|
Pillu
| |
| Thursday, August 16, 2007 - 11:06 am: |
|
|
धन्यवाद अश्विनी, ठीक आहे, चाल नाही मीळाली तर त्यामुळे मनातील भाव काही बदलत नाहीत. आणि या मठात मी नेहमी जातोच.
|
Ashwini_k
| |
| Monday, October 01, 2007 - 6:33 am: |
|
|
श्री स्वामी समर्थ पिल्लू, स्वामींच्या बसलेल्या फ़ोटोत उजव्या हाताच्या चिमटीत ते काय असते? रुद्राक्ष असतो का? मला नेहमी स्वामींकडे बघताना हा प्रश्न मनात येतो पण कोणाला विचारायची आठवणच रहात नाही. आत्ता आठवले म्हणून विचारते आहे. कृपया सांगाल का? "अक्कलकोटनिवासी" या आरतीला चाल कुठे मिळाली का? लिहून चाल कशी सांगणार म्हणून मी तुम्हाला चाल सांगू शकले नव्हते.
|
Mrdmahesh
| |
| Monday, October 01, 2007 - 8:25 am: |
|
|
अश्विनी, मला असं वाटतं की त्यांच्या हातात रुद्राक्ष नसून ती एक साधी काचेची गोटी आहे. श्री स्वामींचं चरित्र (ले. श्रीपादशास्त्री किंजवडेकर) नुकतंच माझ्या वाचनात आलं. त्यात त्यांनी श्रीस्वामींच्या बाल लीलेबद्दल सांगितलं आहे. श्री स्वामी (हेतुपुरस्सर) लहान मुलांसारखे चाळे करत. त्यातला त्यांचा सर्वात आवडता चाळा म्हणजे काचेच्या गोट्या वर फेकून झेलणे. मला असं वाटतं - हीच ती त्यांच्या हातातली काचेची गोटी. हे चरित्र वाचताना मलाही हा प्रश्न पडला होता पण या गोटीचा उल्लेख कुठेही नाहीये. म्हणजेच ही गोटी त्यांच्या खेळातली आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.
|
Ashwini_k
| |
| Monday, October 01, 2007 - 9:20 am: |
|
|
महेश, बहुतेक तुम्ही म्हणता तसेच असेल! कारण हल्लीच पाहिलेल्या एका फ़ोटोत ती वस्तू निळ्या रंगाची दाखवली होती. तसेच श्री दत्तत्रेयांच्या श्री स्वामी समर्थ रुपात बालोन्मत्तपैशाच्यवृत्तीचे दर्शन घडे.
|
Mrdmahesh
| |
| Monday, October 01, 2007 - 2:03 pm: |
|
|
हां मला हा "बालोन्मत्तपैशाच्यवृत्ती" शब्द नेमका आठवत नव्हता. अगदी हाच शब्द चरित्रकारांनी वापरला आहे.
|
Maanus
| |
| Monday, October 01, 2007 - 2:19 pm: |
|
|
हा आमचे वडील बांधत असलेल्या स्वामींच्या मठाचा फोटो. इथे पहा पुर्ण बांधुन झाले की पत्त्यासकट कळवतोच.
|
Mrdmahesh
| |
| Monday, November 19, 2007 - 8:20 am: |
|
|
आज काल मंत्र रेकॉर्ड केलेली यंत्रे मिळतात. जसे की "श्री स्वामी समर्थ" हा मंत्र रेकॉर्ड केलेलं एक यंत्र आहे. जे सुरू केल्यास "श्री स्वामी समर्थ" असा मंत्र ऐकू येतो. हे यंत्र बंद करे पर्यंत हा मंत्र चालूच रहातो... बहुतेकांना असं यंत्र माहीतच असेल. मला माझ्या एका वैयक्तिक मंत्रासाठी असे यंत्र करून घ्यायचे आहे. ते कसे करून घेता येईल? या बद्दल पुण्यात कोणाकडे चौकशी करावी? कुणाला माहित असल्यास कृपया मला कळवा..
|
Ldhule
| |
| Monday, November 19, 2007 - 3:30 pm: |
|
|
महेश, मला वाटत अस यंत्र देवाने आधिच तयार केलय. त्याच नाव हृदय. त्यात मंत्र चालू राहण महत्वाच. ह्या बाह्य यंत्राचा काय उपयोग ? हॉटेलच्या बाहेर बसुन काय पोट भरत का ?
