|
Ajjuka
| |
| Monday, April 16, 2007 - 4:59 pm: |
| 
|
आयला खरंच की रे सव्व्या... मी आपलं सध्याचं ते आहे ना बुड्डा (ढ नाही ड च) होगा तेरा बाप चं गाणं आहे ना.. मेरा भारत जवान त्या चालीवर लिहिलं होतं..
|
The hair oil which made in bappa’s factory given hopes to chemotherapy patients who gained soft, shiny and healthy hair instead of getting bald, can you prove it medically?? While attending Bapu’s pravachan there are different types of VIP passes Can you tell us why thus discremination among the bhaktas???? मी आधीही हे विचारलय की दाभोळकर कुटुंबियांची साक्ष का काढतात हे लोक? दाभोळकरांनी certify केल म्हणुन जोशी डॉक्टर बापु झाले काय? आणि बापु जर स्वत:ला देव मानत नाहीत तर "तु आणि मी मिळुन शक्य नाही असे या जागात काहीही नाही" यातील मी कोण?? हा अहंकार नाही का??
|
भ्रमर साहेब मग एक सांगता का तुम्ही अक्कलकोट स्वामींना पण अहंकारी म्हणाल का? ते सुद्धा म्हणतात ना 'भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे'.... अशक्य असणारी आमची कामे बापूंच्या आशिर्वादाने अगदी सहज पणे होत आहेत. हा अनुभव बापूंच्या प्रत्येक भक्ताला आहे. अणि आमचा बापुंच्या या वचनावर पुर्ण विश्वास आहे.
|
स्वप्नाताई, तुम्ही कोणाची तुलना करत आहात??? हरवलेले हॉल तिकीट सापडणे, रीक्षाचं हरवलेले license सापडणे ह्या अशक्य गोष्टी?? एव्हढे powerful ना बापु, मग loadshading नक्किच थांबवु शकतील ना? अशक्यच आहे ही गोष्ट.
|
Yoga
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:56 am: |
| 
|
this is link of Saicharitra by Hemadpant www.saileelas.org/books/sssm/index.htm
|
खुप छान प्रश्न्न आहे. तुमच्या प्रश्न्नाचे उत्तर द्यायला माझ्याकडे पण एक प्रश्न्न आहे. श्रीरामाने रामायण का नाही थांबवले? श्रीकृष्णाने महाभारत का नाही थांबवले? हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या प्रश्न्नांची उत्तरं मिळालीच की.....
|
Princess
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:16 am: |
| 
|
I agree we all talk about our bapu where ever we go, we can’t stop telling others about bapu, and why we should not talk about him, because all the time we feel his protection wherever we go,we feel his presence,though our most of the wishes are not fulfilled, but we feel his love within our heart all the time that means our intension is not that ,only our bappa is grate and others are fake, it is our desire which we can’t control when we talk about our bapu, हे मात्र अगदी खरय. इतके बोलतात हे लोक... थांबता थांबत नाहीत. समोरच्याला आवडतय की नाही, याचा काही एक विचार करत नाही. वरची bapuskid यांची पोस्ट वाचुन तर दु:ख, खेद, आश्चर्य सगळे काही वाटले.काय बोलणार सगळे पोस्ट्स वाचुन वाईट तर वाटतेच आहे की या बुवाबाजीने किती खोलवर परिणाम केलाय. आनंद एकच की मायबोलीवर बुवाबाजीला विरोध होतोय. हे ही नसे थोडके...
