|
प्रशान्त, साद देती हिमशिखरे खरच छान पुस्तक आहे. महेश, माऊडी, तुम्हाला हे पुस्तक आप्पा बळवन्त ला पण मिळेल. दगडुशेठ च्या समोर च एक पुस्तक दुकान अहे तिथे नक्की मिळेल. आणि हो, याचाच दुसरा भाग पण आहे. माझ्या अजुन वाचण्यात नाही आला दुसरा भाग पण चान्गला आहे असे ऐकले आहे.
|
ह्याच पुस्तकाचा दूसरा भाग नाही,परंतू कै.जी.के.प्रधानांनीच लिहलेल दुसर पुस्तकही आहे. हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर(१९६३),तब्बल २० वर्षांनी प्रसिद्ध झाले.मूळ एंग्रजी Know Thy-self . ह्यात ज्ञान मार्गाबद्द्ल वाचनीय लिहल आहे. मराठी अनुवाद आहे,' अंतरीचा मागोवा'. (प्रधानांनी ही दोनच पुस्तक लिहली) ह्या पुस्तकातील बहुतेक भाग अज्ञात अशा अंत:प्रेरणेतून लिहला गेला आहे. ह्या विषयी एक घटना घडली होती. हा अनुवाद केलाय श्री म. ना. झोळ यांनी.सुरुवातीला, ह्यांनी अनुवाद करायला नकार दिला होता.परंतु त्यानंतर काही दिवसांनी, त्यांचे गुरू पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या आज्ञेवरून त्यांनी अनुवाद केला. यावरुनच जी.के.प्रधानांच्या अध्यात्मिक पायरीची कल्पना येते. "आपल्यातले पुर्णत्व शोधण्यासाठी आपण स्वत:ला रिते केले पाहिजे.आपण कुठे काही घालवलेच नव्हते,हेच आपल्याला शोधुन काढायचे आहे." हेच ह्या पुस्तकाचे सांगणे आहे. ह्या पुस्तकातील एक उतारा- "मी हा 'असा' आहे,मला 'तसे' व्हायचे आहे... हा संघर्ष मानसिक थरावर प्रत्येक व्यक्त्तीत सतत चालू आहे. या जगात जिथे प्रत्येक जण काही तरी होण्यासाठी धडपडत आहे,तिथे मनुष्यनिर्मित जे कोणी तुम्ही असाल, ते समाधानाने राहू शकाल काय? मी म्हणतो म्हणून नव्हे, तर तुम्ही स्वत: हे सत्य अनुभवून पाहा. सत्याचा शोध व परमात्म्याचा बोध हवा असेल तर तुमचे मन निरागस, शुध्द, मुक्त होणे प्रथम अगत्याचे आहे. नंतर त्या परिपुर्ण, रिक्त, अलिप्त,एकाकि अवस्थेतून केवळ एकमेव, अद्वैत अवस्था येते. त्या मूळे तुमचे मन अत्यंत ताजेतवान,निरागस बनते. असेच मन चिरंतन आनंदात डुंबत राहते...."
|
जय देव जय देव जय जय अवधूता, अगम्य लीला स्वामी,त्रिभुवनी तूझी सत्ता/
|
हो एकदम बरोबर आहे प्रशान्त, मला वाटत होते की तो दुसरा भाग आहे की काय... पण अजुन ते दुसरे पुस्तक वाचायचा योग आला नाही आहे लवकरात लवकर पुस्तक घेऊन वाचेन ते
|
Pillu
| |
| Friday, October 20, 2006 - 7:40 am: |
|
|
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रथम सर्व स्वामी भक्तांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी खरच आजच या साईट वर आलोय वा खुपच छान आता माझे अनुभव पण सांगेन ईथे हाक मारा समर्थांनां जैसा बोलवी मातेसी तान्हा पाजतिल मग प्रेमे पान्हा समर्थ माझी माउली समर्थांनी या लेकरा कडून लिहुन घेतलेल्या त्यांच्या पोथीतील ही ओवी आहे. पुन्हा भेटूच
|
Pillu
| |
| Friday, October 20, 2006 - 7:48 am: |
|
|
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रथम सर्व स्वामी भक्तांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी खरच आजच या साईट वर आलोय वा खुपच छान आता माझे अनुभव पण सांगेन ईथे हाक मारा समर्थांनां जैसा बोलवी मातेसी तान्हा पाजतिल मग प्रेमे पान्हा समर्थ माझी माउली समर्थांनी या लेकरा कडून लिहुन घेतलेल्या त्यांच्या पोथीतील ही ओवी आहे. पुन्हा भेटूच
|
Kalika
| |
| Wednesday, October 25, 2006 - 7:11 am: |
|
|
Shri Swami Samarthनमस्कार मंडळी, " श्री स्वामी समर्थ " मी प्रथमच या साईटवर आलेले आहे. मला धनंजय काकानी याबद्दल माहीती दिली. आपले विचार आणि प्रतिक्रिया वाचुन खुप छान वाटले. पुन्हा भेटुच...