|
Mrdmahesh
| |
| Tuesday, November 20, 2007 - 9:00 am: |
|
|
तसं नाही कांतानू... तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. हृदयात आहे म्हणूनच तर अशी इच्छा झाली. मला ते यंत्र आमच्या मठात ठेवण्यासाठी हवंय... मठात येणार्या सगळ्यांना तो मंत्र सहज कळावा असा हेतू आहे. आणि ही माझी एकट्याची कल्पना नाहीये.. मठात नित्यनेमाने येणार्या प्रत्येकाची आहे... वातावरण निर्मिती हाही त्यामागचा एक उद्देश आहे...
|
Ldhule
| |
| Tuesday, November 20, 2007 - 2:44 pm: |
|
|
महेश, पटलं. छान कल्पना आहे. उद्देश चांगला आहे.
|
Mrdmahesh
| |
| Tuesday, November 20, 2007 - 3:30 pm: |
|
|
धन्यवाद लक्ष्मीकांत .. पण मला अजून माहिती मिळालेली नाही . जी श्री स्वामींची इच्छा..
|
Ashwinis
| |
| Saturday, January 05, 2008 - 4:22 pm: |
|
|
Ashwini, Namaskar, Shriswamisamartha is holding our universe, which looks like a small marble ( Goti).I have heard this from many swami bhakta. If you go to Dadar, Swami math, they will tell you that.
|
Ashwinis
| |
| Saturday, January 05, 2008 - 4:26 pm: |
|
|
Mahesh, The instrument you are trying to find, you can get it at Shirdi, in one of the stores outside Baba's temple.It has many japa, but you can play Shri Swami Samartha 24/7. I have one, and I like to play gayatri mantra.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, January 31, 2008 - 8:45 am: |
|
|
आश्विनी, तुम्ही म्हणता तसं यंत्र पुण्यात मिळतात.. आम्हाला आमचा जप त्या यंत्रात रेकॉर्ड करून हवाय.. तसं यंत्र आम्हाला तयार करून हवंय..
|
|
shree swami samarth jay jay swami samarth shree swami samarth jay jay swami samarth shree swami samarth jay jay swami samarth
|
श्री स्वामि समर्थ कृपया मला श्री स्वामी च्या मानस पूजे बद्द्ल माहिति द्यावी, मी एका वेब साईट वर वाचली होति पण आत ती साईट आथवत नाही. धन्यवाद प्रशान्त
|
Maanus
| |
| Tuesday, April 15, 2008 - 5:40 am: |
|
|
कधी मुळशी धरणाकडे जाताना मधे थोडा वेळ आराम करावासा वाटला तर ईथे जरुर थांबा. गेल्या सोमवारी पुजा करुन देवळाचे निट opening केले. घरातले कोणी नसले तरी, कोणी गडी माणूस असेलच. best possible directions I was able to come up with dont worry, there is no dhaba here or obligation to donate anything. This is something my father wanted to do.
|
Maanus
| |
| Tuesday, April 15, 2008 - 7:29 pm: |
|
|
काल एकाने ह्या चित्रातुन पत्ता कळाला नाही म्हणुन मेल केली होती. अजुनही कुणाला कळाले नसेल म्हणुन ईथे पत्ता लिहीतो. थोडाफार मुळशी धरणाचा रस्ता माहीत असेल असे धरुन चालतो. मुळशी धरणा कडे जाताना वाटेत पौड गाव येते, चांदणी चौकापासुन पौड साधारण २२ किलोमीटर लांब आहे. पौड गाव सुरु झाल्यावर प्रथम पौड S.T. Stand येते. गाडीने साधारण ७-८ मिनीट गेल्यावर गाव संपायला लागेल. तेथे बरीचशी दुकाणे आहेत, तेथे कुणालाही हणुमान मंदीर कोठे आहे विचारा. हणुमान मंदीराजवळ पोचल्यावर तेथे गाडी park करा व कुणालाही विचारा डेअरी कोठे आहे किंवा मठ कोठे आहे. Let me know if you have any feedback after your visit, if you have faced any problem in the place I'll make sure it will get fixed soon.
|
Mnp
| |
| Wednesday, April 16, 2008 - 12:39 am: |
|
|
नमस्कार, कधी जर वेंगुर्ल्याला जाण्याचा योग आला तर जरूर स्वामी समर्थांच्या मठात जाऊन या. हा मठ वेंगुर्ला येथे ख्यालगीरी ठिकाणी अतिशय शांत आणि निसर्गरम्य परीसरात आहे. मुख्य म्हणजे या मठात स्वामींच्या आत्मपादुका आहेत. त्यांचे दर्शन फ़क्त गुरुवारी दुपारी १२ च्य आत होउ शकते. या आत्मपादुका एका तुळशी पत्रावर दर्शनासाठी ठेवल्या जातात. वेंगुर्ला हे कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|