|
>>>>>> महाराज, वैशालीला, LT ला या लिस्ट मधे टाकलतर, चालेल का?   एल्ट्या चालणार नाही रे बाबा! का उगा त्यान्च्या पोटात गोळा उठवतोहेस?????? DDD
|
Peshawa
| |
| Saturday, January 27, 2007 - 8:39 am: |
| 
|
LT अरे लोक बापुंचे व्यक्ती महात्म्यच सांगत आहेत. अज्जुकाने केलेली सगळि posts बघ, बापु नावाचे परब्रह्म जसे ज्याला दिसले तसे त्याने त्याच्या कुवती प्रमाणे लिहिले. आता बापु दहा हातांचे दिसतात का अफ़रातफ़र करणारे Doctor दिसतात? अस प्रेमळ संवाद भक्तांमधे चालाला आहे. प्रत्येकाची भक्ती करायची रीत सारखी कशी असेल? ह्या भक्त संवादाला V & C म्हणणे शो ना हो चु भु दे घे मित्र सावट सत्य शोधणे म्हणजे कुत्र्या सारखे आपल्याच शेपटिच्या मागे तिला पकडण्यासाठि धावणे आणि असे शेपुट पकडण्यासाठी जो धावतो तो मुमुक्षु...
|
>>>>>> वत्सा जसे बापुंनी स्वत्:ला विश्णु म्हटल्याने फ़रक पडत नाही तसे बापुना सहस्त्र शिव्या देण्यानेही काही फ़रक पडणे आपेक्षित नाही. अरे बाबा देऊदेत की शिव्या, शिव्या काय की ओव्या काय, सगळ सारखच! पण स्थळकाळाच भान हव की नको? की घरात सकाळचा चा भुरके मारीत मारीत पीत असताना पेपरमधी बाप्पुन्चा फोटु दिसला नी मस्तकातली शीर तडतड उडावी आणि घरातल्या दिवाणखान्यात सोफ्यावर बसुन हातवारे करीत बापुन्ना कोण शिव्या घालत असेल तर आमची कुणाची काय हरकत असणार? पण तशाच प्रकारे इथे मायबोलीवर या "विभागात" असल शिव्यान्च सहस्रावर्तन कितपत सयुक्तीक हे? असली आवर्तने करायला V&C नाही हे का? बाकी चालू द्या तुमच........! अन जाता जाता मला पण शिव्या घालायच्या असल्यास माझी त्यास फुल्ल परवानगी हे......... कारण मला हापिसातले बहुतेकजण "बुवा" म्हणुनच ओळखतात......! बुवा म्हणुनच हाक मारतात! तरी बरऽ, त्यान्ना मी नेमका कशाचा अवतार हे ते ठावुक सान्गितल नाही हे! DDD
|
Zakasrao
| |
| Saturday, January 27, 2007 - 9:17 am: |
| 
|
अरे भांडण करु नका बापुंना त्रास होइल. शांतता राखा पाहू. Shhh.............
|
>>>>>> मित्र सावट सत्य शोधणे म्हणजे कुत्र्या सारखे आपल्याच शेपटिच्या मागे तिला पकडण्यासाठि धावणे आणि असे शेपुट पकडण्यासाठी जो धावतो तो मुमुक्षु... हे वर्णन "अर्धसत्य" हे. जो कुत्र्यासारख आपलच शेपुट सत्य समजुन पकडण्याच्या प्रयत्नात रिन्गण न धरता कपाळाच्या मध्ये दोन डोळ्यान्च्या वर जिथे शन्कराचा तिसरा डोळा कल्पिला हे तिथे असलेल्या सत्याचे शेपुट पकडु पहातो, तो मुमुक्षू! बाकीचे........! जावुदे...!
|
Saavat
| |
| Saturday, January 27, 2007 - 10:17 am: |
| 
|
>>>>>> मित्र सावट सत्य शोधणे म्हणजे कुत्र्या सारखे आपल्याच शेपटिच्या मागे तिला पकडण्यासाठि धावणे आणि असे शेपुट पकडण्यासाठी जो धावतो तो मुमुक्षु... दोस्ता, तुझी 'मुमुक्षू' ची व्याख्या आवडली, पण LT प्रमाणे अर्धीच पटली, कुत्र्याचे प्रयत्न आणि माणसाचे प्रयत्न यात टोकाचा फ़रक आहे. बर ते जाऊदे, माझ म्हणन एवढच आहे की वैशालींना काय म्हणायच आहे, ते आपण ऐकूण घ्याव, काय माहीत शेपूट सापडेल.
