|
काही काळाने बुवाच्या भजनि लागण्याचे व्यसनच लागते म्हणा ना! ही माणसे मग आयुष्यातील लहान सहान गोष्टी साठी सुद्धा मग बुवा वर अवलंबुन रहातात. उदा. अनिरुद्ध बापुच्या एका भक्ताने "माझे रेशन कार्ड हरवले, मी बापुंचे स्मरण केले आणि ते मला मिळले" असं लिहिलं होतं. आता बोला. आणि हेच भक्त चमत्कारांच्या पुड्या सोडतात. होतं काय कि एखादा एक पुडी सोडतो. मग दुसर्याला वाटात की आपण नाही बोललो तर मागे राहु. मग तोही एक पुडि सोडतो! आणि मग चमत्कारी बुवांचा जन्म होतो!
|
आपल्या भारतात वादविवाद, चर्चा, व्यख्यानसत्रे आणि परिसंवाद अगदि प्राचीन काळापासून आजतगायत सर्वत्र झडत असतात आणि तेही अगदी यच्चयावत कुठल्याही विषयावर. लग्न कुणाचे लागते? वराचे वधुशी की वधुचे वराशी? ह्या विषयावरसुद्धा तासन्तास परीसंवाद फक्त भारतातच होऊ शकतो आणि शेवटी निर्णय न होताच परिसंवाद संपविला जातो, तो नवीनच दोन परिसंवादांना जन्म देत. कुणाचेच कुणाशी लग्न होत नाही आणी दोघांचेही एकमेकांशी लग्न होते, असे दोन चातुर्यसंपन्न निष्कर्ष निघून परत वादावादीस सुरुवात होते. 'वाद' किंवा 'चर्चा' ह्या गोंडस नावाखाली मग मधेच कुणीतरी लग्न संस्थेलाच आव्हान देतो व मग परत नवीन चर्चा सुरू होते. लग्न करावे की करु नये? 'लग्न करु नये' असे म्हणणार्यांचा पक्ष, 'लग्न करावेच' असे म्हणणार्यांच्या पक्षाशी भांडत असतानाच त्य प्रत्येक पक्षामधे परत प्रत्येकी दोन गट पदतात. 'लग्न करु नये' म्हणणार्यां गटामध्ये एक गट म्हणतो 'लग्नाबिग्न काहि न करता सरळ विवाह्बाह्य संबंध ठेवावेत' तर दुसरा गट म्हणतो कि 'प्रत्येकाने ब्रह्मचर्यच पाळावे'; तर 'लग्न करावे' असे म्हणणार्या गटात एक उपगट म्हणतो की 'लग्न करावे व निभावून न्यावे' तर दुसरा उपगट म्हणतो की 'लग्न ओन्त्रcत पद्धतीने करावे'. आता मूळ वादाचा विष्य बाजूलाच राहून नवीन आठ वाद सुरू होतात आणि मग ह्या अठाचे चौसष्ट होण्यास वेळ लागत नाही. (उर्वरीत भाग नंतर)
|
Pillu
| |
| Tuesday, January 23, 2007 - 1:01 pm: |
| 
|
आज्जुका महेश, वैशाली मी आजच या( भोंदु बापुंच्या) साईट वर आलोय आजुका तुज़े आभार मानावे तेव्ह्ढे कमीच आहे. महेश आगे बढो खरे तर या प्रकरणला वाचा फुट्ली हे बरेच झाले. आज काल या मानवी स्वत्:ला समजण्यारा महान संताचा प्रचंड ऊदो उदो चालु आहे. आसाराम बापु,नरेंद्र महाराज नारायणपुरचे नारायण महाराज (शी यांना महाराज म्हणायला सुद्दा लाज वाटते) असे किती तरी महारांजांची चलती ईथे वैशाली ताईं सारखे भक्त डोळ्यांवर पट्टी बांधुन गांधारी व ध्रुतराष्ट्र चे अवतार अस्लेले लोंकामुळे बिनदिक्कत चालु आहेत. या महाराज लोकांना एसी रुम शिवाय रहाता येत नाही. विमाना शिवाय फिरता येत नाही. देनगी दिल्या शिवाय दर्शन देता येत नाही चमच्यांशीवाय तर जगुच शकत नाहीत. एक वेळ श्वास मिळाला नाही तरी चालेल हे महाराज अस्ल्या मुळे ते तो फुकट घेऊ शकतात (त्यावर कर नाही ना) पण चमचे मंडळी जर नस्तील तर हे. ऽऽऽऽऽ संपलेच सारे. माझी सख्खी काकु यांची प्रचंड भक्त होती. दोनच महीन्यांपुर्वी तीचे निधन झाले. हि बिचारी शेवट पर्यंत बापुंचे दर्शन जवळुन होईल या आशेवर जगली पण दर्शन काही होऊ शकले नाही. कारण ऐकायचय का कातर म्हणे माझ्या काकुच्या अंगावर प्रचंड कोड होते ना याचा त्रास बापुंना होतो. तिचे आधिच्या जन्मीचे पाप फिट्ले की बापु हिला दर्शन देनार होते जसे काही पाप पुण्याचा हिशोब ठेवणारे यांच्या घरचे नोकरच ना. पण खरे कारण वेगळे होते.ति बापुन्च्या चरणी हवी तेव्हढी दक्षिणा देऊ शकत नव्हती. अजुन बरेच काही लिहिता येईल.पण वेळे अभावी हे लिहिता येईना कोनी म्हणेल की तुमची काकु गेली म्हणुन तुम्ही हे चिडुन लिहित आहात पण तीची शेवटची तगमग पाहीला स्वत:ला ईश्वरी अवतार समजणार्या त्या बापुला तिची हाक ऐकु आली नाही का तिचे दुख्ख कन्वाळु म्हणवण्यार्या त्या बापुला दिसले नाहीका. का हिचे कोड असलेले शरीर ते बरे करु शकत नव्हते का का तिच्या अर्धांग वायु झालेल्या मुलाला ते बरे करु शकत नव्हते का. एकमेव आधार अस्लेल्या तिचे कुंकु ते वाचवु शकले नाहीत का. असे हजार प्रशन ते या डोळे बांधलेल्या समाजा पुढे आहेत हेच बापु मधी मुंबईतला भयंकर रेल्वेस्फोत वाचवु शकले असतेना. आहेत का या प्रश्नांची उत्तरे या मानवी देवा कदे वा त्यांच्या भक्तांकडे
|
अशा प्रकारचे हास्यास्पद वादविवाद व परिसंवाद भारतात गेल्या शतकभरात तर मोठ्या प्रमाणावर बोकाळ्ले आहेत. ह्या परिसंवादांतून कधीच काहि निष्पन्न होत नसते. फक्त स्वत्:चा आवाज ऐकू एच्छिणार्या तथाकथित विचारवंतांची व नेत्यांची हौस भागते. तसेच असे व्यासपीठ न मिळ्णार्या अनेक सामान्य जनांचीही दुधाची तहान ताकावर भागवली जाते. ह्याचा अर्थ, चर्चासत्र किंवा परिसंवाद कुचकामी असतात असा मुळीच नाही. लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये तर अशा गोष्टींची नितांत आवश्यकता असते. राजकीयच काय परंतु सामाजिक व सांस्क्रूतिक प्रांतातही ह्यांची आवश्यकता असतेच. अगदी प्राचीन काळीही ऋषींच्या आश्रमामध्ये अशी चर्चासत्रे चालत असत परंतु त्यामध्ये एक अत्यंत श्रेष्ठ व आदरणीय ऋषी नि:पक्षपातीपणे प्रगट चिंतन करुन जे उचित तेच निर्णय म्हणून जाहीर करीत असे. मुख्य म्हणजे, एकदा का असा निर्णय जाहीर झाला की मग तो प्रत्येक पक्षावर बंधनकारक असे. त्या काळातही काही हटवादी मंड्ळी असतच. अशी मंडळी मग आपली स्वतंत्र चूल करण्याच्या मागे लागत. शक्यतो अशा मंडळींना विविध प्रकारे समजावून सांगून पुनर्मिलाप घडवून आणण्यात येई आणि असे सर्व प्रयास संपले की मग माअत्र अत्यंत कडकपणे अशा दुराग्रही व्यक्तींवर ऋषीसमाज बहिष्कार टाकीत असे. ह्या व्यवस्थेमुळे स्वार्थी व क्षुद्र मनाच्या लोभिष्ट व्यक्तींची कपटकारस्थाने कधिच तडीस जात नसत. अशा बहिष्क्रुत व्यक्तींससुद्धा त्यांच्या मताचा प्रचार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असे परंतु निर्लोभी ऋषिंच्या आश्रमांच्या साखळीमुळे अशा अनुचित प्रचारांना अगदी क्षुल्लकच पाठिंबा मिळू शकत असे. प्राचीन भारताची हीच मोठी शक्ती होती. संपुर्ण भारतीय समाज इ.