तिथल्या इमारती, शिल्पकला, अगदी डोळ्यासमोर उभ्या राहतात. शिवाय इराणच्या खजिन्यातील ज्या संपत्तीचे मूल्यमापनही होवू शकत नाही, असे काहि नमुने, आपल्याला छायाचित्रातून दिसतात. प्रकाशनमूल्य, अगदी अव्वल दर्ज्याची आहेत. इराणचे आणि आपले सांस्कृतिक धागे इतके एकमेकात गुंतले आहेत कि, पानोपानी, त्याचा अनुभव येत राहतो. तीनला ते से म्हणतात, आणि एक ला येक. बाकि दोन आणि चार ते दहा, सर्व अंक शब्दात तेच. इतिहासातही सतत आमनेसामने होतीच, ते संदर्भही इथे येत राहतात. औरंगजेबाने, शहा अब्बासला पाठवलेल्या एका पत्रात, आलमगीर अशी सहि केली होती, त्याला उत्तर देताना शहाने लिहिले होते, तुझ्याच देशात, तुझ्या दक्षिणेला असलेल्या शिवाजी नामक काफ़रालाही तू जिंकू शकत नाहीस, तू कसला आलमगीर ( जगाचा राजा ) इराणमधली अप्रतिम वास्तूकला, तर इथे अचंबित करते. निव्वळ प्रकाशाच्या मोराचे, वर्णन तर मूळातूनच वाचायला पाहिजे. एखादा पूल, किती देखणा, असू शकतो. तोही इथे भेटतोच. पारसी लोकांच्या धर्माची इथे ओळख आहेच पण मुसलमानाच्या प्रतिमक्केला, दिलेली भेटही आहेच. पण तरिही सगळे आलबेल आहे असे नाही. तिथे स्त्रियाना हिजाबचीच नव्हे तर चादोरची पण सक्ति आहे. लेखिकेला तर अगदी विमानात प्रवेश करण्यापासूनच त्या सक्तिचा सामना करावा लागला. आणि त्याबद्दलचा निषेध, लेखिकेने वेळोवेळी, जो भेटेल त्याच्याकडे केला. एका मुल्लाला सुद्धा त्यानी सोडले नाही. आणि या सर्वाचे परिणामहि त्यानी भोगले. लेखिकेची देवधर्माविषयी मते, मला अत्यंत प्रिय आहेत. या पुस्तकात ती मते, अत्यंत धारदारपणे व्यक्त झाली आहेत. आम्ही मस्कतला असताना, इराणी ओले पिस्ते, डाळिंब, केशर, हलवा यांचा मनसोक्त आस्वाद घेतला होता. पण प्रत्यक्ष तिथे मात्र लेखिकेचे जेवणाचे हालच झाले. सारखा क नावाने सुरु होणारा एक पदार्थ खावा लागला. या पदार्थाचा लेखिकेला इतका वैताग आला होता कि शेवटी, त्याचा उल्लेख देखील, त्याना नकोसा झाला होता. आपल्या कडव्या धार्मिक आणि राजकिय मतानी, इराण जगभर बदनाम आहे. देश असा तर माणसे कशी असतील, असे लोक समजत असतात, पण या समजाला मात्र लेखिकेने पुर्णपणे खोटे ठरवले आहे. पण या सर्वांपेक्षा पुस्तकभर व्यापून राहिला आहे तो, इराणी लोकांचा जिव्हाळा. हा जिव्हाळा त्यांचा राष्ट्रीयधर्म असावा, इतक्या निष्ठेने ते लोक तो पाळतात. भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे, हि ओळ अक्षरशः खरी ठरते तिथे. आपण आपल्या परिचिताना, मित्रमैत्रिणीना सुद्धा जितका जिव्हाळा दाखवू शकत नाही, तितका जिव्हाळा, तिथले लोक, एका परदेशी प्रवाश्याला दाखवतात. ज्या लोकांशी लेखिकेचे वाद झाले, त्यानीदेखील हा जिव्हाळा जपला आणि लेखिकेला शरमिंदे केले. आणि हे सगळे खास मीना प्रभुंच्या निखळ प्रामाणिक लेखनातून आपल्यापर्यंत पोहोचते. हे सर्व प्रसंग मूळातूनच वाचण्याजोगे आहेत. लेखिकेच्याच शब्दात सांगायचे तर, जीवनाच्या व्यवहारात स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र होण्याच्या नादात मी किती रुक्ष कोरडी झाले आहे. सगळं देणंघेणं किती मोजूनमापून करते आहे या जाणीवेने माझे डोळे उघडले. सारखे पाणावत असले तरी नक्की उघडले. असलं वेडं प्रेम शिकून घ्यायला हवं पुन्हा. ---- या मातीचा हा गूण असलेला हा प्रेमळपणा मला आतून उसवून पिंजून काढतो आहे. आता विचारा मला पुन्हा कुठल्या देशात जावंसं वाटतय ? इराण, निःसंशय इराण.
