|
Shwetaj
| |
| Wednesday, May 02, 2007 - 1:46 pm: |
| 
|
Hari om, Barich jana vichartat ki ramnaam ghenyasathi vahi kashala havi? manat ram asala mhanje zala. pan hya vahicha sagalyat motha fayada mhanje aapan hatane lihito, dolyani baghato aani tyamule aapoaapach te naam manatun ghetala jata. tyamule atishay sopya paddhatine kuthalehi kashta na gheta aapalyala ram naam gheta yeta. shivay hi vahi aapan kuthehi gheun jau shakato. ti lihinyasathi jagecha, velecha bandhan nahi. tyamule aapan bus, train made pravas karatana suddha lihu shakato. tyamule kharokhar jo vel aapan pravas karatana ikde tikade baghnyat, itaranshi gappa tappa karnyat, t.v baghanyat ghalavato, to vahi lihun satkarani lavata yeto. aani satat lihit rahila ki te naam apoaap aapalya manat jaun basata. mag jar itkya sopya paddhatine japmaal vagaire na gheta sahaj parameshwaracha nava ghyayacha marg upalabdha asel tar to kashala nakarayacha, nahi ka? Hari om
|
Anamikaa
| |
| Wednesday, May 02, 2007 - 3:31 pm: |
| 
|
अंजली, बरोबर आहे तुझे! मला माहित आहे कि माझ्या एकाही प्रश्नाला इथे येणारे बापुभक्त उत्तर अथवा प्रतिसाद देणार नाहित पण तरिही मी माझे प्रश्न विचारतच राहीन. हेच अनुत्तरित प्रश्न वाचुन निदान एखादा बापुभक्त स्वतःला या अवडंबरापासुन मुक्त करु शकला तरी मला समाधान मिळेल........................................................ रामनामाच्या अखंड जपाने वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला हे खरेच पण म्हणुन रामनामाचे लिखाण वहीत करणारे कलीयुगातले बापुभक्त(माझ्या माहितितले) अजुनही वाल्याप्रमाणेच वर्तन करत आहेत त्याचे काय? "अनामिका"
|
Arch
| |
| Wednesday, May 02, 2007 - 3:52 pm: |
| 
|
अनामिका, तुला अस नाही वाटत की जे तुझ्या माहितितले बापुभक्त आहेत त्यांना तू जर समजाऊ शकत नाहिस तर इथे तुला न माहित असलेले लोक तुझ कसं ऐकतील किंवा तुझ्याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा तू कशी करू शकतेस? स्वच्छता ही आपल्या घरापासून सुरु करावी अस म्हणतात.
|
Anamikaa
| |
| Wednesday, May 02, 2007 - 4:23 pm: |
| 
|
आर्च तुला काय वाटल मी प्रयत्न केला नसेन का?पण इतक्या अहंकाराने भारलेली माणसं आहेत ही की ह्यांना कितिहि समजावले तरी काहि फ़रक पडत नाही. आपण मुळात काही चुकीचे करतो आहोत अथवा वागतो आहोत याचीच मुळात जाणीव नाही आणि जाणुन घ्यायची इच्छा देखिल नाही अश्यांना काय ग समजवणार?कधी कधी मला प्रश्न पडतो कि माणसं इतकी बधीर कशी असु शकतात? पण शेवटी मी सुद्धा एका मर्यादे पर्यंतच हस्तक्षेप करु शकते. कारण कितिहि झाले तरी मी उपरिच ठरते आता का? ते विचारु नकोस. एकीकडे रामनामाच स्मरण करायच बापुंचे शिष्य असल्याचे दर्शवायच आणि दुसरी कडे एखाद्यासाठी खड्डे खणायचे हेच उद्योग चालु असतात यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत हेच खर! सगळेच असे नसतिल कदाचित पण दुर्दैवाने माझ्या माहितितले बहुतांशी सगळेच असे निपजलेत त्याला काय करु? म्हणुन तर जिवाची तडफ़ड होते बाकि काही नाहि. कारण या सगळ्यात मी सुद्धा होरपळलेय काहि अंशी. "अनामिका"
|
Asami
| |
| Wednesday, May 02, 2007 - 4:41 pm: |
| 
|
we have 108% FAITH in him. >>एक किरकोळ प्रश्न , १०८ % का म्हणतात ? हि एखादी phrase आहे का ?