स. १००० ते १९०० ह्या बुरसटलेल्या काळात जेवढा विभागलेला होता, त्याच्या दसपट भेद आज उत्पन्न झाले आहेत. हे असेच चालू राहिले तर भारताची औद्योगिक प्रगती व साक्षरता भारतास एकसंघ राष्ट्र म्हणुन बलवान करण्यात अपयशी ठरणार आहेत. फुटीरता हे नेहमीच मूठभर मंडळींच्या क्षुल्लक स्वार्थाचे अपत्य असते; पण एकदा का हे जन्मले की वाढते मात्र अत्यंत वेगाने. मित्रांनो, आम्ही सर्व भारतीय एक आहोत हे नुसते तोंडाने बोलून चालणार नाही. ते मनालाहि पटावयास हवे व त्यासाठी भेदांवर प्रकाशझोत न टाकता समानतेवर व सहकार्यावर टाकावयास हवा.
|
Mansmi18
| |
| Tuesday, January 23, 2007 - 8:56 pm: |
| 
|
Hello, Now I expect fireworks again from both sides I advise restraint to both the sides. Peace
|
Peshawa
| |
| Tuesday, January 23, 2007 - 9:03 pm: |
| 
|
वैशालि आपण जे लिहिताय त्याचा बापुंशी काय संबंध हे कळाले नाही. आपण बापुंन्न मानता म्हणुनच आप्ल्याकडुन त्यांच्या विशयी जास्त माहीती मिळणे अपेक्षित आहे. भारतिय समाज पुर्वि कसा होता हे वेगळ्या BB वर बोलता येइलच की.
|
वैशाली तुम्ही मस्तच लिहिल आहे. पण त्याचा संबध बापु शी काय आहे. वर कोणीतरी लिहिले की बापु स्वत तसे म्हणत नाहीत मग ते फोटो का काढतात.की त्यांना ही या प्रसिध्दी वर स्वार होऊन विष्णू व्ह्यवे वाटले?
|
Mansmi18
| |
| Tuesday, January 23, 2007 - 9:12 pm: |
| 
|
Vaishali, Rather than (indirectly) calling names to those who oppose Bapu why dont you refute the charges/ answer simple questions that Bapu's detractors are asking. That will give your views more credibility. dont you think? Regards
|
पेशवा, केदार, मनस्मी, मी जे काही लिहीले आहे त्याचा बापूंशी अगदी १०८% संबंध आहे. तो कसा हे वेळ येताच नक्कीच सांगेन. सध्या इतकच पुरे. खरंतर, बापुंविषयी, त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारी मी कोणीच नाही. बापू आपले कार्य करत असता त्याचा कुठेही गाजावाजा करत नाहीत, म्हणूनच त्यांच्याविषयी अशा प्रतिक्रिया येऊ शकल्या. मित्रांनो, आपले आईवडील कसे आहेत, ते आपल्यासाठी काय काय करतात हे फक्त आपणच सांगू शकतो, त्याबद्द्ल आपला मित्र किंवा शेजारी नाही सांगू शकणार. तसेच इथे आहे. बापूंबद्द्ल काही लिहीणं हा माझा विषय नव्हता आणि नाही. मी आधीच म्ह्टल्याप्रमाणे ही मी बापु भक्तांसाठीच चालु केली होती. कारण जगाच्या कानाकोपर्यात असलेल्या भक्तांपर्यंत काही गोष्टी पोहोचत नाहीत, त्यांच्यासाठीच हा प्रयत्न होता. परंतु काही घडण्याआधीच त्यचा बाऊ झाला. असो, प्रत्येकाने माझ्या मताशी सहमत असावंच असं नाही. ज्याला जे पटतं ते त्याने करावं. उदा. एखाद्याला संगीत आवडतं म्हणून त्याने संगिताचा क्लास लावला किंवा एखादं संगीत ऐकलं म्हणून त्याला कोणी सांगितलं हे वाईट आहे, तरी त्याला त्यातून समाधान मिळत असेल आणि खरंच ते चांगलं असेल तर काय वाईट आहे. आपण आपली इच्छा त्याच्यावर लादणं किती योग्य आहे. बापू माझा सदगुरु आहे आणि माझा देवही. साईचरित्रामध्ये हेमाडपंतांनी सांगितलं आहे की, गुरु साक्षात देवच. तो का आणि कसा हे फक्त मलाच माहीत आहे आणि प्रत्येक बापूभक्त हे अनुभवत आहे.