|
Zakasrao
| |
| Thursday, February 01, 2007 - 7:04 am: |
| 
|
बघा LT व सावट, बापुंचा महिमा अगाध आहे. बापुंना त्रास होइल असे लिहिल्यावर मंडळी शांत झाली. बोला बापुंचा विजय असो. 
|
Mahesh
| |
| Friday, February 02, 2007 - 4:22 am: |
| 
|
शांतता होईल नाही तर काय ? आजकाल आपल्याकडे ( आमच्या श्रद्धा, भावना आहेत, तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या ) ही प्रवृत्ती फार वाढली आहे. त्यामुळे पुढे कसली चर्चा होऊच शकत नाही, आणी मग समाजात खरे काय खोटे काय, चांगले काय वाईट काय हे कळणे कठिण होते. त्याचा परिणाम अनिष्ट प्रवृती वाढतात. अर्थात मी हे बापूंबद्दल लिहित नसुन सामान्यपणे सर्व बाबतीत लिहित आहे. त्यामुळे कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये ही विनंती. सांगायचा मुद्दा हा की आम्हाला असे वाटते आणी आम्ही असेच करणार ही प्रवृत्ती योग्य नाही. जे काही करत असु ते खरच योग्य आहे की नाही हे तपासुन तरी पहावे. असो, यावर कोणी उत्तर लिहिले तरी आनंद नाही लिहिले तरी आनंद. हा मेसेज उडवला गेला तरी आनंद.
|
Mrinmayee
| |
| Friday, February 02, 2007 - 1:57 pm: |
| 
|
यावर कोणी उत्तर लिहिले तरी आनंद नाही लिहिले तरी आनंद. हा मेसेज उडवला गेला तरी आनंद.. महेश, आता तुला 'बापु' म्हणावसं वाटु लागलंय!
|
Hi all, I joined maayboli just a while ago ... and read through all the posts about Bapu. I am a follower of Bapu and I want to say here is ... not even a single time till now Bapu has said he is God. He always said he is common man like us. Its uptp every individual to belive in Bapu / no. But I feel as a human being we should have atleast some decency when we post our opinion publicly. If tomorrow someone comes up and starts speaking about your dear ones like this will you like it?? I guess there has to be more disciplin in way of communication of some people here...
|
I guess there has to be more disciplin in way of communication of some people here... ====================== काय हे? कुठे गेले सगळे.. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती?
|
Zakki
| |
| Monday, March 12, 2007 - 2:36 pm: |
| 
|
अहो ते एव्हढे फाड फाड विंग्रजीत लिहीलेले वाचून समजायला जरा वेळ लागणारच ना! तेंव्हा धीर धरी, धीर धरी!
|
Mahesh
| |
| Tuesday, March 13, 2007 - 2:50 am: |
| 
|
विंग्रजी काय अन् मराठी काय वाचायला वेळ होत नव्हता कामामुळे. आणी या ईकडे परत कोणी लिहित नसेल म्हणून पहाणे झाले नाही. या आधी ज्यांनी हा बोर्ड सुरू केला त्यांना खरे काय ते सांगा असे म्हणालो होतो, पण त्यांनी चिडून काही लिहिणार नाही असे ठरविले. असो, तर स्वप्ना, आता तुम्ही सांगा की खरे काय आहे. जर बापूंनी स्वत्: असे कधी म्हणले नाही तर हा असा प्रचार वाढला कसा ? व्यक्तीला आणी तिच्या कार्याला मानणे हे मान्य आहे पण दैवीकरण आणी व्यापारी गोष्टींचे स्तोम का ? मी केवळ टिका करण्यासाठी लिहित नाहीये. मला खरच उत्सुकता आहे.
