|
हरि ओम प्रतिक, खरंच, आपल्याच आत असलेल्या किंवा सानिध्यात येणार्या वाईट गोष्टींच्या रुपातला रावण (निशाचर) आणि मनाला बुध्दीच्या ताब्यात ठेवायचे बळ देऊन मनाचे रुपांतर चित्तात करणारा, आपल्याच आत असलेला आत्माराम यांच्यातील युध्द शेवटी रामच आणि रामच जिंकणार! अजुन वेगळ्या पातळीवर, आपल्याच वाईट कर्मांमुळे निर्माण झालेले खडतर प्रारब्ध, भक्ती आणि सेवेच्या सहाय्याने तोडायला शिकवणारा रामच जिंकणार! प्रश्न आहे तो आपण त्या रघुत्तमाला (जो आपल्याला लघु गुणांकडून गुरूगुणांकडे नेणार्या रघु वाटेवर चालवतो) आपला केंद्रबिंदू करतो का सैरभैर होऊन त्याचे बोट सोडतो त्याचा. मला आशा आहे की ज्याच्या ज्याच्या ह्रदयात कुठल्याना कुठल्या रुपात रामाचे स्मरण आहे त्या प्रत्येकाला हे पटेल. कुठले रुप कोणी स्मरावे हे पुर्णपणे ज्याचा त्याचा प्रश्न आहे व आपण बापुभक्त (कोणी हे बिरूद टिंगल म्हणून आम्हाला वापरले तरी पर्वा नाही) त्या प्रत्येकाचा आदर करतो कारण कुठलेही रुप (साई, स्वामी, गजानन महाराज इ.) हे त्या परमात्मा श्रीरामाचेच रूप आहे म्हणून तिथे भेदभाव करून चिखलफ़ेक केली तर ती आपण कोणावर करतो आहोत हे प्रत्येकाला कळ्ले पाहिजे. जो सद्गुरुतत्व एकच आहे हे जाणतो तो असे करणारच नाही. आपल्या संस्थेत श्री साईंची व श्री स्वामींची उपासना व जप सारख्याच भक्तीभावाने केली जाते. हरि ओम.
|
Manus80
| |
| Tuesday, July 24, 2007 - 3:48 pm: |
| 
|
सच्_बि, लायकी दाखवु नका. आणि हा पब्लिक फ़ोरम आहे. चिमटे काढायची सवय बापुभक्तानाच आहे. पुरावा हवा असेल तर सगले पोस्ट वाचा. अहंकार, ढोंगीपणा सोडा आणि सत्याच्या मागे लागा. तुमचाच माणुस.
|
Anamikaa
| |
| Wednesday, July 25, 2007 - 6:50 am: |
| 
|
अरे वा! हा बिबि पुनर्जिवित झाला तर!!!!!!!!!!! बरेच दिवसानी भेट दिली पण बापुभक्तांमधे सुधारणा नाही ना आचरणात ना भाषेत?शेवटी काय तर "गाढवा पुढे गायली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता" अशी परिस्थिति आहे हेच खरे. तो व्याधीग्रस्त बापुभक्त तसाच होरपळतोय त्याची आता या इहलोकातुन कायमची सुटका होणार असे दिसतेय? अजुन बरेच काही लिहायचे आहे एका व्यक्तीचे अनुभव कथन करायचे आहेत.बघु कसे जमतेय ते? अश्विनि_के तुमच्या बापुंची कर्जतच्या आसपास काही स्थावर मालमत्ता आहे का? जिथे तुम्हा बापुभक्तांना सेवा करुन पुण्य कमवायची संधि मिळते.जरा माहिती पुरवलित तर बरे होइल. अनामिका"
|
Ashwini_k
| |
| Wednesday, July 25, 2007 - 8:53 am: |
| 
|
हरि ओम अनमिका, अग तू सर्व बापूभक्तांना गाढव म्हणालीस का? म्हण हो म्हण. अजूनही काही म्हणायचे तरी म्हण. त्याने तुझ्या मनातला कोणा एका व्यक्तीबद्दलचा (जी योगायोगाने बापूभक्तही असावी) राग शांत होणार असेल तर खुशाल म्हण. तूला त्या व्यक्तीच्या आचरणाचा त्रास होत असेल व ती व्यक्ती न टाळता येण्याजोगी असेल तर प्रयासपूर्वक सामोपचाराने घे व प्रश्न सोडव (मी देखिल एक स्त्री आहे म्हणून हे सांगवेसे वाटले, रागवू नकोस.) पण तुला माहित देखिल नसलेल्या लाखो बापुभक्तांचे आचरण