|
Deshi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:48 pm: |
| 
|
आता जर यांना आधीच साईबाबांचे अवतार मानले जात आहे, तर अक्कलकोट स्वामींबरोबर तुलना म्हणजे काही विशेष गोष्ट नसावी>>>>> महेश. परत तेच. अहो. कोण मानतय. काही भक्त. कशाच्या जोरावर. तसा त्यांना द्रुष्टांत झाला की काय? परत एकदा. भक्ती मार्गा वर जावेच. पण जिंवत व्यक्ती देव जर असेल तर मग निदान मला तरी विश्व दर्शन देनार का? हे निदान माझे तरी त्या भक्तांन्ना व जोशींना चलेज आहे. ते देनार का?
|
अरे देशी, ते अस कोणालाही दर्शन देत नाहीत रे... कोणतेच बाबा... तू आधी त्यांच्या भक्तीरसात न्हाऊन नीघ त्या baapu's kid सारखा, मग तुला ते 'कदाचीत' होईल. ते बापुज किड अगदीच पिकावरील कीड सारख वाटतय
|
Storvi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:46 pm: |
| 
|
सव्या ते कीड असे न लिहिता किड असे लिही रे,(वाटल्यास) 
|
पण जिंवत व्यक्ती देव जर असेल तर मग निदान मला तरी विश्व दर्शन देनार का? >> deshi,thats so great! bapunna challenge dyayche asel tar BB war ka?? tyanchyakadech jaunach dya ki...tumchi itki talmal asel vishwadarshanachi tar tumhala bapunni vishwadarshan ghadavnyachi garaj urnar nahi.. apoapch hoil ki tumhala :-)) ani nandini, halli jasta kam nasta watta ... barech BB lihita ... patrakar lokanna itka wel milto ... ? very good! असो हे असे संप्रदाय जर खरेच काही समाज विधायक करत असतील तर त्यांचे असणे आक्षेपार्ह असण्याचे कारण नाही. पण ते तपासून पहाणे हे समाजातल्या प्रत्येक सुज्ञ घटकाचे कर्तव्य आहे.>> mahesh, tech tar me sangte ahe ... amchya kadun spoon feeding karun bapu kay ahe te mahit karun ghenyapeksha ... tumha sarvansarkhya sudnya ghatakanni swata tapasun pahava ... pan titka wel konalach nasel bahutek... nahitar divasbhar dusryachi khilli udvat BB kon lihit basnar ...agdi patrakar maldali pan apvad disat nahit .... tumha sarvanna bapuncha itka problem vatat asel tar ithe BB lihun kahi upyog hoil asa mala watat nahi ... typeksha tumhi lokajagruti etc. ka karat nahi??? that will be more useful if you think Bapu is a fraud ... nandini madam ahet ki ... madat karayla ... 
|
मला असे वाटते की त्या स्वामींनी स्वत्: म्हणले नसणार "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे". नंतर ते वाक्य कोणीतरी भक्तांनी प्रसिद्ध केले असेल. मी महेशच्या वरील मताशी सहमत आहे. स्वामींच्या पश्चात हे वाक्या आले असावे. पण बापुंच्या हयातीत हे होतय आणि ते आक्षेप घेत नाहीत. आता राम आणी कृष्णा! अहो व्यास वाल्मिकीच्या प्रतिभेचा आविष्कार तो. त्या महाकविना वाटल असत तर त्यांनी थांबवल असत की ते. बापु आणि त्यांचे भक्तगण स्वत:च बापुभक्तीची गाथा रचतात ते थांबवा की. मागे जेव्हा भुजला भूकंप झाला किंवा त्सुनामीचा तडाखा बसला तेव्हा एक बापु भक्त मला म्हणतो की हे संकट मुंबईवर येणर होतं पण बापुंनी ते टाळल. अरे पण्ते नाहिसं का नाही केलं?? गुजराती किंवा तामिळ ही माणसं नाहित का? की तेथे भक्त नाहीत म्हणुन??