|
Hi Mahesh... really dont get time to write in marathi ... aplyakade lokshahi ahe ... tyamule pratyekala bolnyache ani aple vichar vyakta karayche swatantrya ahe ... bapunni swatahachi kadhich publicity keli nahi.. tyani pravachan karayla survat keli tenva 10 chya war lokanahi tyanchya baddal mahit navta. Pan tithe yenarya pratyek vyaktila kahi na kahi anubhav alach ahe tyamule aaj tikade yenaryanchi sankhya 10 warun lakhanparyanta geli ahe ... ani anubhav mhanje angara kadhna, kavlyachi kombdi karana ase nahit ... he chamatkar mhanje aplya ayushyat badal ghadavun annare... malahi swatahat asach farak janavto ... bapunkade janyapurvichi me and aajchi me ... khup farak ahe ... 'शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती? ' mhanna soppa ahe ... pan aplyatle kiti jana ashi konachi madat karaylahi mage pudhe pahat nahit? ani asa facta mhanun kay fayda ahe? tumchya shur panacha samajala pan kahi fayda hou de ki ... apan sagle jan devala manto ... pan sankat ala ki facta dev ahe asa manana aplya samanya mansansathi puresa nasta. Aplyala devachi murti kinva photo lagtoch na? pratyekachya purse madhe ganpaticha photo miltoch na? tasach ahe ... bapundade yenarya pratyekalahi jar asach watla tar tyat wawga kay ahe? bapu swataha sagla provide kar nahit ... tyanchyawar purna shraddha asnara koni manus ya goshtincha business karat nahi... tumhala facta yach goshtincha stom dista pan tyanni chalavlele anek upakram disat nahit .. afva pasaravnare khup astat and tya pasrayla welahi lagat nahi... I suggest jyana bapunbaddal itka doubt ahe tyani ekda Bandra la 'Sai Nivas' la jaun yava... 'Sai Nivas' mhanje jyani Sai Charitra lihila tya Hemadpanta / Dabholkar yanche ghar.. tyanche natu appa dabholkar tikade rahatat. Tyana jarur bheta ... pratyaksha Sai Babanchya sahavasat asleli mansa ahet tikade ... tynachyashi bollyawar tumchya anek prashnana uttara miltil..
|
Mahesh
| |
| Tuesday, March 13, 2007 - 5:07 am: |
| 
|
धन्यवाद, आत्ता लगेच मला मोठा मेसेज लिहिता येणार नाही, पण लवकरच लिहिन. तोपर्यंत अजुन काही सविस्तर लिहू शकलात तर बरे होईल.
|
नक्की लिहीन मराठीतच लिहीन मला जितका माहित आहे
|
Mahesh
| |
| Saturday, March 17, 2007 - 4:24 am: |
| 
|
मी आधीच्या मेसेजमधे लिहिले आहेच, तर आता जरा सविस्तर सांगा पाहू. वर बरेच जणांनी लिहिलेले बरेच मुद्दे तुम्ही वाचले आहेतच. तर त्याबद्दल काय सांगू शकाल ? विशेषत: समाजकार्याच्या व्यापारीकरणाबद्दल. अवताराबद्दल मला खात्री आहे की ते स्वत: तसे काही म्हणत नसणार. त्यावरही मला प्रश्न आहेतच, पण ते नंतर विचारतो. मला खालील गोष्टींबद्दल खुपच उत्सुकता आहे. १. अनिरुद्ध जोशींचे वय काय आहे ? २. त्यांची background काय आहे कौटुंबिक, शैक्षणिक, ई. (डॉक्टर आहेत हे माहिती आहे पण त्याव्यतिरिक्त माहिती. त्यांच्या घरात आधी कोणी समाजकार्यात होते किंवा काय त्यांना लहानपणापासुनच कार्याची आवड होती, ई.) ३. त्यांनी समाजकार्य केव्हापासून सुरु केले ? ४. या कार्याची व्याप्ती काय आहे ? म्हणजे काय काय कार्य चालते ? आणी कुठे कुठे आहे ? ५. त्यांच्या कार्याचा आणी ईतर सामाजिक, राजकीय संस्थांशी संबंध येतो का ? मी केवळ विरोध करायचा म्हणून विचारतो आहे असे नाहीये. तर समाजकार्यात मोठे असणार्यांबद्दल मला नेहेमीच जिज्ञासा आहे.
|
Mahesh
| |
| Monday, March 19, 2007 - 3:45 am: |
| 
|
झक्की पण डोकावले नाहीत ईकडे. त्यामुळे माझे मलाच म्हणावे लागेल, धीर धरी, धीर धरी
|
महेश, कामाच्या व्यापात वेळ मिळत नाही लिहायला. इतकी उत्तर लिहायची म्हणजे जरा वेळ लागेल.
|
आयला... गेले कुठे सगळे जण...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|