|
Pillu
| |
| Friday, October 27, 2006 - 1:06 pm: |
|
|
वा कालिका तुझे या बिबि वर स्वागत येत रहा भरपुर शिकायला मिळते येथे
|
Mrdmahesh
| |
| Friday, October 27, 2006 - 2:28 pm: |
|
|
साद देती हिमशिखरे हे पुस्तक मी शंकर महाराज मठातून विकत घेतले. वाचायला चालू केले आहे. नुसत्या प्रस्तावनेतच एवढे अनुभव आहेत की वाचून मी दंग झालो. कालिका, तुझे स्वागत!
|
नमस्कार. कालच मायबोलीकर झाले आहे. म्रुदगन्धा, महेश, प्रशान्त, पिलु तुम्ही सगळे फ़ार छान लिहिता. मी साधना करत नाही त्यामुळे अनुभव नाहित, त्यामुळे इथे मी काहि लिहायची शक्यता कमी आहे. पण मनापासून आवडतात अशा चर्चा ऐकायला. साद देती हिमशिखरे (टोवर्र्डस दि सिल्वर क्रेस्ट्स ऑफ़ हिमालयस) चा विषय निघाला म्हणुन लिहावस वाटल. माझ्या खूप आवडत्या पुस्तकान मधल हे १. सगळ्यात आवडत पुस्तक म्हणजे ऑटोबायोग्राफ़ी ऑफ़ अ योगी. कोणी वाचल आहे का हे?
|
Pillu
| |
| Saturday, October 28, 2006 - 7:30 am: |
|
|
पुणेरी आपल हार्दिक स्वागत साधना करत नाही म्हणुन अनुभव नाहि हे माझ्या मते चुकीचे आहे.माणसाने शोधक व्रुत्ती सभोवती ठेवली तर निच्शित अनुभव येतात अर्थात हे माझे मत आहे.
|
स्वागत नवोदिकांचे. धन्यवाद पुणेरी. धनूदादा म्हणतात ते बरोबर आहे.. आणि अनुभव सगळ्यांनाच येत असतो,निरिक्षण हवे मात्र. आणि मीही कुठे साधक आहे.. फ़क्त प्रेम आहे स्वामींवर,परमेश्वरावर एव्ह्ध्या एकाच गोष्टिमुळे,तोच लिहून घेतो सगळे..
|
//तुझे दर्शन होता, जाती ही पापे, स्पर्शनमात्रे विलया,जाती भवदुरिते// अनंतकोटि ब्रम्हांड नायक, राजाधिराज,सद्ग़ुरु समर्थ अक्कलकोटस्वामीमहाराजकी जय. अरे व्वा! सगळ्यास्वामी भक्तांचा मेळावा भरलेला दिसतोय!! पुणेरी, 'ऑटोबायोग्राफ़ी ऑफ़ अ योगी' ही कादंबरी अतिशय चांगली आहे. त्याचा अनुवाद आहे, 'योगी कथामृत'. ह्या कादंबरीत आलेल्या उल्लेखानुसार, 'महावतार बाबाजी' हे अजुनही कार्यरत आहेत. त्यांना माझे अनंत दंडवत.
|
'महावतार बाबाजी' हे अजुनही कार्यरत आहेत त्याच रुपात आहेत का? म्हणजे मला विचारायच आहे कि सर्व-सामान्य लोकाना सुद्धा त्यानच दर्शन होत का? (का शन्कर महाराज सारखे त्यानी समाधी घेतली आहे पण तरी कार्यरत आहेत, अस तुम्हाला म्हणायच आहे? ) आणि कुटे आहे त्यान्चा आश्रम हो, निरिक्षण हवे, हे पण खर आहे.
