देव्हार्यात देव ठेवताना कोणत्या दिशेला ठेवावेत? पूर्व पश्चिम असावेत हे माहीत आहे. पण काही कारणाने जर शक्य नसेल आणि दक्षिण उत्तर ठेवायचे झाल्यास कसे ठेवावेत? म्हणजे देवांच facing उत्तरेला ठेवायच का? की पूजा करणार्याचे facing उत्तरेला असावे?
|
Zakki
| |
| Saturday, October 14, 2006 - 3:40 pm: |
|
|
मी बाळकृष्णाची नविन मूर्ती आणली आहे. तिची प्राणप्रतिष्ठा कशी करतात? श्री सत्यनारायणाच्या पूजेच्या सुरुवातीला करून मग तीच मूर्ती पुजेला घेतली तर चालेल का? प्राणप्रतिष्ठेचे मंत्र व विधी काय? कृपया ही माहिती द्यावी. धन्यवाद.
|
कृपया लवकर सांगा. urgent आहे.
|
लॉजिक वापरुन, पुजा करणाराच तोन्ड उत्तरेकडे व देव दक्षिणाभीमुखी असुदेत! शक्य झाल्यास या दक्षिणाभीमुखी देवघरात हनुमानाची तसबीर किन्वा मुर्ति जरुर असु द्यावी! झक्की तुमच्या प्रश्णाच उत्तर मला येत नाही
|
Vinya
| |
| Sunday, October 15, 2006 - 10:48 am: |
|
|
असे म्हणतात की देव सर्व दिशांमधे भरला आहे. कुठल्याही दिशेला ठेवेनात का? किंवा न ठेवेनात का? काय फरक पडणार आहे.
|
जाहिद,शराब पीने दे मसजिदमे बैठ कर.. या फिर वह जगह दिखा दे जहां खुदा ना हो...
|
नामदेवांचे गुरु विसोबा खेचर नामदेवांची या ना त्या प्रकारे परिक्षा घेत आणि त्याना ज्ञान देत. एकदा नामदेव महादेवाच्या दर्शनाला देवळात गेले असता एक अत्यन्त वृद्ध मनुष्य आपले पाय महादेवाच्या पिन्डीवर ठेऊन आरामात पहुडला होता. ते पाहून नामदेवांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि ते म्हणाले'अरे थेरड्या तुला कळत नाही का हा देव आहे आणि खुशाल तू पाय पिन्डिवर टाकून पडलायस? पाय काढ आधी! वृद्धाने उत्तर दिले'अरे बाबा माझ्या अन्गात पाय उचलून बाजूला ठेवण्याचेही त्राण नाही. तूच आता माझे पाय बाजूला ठेव!" नामदेवानी त्याचे पाय उचलून बाजूला ठेवले अन काय आश्चर्य? त्या पायाखाली पुन्हा पिंड आली. नामदेवानी पुन्हा पाय उचलून दुसरीकडे ठेवले तर पुन्हा पिन्ड पायाखाली! नामदेवानी सगळ्या दिशेला पाय ठेऊन पाहिले पण प्रत्येक वेळी तेच! मग नामदेवाना शंका आली हा काही साधा सुधा म्हातारा दिसत नाही.. त्यानी त्यांचे पाय धरले आणि क्षमायाचना केली. ते त्यांचे गुरू विसोबा खेचरच होते! त्यानी नामदेवाला सांगितले'बा नामदेवा, परमेश्वर सर्वत्र वास करीत असतो हे सांगण्यासाठी मीच हे सर्व नाटक केले!
|
बा रॉबिनहुडाऽऽ, परमेश्वर सगळीकडे वास करत असतो पण तो तुम्हासारख्या सन्तपदी पोचलेल्यान्साठी आमच्यासारख्या सामान्य जनान्साठी अजुन तरी तो देवघर आणि देवळात आणि जागा असलिच तर आमच्या हृदयात वास करीत असतो! हृदयात जागा तयार व्हावी म्हणुन हे बाकीचे उपचार! बाकी अजुन काही शन्का असतील तर हा विषय घेवुन व्ही आॅण्ड सी वर भेटा, कसे?