बिघडलेले आहे असे समजून काय साध्य होणार. त्या व्याधिग्रस्त माणसाचे काय मत आहे ? (तो मत व्यक्त करायच्या परिस्थितीत असल्यास). भोग कुणाला चुकले आहेत? आणि तो देव असतो ना (तू मानत असशील तो) तो आपल्या कुकर्मांपेक्षा (गतजन्मींचे वा या जन्मींचे) फ़ारच कमी भोग आपल्या वाट्याला देतो व आपल्या सत्कर्मांच्या कितीतरी पटीने चांगल्या गोष्टी आपल्या पदरात घालतो. तू, मी, आपण सगळेच यातून कधी ना कधी जात असतॉ. पण श्रद्धा व सबुरी ठेवल्यास तोंड द्यायचे बळ मिळते. गीता तू वाचली असशील तर उत्तमच आहे. मी वाचली नाही अजून आणि वाचली तरी त्यातला देव कितपत कळेल कुणास ठाऊक आणि तो देवच (तो श्रीहरी) कळणे महत्वाचे, कारण बाकी महाभारताचा प्रवास सूडाने व द्वेषाने भरलेला आहे. मला जी माहिती विचारलीस ती त्याच व्यक्तीला विचारलीस तर बर. आणि बापूभक्त उन्हातान्हाची पावसाची पर्वा न करता निरपेक्षपणे, पल्स पोलियो, सिद्धीविनायक, आपत्तीचे प्रसंग, गणपती विसर्जन, पुनर्विसर्जन, हॉस्पिटलशाळा स्वच्छता, मतिमंदंच्या केंद्रांमधिल कुठचीही किळस न बाळगता केली जाणारी सेवा इ. अनेक गोष्टी विचारात घेतल्यास तर तुझा सरसकट सर्व बापुभक्तांबद्दल होणारा चडफ़डाट होणार नाही. (कौतुकाची कणभरही अपेक्षा नाही पण रागराग करून त्रास करून घेऊ नकोस). माझ्यावर रागवायचे नाही!! हरि ओम.
|
Pillu
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:54 am: |
| 
|
श्री स्वामी समर्थ अश्विनी तु दिलेली पहिली आरती मला माहीत नाही पण मलाही ती हवी आहे आणी दुसरी आरती ही साईबाबांची नसुन ती स्वामी समर्थांची आही आणी ती कित्येक मठात म्हटली जाते परंतु स्वामी आनी साई हे वेगळे नाहीत श्री स्वामी महाराज हे साईंचे गुरु आणि त्यांच्या समोर त्यांच्या गुरुंना आळवलेले नक्कीच त्यांना आवडते म्हणून कदाचीत ही म्हणत असावेत आणि मला वाटते तु हा प्रश्न चुकीच्या वर विचारलास कारण हा नुसता वादाने ओतप्रोत भरला आहे. आसो तुला जर ही पुर्ण आरती हवी असेल तर मला माझ्या पर्सनल मेल वर तुज़ पत्ता दे मी तुल सर्व माहीती असलेल पुस्तक लगेच पाठ्वतो ज्यात ही आरती आहे.
|
Ashwini_k
| |
| Wednesday, July 25, 2007 - 11:04 am: |
| 
|
हरि ओम धनंजय (पिल्लू), तुमची पोस्ट वाचून बरे वाटले. मला दोन्ही आरत्या असलेले छोट्या आकाराचे पुस्तक मिळते आहे. "अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्था.." ही आरती मी थोड्या दिवसात स्वामींच्या नावाच्या बोर्डवर टाकीन. बरोबर आहे, स्वामी आणि साई दोघे भिन्न नाहीतच. बापूंकडे साईंना सद्गुरूंचे मातेचे वात्सल्य दाखवणारे रुप तर स्वामींना पित्याचे आधार छत्र देणारे, वेळ पडल्यास आपल्याला वठणीवर आणण्यासाठी धाक दाखवणारे रुप मानले जाते. मला सद्गुरुंच्या कुठल्याही रुपाच्या दर्शनाने आता सारखाच आनंद होतो. कारण सद्गुरुतत्व एकच आहे हे मनबुध्दीच्या गाभ्यापासून पटले आहे. सहकार्य देऊ केल्याबद्दल मनापासून आभार. येऊ घातलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना गुरुंची अधिकाधिक क्रुपा प्राप्त होवो ही शुभेच्छा. हरि ओम.