|
Chyayla
| |
| Wednesday, April 18, 2007 - 5:15 am: |
| 
|
बरेच दीवसान्पासुन हा BB वाचत आहे, पण पोस्टायला वेळ नव्हता मिळाला. दोन्ही बाजु ऐकल्या त्यातल्या त्यात मला तरी बापु बद्दल काहीच माहिती नाही ती थोडीफ़ार ईथे वाचुन मिळाली. त्यामुळे मी बापुन्चा ना विरोधक आहे ना समर्थक पण स्वता:ची बाजु मान्डण्याचा प्रयत्न करतो. मी पण बापुभक्तान्सारखेच भक्त पाहिले आहेत, सनातन धर्म, आसाराम बापु, गुरुमाई वैगेरे (यात कुणाला दुखवायचा हेतु नाही) अगदी स्वता:ला पोहोचलेले, स्वता:ला अध्यात्मिक अनुभव आलेले म्हणणारे भौतिक द्रुष्टान्त झालेले, जसे कुणाला काही दुख:, सन्कट आलीत आणी गुरुक्रुपा होउन चमत्कार होउन ते दुर झाले वैगेरे... या अनुभवानवरुन काही मुद्दे मान्डतोय. १) मानवाला ईतर भुकेप्रमाणे एक अध्यात्मिक भुकही असतेच. त्यासाठी मिळेल किन्वा दीसेल त्या मार्गाने पुढे जायची तडफ़ड असते. त्यात त्याला सुरुवातीला कळत नसत की कोणता मार्ग योग्य, मग पुढे जाण्यासाठी समोर जो मार्ग दीसतो तो ईतराना कदाचित निर्बुद्धपणा वाटत असतो तोच त्याला महान, मुक्तिचे दार वाटत असतो त्यामुळे एकवेळ जग त्याला मुर्ख समजत असत तर तो जगाला अज्ञानी समजत असतो. त्यामुळे एक सन्घर्ष निर्माण होतो. २)कोणत्याही मार्गाने का होईना जरी तो अतिशय विचित्र वाटत असला तरी त्याची सत्य शोधण्याची, अध्यात्मिक भुक भागवायची धडपड ही महत्वाची. पुढे त्याची जशी प्रगती होत जाते तसा त्याला नवा मार्ग मिळु लागतो व जुना मागे पडतो. तरी भक्तानी त्यातच अडकुन न पडता स्वता:हुनच याच्या पुढे जायची तयारी ठेवली पाहिजे. ३)मनुष्य टप्प्या टप्प्याने प्रगत होतो. जसा लहान वयात चान्दोबाला मामा म्हणुन दाखवण्यात येत आणी त्यातच लहान मुल केवळ कल्पनेनी आनन्दी होतो व त्याचापुरता समाधान झालेल असत. त्याला त्या वयात जर तुम्ही अवकाश शास्त्र शिकवण्याचा फ़न्दात पडलात तर तुम्हीच मुर्ख ठराल. पुढे लहान मुल जसे मोठे होते त्याला चान्दोबा कुणी व्यक्ति नव्हे तर खगोल वस्तु आहे हे सत्य कळत यात आपण लहान बाळाला मुर्ख म्हणु शकु काय? तसेच अध्यात्माच्या वाटेवर मनुष्य हा एका सत्यापासुन वरच्या श्रेणीच्या सत्याकडे सरकत जातो व अशीच त्याची परम सत्याकडे प्रगती होत जाते. हे जर कळाले तर भक्तान्च्या मार्गाला मुर्खपणा व नावे ठेवण्यात अर्थ नाही. कदाचित ती त्यान्ची एक अवस्था एक पातळी आहे ज्यावर तुम्हीसुद्धा नसेल पोहोचलात. किन्वा त्याचापुढे गेला असाल व मागच्या अवस्थेला चुकीची समजायची चुक करत असाल? ४) दुसरीकडे ज्याप्रमाणे फ़ुलाला जाउन सान्गावे लागत नाही की त्याचाकडे सुगन्ध आहे त्याचप्रमाणे या बापु, गुरु, बाबा लोकानाही ते काय आहेत ते सान्गायची गरज नाही, पण पुष्कळदा स्वनाम घोषीत बाबा, अमक्याचे अवतार वैगेरे सान्गणारे, त्यापेक्षा त्यान्चे