Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 21, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through July 21, 2007 « Previous Next »

Ksha
Wednesday, May 16, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी खी
गमतीशीर चर्चा आहे :-)


Disha013
Wednesday, May 16, 2007 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही चर्चा ' general timepass मधे हलविली तर?मला तरी तीच योग्य जागा वाटते.

Ajjuka
Thursday, May 17, 2007 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंय.. आता GTP मधेच हलवायच्या लायकीची झालीये चर्चा...

Deepad
Thursday, May 17, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धड इंग्रजी नाही आणी मराठीही नाही. आणि जी काय आहे ती वेडी चर्चा जी टी पी मध्येच बरी आहे.

Mahesh
Thursday, May 17, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विश्वासू आपले चर्चेत स्वागत असो.
तुम्ही माझ्याबद्दल जे काही लिहिले आहे त्याचा राग नाही,
कारण मला माझा खरेपणा माहिती आहे.
MSN वरील संबंधित व्यक्तीला मी सविस्तर मेल पाठविली आहे.
पुर्ण माहिती करून घेतल्याशिवाय आगपाखड करू नका ही विनंती.


Sach_b
Friday, May 18, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व बापूभक्तांना एक नम्र सूचना इथे बापूविरोधक केवळ विरोध करायचा म्हणून करत आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न मी पूर्वी केला आहे. श्रध्दावानांना श्रध्दाहीनतेकडे नेऊ पहाणा-या या मंडळींना entertain करू नका. मी खाली दिलेल्या सर्व लिंक्स पहा मग तुम्हाला ते कळेल. gaurivichare , I think you also have given enough information to these people. Now i will like to suggest you not argue with this people.

/hitguj/messages/103384/125010.html?1177135101
/hitguj/messages/103384/125023.html?1177209554
/hitguj/messages/103384/125058.html?1177314243
/hitguj/messages/103384/125069.html?1177352286
/hitguj/messages/103384/125118.html?1177416021
/hitguj/messages/103384/125220.html?1177662082
/hitguj/messages/103384/125221.html?1177673557
/hitguj/messages/103384/125258.html?1177751686


Bapuskid
Friday, May 18, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dear Bapu bhakta,


HARI OM

Dear Sach_b,

Really thanks to you,

I myself fully agree with your decision.

And one more thing no bapu bhakta will entertain all such types of discussions, even they should not log in to any other group for Bapu's discussions.

As we all are well aware, bapu has made us everything ready, if someone wants information about Anirudha Trust/Upasana Centres or any other useful information, they may either visit Pravachan place or visit Happy Home or contact PRATYAKSHA OFFICE.


We all know our bapu's suffering, there should not be misunderstanding between bapu bhakta, because in this KALYUG we don't know what will happen, we have to walk in Bapu's path which is directed by our dearest bapu..........

Each any every bhakta promise that they will not entertain any other groups, except Bapu's original sight.


I think one year back we all use to enjoy Yahoo Group which was really ideal sight, where we use to share our Anubhav and lots of other information through happy home itself.


So please do not login to other groups just for timepass, we need not give any bifercations to others, which is not necessary at all.

We get all information from our trust, whenever we are in need. Our volunteers are very sweet, they always guide us in proper manner then why we need such type of e-groups


Please forgive me, if i mentioned any thing wrong.


HARI OM

Yogita_dear
Friday, May 18, 2007 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे!!! इतकी चर्चा झाली तरी बापुभक्ताना मराठीत लिहीता येत नाहिय..इथे कोणाला बापुंच्या आई वडिलांबद्दल काही माहिति आहे का???ए भा प्र...

Nandini2911
Friday, May 18, 2007 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर खूपच भा प्र पडले आहेत.
साच बी, आधी स्वत्:ला तटस्थ म्हणवून घेतात, आणि आता बापुभक्त बनतात.???

बापुजकीड, मायबोलीवर या असं आवताण कुणी दिलं होतं तुम्हाला? MSN वर जाहीर आवाहन आम्ही केलं का? या इथे आणि माँडा आपापली मते. मते मांडली असती तर काही हरकत नव्हती. पण अर्वाच्य शिवीगाळ कुणी केली?
ते जाउ दे, मीही तो विषय सोडून दिलाय. :-)

बापुजकीड.
except Bapu's original sight. अहो काय हे? इंग्रजी तरी नीट लिहा ना.. त्याला bapu's official site म्हणतात.

We all know our bapu's suffering, there should not be misunderstanding between bapu bhakta, because in this KALYUG we don't know what will happen, we have to walk in Bapu's path which is directed by our dearest bapu..........
बाउन्सर्स.... मी क्लीन बोल्ड. बापूनी काय सफ़र केले??
आणि सत्ययुगात आणि द्वापारयुगात लोकाना आधी काय होणार हे माहित असायचं?? परत एकच प्रश्न....
बापुनी नक्की काय रस्ता दाखवला आहे? अर्थात त्याची शिकवण काय आहे?