|
Gurudasb
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:07 pm: |
| 
|
जपमाळेची गरज नाही तर महागड्या वहीची तरी काय गरज ? आणि जपमाळ तरी हवी कशाला ? देवाने तोंड दिले आहे ना ? आणि ते न उघडताही मनात भाव ठेऊन जप करता येतो . बस, , टी . व्ही . यांचा उल्लेख अनुचित आहे . आणि वहीच हवी तर घरातील मुलांच्या वहीतील शिल्लक कागदांचा उपयोग करता येत नाही का ? पैसे वाचतील ना . [ संस्थेचे नुकसान होईल मात्र हे खरे ] . पैसा उभारणीसाठी किती तर्ह्रेने डोके चालते बघा . अध्यात्माला विरोध नाही पण अवडंबराला मात्र जरूर विरोध आहे . आणि समाजात आता एकविसाव्या शतकात किंवा त्याही पुढे वैज्ञानिक प्रभावाने खूप बदल होणार आहेत . एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू कमी होत चालली आहे , एक कुटुंबीय पद्धती सुरू झाली आहे बर्याच प्रमाणात . रीती रिवाजही बर्याच प्रमाणात बदलत चालले आहेत . ते कुणा सदगुरुतत्वाने बदलत चालले आहेत असे म्हणावे का ? कि नविन अवतारी वेद , पुराणे सुरू झाली आहेत म्हणावे ? सर्व काही अविश्वसनीय . अवडम्बराची परीसीमा . स्वबुद्धीला थोडीतरी चालना द्यायला हवी .
|
Nanya
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:11 pm: |
| 
|
एक किरकोळ प्रश्न , १०८ % का म्हणतात ? हि एखादी phrase आहे का ? अगदी मलादेखील हाच प्रश्न पडला होता. १०८ ह आकडा मि य वर नेहमि बघितला आहे, विशेषत्: बापु भक्ताकडुन. हास आकडा कुथुन आला?(तुलनेने सोपा प्रश्न आहे, बपुभक्तानी उतार द्यायला हरकत नाही.)
|
Manus80
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:12 pm: |
| 
|
ज़ोशीभक्त, रामनाम लिहा. नक्की लिहा , तुमचे लिहणे सुधारेल. पण एक विचार आला मनात की वह्यांपेक्षा पाट्या का नाही वापरत. किती तरी झाडे वाचतील. एक शंका, रामनाम तुम्ही मराठीत लिहिता का इंग्लिश मध्ये. बापुचा तु, जे लिहितो ते मराठीत लिहि किंवा लघुलिपित लिहि म्हणजे वाचता येइल नीट. आणि तु नीट ठरव, की जोशी नक्की कोण आहेत ते. माझ्यासारखे माणुस , की अवतार की अजुन काहि. तुझे जोशीपरिवारवाले त्यांना ना देव मानत आणि ना अवतार. जोशींना विचार की भक्ती मोजता येते का ? आमचा आमच्यावर विश्वास आहे आणि या जगाच्या निर्मात्यावर देखिल. जोशीभक्तंचे बीबी वाचुन असे दिसते कि जोशी फ़क्त भक्तंचे भले करतात. असो. जय श्री राम.
|
Bavlat
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:19 pm: |
| 
|
वह्यांपेक्षा पाट्या का नाही वापरत. किती तरी झाडे वाचतील. >> पाट्यांचा गणपती कसा बनवणार?.