|
Mahesh
| |
| Thursday, January 25, 2007 - 7:58 am: |
| 
|
मी जरी काही मेसेजेस मधे बापू आणी कार्याविषयी विरोधी लिहिले असले तरी माझा विरोध कार्याला नसून केल्या जाणार्या अवडंबराला आहे. मला जाणून घेण्याची उत्सुकता आहे, म्हणुनच तुमचा पहिला मेसेज दिसताच मी लगेच माहिती विचारली. पण लगेचच विरोधी चर्चा सुरू झाली. त्यावर कोणीतरी बाजूने लिहिणारे पुढे येईल असे वाटत होते. पण तुम्ही " मी काय लिहिणार ?" असे म्हणत आहात. तुमची कळकळ रास्त असेलही. पण जर तुम्ही माहिती सांगितली नाहीत तर विरोध करणार्या लोकांना कळणार तरी कसे ?
|
रीलिजन मधे व्यक्ती मधे बापून्चा बीबी........! पण मग इथे पहिल्यापासून V&C का? (वरल्या पोस्ट्स ना मी "चर्चा" म्हणु शकत नाही... व जी चर्चा(???) हे ती V&C मधेच शोभुन दिसेल) असला अगोचर पणा आपण नवता बुवा केव्हा केला! (मी काय "सटकलेला" "केतकर" हे का? की बामणान्च्या अधिवेशनात जावुन त्यान्ना "जात" विसरायला सान्गायचा उद्धटपणा केल्यासारख लिहायला बोलायला??? आणि तेही "ब्राह्मण्य" मान्य करीत? ) DDD ज्यान्ना बापून्च आणि एकुणच "असल्या" "साधू सन्त बैरागी" वगैरे ढोन्गी पुरुष व बायान्वर टीका करायची असेल तर V&C वर नव्याने बीबी उघडता येत नाही का? मॉड्स, कुठ हाऽऽऽत? अनिरुद्ध बापू विषयी सोडुन अन्य सर्व "अहम ब्रह्मास्मी" पोस्ट्स V&C वर योग्य बीबी उघडुन तिकडे हलवाल का?
|
Krushna
| |
| Thursday, January 25, 2007 - 11:39 am: |
| 
|
Hi all i have joined maayboli few days back.but i was really shocked by the statements from all who have no belive on Shri.Anirudha Bapu.Though i am not his shishya.i believe in saibaba. vaishali wants to share the things with all of us but some people had taken it wrong way.i am with vaishali. one thing i knew very well u belive in a stone as a guru it will help you a lot as GURU in life is very mportant and without guru everything is impossible.I know what is Saibaba so if somebody says wrong abt baba it really bad coz if u dont belive then pl DONT COMMENT ON THIS......... I REQUEST TO VAISHALI PL LET US KNOW MORE ABT BAPU AND HIS TEACHINGS..... THOSE WHO DONT WANT TO KNOW PL DONT DO YOUR COMMENTS ON THAT.....
|
कृष्णा, public forum याचा अर्थ तो Public साठी असतो, आणि त्यावर लोक त्यांना बरोबर वाटेल ते लिहिणारच.. इंग्लिश मध्ये म्हण आहे 'You opened the Door' ...