|
Naami
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:29 am: |
| 
|
श्रीसाईसच्चरित... भक्तप्रिय परमात्मा साईंच सच्चरित. साईंच्या भक्तांचं आ-चरित. हा गोपाळ्-गोविन्द साई आपल्या द्वारकामाइत कसा वावरला-बागडला, त्याचं चरित. हिरे-रत्न-माणकांची खाणच जनू. म्हटलं तर हे एक प्रवासवर्णन आहे... भक्तिमार्गावर मार्गक्रमणा करणार्यांच्या नितांत सुंदर प्रेमप्रवासाचं साईसच्चरित विरचलेल्या हेमाडपंतांनी गुरुमार्गावर पाउल ठेवण्याआधीचे आपल्या मनात गुरुविषयी आलेले संशय्-विकल्प, इथ्पासून सुरुवात करुन ते निवळल्यावर गुरुमार्गावर दृढ होईपर्यंतचा आपला प्रवासही ह्यात मनमोकळेपणने वर्णन केलेला आहे. ह्या हिर्यांच्या खाणीतला एक अनमोल लखलखता हिरा म्हणजे अकरावा अध्याय रुद्राध्याय. रुद्र म्हणजे पावित्र्याचं रक्षण करणारा, वाईट प्रवृत्तींना-मनोवृत्तींना कठोर शासन करुन चांगल्यात बदलणारा, पंचमहाभुतांवरही सत्ता चालणारा, इतकंच नव्हे, तर भक्तांचं रक्षन करण्यासाठी प्रसंगी पंचमहाभूतांचे नियमही बदलणारा परमशिवच. ह्याच्या सुरुवातीलाच हेमाडपंत म्हणतात की 'हा गोड गुरुकथेचा सुहावा| वाटले साईचरणी वहावा|| खरंच गुरु इतकं गोड ह्या जगात दुसरं काय असणार? पाण ज्याप्रमाणे 'साखर गोड असते' हे एखाद्या साखर त्यापूर्वी कधीही न चाखलेल्याच्य कानीकपाळी ओरडूनहि, साखर प्रत्यक्षात चाखल्यशिवाय त्याला कळू शकत नाही, तशीच ह्या गुरुमार्गाची गोडी सद्गुरुचरणी शरण गेल्याशिवाय चाखत येत नाही. ज्याने एकदा का ह्या गुरुमार्गाच अनुभव घेतला, तो मात्र 'गुळ ना तो सोडी, तुटो मुंडी" ह्या मुंगीच्या आचरणाप्रमाणे सद्गुरुचरणांना घट्ट हृदयात धारण करतो, मग काय वाट्टेल ते होवो. एकदा ह्या परमात्म्याची, माझ्या सद्गुरुची खूण पटल्यावर मग मीसुद्धा त्याचं बोट दृढ धरुन ठेवलं पाहिजे. कारण 'देव' 'देव' तो आणखी कसा असणार? तर माझ्या सद्गुरुसारखाच.
|
अच्छा म्हणजे बापुना तुम्ही राम कृष्णाच्या पंक्तीमधे बसवु पहाताय तर!
|
Naami
| |
| Tuesday, April 17, 2007 - 10:50 am: |
| 
|
आपण नेहमी एक वाक्य ऐकतो, 'मला गाता येत नाही' किंवा 'मला गायला जमत नाही'. तसेच 'मला नाचता येत नाही' किंवा 'मला नाचणे जमत नाही'. अगदी शंभरातील नव्वद माणसांची खात्री असते की ते काही गायक नाहीत. परंतु ह्याचा अर्थ एकच कि ह्या माणसांना सुरात गाता ये नाही किंवा ते सुरात गाण्यास शिकलेले नाहीत. परंतु हे सूर किंवा बेसूर स्थळ, काळ व दिशेनुसार उलट पुलटदेखील होउ शक्तात, हे मात्र कोणीच विचारात घेत नाही. अगदी भसाड्या आवाजात गाणारी एक स्त्रिसुद्धा तेवढ्याच बेसूर आवाजात आपल्या लाडक्या बाळला मांडीवर घेऊन अत्यंत प्रेमाने थोपटत थोपटत अंगाई गीत म्हणू लागते, तेव्हा त्या बाळासाठी ती जगातील सर्वश्रेष्ठ गायिका असते. ह्या ठिकाणी जगातील सर्वोत्कृष्ठ गायिकेने त्या बाळासमोर बसून तेच अंगाईगीत अत्यंत सुरेल आवाजात गायले तर बाळ झोपणे लांबच राहिले, किंचाळून रडायला लागेल. त्याचप्रमाणे अत्यंत सुरेल आवाज असणाही पत्नी भांड्याची आपटाआपट करत व बोटे कड्कडा मोड्ण्याचा ताल धरून आपल्य नवर्याशी अहोरात्र भांडत राहिली, तर त्या पतीस ते सुरेल वा मंजुळ वाटेल काय? नक्कीच नाही. एखद्या डोक्टरने अगदी अत्यंत सुंदर आवाजात व पूर्ण शास्त्रशुद्धरित्या गाऊन समोर बसलेल्या पेशंटला सांगितले की 'मला काही तुझी धडगत दिसत नाही. तुला खूप मोठा रोग झालेला आहे', तर काय त्या पेशंटला त्या सुरेल आवाजामुळे आनंदाच्या उकळ्य फुटतील? नक्कीच नाही. उलट अत्यंत घोगर्या आवाजात पण प्रेमळपणे समजावणीच्या स्वरात जर अनुभवी डोक्टरने, 'तुमचा आजार गंभीर आहे परंतु आपण विशेषज्ञांची मदत घेउन जोरदार प्रयास करु इ उपाय शोधू' असे सांगितले, तर त्या पेशंटला ते नक्कीच अधिक मंजुळ वाटेल. ह्या सर्वांचा अर्थ असा नव्हे की सुरेल आणि मंजूळ गायन काही कामाचे नाही. परंतु वरील सर्व उदाहरणांतून एक अत्यंत सुंदर सत्य प्रतीत होते की मानवी जीवनामधे संगीताच्या सर्व प्रकारांमध्ये प्रेम व आपुलकीच्या सुरांचे स्थान सर्वोच्च आहे. ह्याचाच अर्थ, फक्त संगीताच्याच क्षेत्रात नव्हे तर मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये 'शास्त्रशुध्द्ता' व 'कडक शिस्तबद्धता' ह्यांपेक्षाही प्रेमातून उत्पन्न होणारी स्वकर्तव्यपालनाची तत्परता केवळ अधिक मधुरच नव्हे तर अत्यंत आवश्यकही असते.
|
भ्रमर साहेब मी कोण पंक्तीत बसवणारी? तुम्ही माझ्या प्रश्न्नाचं उत्तर टाळलंत.... त्याची वाट पहाते आहे... मग बघु आपण बापू किंवा अजून कोणीही भारनियमनाबद्दल काही करू शकते का... कदाचित तुम्हीच काही करू शकत असाल
|
Naami
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:24 am: |
| 
|
श्रीसाईचरित्रामध्ये जोरजोरात ओरडून व तेही कर्कश स्वरात, भजन करणार्या रोहिल्याची कथा हेमाडपंत ह्यासाठीच सविस्तरपणे भक्तांसमोर मांडतात व साईबाबांचा संदेश अत्यंत स्पष्ट शब्दांत भक्तांच्या हृदयात उतरवितात की ह्या साईला 'भजन' प्रिय आहे, त्या भजनामागील भाव साई ओळखतो व म्हणूनच साईंन तो रोहिला प्रिय असतो. ह्याच श्रीसाईसच्चरितामध्ये तर्खडांच्या कथेमध्येही बाबा स्पष्टपणे दाखवून देतात की केवळ दर्शनी कवायत मला मान्य नाही तर सरळं अंत्:करणाचे कुतर्कविरहित भाबडे प्रेमच मला अधिक मान्य आहे. स्वत्: भगवान श्रीकृष्णही सांगतात, "मद्भक्ता: यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद्|| - हे नारदा, जिथे जिथे म्हणून माझे भक्त गात असतात म्हणजेच भजन कहीत असतात, तेथेच मी उभा असतो." भगवान श्रीकृष्ण कुथेही असे सांगत नाहीत की जिथे संगीतविशारद सुंदरपणे गात असतात तिथे मी निवास करून असतो. 'मद्भक्त' ह्यमथ्येच सर्वकाहि आहे. साक्षात भगवंताने आपल्या वैखरी वाणीतून हजारो वर्षांपुर्वीच उच्चारलेले हे शब्द विसरणे म्हणजे भगवंतालाच विसरणे होय. भगवंताचा नामगजर करताना किंवा अभंग गाताना आम्हाला जर स्वत्:ला नीट सुरेलपणे गाता येत नसेल तर आम्ही उगीचच्या उगीच माईक हातात घेऊन इतरांच्या कानांचे पडदे नक्कीच फोडू नयेत. परंतु जिथे भगवंताचे अनेक भक्त मिळून व एकत्र येउन गजर किंवा भजन गात आहेत, तिथे मुक्तकंठाने व उच्चस्वरात त्यांच्याबरोबर गाणे अत्यंत श्रेयस्कर आहे. कारण त्यामुळे प्रत्येक जण भजन किंवा गजर स्वत्: गाण्याचा आनंद मनमुराद लुटू शकतो व त्या आनंदामुळे त्याची भक्ती अधिकाधिक बहरून त्याच्या प्रार्थना सफल होउ लागतात. मित्रांनो, भगवंताच्या कानांना वैखरी वाणीच्या सुरांची तालबद्धता व शास्त्रशुद्धता ह्यांच्याशी काही विशेष देणेघेणे नाही तर त्या सुरांमागील मध्यमा व पश्यन्ती वाणीमधील म्हणजेच मानवाच्या अंत्:करणातील मधुर व तालबद्ध भावगीताची व भावपदन्यासाची आवड आहे. (अग्रलेख 'प्रत्यक्ष' - अनिरुद्ध)