|
Arch
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:46 pm: |
| 
|
पाट्यांचा गणपती कसा बनवणार?. >> सत्यसाईबाबा हवेतून काढून देतील 
|
Upas
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:49 pm: |
| 
|
माऊली समजावतेय हरीपाठात.. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी? काही कोटी रामनाम झाले की आपल्या वृत्तीत फरक पडू लागतो असे महात्मे म्हणतात.. म्हणजे अगदी १३ कोटी झाले की रामाचे दर्शन झाल्याची जाणीव जी समर्थांना झाली होती.. अर्थात रामनामाने मनशुद्धी आपोआप होत जाते.. नामाचा आणि पुण्याचा हिशोब ठेवायला हवा असे वाटत नाही.. :-)
|
Gurudasb
| |
| Wednesday, May 02, 2007 - 6:07 pm: |
| 
|
रामनामाच्या अकाउंटवर नाम बॅंकेत दर काय असतो ? व्याज मिळवले जाते का ? कायपण भोळसटपणा !
|
Madhura
| |
| Wednesday, May 02, 2007 - 7:15 pm: |
| 
|
एक किरकोळ प्रश्न , १०८ % का म्हणतात >>>>> जपमाळेत १०८ मणी असतात त्याच्याशी संबध असेल बहुतेक.
|
जोशीभक्तंचे बीबी वाचुन असे दिसते कि जोशी फ़क्त भक्तंचे भले करतात>>>>>>>> त्यांचे तरी कुठे भले करताहेत? ती अनामिका कित्ति दिवस सांगतेय कुणा बापुभक्त पिडिताबद्द्ल. काय मदत मिळाली का? मदत तर सोडा ते कोण आहेत कुठे आहेत ही साधी माहिती तरी बापुभक्तानी विचारली का?
|
गायकवाड साहेब, वेदामधे काहीही असो, ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्यांचा त्याग करायलाच हवा. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी मेल्यावर माझ्या पत्निने सौभाग्यलेणी त्यागावी असे मी मुळीच म्हणणार नाही. माझ्या आईने आम्हा भावाना सांगितले आहे की तिच्या पश्चात कुठलेही धार्मिक विधी करु नयेत. आणि हे तिनेच ठरवले आहे, कुठल्याही बापुंनी तिला सांगितलेले नाही. बाकी तुमच प्रश्न की बापुंखेरीज असे ईतर कोणी आहेत का? तर मी म्हणेन की तुम्ही डोळ्यावर बापुंच्या भक्तीची झापडे बांधुन फिरता आहात किंवा फक्त वेद आणि पुराणे यातच गुरफटला आहात, महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांबद्दल तुम्ही किंवा तुमच्या बापुनी माहीती करुन घेतलेली दिसत नाही. ह्या सर्व अनिष्ट प्रथांना तिलांजली द्यायला देवाचा अवतार असावे लागत नाही. तुमची संख्या लाखाने आहे आणि ती वाढते आहे, ह्याचा अर्थ बापु जे काही करतात ते बरोबर असा होत नाही. बाळासाहेबांच्या सभेलाही लाखांनी गर्दी होते, सोनियाबाईंच्या देखिल म्हणुन ते म्हणतात तोच सूर्य असे होते का?? गाडगेबाबांचं नाव तुम्हि ऐकल असाव अशी अपेक्षा. या संताने काय केले नाही समाजासाठी? आणि एव्हढे करुन त्यानी कुणाकडुन साधा नमस्कार घालुन नाही घेतला. "तोचि खरा साधु, तोचि खरा संत" . हरी ओम!