उत्तराच्या प्रतिक्षेत नसलेली.
नंदिनी.



Bhramar_vihar
Friday, May 18, 2007 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bapuskid उर्फ aai628 ,

मायबोलीवर चर्चा सुरु झाली तेव्हा तुमच्या msn group वर जाउन कोणि हाकारे घातले की धावा, धावा मायबोलीकरांना उत्तरे देण्यासाठी या म्हणुन? आणि निरुत्तर झाल्यावर आता पळ काढताय की open forum मधे discuss करु नका म्हणुन??

कलीयुगात काय होईल ते होईल पण बापुंची भक्ती केलेले तरतील आणि बाकी बुडतील ही आध्यात्मिक (???) दहशतच झाली की!!


Dhumketu
Friday, May 18, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईकडे ह्या पोस्टांनी ईतकी जागा अडऊन ठेवली आहे की त्यात मॉड नी कधीतरी ऊडवलेले (वा उडवण्याच्या बेतात असलेले) बी.बी सहज राहतील... ह्या ना त्या कारणाने बी.बी ला टाळे ठोकणारे कुठे गेले? ह्या चर्चेतून निष्पन काहीच होत नाहीये.. बापू समर्थक आणी विरोधक ह्याचे "नळी फ़ुंकली सोनारे ईकडून तिकडून गेले वारे" असे झाले आहे. (नाहीतरी बाकींच्या v&c वरती तरी काय होते म्हणा.)

हे म्हणजे अगदीच नरसिंहरावां टाईप झाले.. ते आपले काहीच बोलायचे नाहीत.. काळ हेच उत्तर असे त्यांचे असायचे.. बहूतेक मॉड ला असेच वाटत असावे की हा बी.बी आपोआप मृतवत होईल पण त्याचेही काही लक्षण नाही. हे म्हणजे "तुका म्हणे ऊगी राहवे जे जे होईल ते ते पहावे" असे झाले.

ह्या पेक्षा पी.जे चा बी.बी साठवा.. त्यात करमणूक तरी आहे.. (आताशा ह्या बी.बी. मध्येही करमणूक तशी कमीच राहीली आहे :-) ).

मला आताशी "नको देवराया ऍडीमन अंत असा पाहू" हे का आठवावे काही कळत नाही. (कोणाला सुचते आहे रे विंडबन ह्यातून?, उगीचच काही बाही सुचते ह्यांनापण)...

जाऊदे.. काय हो... मायबोली वर सर्वात लांब चाललेली चर्चा ही का दुसरी कुठली?


Sach_b
Saturday, May 19, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bapuskid उर्फ aai628 ,

मायबोलीवर चर्चा सुरु झाली तेव्हा तुमच्या msn group वर जाउन कोणि हाकारे घातले की धावा, धावा मायबोलीकरांना उत्तरे देण्यासाठी या म्हणुन? आणि निरुत्तर झाल्यावर आता पळ काढताय की open forum मधे discuss करु नका म्हणुन??

कलीयुगात काय होईल ते होईल पण बापुंची भक्ती केलेले तरतील आणि बाकी बुडतील ही आध्यात्मिक (???) दहशतच झाली की!!

तुम्ही फक्त गोंधळलेल्या अवस्थेत आहात..विरोध कुठून आणि का करायचा हेच तुम्हाला कळत नाही आहे..कोण काय म्हणत यापेक्षा तुम्ही बापू काय म्हणतात यावर जास्त भर द्या..

Sach_b
Saturday, May 19, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाउन्सर्स.... मी क्लीन बोल्ड. बापूनी काय सफ़र केले??
आणि सत्ययुगात आणि द्वापारयुगात लोकाना आधी काय होणार हे माहित असायचं?? परत एकच प्रश्न....
बापुनी नक्की काय रस्ता दाखवला आहे? अर्थात त्याची शिकवण काय आहे?

उत्तराच्या प्रतिक्षेत नसलेली.
नंदिनी.

thanks a lot उत्तर देण्याची आवश्यकता न वाटणारा,
सच्_बी


Mahesh
Saturday, May 19, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जोशीभक्तांना असे वाटत असणार की , सगळे चांगले असूनही लोक विरोध का करत आहेत. तर त्यावर मला जे वाटले ते लिहीत आहे.

आत्तापर्यंतच्या चर्चेतून , वाचलेल्या लेखांमधून , ई. गोष्टीतून जे वाटते ते लिहीत आहे.
सगळे पुर्वग्रह बाजूला ठेवून विचार करून पहा. कदाचित मी लिहीलेले बरोबर नाही असे वाटले तर माफ करा.