|
Saavat
| |
| Thursday, January 25, 2007 - 5:42 pm: |
| 
|
>>>आपले युवराज बरेच Confused आहेत... 'दुसर्याला मारू नका' हा स्वच्छ इशारा त्यांना कळत नाही विनय, हे वाक्य तुझच आहे, smoking च्या संदर्भात लिहलेल. ते इथे लागू होईल का? काय आहे 'शब्दाची धार, तलवारीपेक्षा धारधार असते' अस जाणकार म्हणतात! त्यामुळेच 'सुसंस्कृत माणस' शब्द जपून वापरतात.सिगारेटच्या धुरापेक्षा, भयंकर प्रकार आहे हा. दगडात देव शोधणारे आम्हीच, इतरात देव बघणारे आम्हीच, फ़ोटोतल्या काल्पनिक चित्राला देव म्हणणारे आम्हीच, तो फोटो B.B. वर टाकायला धडपडणारे आम्हीच, देवावर आपला भार टाकू नये,अस म्हणणारे आम्हीच, परत देव निराकार असतो, सगळीकडे पसरलाय,अस शेवटी म्हणणारे आम्हीच. मग एखाद्याने मी म्हणजे 'ब्रम्ह(विष्णु)' म्हंटले तर 'नक्की' काय बिघडते, हे मला कळल नाही.कोणी जाणकार असेल तर अवश्य सांगा, please! नाहीतर वैशालींना त्यांच काम करू द्यावे, ही नम्र विनंती!!
|
Saavat तुम्ही हा BB नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल, की मी बापू, व्यक्ती किंवा भक्ती चांगले अगर वाईट यावर बोलत नाही आहे... फक्त २ fact सांगितल्या.. त्यातली पहिली (विष्णूचे अवतार) कुणीतरी लिंक देऊन दाखवली आहेच.. दुसरी वरची Public Forum बद्दल आहे... (जी सगळ्याच BB बद्दल खरी आहे..) (नवीन आलेल्या कृष्णाला हे लक्षात आलं नसेल म्हणून) त्यामुळे 'मी कुणाला मारत आहे, किंवा जगू देत नाही आहे' असं मला वाटत नाही, आणि तुम्हालाही वाटू नये... बाकी तुमचं चालू द्या... 
|
Mansmi18
| |
| Thursday, January 25, 2007 - 10:32 pm: |
| 
|
mitraanno, he maaze shevatache posT aahe ya vishayaavarache. yaanantar mee ithe posT karnar nahi. pan kahi goshti sangavyashya vaaTalyaa mhanun lihit aahe. Ethe Bapunchya viruddha lihinare sagale nastik aahet ka? ani tyancha swatachya kartrutvavar eetka vishwas aahe ka ki te konatyahi devala manat nahit? Ase lok asatail tar tyanche mat shirasavandya. Pan mee nahi evadha confident. Mala devache/guruche sahayya lagate. Mee Devalat jato, Sri Ganeshavar maza thaam vishwas aahe. To kasa aala mee nahi sangu shaknar. Ata mee mhanalo ki mazi shraddhach sreshta aahe ya bapunchya bhaktapeksha tar te barobar tharel ka? Mazi ti shraddha ani yanchi andhashraddha he mhanane kitpat yogya aahe? Mee konachi tulana karat nahi pan etar je sant zale aahet Sri saibaba, Sri gajanan maharaj, swami samartha tyanche bhakta pan andhashraddha ase apan mhanu ka? Shevati ha shraddhecha prashna zala. Jar koni sheshashayee bapuncha photvar shraddha theun anandi hot asel tar tyala murkha ani andhashraddha mhanane kitpat yogya aahe. Ha BB bapunchya Bhaktanni banavala aahe tyavar apan yeun bapu kasa khota aahe he sangane (vicharswatantrya lakhsat gheunahi) kitpat yogya aahe? Mage ya bord var mee Bapubhaktana avahan kele hote ki tyanni tyanchi baju mandavi pan mala vatate te chukiche hote. Mee he visaralo ki Apan apalya shraddhebaddal konalahi answerable nahi aahot. Rahata rahila bapunchya fasavafasavicha prashna tar mala nahi vatat ajakalachi pidhi itki andhashraddha asel ki te andhalepanane konavar vishwas thevatil. Jar ya bapunche gairvyavahar asate tar TEHELKA ne ughadakila analyashivaya rahile aste ka? anyways, if I offended anyone here I apologize. regards
|
बापु विरोधातली ही सगळी गम्मत मी माझ्या मावशीला वाचुन दाखवणार आहे बघु तीच्यात काही फ़रक पडतो का?