|
दुरुस्ती रॉबीनहुड ते गुरु न्हवते पण या प्रंसगा नंतर झाले. एकदा गोरोबा कुंभाराच्या घरी ज्ञानदेव गेले तिथे ते मडके तपासु लागले. सोपान देव किंवा मुक्ताई म्हणाल्या की आपले डोक्यावर काठी लावली असता आपले मडके पक्के आहे हे सांगु शकाल का? मग ज्ञानदेव प्रत्येकाचा डोक्यावर काठी वाजवु लागले. नामदेव तिथे होते ज्ञानदेवांनी त्यांचा डोक्यावर काठी ठोकली व म्हणाले हे मडके कच्चे आहे कारण तुम्हला गुरु नाही. नामदेवांनी विचारले गुरु कुठे आहे व कसा ओळखावा तर ज्ञानदेव म्हणाले वेळ येताच कळेल. काही दिवसानंतर नामदेव एका देवळात गेले तिथे एक म्हातारा पिंडीवर पाय ठेवुन झोपला होता मग तुम्ही सांगीतलेला भाग. अशा तर्हेने नामदेवांना गुरु मिळाला. ह्या विसोबा खेचंराना खेचर हे नाव कसे मिळाले ह्याची ही एक कथा आहे.
|
>>>> जाहिद,शराब पीने दे मसजिदमे बैठ कर.. च्यामारी, मशिद किन्वा मन्दीरात? आम्हाला गल्लोगल्ली असलेल्या मुतार्यात रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात! अशा काहो टाकतातकुठेही पिवून कुठेही? DDD >>> या फिर वह जगह दिखा दे जहां खुदा ना हो... अब्बे खुदाकी बात छोड, मला माणुसकीसहीत माणुस दाखवुन दे, नन्तर बोल खुदाफिदाच्या बाता
|
Zakki
| |
| Monday, October 16, 2006 - 12:51 pm: |
|
|
ओ, मियाँ रॉबिनहूड! हिंमत आहे का कुणा हरीच्या लालाची, (विशेषत: हिंदूच्या हरीच्या लालाची,) असे म्हणून मशीदित जाऊन शराब प्यायची? गाव पेटून निघेल! शराब पिऊन देव कुठे आहे ते सांगीतले ते पटते रॉबिनहूडला पण दारू पिऊन अंतिम सत्य, "जिंदगी ख्वाब है" ते पटत नाही! हटकेश्वर हटकेश्वर!
|
शर्मिला, देवघरात जर तुला पूर्व पश्चिम देव ठेवने जमत नसेल तर देवान्चे तोन्ड उत्तरेला करावे
|
कृपया लवकर सांगा. urgent आहे. ..... जर तू आधीच कुठल्यतरि दिशेल ठेवले असशिल अणि ती दिशा दक्शिन असेल तर क्र्रुपया change कर. कारण दक्शिन हि यमाचि दिशा आहे. अजुन एक, ईशान्य कोपर्र्यात देव घर असले तर उत्तम... पण जर नसेल तर atleast त्य दिशेला किन्व पूर्व दिशेला तोन्ड केले तरी चालते
|
मनकवडा! तुझ बरोबर हे! मी आत्ताच गुरुजीन्ना फोनवर विचारुन घेतल देवाच तोन्ड उत्तरेकडे करावे! पण पुजा करणार्याने पुजा करताना पुर्वेकडे तोन्ड करुन बसावे म्हणजे देव उजव्या हातास असतील व ताम्हनात देव काढल्यावर ते पुर्वपश्चिम असे असतील आधीच्या चुकीच्या "लॉजिक" बद्दल क्षमस्व! (लगेच फारस बिघडत नाही, पण माहित पडल्यावर तत्काळ योग्य बदल करावा) दुसर अस की दक्षिण किन्वा नैर्ह्युत्य दिशेस कशाचेच तोन्ड ठेवु नये नैर्ह्युत्येस तोन्ड करुन कर्ती व्यक्ती बसत असल्यास घरात वस्तु पुरवठ्यास पडत नाही असा सन्केत आहे पुन्हा एकदा, आधी दिलेल्या चुकीच्या माहिती बद्दल क्षमस्व! (च्यामारी, कधी नव्हे ती घाईगडबडीत चूक झाली)
|
लिम्बुटिम्बु, गुरुजीना विचारुन वेळेत बरोबर माहिती सान्गितल्याबद्दल आभारी आहोत.. हो, एकदम बरोबर अहे... दक्षिण or नैर्रुत्येला ठेवु नये आणि तिकदे तोन्ड करुन बसु पण नये.. कारण दक्षिण हि यमाचि तर नैर्रुत्य राक्षसचि दिशा होय
|
हे nairrutya कसे लिहायचे
|
Vinaydesai
| |
| Wednesday, October 18, 2006 - 12:41 pm: |
|
|
नैऋत्य = naiRitya असे लिहावे...
|
नैऋत्य जमले धन्यवाद विनय
|
Prajaktad
| |
| Thursday, October 19, 2006 - 3:04 pm: |
|
|
इथे एखादा दिशादर्शक चार्ट काढु शकेल का कुणि? म्हणजे नैऋत्य आणी ईशान्य दिशा कळेल..
|
हा असा चालेल का? बरोबर हे का?
|