|
Manjud
| |
| Tuesday, June 10, 2008 - 8:45 am: |
|
|
परवाच्या रविवारी दुपारी छान पुस्तक वाचायला मिळाले अनंत सामंत ह्यांचे ऑक्टोबर एण्ड. पहिल्याच पानावर जहांगिर आर्ट गॅलरी, भणंग चित्रकार, सामोवार वगैरे वर्णन वाचून हे पुस्तक भयंकर बोअर करणार असं वाटलं होतं.... पण पुढच्या पानांवर विशाल, नीना, ऍश्विन डीसूझा, स्कारलेट, कमलजीत, स्वामीनाथन, मंदाकिनी भेटत गेले आणि पुस्तकात मी हरवून गेले. कॅटरींग कॉलेजमधले हे सगळे जुने दोस्त. चार पाच वर्षानंतर गेट टू गेदरची टूम निघते. विशाल एक leading sculpturist , त्याला आवडणार्या स्कारलेट आणि नीना, ऍश्विनला ठाऊक असलेलं निनाचं गुपीत, अतोनात खर्च करणारा कमलजीत, मंदाकिनी, स्वामीनाथन, विशालची आई सगळेच आपल्याला आवडून जातात. कादंबरी वेगवेगळ्या वळणाने फुलत जाते आणि एका अनपेक्षित शेवटावर आणून सोडते तेव्हा आपण थक्क होतो. ह्या शेवटाची कथेत येणार्या वेगवेगळ्या प्रसंगातून हिंट मिळत जाते पण हे आपल्याला कथा संपल्यावरच लक्षात येतं. व्यवसायाने दर्यावर्दी असलेल्या अनंत सामंत ह्यांच्या भाषेतला बिनधास्तपणा जाणवतो. त्यांचं लिखाण थोडसं बोल्ड वाटू शकेल पण त्यातला सच्चेपणा आपल्याला भावतो. 'एम. टी. आयवा मारू' हि त्यांची पहिली कादंबरी आणि 'अविरत', 'त्रिमाकासी मादाम' ह्या कादंबर्या मी वाचलेल्या आहेत. 'माईन फ्रॉईंड' हा कथासंग्रह देखिल खुप छान आहे. त्यांच्या सगळ्याच लिखाणातून खलाशी जीवनाची झलक आपल्याला अनुभवायला मिळते. 'ऑक्टोबर एण्ड' ही वेगळ्याच विषयावरची कादंबरी पण खिळवून ठेवणारी आणि अतिशय वाचनीय आहे.