|
याच बीबीवर मी एक गोष्ट सान्गितली होती, बापु विरोधकान्नी ती अजुनही विचारातही घेतलेली दिसत नाही, मुळात वाचलीच की नाही ठावुक नाही! रावण महान शिव भक्त होता! पण त्याचे जे काही कर्तुत्व सीतेबाबत होते त्याबद्दल कोणी शिवाला दोषी ठरवत नाही! (आता मुळात रामायणच खर की काल्पनीक, कशावरुन शन्कराच अस्तित्व हे असले प्रश्ण कुणी बुन्दी पाडल्याप्रमाणे पाडले तरी मला नवल वाटणार नाही) DDD तद्वतच, बापु नावाचा कोणी गुरु, बुवा, सन्त किन्वा ढोन्गी जो काही असेल तो, त्याच्या शिष्यान्च्या कोणत्याही वागण्याला त्या बापुला जबाबदार धरण्याची, चोर सोडुन सन्याशाला बळी देण्याची, वडाच साल पिम्पळाला लावायची, बादरायण सम्बन्ध जोडायची बापु विरोधकान्ची वरील पोस्ट्स मधील वृत्तीचा मी जाहीर निषेध करतो! तर्काला धरुन हेत असे भासवित, "श्रद्धा" किन्वा "भक्ती" मार्गावर चालणार्यान्ना नाऊमेद करणारे अवसानघातकी प्रश्ण विचारुन भले कित्येकान्चा कण्डु शमत असेल, कित्येकान्ना अन्धश्रद्धा निर्मुलन केल्याच भ्रामक सुख मिळत असेल पण एकन्दरीत, या धार्मिक विभागात, बापु भक्तान्नी त्यान्चे करीता सुरु केलेल्या बीबीवर सर्व बापुविरोधक जशा टोच्या मारत गेले काही दिवस जो रौन्दळ घालताहेत, तो "मायबोलि" या साइटच्या परम्परेस साजेसा नाहि असे माझे स्पष्ट मत हे! बापु विरोधकान्नी जरुर मतान्द्वारे विरोध करावा पण त्यासाठी V&C उपलब्ध हे! तिथे जावुन जे काय बापु विरोधातील नारे लावायचे ते लावावे! मी सहसा अशी भाषा वापरीत नाही, पण अती होतय म्हणुन सान्गाव लागतय जरी मी बापु किन्वा अशा कुणान्चा भक्त बिक्त नसलो तरी अस्थानी विरोध करु नका असे माझे सान्गणे राहील! मला केवळ दोन गोष्टी कळताहेत! हा बीबी बापुभक्तान्नी सुरु केला हे! तिथे येवुन बापु किन्वा त्यान्च्या भक्तान्ची निन्दा करण्याचे बापु विरोधकान्ना काहीच प्रयोजन खर तर नसायला पाहिजे! माननिय Admin , आपण या मुद्द्यान्ची दखल घ्याल का? बापु विरोधकान्ना V&C वर एक बीबी उघडुन द्या! मी पुर्वी पण तसे सान्गितले आहे! तसेच मॉड्स नी येथिल अनावश्यक चर्चा हलवावी अशी मी विनन्ती करतो! माझ्या दृष्टीने म्हातारी मेल्याच दुःख नाही, काळ सोकावतो हे! अस वाट्टय! आज बापुन्चा बीबी बन्द पडेल या असल्या रौन्दळात, उद्या ज्योतिष, अद्ध्यात्म आणि असे अनेक बीबी अशीच वैचारीक किन्वा बौधिक (खर सान्गायच तर निधर्मी "लाल") झुन्डशाही करुन बन्द पडले जातील आणि मग कशाला काही अर्थच रहाणार नाही! मी अधिक उणे लिहिले असल्यास क्षमस्व, पण अगदीच रहावले नाहीये! 