|
Peshawa
| |
| Friday, January 26, 2007 - 10:58 pm: |
| 
|
मग एखाद्याने मी म्हणजे 'ब्रम्ह(विष्णु)' म्हंटले तर 'नक्की' काय बिघडते, हे मला कळल नाही.कोणी जाणकार असेल तर अवश्य सांगा, please! >>> वत्सा जसे बापुंनी स्वत्:ला विश्णु म्हटल्याने फ़रक पडत नाही तसे बापुना सहस्त्र शिव्या देण्यानेही काही फ़रक पडणे आपेक्षित नाही. अज्जुका, बापु, विश्णु, दुक्कर, तु आणि मी ही एकाच परम तत्वाची रुपे नाहीत काय? किंबहुना एकच परमतत्व नाहीत काय? त्यामुळे कोण कोणाला काय म्हणाले कसे म्हणाले कधी म्हणाले ह्याचा मुमुक्षू म्हणुन तु विचार करू नयेस...\ सधाना करावी (शेजारी असेल तर चोरून भेटावे) आणि अंतीम सत्याचे रुप ओळखावे. हे अण्तीम सत्य बापु आहे काय अशी साधी चर्चा इथे चालु आहे... म्हणजे परमतत्व आत्मचिंतनात गुंतले आहे आणि आपले बापु हे रुप खरे आहे का ह्यावर स्वत्:शीच वाद्विवाद करत आहे... असे समज
|
Saavat
| |
| Saturday, January 27, 2007 - 6:36 am: |
| 
|
>>>त्यामुळे कोण कोणाला काय म्हणाले कसे म्हणाले कधी म्हणाले ह्याचा मुमुक्षू म्हणुन तु विचार करू नयेस...\ _/\_ धन्य झालो महाराज! आपली कृपा अशीच राहू द्यावी, या पामरावर! तुमच्या म्हणण्याप्रमाणे, आता नाही विचार करणार, पण त्याच्या अगोदर जरा 'मुमुक्षू' म्हणजे नक्की काय प्रकार आहे यावर आपण उपदेश करावा, अशी नम्र विंनती आहे महाराज आपल्याला. आपलि अंतिम कृपा लवकरातलवकर लाभो, अशी विंनती तुम्हि शोधत असलेल्या, पुढे कधीतरी तुम्हाला सापडणार्या, अंतीम सत्याकडे करावी म्हणतो.सापडल तर अवश्य कळवावे महाराज. >>>अज्जुका, बापु, विश्णु, दुक्कर, तु आणि मी ही एकाच परम तत्वाची रुपे नाहीत काय? किंबहुना एकच परमतत्व नाहीत काय? महाराज, वैशालीला, LT ला या लिस्ट मधे टाकलतर, चालेल का?
|
मला अजुन एक कळत नाही की हा विभाग V&C चा नाही तर धार्मिक विषयान्तर्गत व्यक्तीमाहात्म्याचा हे तर इथे च येवुन "बापू" कसा "नालायक" हे हे पचकायची काय गरज हे? त्यासाठी V&C विभाग हे ना? मी बापुला काळा की गोरा बघितला नाही, पण एखाद्याने असा बीबी उघडल्याबरोब्बर आपल्या वैचारीक स्वातन्तयाचा दुरुपयोग करीत V&C वर जावुन टीका न करता धार्मिक विभागात येवुनच आपली पाचकळ नास्तिक मतान्सहीत गिधाडाप्रमाणे बापुन्वर आणि त्यान्च्या भक्तान्वर (आणि मायबोलीकर वाचकान्वरही) तुटुन का बरे पडताहेत???? मॉड्स झोपलेत की सुट्टीवर गेलेत लॉऽऽऽन्ग वीकेण्डच्या?????? DDD इथल्या बहुतेक पोस्ट्स V&C वर हलवायच्या "लायकीच्या" हेत! हव तर या नास्तिकान्ना टीकेकरता एक छानसा विभाग उघडून द्या! बसूदेत तिथे ठणाणा करीत......!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|