|
ज्याचा त्याचा विठोबा आणि प्रवासांतल्या नोंदी केवळ लेखकः आनंद जातेगावकर. चार-पाच वर्षांपूर्वी 'ज्याचा त्याचा विठोबा' ह्या एकपात्री[?] कार्यक्रमाचे काही मोजके प्रयोग सुप्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांनी सादर केले होते. त्यांतला एक प्रयोग पहाण्याचं भाग्य मला लाभलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी योगायोगाने अमरापुरकरांशी बातचीत करण्याचीहि संधी लाभली होती. मला तो प्रयोग अतिशय आवडला होता, विशेषतः त्याचं स्क्रिप्ट खूपच 'समर्थ' आणि 'अभिनव' वाटलं होतं. 'ते स्क्रिप्ट प्रसिध झालं आहे का?' असं मी त्यांना तेंव्हा विचारलं होतं. ' प्रसिद्धीच्या वाटेवर आहे' असं उत्तर मला मिळालं होतं. आता 'ज्याचा त्याचा विठोबा' आणि 'प्रवासांतल्या नोंदी केवळ' ह्या दोहोंचं संयुक्त पुस्तक 'लोक वाङ्मय गृह' मुंबई' यांनी प्रकाशित केलेलं माझ्या हाती लागलं. तुकोबांच्या अभंगांचं, आजच्या पिढीला पटेल, भावेल असं आणि आजच्या परिस्थितीला लागू पडेल असं एक 'इंटरप्रिटेशन' करणं हेच मुळी एक प्रचंड आव्हान होतं. आनन्द जातेगावकरांनी ते खरंच समर्थपणे पेललं होतं. दुसरं असं की तुकारामांच्या अभंगाच्या पारंपारीक निरुपणापेक्षा त्यांनी मांडलेला अन्वयार्थ खूप वेगळा वाटला. एकूणच शांकर-प्रणीत मोक्षवादी वेदांतापेक्षा आणि निवृत्तीमार्गी तत्वज्ञानापेक्षा खूप काही वेगळं तुकोबा सांगू पहात होते, हे जाणवलं. [आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचं कामही तितकंच आव्हानात्मक होतं. अमरापुरकरांनी संहितेला नुसता न्यायच दिला नव्हे तर तीचं सौंदर्य आणि सौष्ठव काही पटींनी वाढवलं, ह्यांत शंकाच नाही. ती संहिता पुस्तकरूपाने मिळवून वाचावी आणिआपल्या संग्रही ठेवावीशी वाटावं हे सादरीकरणाचं यश नव्हे काय?]. मोक्षप्राप्ती हे मानवी जीवनाचं अत्त्युच्च आणि अंतिम ध्येय आहे आणि मोक्षप्राप्तीसाठी 'अहंलोप' अत्यावश्यक आहे असं पारंपारीक तत्वज्ञान सांगतं. परंतु मोक्ष ही संकलपना मुळातच, व्यक्ति-निष्ठ आहे आणि त्यामुळे ती 'स्व-अर्थी' आहे. ज्याने त्याने आपापला मोक्ष साधावा असा त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो. मग 'समष्टी'चे काय? आपण ज्या कुटुंबांत जन्म घेतो आणि काढतो ते कुटुंब तसेच ज्या समाजांत राहून आपण आपापली नेमस्त [तसेच 'स्वीकृत'] कर्तव्यं आणि कर्मे पार पाडतो, त्या समाजाचे काय? ह्या विषयी फारशा विस्ताराने विवेचन होत नाही. जातेगावकरांना तुकोबाचं वेगळेपण जाणवलं [म्हणजे मला तरी तसं वाटलं] ते हेच की तुकोबारायांनी सार्वकालीक समष्टीलाच विठोबा मानलं. 'पुरांत घातल्या उड्या' ह्या प्रकरणातलं विवेचन आणि 'इंटरप्रिटेशन' अपूर्व आहे, थक्क करणारं आहे, परंपरेची झापडं लावून वावरण्यार्या अंधजनांचे डोळे उघडणारं आहे. मला अतिशय आवडलेलं आणि पुनःपुन्हा वाचावसं वाटणारं हे पुस्तक आहे. -बापू करंदीकर. * ललित
|
|
|