|
Princess
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:47 am: |
| 
|
नामी, तुम्ही लिहिलेल्या सगळ्या पोस्ट्स पैकी एक पटले मला: तुम्ही लिहिले आहे की एखद्या डोक्टरने अगदी अत्यंत सुंदर आवाजात व पूर्ण शास्त्रशुद्धरित्या गाऊन समोर बसलेल्या पेशंटला सांगितले की 'मला काही तुझी धडगत दिसत नाही. तुला खूप मोठा रोग झालेला आहे', तर काय त्या पेशंटला त्या सुरेल आवाजामुळे आनंदाच्या उकळ्य फुटतील? नक्कीच नाही. उलट अत्यंत घोगर्या आवाजात पण प्रेमळपणे समजावणीच्या स्वरात जर अनुभवी डोक्टरने, 'तुमचा आजार गंभीर आहे परंतु आपण विशेषज्ञांची मदत घेउन जोरदार प्रयास करु इ उपाय शोधू' असे सांगितले, तर त्या पेशंटला ते नक्कीच अधिक मंजुळ वाटेल. माझे मत असे डॉक्टरचे काय काम आहे हे माहिती आहे तर तुम्हाला. एक डॉक्टर भसाड्या किंवा सुरेल आवाजात आजाराबद्दल बोलला तर तो नक्कीच डॉक्टर वाटेल याउलट जर एखाद्या डॉक्टरने मीच राम, मीच कृष्ण, मीच साईबाबा असे सांगितले तर काय वाटेल याचा विचार नक्की करा. आज भारताला बुवा आणि बापु पेक्षा डॉक्टर्सची अधिक गरज आहे. एक मेडिकलची सीट नासवुन अनिरुद्ध जोशीनी कोणाचेतरी डॉक्टर बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. आज ते जे काही करताय ते डॉक्टर न बनता अगदी शाळेत न जाता सुद्धा करु शकले असते. त्यांच्या मागे जाणार्याना त्यांच्या शिक्षणाने नक्कीच फरक पडला नसता. पण त्यंच्या मुळे समाजाने एक डॉक्टर गमावला आहे.
|
Princess
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:53 am: |
| 
|
स्वप्ना, भ्रमाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिले तरी चालेल. प्रश्न तुम्ही विचारलाय उत्तरही असेल तुमच्या जवळ. रामाने आणि कृष्णाने जे काही केलेय त्यातले कुठले काम तुमचे गुरु करु शकतील, सांगाल का?
|
Neelu_n
| |
| Tuesday, April 17, 2007 - 12:15 pm: |
| 
|
>>तुमच्या प्रश्न्नाचे उत्तर द्यायला माझ्याकडे पण एक प्रश्न्न आहे. श्रीरामाने रामायण का नाही थांबवले? श्रीकृष्णाने महाभारत का नाही थांबवले? स्वप्नाजी राम आणि कृष्न यांना जरी आपण देवाचे अवतार मानत असलो तरी रामायण महाभारतातील स्वत्:चे मनुष्यपण मान्य करुन त्यांनी मनुष्याच्या वाट्याला येणारी सुख दु:ख आणि जन्मानुसार मिळणारे भोग मान्य केले होते. मला अशक्य काही नाही असे ते कधी बोलल्याचे वाचनात नाही. अर्थात अजुन कुणाच्या वाचनात असेल तर इथे जरुर नमुद करावे. पण बापुंनी "तु आणि मी मिळुन शक्य नाही असे या जागात काहीही नाही" असे म्हटल्याबरोबर आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या अपेक्षा वाढतात ना. BTW मिलिंदा तुझ्या म्हणण्याप्रमाणे खरच हे भारनियमन बापुंच्या कृपेने बंद करणे शक्य झाले तर फारच बरं होइल.