|
Anamikaa
| |
| Wednesday, July 25, 2007 - 3:35 pm: |
| 
|
काय आहे अश्विनि! व्यक्तिच्या भोळेपणाचा फ़ायदा उठवणार्यांची कमतरता नाहि ना या जगात? आणि त्यातुन आपण हिंदु पापभीरु आहोत माझी तरि किमान अशीच धाराणा आहे! गाढवाची उपमा दिलि म्हणुन कुणी गाढव ठरत नाही बरोबर ना? माझे एक निरिक्षण तुम्ही बापुभक्त क्रोधावर नियंत्रण ठेवु शकत नाही. लगेच प्रत्येक गोष्ट मनाला लावुन घ्यायलाच हवी असा नियम नाही. मी तुला पत्ता विचारला कारण बापुभक्तांपैकी तुच एक मला या बिबिवर जरा सुज्ञ आहेस असे जाणवले म्हणुन तुला विचारले. आणि माझे म्हणशील तर बाई ग माझा कुणावरहि राग वगैरे नाही कारण अपेक्षा अश्या व्यक्ती कडुन ठेवाव्यात ज्यांना हृदय आहे हृदयशुन्य माणसाकडुन चांगुलपणाची अपेक्षा व्यर्थ आहे. आणि आपल्या चांगल्या वाईट कर्माची फळे आपल्याला इथेच भोगुन जायची आहेत पण दुर्दैवाने हे समजायला मला कुणा बापुंची मदत घ्यावी लागली नाही आणि कधी घ्यावी लागेल अशी आशा देखिल नाहि. मला त्या व्यक्तिने कर्जतला गेल्यावरचे जे अनुभव मला सांगितले त्यावरुन मला हसावे का रडावे ते कळेना. कारण त्या व्यक्तिला असे सांगण्यात आले की ती जागा बापुंच्या सौभग्यवतींची वडिलोपर्जित मालमत्ता असुन ती त्यांनी बापुंच्या नावे करुन दिलि आहे त्या व्यक्तिच्या बोलण्यावरुन असे समजले की केवळ ती जागा राखण्यासाठी तिथे श्रमदान करुन बापुंची सेवा करण्याचे पुण्य मिळवा या भंपक कल्पनेपोटी बापुभक्तांची फ़सवणुक केली जाते आहे. असो बरेच काही लिहु शकते पण वेळेअभावी शक्य नाही. "अनामिका"
|
पु ल देशपान्डेन्च्या असामी असामी या पुस्तकात बेम्बट्याला त्याचे वडील लहानपणी सान्गतात "बेम्बट्या, जगात दोनच प्रकारचे लोक, गाढवे आणी कुम्भार, राबणारे गाढव व्हायचे की राबवून घेणारा कुम्भार हे ज्याचे त्याने ठरवावे" किन्वा हिन्दि म्हण "दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये" सध्या भारतात आलेले बापु, बुवा, माताजी, श्री श्री, महाराज असले पीक आणे त्यान्च्या चरनाशी सर्वस्व अर्पण करून देशोधडीला लागणारे भक्त हे पाहून मला त्याचीच आठवण होते. माझी पर्सन्यालिटी छान असती आणी मला धीर गम्भीर आवाजाची देणगी असती तर मी ही गुरु झालो असतो आणी खोर्याने पैसा ओढला असता.