भक्तगणान्ना असला प्रचार करण्याचा मोह आवरत नाही. व एक अवडम्बर मात्र दीसुन येत. व दुसर्याना त्रासही होतो. ५)त्यातल्या त्यात भक्ताना आलेले अनुभव, द्रुष्टान्त वैगेरे अतिरन्जीत वाटतात, शेवटी त्यान्नीच विचार करायचा की हे अनुभव त्यान्च्या प्रगतीत बाधा तर निर्माण करत नाहीत, आत्ममग्न होउन स्वता:ची दीशाभुल तर करत नाहीत. अध्यात्माचे उद्दीष्ट फ़ार मोठे आहे, वेदही त्याला "नेती नेती" म्हणुन एका मर्यादेपर्यन्त थाम्बले आहेत... जसे प्रवासात जाताना अनेक चान्गली ठिकाणे, सुन्दर दृश्ये रस्त्यात दीसतात पण त्यासाठी काय आपण मुक्कामाला जायचे थाम्बवतो काय? तसेच या क्षुल्लक अनुभवान्च्या गोष्टीन्चा बाउ करुन उदो उदो करण्यात अर्थ नाही व तिथेच गुन्तुन पडण्यात नुकसानच आहे. ६) वरच्या पातळीच्या सत्याकडे सरकायची तयारी, ईच्छाशक्ती ही भक्तान्कडेच असायला पाहिजे नाहीतर कोणताही गुरु त्याला मदत करु शकत नाहीत आड्यातच नाही तर पोहोर्यात कुठुन येणार? केवळ आश्रम निर्मित उत्पादन वापरुन, बाबान्चा जाहीर उदो उदो करुन काही फ़ायदा नाही असे वाटते. मात्र आश्रम पुरस्कारीत समाज सेवे मधे सहभागी झाल्यामुळे कर्म, सेवा करण्याचा अहम पुर्ण होतो हे मान्य. त्यात काही वावगेही नाही. शिवाय एखादे विधायक कार्य असेल तर त्याचा उपयोग म्हणजे स्वार्थासोबत परमार्थही साधण्याचे समाधान मिळते व समाजाला काही तरी उपयोग होतो. ७) सगळ्यात शेवटी एका दुसर्या द्रुष्टीनी विचार केला... जे लोक केवळ बापु व त्यान्च्या भक्ताना नावे ठेवत आहे तेच दुसर्या धर्मातील जसे "मदर टेरेसा" याना पण नावे ठेवतील का? त्यान्चा तर मिडिया मधे नेहमी उदो उदो चालतो. निदान सेवेच्या नावाखाली अज्ञानाचा, असहायतेचा फ़ायदा घेउन हे बापु आणी भक्त दुसर्यान्चे धर्मान्तर व समाजाचे कोणतेही नुकसान तरी करत नाहीत. उलट चान्गलीच शिकवण देतात. ८) मला या सगळ्यान्पेक्षा बाबा रामदेव यान्च कार्य खरच स्पृहणीय, आदरणीय वाटत ज्यामुळे करोडोना प्रत्यक्ष भौतिक व अध्यात्मिक लाभ होत आहे.
|
Mahesh
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:00 am: |
| 
|
समीर, तुमच्या लिखाणाला शतश: प्रणाम. मी खुप दिवस विचारात होतो पण सुचत नव्हते कसे लिहावे, मी याआधी माझ्या एका मेसेजमधे लिहायचा प्रयत्न केला होता. तुम्ही अगदी यथायोग्य शब्दात मांडलेत. जोशींचे कार्य चांगले असेलही पण त्यांना मानणार्या लोकांकडून त्याला जे अहंकारी स्वरूप प्राप्त होत आहे ते योग्य वाटत नाही. अर्थात हे ईतर संप्रदायांच्या बाबतीततही कमी अधिक प्रमाणात घडते. आज जगात जे जातीय, धार्मिक वाद दिसतात त्यांची सुरूवात कदाचित अशाच वैचारिक मतभेदांमधुन झाली असणार.
|
Naami
| |
| Wednesday, April 18, 2007 - 10:06 am: |
| 
|
महेश, हा बापुंचा प्रत्यक्ष मधील अग्रलेख आहे. ह्यात माझे काहीच नाही.