|
प्रिंसेस आणि नीलू, नीलू अगदी बरोबर म्हणालीस, मनुष्याच्या जन्माला आल्यावर त्यानुसार मिळणारे भोग पण आलेच आणि 'मर्यादा' पण आल्याच. जेव्हा मर्यादेचे उल्लंघन होते तेव्हा तिथे दुष्परिणाम पण आलेच. आपण मानव म्हणुन आपल्या मर्यादा पाळल्या असत्या तर भारनियमन करायची गरज उरली असती का? ज्या मानवाला देवाने सर्वात श्रेष्ठ बनवले त्याने सर्व पर्यावरण बिघडवुन ठेवले तर तो देव काय आपला नोकर आहे सर्व आपल्याला पाहीजे तसं करुन द्यायला? जसे करावे तसे भरावे हा त्या परमेश्वराचा नियम आहे आणि तो स्वत्: पण यास अपवाद ठरत नाही. अजुन काय बोलू. तुम्ही सर्व मंडळी माझ्यापेक्शा सुज्ञ आहात.....
|
म्हणजे बापू पर्यावरणवादी सुद्धा आहेत?
|
Deshi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 4:25 pm: |
| 
|
Bapu never declared he is god, but we, all his kids call him as our god>>>>>> ज्यांना स्वत: ला देव काय आहे ते माहीत नाही ते दुसर्यानां तो देव आहे हे कसे ठरवु शकतात? आणि ते विष्णू चे फोटो त्यांनी का काढले असावेत? बापुज किड, स्व्प्ना नाईक, नामी जरा या प्रश्नाच उत्तर द्याल का?
|
Mahesh
| |
| Tuesday, April 17, 2007 - 4:58 pm: |
| 
|
अरे वा एका दिवसात चर्चा बरीच पुढे गेलेली दिसते. नामी वयाच्या मानाने तुमचे लिखाण आणी अभ्यास कौतुकास्पद आहे. आता जर यांना आधीच साईबाबांचे अवतार मानले जात आहे, तर अक्कलकोट स्वामींबरोबर तुलना म्हणजे काही विशेष गोष्ट नसावी. मला असे वाटते की त्या स्वामींनी स्वत्: म्हणले नसणार "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे". नंतर ते वाक्य कोणीतरी भक्तांनी प्रसिद्ध केले असेल. मला वाटतच नाही की जोशींचा सद्गुरू, अवतार, ई. असण्या एवढा अभ्यास अधिकार असेल. सत्यसाईबाबा बद्दलही माझे हेच मत आहे की त्यांचा एवढा अभ्यास अधिकार असेल असे वाटत नाही. पुर्वीचे खरे संत, महंत, ई. लोक समाजात मोठमोठे आर्थिक उद्योग उभारत होते असे ऐकिवात नाही. उलट ते भौतिक सुखांपासून दूर असत. फारतर स्वत्:चा संसार निट करत होते. मला तर असे वाटते की जोशींनी सुरूवातीला साधे सामाजिक समुपदेशन ( couselling ) करायला सुरूवात केली असेल, आणी त्याला पुढे वेगवेगळी दिशा मिळून आजच्या संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले असेल. असो हे असे संप्रदाय जर खरेच काही समाज विधायक करत असतील तर त्यांचे असणे आक्षेपार्ह असण्याचे कारण नाही. पण ते तपासून पहाणे हे समाजातल्या प्रत्येक सुज्ञ घटकाचे कर्तव्य आहे.
|
Princess
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:12 pm: |
| 
|
स्वप्ना, आपण माझ्या प्रश्नाचे उतर दिले नाही. राम आणि कृष्णाच्या रांगेत बसण्यासारखे कोणते काम जोशीनी केले आहे, सांगाल का?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|