|
Anamikaa
| |
| Thursday, July 26, 2007 - 8:09 am: |
| 
|
अहो!कुलकर्णी आहात तसे सुखी आहात कि?कशाला नसती अवदसा आठवतेय तुम्हाला?आधीच या बहुतांश बापुंनी करायचे तेव्हढे नुकसान केलेच आहे समाजाचे अजुन त्यात तुमची भर कशाला? बापु अथवा बुवाबाजीच्या भजनी लागणे मानसिक कमकुवतपणाचे लक्षण नव्हे काय? बरेच बापुभक्त वैयक्तिक आयुष्यात कसे आचरण करतात ते सांगायला नकोच? मी सगळ्यांनाच वाईट ठरवतेय असे नाही पण निदान माझ्या माहितितले तरी असेच आहेत आता सुक्या बरोबर ओले जळतेच त्याप्रमाणे प्रामाणिकपणे बापुभक्ती करणार्यांना देखिल टिकेला तोंड द्यावे लागते त्याला कोण काय करणार? अनामिका
|
हरि ओम अनामिका, गुरुग्रुही (टाईपींग जमत नाहीये) सेवा करणे ही आपली परंपरा आहे हे आपल्याला लहानपणापासुन ऐकलेल्या गोष्टीतून माहितच आहे. श्रीक्रुष्ण व बलराम हे राजघराण्यातील असूनही दरिद्री सुदामांच्या बरोबरीने सांदिपनी मुनींच्या आश्रमात झाडलोट करीत, अरण्यातून सरपण आणित. साई देहात असतानादेखिल त्यांचे भक्त द्वारकामाईची झाडलोट इ. सेवा करीत. साईंनी थोड्या काळाकरता केलेल्या गुरुचीदेखिल सेवा करून उत्तम शिष्य कसा असावा याचा आदर्श ठेवला. आज गुरुच्या घरी कोणी रहात नाही पण गुरुच्या स्थानी सेवेकरी मी नेहमीच पहात आले आहे. स्वामींच्या मठांमध्ये, स्वतःच्या हुद्द्याचा अभिमान बाजूला ठेऊन लोकांना साफ़सफ़ाई करताना मी पाहिले आहे. त्यांच्या चेहर्यावरचे धन्य झाल्याचे भाव मी पाहिले आहेत. (आता स्वामींना न मानणार्यांनी सेवेकर्यांना गाढव कुंभार वगैरे उपमा दिली तर त्याकडे सेवेकर्यांनी दुर्लक्ष करणेच उत्तम). तसेच इतर गुरुंच्या स्थानीही होत असते. बापूंकडे कुठल्याही सेवेसाठी जबरदस्ती केली जात नाही. आपापला संसार व इतर कर्तव्ये नीट पार पाडून भक्ती व सेवा करायची असते. कोणी तसे न करता संसार वार्यावर सोडला तर तो त्याचा मुर्खपणा व पाप. बापुंची स्वतःची काहीच सेवा करावी लागत नाही. (खरंतर तेच आमच्या पाठीशी उभे असतात हे मी स्वतः फ़ील केले आहे. क्रुपया पुरावा मागू नये. ) तु उल्लेख केलेल्या व्यक्तीला कुठ्ल्या सेवेला गेल्याचा पश्चात्ताप होत असेल तर तिने जाऊ नये कारण सेवा व भक्ती प्रेमापोटीच असायला हवी. गुरुंच्या रुणांतून उतराई आपण होऊच शकत नसतो हे तुला पुर्वीपासून माहीतच असेल. hari om.
|
हरि ओम कुलकर्णी, माझी पर्सन्यालिटी छान असती आणी मला धीर गम्भीर आवाजाची देणगी असती तर मी ही गुरु झालो असतो आणी खोर्याने पैसा ओढला असता. - नको नको. त्यापेक्षा तुम्ही "कौन बनेगा करोडपती" च्या पुढच्या भागात अमिताभ किंवा शाहरुख च्या ऐवजी जा! तिथे खोर्याने पैसेही मिळतील व तुमच्या भक्तांपैकी कोणी तुमच्या नावाचा बोर्ड चालू केला तर उगाच नविन वाद होणे टळेल (तुमची शिकवण चांगली असली तरी टीकाच होईल कारण वाईट प्रचार खोटा असला तरी पटकन खरा मानला जातो). दिवा घ्या (मजा केली, रागावू नका!) - मायबोलीवर माझ्या वाक्प्रचार ज्ञानात पडलेली भर. हरि ओम.