|
Naami
| |
| Wednesday, April 18, 2007 - 10:14 am: |
| 
|
मी कोण आहे? मी कोणाचाही अवतार नाही. मी कालही अनिरुद्ध होतो, आजही अनिरुद्ध आहे आणि यापुढेही अनिरुद्धच राहील. -अनिरुद्ध (श्रीमद्पुरुषार्थ प्रथम खण्ड सत्यस्मृती)
|
स्वप्नाबाई.. कदचित तुम्हाला पत्रकाराचे खरं काम काय असतं ते माहित नसावं.. माहित करून घ्याल ही आशा देखील नाही. मी आधीपासून सांगत आली आहे की माझ आक्षेप हा भक्तिच्या अवडंबराला आहे. करा ना भक्ती,, मिळवा अध्यात्मिक शांती.. पण म्हणून आमचे बापू महान... हा विचार कशाला? वरती सगळ्या पोस्टमधे हा एकच सूर मला जाणवला आहे, मला एकदा बापूभक्ताने त्राहि त्राहि करून सोडले होते.. त्याचे बापूमुळे सुटलेले प्रॉब्लेम्स पेपरमधे छापून आणा म्हणुन.... आणि सर्वानाच समीरने खूप मस्त लिहीलय ते वाचले तरी समजेल की अध्यात्म काय आहे ते...
|
Naami
| |
| Wednesday, April 18, 2007 - 11:04 am: |
| 
|
13 Kalam Yojana 1. Vastra Yojana 2. Barmaas pani sheti chaara yojana 3. Raddi yojana 4. June te sone yojana (Old is Gold) 5. Premachi Uub Yojana 6. Vidyaprakash Yojana 7. Swachhataa mohim Yojana 8. Ahilya sangh Yojana 9. Satyasmruti 10. General Knowledge Bank 11. Bhaartiya Bhasha sangam 12. Institute of study of five continents 13. Aapatti Nivarak Dal. (A.A.D.M.)
|
nandini, mala itka kalta ki patrakaracha kam he keval batmya chhapnyacha nahi ... they are like guiding stars for the people, they will make people aware of the truths... and tell them about all the things happening around them.. in few words something like 'janajagruti'.. because they have such powerful medium of communication with them...and i guess when they become reporters it becomes their self accepted responsibility to do so ...correct if i am wrong ... and if it is true then who is saying no for carrying out your responsibility ... put facts in front of all people for Bapu is fraud ... they will accept ... isnt it?? do u believe in god?? if yes then if someone tells you prove that there is god and what he has done for you... and whatever good has happened is because of him only and no other reason ... will you be able to do that?? if yes you will be the first one in the whole world to do so ... and i will also be very happy for it ... also, for a matter of fact I have a friend who is journalist and i know the kind of work he does ... may be i relate to jornalism more through him .. so asked whether jouralists really have so much time and immaturity to write BBs rather than presenting facts
|
Mansmi18
| |
| Wednesday, April 18, 2007 - 2:10 pm: |
| 
|
च्या, महेश बर्याच दिवसानी एक समतोल विचार या वर दिसला. असा विचार जर सर्वानी केला तर या वर जी मारामारी सुरु होति ति कमी होइल. बापुभक्ताना विनन्ती, इथे जे लोक बापुन्च्या विरोधात लिहित आहेत ते बहुतेक आयुश्यात अतिशय यशस्वी, कर्तबगार, ज्ञानी आणि ज्याना देवाची किन्वा गुरुन्ची आवश्यकता नाही असे सर्वज्ञ आहेत त्यामुळे त्याना पटवायला गेलात तर ते शक्य होणार नाही त्यामुळे त्यान्ची उत्तरे त्यानच शोधु द्यात. मला तरी वाटते कि तुम्हाला तुमच्या गुरुन्वरील श्रद्धेचे स्पष्टीकरण कोणाला द्यायची गरज नाही. धन्यवाद.