|
'महावतार बाबाजी' हे गेल्या २००० वर्षापासून सह्याद्रिपर्वतावर सूक्ष्म रूपात ध्यानस्थ आहेत. अध्यात्माच्या वाटेवर असणार्या आणि पुढच्या मार्गदर्शनाची गरज असणार्या जीवास, हमखास मदत करतात.
|
Prashantnk
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:42 am: |
|
|
अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयांची संगती, मग मी कमळापति, तुज नाणीं कांटाळा./
|
Prashantnk
| |
| Wednesday, November 01, 2006 - 9:51 am: |
|
|
स्मरण तुझें मज, नित्य असावे, तव गुण भावें गावे/ अनासक्तिनें मी वागावे, ऐसें मन वळवावे//
|
Pillu
| |
| Monday, November 06, 2006 - 2:21 pm: |
|
|
श्री स्वामी समर्थ नमस्कार मायबोलीकर ईथे श्री स्वामींचा तारक मंत्र देत आहे. याची म्हणावयाची पध्दत अशी आहे. एका भांड्यात थोडे पाणी घेऊन त्यामधे ऊदबत्तीची रक्षा पडेल असे करावे. म्हणुन झाल्यावर हे तिर्थ घरातील सर्वांना पिण्यास द्यावे. निश:क हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठिशी रे अतर्क्य अवधुत हे स्मर्तुगामी अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्युन्य काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञेविणा काळ हि ना नेई त्याला परलोकी ही ना भिती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे जगी जन्म म्रुत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरु तु असे बाळ त्यांचा खरा होई जागा तु श्रध्दे सहित कसा होशी त्या विण तु स्वामी भक्त कितिदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगु स्वामी देतिल साथ विभूती नमन नाम ध्यानादि तिर्थ श्री स्वामीच या पंचप्राणाम्रुतात हे तिर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती श्री स्वामीसमर्थ चरणाविंदार्णपर्णमस्तू
|
श्री राम जय राम जय जय रामा राघवा पन्चारती ही आरती जर कुणाला येत असेल तर नक्कि पोस्ट करा .. आभार
|
राजाधिराज योगीराज श्रीस्वामी समर्थांचे रुपवर्णन- श्रीमहाराज हे अवधूत श्रीदत्तात्रेयांचे कलीयुगातील तिसरे पुर्णावतार. श्रीमहाराजांची मातापितरे,जात,देश,दीक्षा यातील खरे कोणासच माहीत पडले नाही.सन्यांसी असणारे श्रीस्वामी कधी-कधी वेदपुराणातील वाक्ये अस्सलित म्हणत. इतर वेळी त्यांच बोलण असंबध्द वाटे. आजानुबाहु, तेज:पुंज दिव्यकांती, सुवर्णवर्ण, उंच अशा व्यक्तिमत्त्वाचे श्रीस्वामींच्या अंगचे तेज इतके प्रखर होते की त्यांच्याकडे एकसारखीदृष्टी लावून बघणे शक्य नसे. श्रीमहाराजांना पाहील्यावर त्यांच्यातील देवत्वाविषयी खात्री पटत असे. त्यांनी अनेक अचाट वाटणारी कृत्ये केली,पण कोणत्याही वेळेस त्यांच्या अमृत दृष्टिने अपघात किंवा विपरीत असे घडले नाही. श्रीमहाराज म्हणजे अक्कलकोटचे वैभव होते.त्यांच्या समोर लहानथोर सगळे सारखेच असायचे. समोरच्या व्यक्तीचे विचार त्यांना उघड्या पुस्तकासारखे कळायचे. त्यावेळचे अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराव भोसले यांना ही एकदा श्रीमुखात खायचा प्रसंग आला होता. श्रीमहाराजांच्या दर्शनास अर्थार्थी, जिज्ञासू, आर्त आणि ज्ञानी अशा चारी प्रकारचे लोक यायचे.पात्रतेप्रमाणे ते सगळ्यांची इच्छा पुर्ण करत. श्रीमहाराज हे चालते बोलते देवच आहेत असे सगळ्यांना वाटे.त्यांच्या सन्निध बसून रहावे, मुळीच उठू नये अशी ही मनोहर मूर्ति होती. 'हम गया नही जिंदा हैं' हे श्रीस्वामींचे शब्द आजही ते असल्याची साक्ष आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|