|
Tiu
| |
| Friday, July 27, 2007 - 6:46 pm: |
| 
|
काही नाही हो...दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये...एकदा डोळ्यावर आणी बुद्धीवर झापडं लावली की खरं खोटं, चुक बरोबर काही समजत नाही...माणूस सारासार विचार करुच शकत नाही मग अश्या वेळी... थोडा विचार केला तरी कळेल की हे सगळे बुवा, बाबा, बापु लोक श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फ़सवणूक करुन स्वत:च्या तुमड्या भरायचा धन्दा करतायेत...त्यात सुद्धा हे अनिरुद्ध बापु सारखे लोक जास्त dangerous . इतके शिकलेले असल्यामुळे लोकांचा लवकर विश्वास बसतो...एवढा MD झालेला माणूस सगळं सोडून असं काही करतोय म्हणजे नक्कीच त्यात काहीतरी तथ्य असणार. मला तरी ह्यात काही लॉजीक दिसत नाही! जाउदे...जोपर्यंत आपले पंतप्रधान आणी राष्ट्रपती सत्यसाईबाबा सारख्या भोंदु लोकांच्या पायावर डोकं ठेवतात तोपर्यंत असे बुवा बाबांचे पीक येतच राहणार! सगळा आनंदी आनंद आहे...
|
स्वामींच्या मठांमध्ये, स्वतःच्या हुद्द्याचा अभिमान बाजूला ठेऊन लोकांना साफ़सफ़ाई करताना मी पाहिले आहे. त्यांच्या चेहर्यावरचे धन्य झाल्याचे भाव मी पाहिले आहेत. असे भोळे भाबडे भक्त मी इतरही अनेक बुवान्कडे पाहिले आहेत. बापूंकडे कुठल्याही सेवेसाठी जबरदस्ती केली जात नाही त्याची गरजच नाही. ब्रेन वॉशिन्ग इतके परफेक्ट असते.
|
Sach_b
| |
| Saturday, July 28, 2007 - 11:08 am: |
| 
|
सच्_बि, लायकी दाखवु नका. आणि हा पब्लिक फ़ोरम आहे. चिमटे काढायची सवय बापुभक्तानाच आहे. पुरावा हवा असेल तर सगले पोस्ट वाचा. अहंकार, ढोंगीपणा सोडा आणि सत्याच्या मागे लागा. >>>>>>>>> तुम्ही भांडताय की समजवताय?? आणि एवढी आदळ-आपट करण्याएवढ झालंय तरी काय?? अहंकार सोडा, सत्याच्या मागे लागा हे सगळ प्रत्येक खरा गुरु आपल्या शिष्याला सांगतच असतो.. ढोंगीपणा हा मात्र संशोधनाचा विषय आहे.. तुमची मतं तुम्ही जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न करत आहात असं तुम्हाला वाटत नाही का?? उत्तराची अपेक्षा मुळीच नाही.
|
Sach_b
| |
| Saturday, July 28, 2007 - 11:26 am: |
| 
|
स्वामींच्या मठांमध्ये, स्वतःच्या हुद्द्याचा अभिमान बाजूला ठेऊन लोकांना साफ़सफ़ाई करताना मी पाहिले आहे. त्यांच्या चेहर्यावरचे धन्य झाल्याचे भाव मी पाहिले आहेत. असे भोळे भाबडे भक्त मी इतरही अनेक बुवान्कडे पाहिले आहेत. बापूंकडे कुठल्याही सेवेसाठी जबरदस्ती केली जात नाही त्याची गरजच नाही. ब्रेन वॉशिन्ग इतके परफेक्ट असते >>>>>>>>>>>> त्याने तुमचं काही नुकसान झालं का??? की समाजाचं काही नुकसान झालं??