|
>>>>> गाडगेबाबांचं नाव तुम्हि ऐकल असाव अशी अपेक्षा. या संताने काय केले नाही समाजासाठी? आणि एव्हढे करुन त्यानी कुणाकडुन साधा नमस्कार घालुन नाही घेतला. "तोचि खरा साधु, तोचि खरा संत" . हरी ओम! भ्रमा, आमच्यात ज्येष्ठाला वाकुनच नव्हे तर शिरसाष्टान्ग नमस्कार करायची पद्धत हे! गाडगे बाबा नमस्कार करुन देत नव्हते म्हणुन आम्ही नमस्कार घालणे किन्वा लहान्नन्कडुन करुन घेणे सोडावे अशी अपेक्षा का बरे???? चवीपुरते उदाहरणादाखल गाडगेबाबान्च नाव घ्यायच, त्यान्च्या सारखच एक दशान्श टक्के तरी आपण वागतो, जगतो का? मी वागलोय, म्हणुन अधिकाराने हा प्रश्ण विचारतोय! मी रस्त्यावर झाडु मारलेत, गू घाण गटारी साफ केल्यात, आणि असे अनेक हेत माझ्यासारखे! पण म्हणुन बापुला विरोध करताना त्या बिचार्या गाडगे बाबान्ना का मधे आणतोस???
|
अहो बापूचा, विधवेच्या सौभाग्यलेण्यांचं कौतुक सांगून समाजसुधारणा केली म्हणताय आणि परत परत विचारताय की तुम्ही कुणी करू शकाल का? म्हणून विचारतेय. मुळात आपल्या समाजात फक्त बाईनेच(पुरुषाना मात्र सूट) सौभाग्यलेणी घालावीत (आणि तिने घालावीतच) अशी जी प्रथा आहे त्याबद्दल डॉक्टर जोशींचं काय म्हणणं आहे? तुम्ही तुमच्या बायकोला सांगाल का की बाई मी नाही ना मंगळसूत्र घालत मग तूही नाही घातलेस तर हरकत नाही. आणि दागिने कुंकू आणि गजरे घालू देणं यापेक्षा त्या बाईला स्वतःच्या पायवर उभं रहाण्यास मदत करणं, तिचा आत्मविश्वास वाढवणं हे महत्वाचं आहे नाही का? बाकी तुम्ही म्हणताय तो बदल मी कित्येक ठिकाणी पाहिलाय. त्यासाठी कुणा बाबांची गरज नाही. घरातल्या लोकांनी, मैत्रिणींनी पाठींबा दिला प्रोत्साहन दिलं की बर्याच बायका त्यांना हवी ती सौभाग्यलेणी घालणं, हळदीकुंकवाला जाणं कंटिन्यु करतातच.
|
>>>>> मुळात आपल्या समाजात फक्त बाईनेच(पुरुषाना मात्र सूट) सौभाग्यलेणी घालावीत माझ्या माहितीप्रमाणे पुरुषाच आधी मौन्जिबन्धन होत तेव्हा एक जानव घालतात! ( हे केवळ ब्राह्मणात नाही तर क्षत्रिय आणि वैश्य देखिल घालतात, शुद्रान्चे माहित नाही) आणि लग्न झाल्यावर दोन जानवी घालायची असतात अशी रीत हे! (जानव घातल्यान काय होत किन्वा त्यावर गायत्रीचा जप केल्यान किन्वा पन्चगव्य प्राशन केल्या काय काय होत हे प्रश्ण मला विचारु नका! मी ते करतो कारण माझी तशी श्रद्धा हे! आणि जोवर तिचा दुसर्यान्ना उपद्रव होत नाहि तोवर मला प्रतिप्रष्न करण्याचा कुणालाही अधिकार नाही हे मी आधीच सान्गुन ठेवतो, शिवाय वरील विषय हा या बीबीचा विषय नाही, इथे बापुन्चे विचार व कौतुक अपेक्षित हे अस माझ मत!) बाकी तुमच चालुद्या! 
|
लिंबुभाउ, तुम्ही महान आहातच, याबद्दल वाद नाही. प्रश्न हा नाहीच आहे. भक्तांचं म्हणणं असं दिसतय की बापु समाजसेवा करुन राह्यलेत म्हणुन देव आहेत. गाडगेबाबांच नाव घेण्याचा उद्देश हा होता. बाकी त्यांच किंवा तुमच नाव घेण्याची आमची काय लायकी?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|