|
नामी आणि स्वप्ना नाईक, तुम्हा बापु भक्तांना एक नम्र विनंति! कृपा करून आपले प्रांजळ विचार माय मराठीतुन मांडलेत तर आम्हा मायबोलीकरांवर फ़ार उपकार होतिल.काय आहे! आम्हा पामरांना तुमचे उच्चप्रतिचे ईंग्रजी जरा कळायला अवघड जाते. मायबोलीवर मराठीचा वापर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे असलेले बहुदा सगळेच मायबोलीकर करतात तेंव्हा तो तुम्ही देखिल करावात हि विनंति. आणि आपली मते आणि विचार जितक्या प्रभाविपणे आपण आपल्या मातृभाषेतुन मांडू शकतो तितके ते आंग्ल भाषेत मांडता येत नाहि असे निदान माझे तरी मत आहे आणि आपल्या मातृभाषेचे संवर्धन करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे आद्य कर्तव्य आहे.तुम्ही देखिल ते कर्तव्य या पुढे बजावाल अशी आशा करते. मॉड हे पोस्ट आक्षेपार्ह असल्यास उडवु शकता. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Peshawa
| |
| Wednesday, April 18, 2007 - 3:59 pm: |
| 
|
सगळ्यात शेवटी एका दुसर्या द्रुष्टीनी विचार केला... जे लोक केवळ बापु व त्यान्च्या भक्ताना नावे ठेवत आहे तेच दुसर्या धर्मातील जसे "मदर टेरेसा" याना पण नावे ठेवतील का? त्यान्चा तर मिडिया मधे नेहमी उदो उदो चालतो.>>> इथे गफ़लत होते आहे... त्या बाइने कधी ती येसु कीम्व इतर कुणाची अवतार आहे असे तर सांगितले नाही तिचे मोठेपण तीने कमावलेले आहे... पुन्हा तिचे भक्तही तसा प्रचार करत नाहीत... संत होण्यासाठि आधि कर्म करणे अपेक्षित नाही का? लोक संत म्हणतात ते जिवनाचरण पाहून बापु overnight संत झाले म्हणुन त्यांचे संतपण न पटणारे आहे... पुन्हा सद्गुरू होण्यामागे साधना लागते ती बापुनी केली असे आहे का? समर्थानी १२ वर्शे पुर्श्चरण केले.. ज्ञानेश्वरानी जे अवघ्या २३-२६ वर्शात भोगले त्यातले किटि बपुंन्नी बघितले? बुद्धाने सत्यासाठि जे भोगले त्यातले काही अंश तरी बापुनी भोगले काय? अर्थात अत्मसाक्शात्कर हा किती भोगले ह्यावर अवलंबुन नसतो पण तो झलेला साक्शात्कार खरा आहे का नाही हे पहाण्यासाठि त्याला तर्काच्या व त्या पुदएहि अनेक प्रकारे घासावे लागते ते बापुनी केले हे कसे ठरवायचे? कसे मानायचे? कुणाचा अवतार म्हणुन मिळालेले संतपण म्हणुनच स्विकारण्यास अवगढ आहे... infact हा आध्यत्मिक plagerism आहे इथे भक्ताचे तार्तम्य मह्त्वाचे आहे... मला वाटते ही भक्तांच्या तार्तम्याबाबत चर्चा आहे... आणि इथे अनेकाना वरील बाबी खेरिज भक्तांच्या बापु marketing strategy वर आक्शेप आहे...ते भक्त amway चे agent असल्यासारखे वागतात हा प्रोब्लेम जास्त आहे :-) बाकी अनिरुद्ध भोंदु आहे की नाही हे थरवायला काही अध्यत्मिक मार्ग आहे की नाही माहीत नाही पण अनिरुद्ध भोंदु नाही हे केवळ जिवनाचरणातूनच तो सिद्ध करू शकतो... so lets see सध्या तरी त्याला दिलेले मोठेपण अवाजवी आहे असे माझे मत आहे... अनेक कल्याणकारी योजना followers च्या जोरावर राबवणारा उत्तम प्रशासक आहे असे म्हणणे आणि त्याला संतभगवंत म्हणणे ह्यात भरपूर फ़रक आहे असे म्या पामराला वाटते...