|
Anamikaa
| |
| Monday, July 30, 2007 - 6:09 pm: |
| 
|
अश्विनि जाऊ दे! मला माहित आहे काहि उपयोग नाही कारण झोपलेल्याला जागे करणे सोपे असते पण डोळ्याला झापडे लावुन आणि झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे महाकठिण" काम आहे. मुळ मुद्द्याला बगल देवुन मुद्दा कुठेतरि भरकटत नेण्याचे कसब बापुभक्तांच्या अंगी नक्कीच आहे. निस्वार्थिसेवा करणे आणि सेवेच्या नावाखाली राबवुन घेणे यातला फ़रक जर तुम्हांला कळत नसेल तर पुढे बोलणेच खुंटले! तुम्हाला पुण्य मिळेल या सबबि वरती जर तुम्हाला कुणी गुलामासारखे राबवत असेल आणि जर ते तुमच्या कुणाच्या ध्यानात येत नसेल तर कुणि काहिच करु शकत नाही. असो याच बिबि वर काही पुर्वाश्रमीच्या बापुभक्तांनी त्यांना आलेले विपरित अनुभव कथन केले आहेतच पण तुम्ही त्याकडे देखिल जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असालच. कारण सारासार विचारबुद्धी जागृत न ठेवता आचरण करताय तुम्ही त्याला आम्ही बापडे काय करु शकणार आहोत? त्या पिडित बापुभक्ताबद्दल म्हणशील तर आपल्या या जन्मीच्याच कर्माची फळे ती भोगत आहे मातृ देवो भव पितृ देवो भव! हे लक्षात न ठेवता आयुष्यात आचरण करणार्यांना आपल्या कर्माची फळे भोगाविच लागतात. जेंव्हा एखादी व्यक्ती आपल्या जन्मदात्यांनाच व्यथित करते त्या व्यक्तिच कधी भल होत नाहि हेच खर! अनामिका" }
|
Manus80
| |
| Monday, July 30, 2007 - 7:32 pm: |
| 
|
सच्_बि, अहो तमोगुण जरा आवरात घ्या. जोशी बोलले कि चालते तुम्हाला जिथे तुम्हि काहिही करता आणि मी एक माणुस बोलला कि लगेच राग येतो. बघा जरा आत्मपरिक्षण करुन.
|
हरि ओम अनामिका, जेंव्हा एखादी व्यक्ती आपल्या जन्मदात्यांनाच व्यथित करते त्या व्यक्तिच कधी भल होत नाहि हेच खर! - अगदी खरं! असो याच बिबि वर काही पुर्वाश्रमीच्या बापुभक्तांनी त्यांना आलेले विपरित अनुभव कथन केले आहेतच पण तुम्ही त्याकडे देखिल जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असालच. - मी कुलकर्णीदादांना उद्देशून म्हतलेच आहे की चुकीचा प्रचार पटकन खरा मानला जातो. जीव तोडून स्वतः अनुभवलेले सांगायला गेले तर मूर्ख ठरवले जाते. मग दुर्लक्ष केलेलेच बरे नाही का? हरि ओम.
|
Bapucha
| |
| Tuesday, July 31, 2007 - 10:19 am: |
| 
|
Shravani Devdhar,one of BAPU bhakta @ her experience in maharashtra times. This is just a experience so no need to criticise,insted think why its happening. And yes,this is happening to everybody who is 'CHARANASHRIT',at lotus feet of BAPU. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन - श्रावणी देवधर [ Thursday, March 27, 2003 10:03:31 pm] हानपणापासून मी तशी धार्मिक वातावरणातच वाढले. माझी आई कोकणस्थ ब्राह्माण आणि वडील बंगाली. दोघंही डॉक्टर. त्यामुळे दोन्ही संस्कृतींचा संगम आमच्या घरी झालेला होता. म्हणजे जितक्या मोठ्या प्रमाणात आमच्याकडे गणेश चतुथीर् साजरी व्हायची तितक्याच मोठ्या प्रमाणावर दुर्गापूजाही साजरी व्हायची. त्यामुळे बंगाली आणि मराठी दोन्ही प्रकारचं वातावरण आमच्या घरी होतं. माझ्या वडिलांची आई- आमची आजी पुढारलेल्या मतांची होती. तिने त्याही काळात माझ्या आईला जो पाठिंबा दिलाय तो कौतुकास्पद होता. ती नेहमी गुरूंबद्दल आम्हाला सांगायची. रामकृष्ण परमहंस , विवेकानंद यांच्या गोष्टी सांगायची. त्यामुळे गुरूचं महत्त्व किती आहे , हे तिच्या गोष्टीतून आमच्या मनात रूजत गेलं. त्यातूनच कदाचित पुढे साईबाबांविषयी माझ्या मनात श्रद्धा , भक्ती उत्पन्न झाली. एक खंत मात्र राहून गेली. आपण जन्मलो तेव्हा साईबाबा काही हयात नव्हते. पण आपली श्रद्ध खरी असली की काहीतरी पर्याय निघतात. त्याप्रमाणे साईबाबा सिरिअल करण्यासाठी चॅनलकडून मला विचारण्यात आलं. मला ती सिरिअल करता आली. साईबाबा ही एकच सिरिअल मी केली. किंबहुना ती बाबांनीच माझ्याकडून करवून घेतली. ती सिरिअल करत असतानाच चंदशेखर गोखले यांनी अनिरुद्ध बापूंविषयी मला सांगितलं. ते म्हणाले , एकदा त्यांच्या प्रवचनाला ये. या अशा प्रकारात बहुतेक वेळा लोक शॉर्टकट शोधत असतात. त्यामुळे खरंतर जायची इच्छा नव्हती. पण जाऊन तर बघू या असं म्हणून त्यांच्या प्रवचनाला गेले. तिथे मी जे अनुभवलंय ते कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे. तिथे भक्तीची खरी ताकद अनुभवली म्हणा ना! अनिरुद्ध बापू हे स्वत: डॉक्टर असल्यामुळे त्यांनी जे विचार मांडले ते विज्ञानाला आणि वास्तवालाही धरून होते. म्हणूनच ते पटत गेले. त्यांच्या बोलण्यातून , बघण्यातून आणि विचारातूनही सद्गुरू सापडतो. आज अनेक डॉक्टरर्स जे त्यांच्याबरोबर शिकून पुढे आले. तेही त्यांना सद्गुरूचं स्थान देतात किंवा त्यांच्या प्रवचनाला येणारी माणसं अगदी बुद्धिजिवी गटातील असतात. तेव्हा त्यांच्या विचारांची खरी ताकद कळलेली आहे , हे पटतं. प्रत्येक माणसासमोर संकटाचा काळ हा असतोच. तशा माझ्याही काही समस्या होत्या. त्याचा परिणाम माझ्यावर , माझ्या कुटुंबावर आणि माझ्या कामावरही होत होता. त्या दिवसांत मी बापूंना भेटले. वीस मिनिटंच भेटले पण माझ्या आयुष्यातली भीती , असुरक्षितता दूर झाली. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी जायला लागले. हळूहळू काही प्रमाणात समस्यांचंही निराकरण होऊ लागलं. कधी कधी काय होतं , आपल्या आयुष्यात यश-अपयश पचवायची ताक किंवा आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन त्यांच्या प्रवचनाने नक्कीच बदलत गेला. कोणत्याही बाबतीत समतोल विचार करण्याची शक्ती आली. कारण ते जे काही सांगतात , त्याला एक सैद्धांतिक आधार असतो. ते म्हणतात , ' देवाला किलो किलो मिठाई आपण नेतो , ते आपल्या अहंसाठीच , देव काही मागत नाही. उलट अशा वेळी आजूबाजूच्या कित्येकांना दोन वेळचं अन्नही मिळत नाही हे आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण तीर्थयात्रेला जातो , तेव्हा देवाचं दर्शन कधी होईल यापेक्षा आपण कसं जायचं , कुठे जायचं , गाडी कुठली असेल , गाडीत एसी आहे की नाही याचा विचारच आपण जास्त करतो. ' बापू सांगतात , तसा मानवी समाजाचा विचार त्यांच्या प्रवचनांमुळे मी करू शकले आणि म्हणूनच माझा जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला. शब्दांकन : उत्तर मोने
|
kaal paasun hi sarva charchaa vaachun kaadhali aaNI khup vaaIt vaatale. swataalaa baapu bhakta mhanavun ghenaaryaa lokaanaa baapunaa aapan dev kaa manato kiwaa baapunbaddal vyavasthit maahiti detaa yeu naye? aapan amuk eka vyaktilaa kiva goshti laa maanato, vishwaas thevato he saangataa aalech paahije. ithe baapunvishayi prashnaanchi yogya aani samadhaan kaarak uttare deun baapu virodhi lokaanche dnyaan vadhavaayala have hote. jyaanaa aapalyaa bhakti sthaana vishayi vishwaasaane, shraddhene aani chatithok pane saangata yet nahi ase lok he nivval swarthi aani khote bhakt astat ase mala vatate.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|