भारतीय माणसाचा आध्यात्मिकतेकडे स्वाभाविक ओढा आहे. त्यामुळे त्यासंदर्भातल्या कोणत्याही गोष्टीकडे लोक चटकन आकर्षिले जातात. त्यातही आपल्याकडॆ भोगापेक्षा त्यागाला जास्त महत्व दिले गेलेले आहे. ज्याचा त्याग जेवढा जास्त तेवढा तो पूजनीय. उदा. राम, पांडव, बुद्ध, ई.
तसेच पूजनीय व्यक्तीची घराणेशाही / वंशवेल तरी जबरदस्त असते (अगदी नेहरू घराण्यापर्यंत) किंवा तसे नसेल तर त्या व्यक्तीचे द्न्यान / कर्तुत्व तरी जबरदस्त अतुलनीय असते.

कदाचित जोशींच्या घराण्याची खूप प्रसिद्धी नसावी, तसेच त्यांचे द्न्यान / कर्तुत्व सर्व लोकांना अतुलनीय वाटत नसावे. आणी ते संसारी असल्यामुळे त्यागाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे खुप लोकांना ते सतगुरु, पूजनीय, अवतार, ई. न वाटता सर्वसामान्य वाटत असावेत. अवतार तर सांगावाच लागत नसावा, त्याची दिव्यता न सांगताच कळत असावी असेही लोकांना वाटत असणार.

जो नम्रपणे श्रेय स्वत:कडे घेणार नाही त्याला नक्कीच खूप मानले जाते. आपली आपण जाहिरात केली की फार मान मिळत नाही. हे खुप आधीपासून आहे अगदी द्न्यानेश्वर, तुकाराम, ई. लोकांनी देखील स्वत:कडे धाकुटेपणा घेतलेला आहे.

जोशी स्वत: कडे नम्रपणा घेत आहेत म्हणून त्यांना मानणारे खूप आहेत पण त्यांना मानणारे त्यांची जी अतोनात स्तुती करीत असतात त्यामुळे कदाचित मोठ्या प्रमाणावर विरोधकही तयार होत असावेत.

परमार्थ आणी संसार यांचे नाते तर अगदी विळ्याभॊपळ्यासारखे आहे. तसे उत्तम संसार करूनही संत असलेले बरेचजण होते. एकनाथ, सावतामाळी, ई. पण त्यामुळे त्यांची जनमानसातील प्रसिद्धी ही काकणभर कमीच वाटते. शक्यतॊ आध्यात्म आणी अर्थार्जन हे पूर्णत: वेगळे विषय़ मानले गेले आहेत.

आता या पार्श्वभूमीवर, जोशींनी जे काही कार्य केले आहे ते सर्वांच्या पचनी पडणे कठीण दिसते. कारण त्यांचे समाजकार्य त्यांनी फार सावधानतेने संसार आणी परमार्थ याच्या सीमेवर आणून ठेवलेले दिसते. त्यांचा समाजमनाचा अभ्यास, निरीक्षण फार सखोल असणार. त्यांनी आजपर्यंत असलेल्या आध्यात्मिक व्यक्ती, संस्था, ई. चा पण खूप विचारपूर्वक अभ्यास केला असावा असे वाटते.
बर्याच ठिकाणी असलेल्या चांगल्या गोष्टी, विचार, उपक्रम, उद्योग, ई. चा मोठा मिलाफ केलेला दिसतो. प्रवचन, परीक्षा, उपक्रम स्वाध्यायसारखे / दासबोध अभ्यासवर्गासारखे वाटतात. रामनाम जप लिहीणे समर्थसेवा कॆंद्रासारखे वाटते. अनेक उद्योगांचे जाळे सत्यसाईबाबा सारखे वाटते. असा मिलाफ करणे वाईट नक्कीच नाही फक्त त्याचे श्रेय त्या त्या मूळ सुरू करणार्यांना दिले गेले तर त्यांनाही बरे वाटेल. अर्थात त्यांची अपेक्षा असेल असे नाही. या सर्व गोष्टी, उपक्रम, उद्योग यामधे कोणाचेही अहित होणार नाही, कोणतेही बेकायदेशीर कृत्य नसेल, झाले तर समाजाचे चांगलेच हॊईल याची काळजी घेतली गेलेली दिसते. पण कितीही झाले तरी हे सर्व अध्यात्म चांगलेच उद्योगी वाटते, दिसते. आणी त्यामुळेच खुप लोकांना असे वाटत असणार की अध्यात्मात उद्योग, पैसा, ई. कशाला आणायला हवा ?
गुजराथी, पंजाबी, सिंधी लोक हे उद्योगात अग्रेसर असून समाजाकरीता खुप मदत करत असतात, पण त्यातल्या कोणी स्वत:ला कृष्णाचा, नानकांचा, झूलेलालचा अवतार म्हणल्याचे, म्हणवून घेतल्याचे ऐकिवात नाही. मागे आज्जुकाने म्हणले त्याप्रमाणे उद्योग करता तर उद्योग करता म्हणा त्याला आध्यात्माचा मुलामा कशाला ? विरोध करणार्या खुप जणांना असेच वाटत असणार.