|
Prafull
| |
| Wednesday, April 18, 2007 - 6:39 pm: |
| 
|
सद्ग़ुरु हा साक्षात परब्रह्म असतो, तेव्हा त्याचे शिष्य त्याला रामाचा किवा ईतर कोणाचा अवतार मानत असतील तर गैर काहीच नाही. तेवढी श्रद्धा नसेल तर भक्ती कठिण. मात्र सद्ग़ुरु स्वीकारण्याआधी त्याची पारख करणे जरूरी आहे. स्वामी विवेकानन्दानी सद्ग़ुरुची लक्षणे सान्गितली आहेत त्यामधले महत्वाचे लक्षण म्हणजे सद्ग़ुरु मागे गुरुशिष्य परम्परा असते. त्याचे मुख्य कारण हे की ब्रह्मज्ञान हे पुस्तक वाचुन किंवा स्वप्रयत्ने शक्य नाही. त्यासाठी ब्रह्मज्ञानी सद्ग़ुरुची गरज असते. ब्रह्मज्ञानाची ज्योत गुरु-शिष्य परंपरा जीवंत ठेवते. रामाला सुद्धा वसिष्ठांकडे जावे लागले होते. तेव्हा आपापला सद्ग़ुरु ह्या कसोटीत ऊतरतो की नाही हे प्रत्येकाने पहावे. ( Above comments are general in nature and not intended for any specific group of followers )
|
Chyayla
| |
| Wednesday, April 18, 2007 - 6:47 pm: |
| 
|
पेशवा गफ़लतीबद्दल थोडेसे, मदर टेरेसा च्या प्रार्थनेमुळे रोगी बरा होतो, कुणी तरी कंसर मुक्त होतो असा प्रचार करुन त्याना Saint म्हणुन मान्यता देण्याचा खटाटोप चर्चने चालवला होता हे कदाचित तुम्हाला माहित नसावे. बाकी तुमचे ते Amway चे एजेन्ट सारखे वागण्याचा मुद्दा मान्य. पण त्यान्च्यामधेही असला प्रकार वेगळ्या स्वरुपात चालतो नव्हे जोरदार चालतो, ते आपल्या लक्षात येत नाही पण हॉस्पिटल मधे जाणे, रोग्याच्या घरी जाउन येशु तुम्हाला मुक्ती देइल असे म्हणुन प्रार्थना करणे हे प्रकार सर्रास चालतात ही त्यान्ची Marketing Strategy च आहे ना. माझे म्हणणे असे की निदान बापुभक्त तरी असे प्रकार करत नाही. याबद्दल तुम्हालाही आक्षेप नसावा... असो थोडे विशयान्तर झाले खरे. महेश, मनस्मी तुम्हाला धन्स, मी आपला प्रयत्न करतो... (साळसुद पणाचा स्मायली)
|
Mansmi18
| |
| Wednesday, April 18, 2007 - 7:29 pm: |
| 
|
एक दुरुस्ती. सन्त ज्ञानेश्वरानी वयाच्या २१ व्या वर्षी सन्जीवन समाधी घेतली.
|
Mansmi18
| |
| Wednesday, April 18, 2007 - 7:49 pm: |
| 
|
प्रफ़ुल्ल, अप्रतिम पोस्ट. अगदी थोडक्या शब्दात सुन्दर वर्णन. पेशवे, तुमचे पोस्ट हे अतिशय विचाराने लिहिले आहे. तुमचे बरेच मुद्धे अतिशय व्यवस्थित लिहिले आहेत. फ़क्त एक ग़ोष्ट जरा खटकली म्हणुन लिहित आहे.(हे केवळ माझे विचार आहेत बर का..काही लोक मी सुचना जरी केली तरी उपदेश समजतात म्हणुन हे स्पष्टीकरण). तुम्ही बापुन्चा उल्लेख एकेरी आणि थोड्याशा अनादराने केला आहे. बापु देव्सन्तभगवन्त आहेत कि नाही हा वादाचा मुद्दा थोडा वेळ बाजुला ठेवा. डॉ. अनिरुद्ध जोशी वयाने ५६ वर्शाचे आहेत. त्यान्चे शिक्षण एम डी पर्यन्त झाले आहे. ते शिक्षणाने आणि वयाने थोर आहेत. त्यामुळे त्यान्चा उल्लेख एकेरि वाचुन थोडे ठीक नाही वाटले. एकन्दरीत चर्चा चान्गली होते आहे. धन्यवाद.
|
च्यायला, प्रफुल आणि पेशवा.. छान मुद्दे मांडलेत. बापुंचे गुरु कोण किंवा त्यांना काही साक्षात्कार झाला आहे का, याबद्दल कधीच उल्लेख केला जात नाही. मी आधि म्हटल्याप्रमाणे दाभोळ्कर कुटुंबियांनी certify केल्याने ते साईबाबांचा अवतार म्हणुन प्रसिद्ध झाले. मदर टेरेसा आणि धर्मांतर हा वेगळा चर्चेचा विषय होउ शकेल. नामीने उल्लेख केलेल्या योजना चांगल्याच आहेत. पण बर्याच सामाजिक संस्था हे कार्य करत असतात.. कुठल्याही बापुंशिवाय!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|