पु.लं.च्या तुझे आहे तुजपाशी मधे जे आचार्य आहेत त्यांचे शेवटचे संवाद वाचले तर येथेही तसेच झाले आहे की काय असे वाटते.
ते म्हणतात की मला कळालेच नाही की मी आचार्य कधी झालो. लोकांनी मला यातून बाहेर येऊच दिले नाही.

अर्थात हे सगळे केवळ अंदाज आहेत, खरे काय ते हरी जाणे.

असो शेवटी कोणी कोणाला जबरदस्तीने बदलवू शकत नाही, प्रेम लावू शकत नाही.
प्रेम कोणी करेना का अशी फिर्याद खोटी
प्रेम लाभे प्रेमळाला त्याग ही त्याची कसोटी

माझ्याकडून या बोर्डवरचे बहुतेक हे शेवटचे लिखाण. धन्यवाद.


Sach_b
Wednesday, May 30, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याचा त्याग जेवढा जास्त तेवढा तो पूजनीय. उदा. राम, पांडव, बुद्ध, ई.
कदाचित जोशींच्या घराण्याची खूप प्रसिद्धी नसावी, तसेच त्यांचे द्न्यान / कर्तुत्व सर्व लोकांना अतुलनीय वाटत नसावे.
असेही लोकांना वाटत असणार.
मोठ्या प्रमाणावर विरोधकही तयार होत असावेत.
त्यांचा समाजमनाचा अभ्यास, निरीक्षण फार सखोल असणार.
गुजराथी, पंजाबी, सिंधी लोक हे उद्योगात अग्रेसर असून समाजाकरीता खुप मदत करत असतात, पण त्यातल्या कोणी स्वत:ला कृष्णाचा, नानकांचा, झूलेलालचा अवतार म्हणल्याचे, म्हणवून घेतल्याचे ऐकिवात नाही.

एकनाथ, सावतामाळी, ई. पण त्यामुळे त्यांची जनमानसातील प्रसिद्धी ही काकणभर कमीच वाटते



वरील लिखाणात जर-तर चा वापर जास्त झालेला दिसतो.. तर्क फार मोठ्या प्रमाणत केलेले दिसतात... महेश यांनी आपली मतं ठामपणे मांडली असती तर ही पोस्ट खरच अर्थपूर्ण झाली असती..

Nandini2911
Wednesday, May 30, 2007 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही अर्थपूर्ण पोस्ट लिहीता ना.. (असं तुम्हीच म्हटले आहे.) मग लिहा ली ही पोस्ट अर्थपूर्ण बनवून.

Ashwini_k
Friday, June 22, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम,

आपल्या संस्थेच्या भक्तीच्या कार्यक्रमात घेतल्या जाणार्या खालील आरत्या कोणी देऊ शकल्यास मला पूर्ण हव्या आहेत्:-

१) "अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था
जय जय गुरुअवतारा पदी ठेवी माथा"
ही श्री स्वामी समर्थान्ची आरती.

२) "पंचप्राण हे....
सगुण रुपाने येऊन साई स्विकारा आरती"
ही श्री साईनाथान्ची आरती.

हरि ओम.



Kpratiks
Thursday, July 12, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम
मित्रानो,
सूर्याची ओळ्ख करून द्यावी लागत नहि. आणि कोणी काही म्हटले तरी सूर्य कधी स्वत:चा गुणधर्म सोडत नाही. आमचे बापु, आनिरुद्ध राम आहेत, साई आहेत, आमचे सर्वस्व आहेत. त्यासाठी कोणाच्या शिफ़ारस पत्राची आवश्यकता नाही. ते आमचे बाबा आहेत. आणि फ़क्त एकच सत्य आहे ते म्हणजे फ़क्त रामाचच विजय होतो. कोणाची इcछ असो व नसो.
रामो राजमणि: सदा विजयते
रामम रमेशम भजे|
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम्: ||


Manus80
Friday, July 20, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुर्याचे कोणी भांडवलही नाही करत. आणी कसल्या विजयाची गोष्ट करत आहात आपण.

ढोंगीपणा सोडा आतातरी.

- माणुस.


Sach_b
Saturday, July 21, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुर्याचे कोणी भांडवलही नाही करत

इथे भांडवल करतय कोण तुम्हीच तर येऊन जाऊन चिमटे काढताय... राहीला प्रश्न विजयाचा i think ,that is none of your business..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators