Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 09, 2006

Hitguj » Religion » व्यक्ती » Shree Swami Samarth » Archive through October 09, 2006 « Previous Next »

Aschig
Friday, May 19, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा चांगला गुरु मिळाला की मग ठीक आहे, पण गुरु चांगला नाही मीळाला तर? पुर्ण आयुष्याचे नुकसान होवु शकते. गुरुच्या निवडीबद्दल येथील जाणकारांचे काय मत आहे?

Maudee
Friday, May 19, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरु कसा निवडावा हे तर मी सांगू शकत नाही.
पण असे म्हणतात की गुरु नेहमी पारख़ून घ्यावा.


Mrdmahesh
Friday, May 19, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर गुरु नशीबानेच मिळाले... पण त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांची शिकवण मला पटते आहे... खासकरून त्यांनी मला माझ्या अपघातानंतर जी मदत केली ती मी आयुष्यभर विसरू शकत नाही.... गुरु नेहमी आपला शिष्य अध्यात्मात पुढे कसा जाईल याचाच विचार करत असतात... प्रसंगी त्याची सांसारिक दु:खे कशी दूर होतील किंबहुना सांसारिक दु:खे सहन करण्याची शक्ती त्याला देऊन तो अध्यात्मात पुढे कसा जाईल हेच गुरु पहात असतात... त्याच्या अडचणीत त्याला मार्गदर्शन करुन त्याचा पुढील मार्ग सुकर करण्याचे काम गुरु करत असतात... माझे गुरु नेमके हेच करत असतात... मला वाटते तुम्ही ज्या गुरूंच्या सान्निध्यात आहात ते तुम्हाला अशी काही मदत करत असतील तर ते गुरु नक्कीच चांगले म्हटले पाहिजेत... गुरु कसा निवडावा हे सांगण्याचा माझा हेतू नाही... कारण माझी ती पात्रता नाही... गुरुंनी माझ्यासाठी जे केले तेच मी इथे सांगितले आहे... :-)

Swarajdas
Wednesday, May 31, 2006 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sarva Swami Bhaktana Namaskar,
Man asvastha hone aani vait vichar manat rengalane he upasanet kami padlyamule hote ka ?

Mrdmahesh
Thursday, June 01, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय,
मला तरी तसेच वाटते... उपासनेमुळे तुमचे मन स्थिर होण्यास मदत होते... स्थिर मनात अशा गोष्टींना थारा नसतो. क्वचित असे होणे ठीक आहे कारण मानवी स्वभाव लगेच बदलत नाही... परंतु असे विचार खूप वेळ रेंगाळणे, खूप वेळ मन अस्वस्थ रहाणे हे स्थिर मनाचे लक्षण नव्हे... आणि यामुळे जर इतर कार्यात जर अडथळे येत असतील तर ते आणखीनच वाईट...
असे होत असेल तर श्री स्वामींना विनंती करावी की माझे मन शांत होऊ देत, मनात वाईट विचार येऊ नयेत असे करा... त्याचवेळी आपली उपासना दृढ करण्याकडे प्रयत्न करावा... उदा. स्वामींचे जास्त जप करावेत... मन जास्तीत जास्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा... जास्तीत जास्त नामस्मरण करावे... आध्यात्मिक पुस्तके अथवा संतांची चरित्रे वाचावीत... मनात नेहमी स्वामींचे विचार / स्वरूप आणण्याचा प्रयत्न करावा... सतत स्वामींच्या / गुरुंच्या / स्वामी भक्तांच्या सान्निध्यात रहाण्याचा प्रयत्न करावा.
तसे करण्यासारखे बरेच असू शकते... मी यथामतीने सांगितले... चुकीचे सांगितले असेल तर क्षमा असावी व चूक दुरुस्त करावी...
||श्री स्वामी समर्थ||


Swarajdas
Thursday, June 01, 2006 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tumche uttar yogyach aahe. Chuk tar nakkich naahi. Dhanyavaad.
Shree Swami Samarth Jai Jai


Prashantnk
Saturday, July 22, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ//

१)स्वामी समर्थांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून रहावे.

२)व्यवहार हा प्रारब्धा नुसार होतो,परमार्थ करावा लागतो.

३)गुरु-शिष्य सन्बन्ध हे ऋणानुबंधाचे असतात.

४)देवाच काही कराव अस वाटण हि त्याचीच कृपा असते.

५)स्वामी समर्थ माझी आई,मजला ठाव द्यावा पायी.

६)किन्तुपरन्तु,जर-तर सोडा स्वामीना शरण जा, लाखो आले-गेले,आपणही जाणार आहोत,बरोबर फ़क्त स्वामी-नामच शेवटपर्यन्त असेल. (कलीयुगात नामस्मरणच तारेल.)

७) तुम्ही त्याच्याकडे एक पावुल चाला,तो तुमच्याकडे दहा चालेल.

//श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ//


Prashantnk
Wednesday, July 26, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//

माझा उपाय किंचित/ स्वसामर्थे न चले येथे/
कांहीं करोनि निमित्त्/ मज तारावें समर्था//


Prashantnk
Sunday, August 13, 2006 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//

भगवान श्री दत्तात्रेय-श्री स्वामी समर्थ महाराज परंपरा--

भगवान श्रीदत्तात्रेय


राजाधिराज सद्ग़ुरु श्रीस्वामी समर्थ महाराज
अक्कलकोटकर


१)प.पू.श्री बीडकर महाराज (पुणे),

२)प.पू.श्री शंकर महाराज (धनकवडी,पुणे)

३)प.पू.श्री नारायणभट्ट सोनटक्के महाराज़ (पुणे)

४)प.पू.श्री गजानन महाराज(शेगाव)

५)प.पू.श्री बाळाप्पा महाराज (अक्कलकोट)


Prashantnk
Sunday, August 13, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//

स्वामींनी अक्कलकोटला देह सोडल्या नंतर त्यांच्याच आज्ञेनुसार नर्मदा प्रदक्षिणा करित असणार्‍या व ह्या देह सोडल्याच्या बातमीने व्यथित झालेल्या श्री प.पू.श्री बीडकर महाराजांच्या स्वप्नामधे दर्शन देऊन सांगीतले की,

'हम गया नही, जिंदा है.'

श्री स्वामींच्या ह्या सत्संकल्पानुसार, आजच्याजिवनातही लाखो भक्तांना अनुभव येत आहेत.सर्व स्वामीभक्तांना सांगायची आंनदाची गोष्ट म्हणजे, ह्या अनुभवांच संकलन हि "ब्रम्हांडनायकाचे मोती"या नावाने,श्री स्वामीनामधारक यांनी केले आहे.मी त्याचे आतापर्यंत ७ भाग वाचले आहेत व ते माझ्या संग्रहि ही आहेत.

माझ्यामते हे महेशना माहित असाव,कारण ते धनकवडीला रहातात.


Mrdmahesh
Monday, August 14, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत,
मला याबद्दल काहीही माहिती नाही... मी धनकवडी ला रहाण्याचा आणि हे माहित असण्याचा संबंध कळाला नाही..
हे सगळे भाग कुठे विकत मिळतील? धनकवडी, पद्मावती किंवा अप्पा बळवंत चौकात कुठे मिळतील?


Prashantnk
Monday, August 14, 2006 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//
महेश,
हि सगळी पुस्तके प.पू.श्री शंकर महाराजांचा जो धनकवडीला मठ आहे,तिथ मिळतात.सर्व स्वामीभक्तांनी अवश्य वाचावीत.प.पू.श्री शंकर महाराजांची प्रत्यक्ष समाधी धनकवडीला आहे.

अजुन एक पुस्तक, कै.जी.के.प्रधान (प.पू.श्री शंकर महाराजांचे शिष्य)यानी लिहलेल.मुळ पुस्तक इंग्रजी मधे आहे. नाव आहे Towards The Silver Crest Of Himalaya. याचा मराठी अनुवाद हि आहे. नाव आहे "साद देती हिमशिखरे." हे पुस्तक एक अध्यात्मक कादंबरि आहे.थोडी महाग आहे परंतु श्री स्वामी प्रेमींच्या संग्रही असाव अस आहे. हे पण तीथेच मिळेल.



Maudee
Wednesday, August 16, 2006 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थन्क्ष प्रशांत.

साद देती हिमशिख़रे हे पुस्तक कितीतरी वेळ माझ्या समोर आले पण मला वाटले ते trek वर वगैरे असाव आणि तो काही माझा प्रांत नाही म्हणु मी दुर्लक्ष करत होते....आता नक्की घेईन वाचायला.
पुन्हा एकदा धन्यवाद:-)


Mrdmahesh
Wednesday, August 16, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत,
मी शंकर महाराजांच्या मठात खूपदा गेलो आहे पण तिथे पुस्तके विकताना कोणाला पाहिले नाही.. असो परत एकदा पाहीन...
साद देती हिमशिखरे हे पुस्तक मी गेल्या रविवारीच पाहिले आहे परंतु ते वचण्यास एकाने घेतले त्यामुळे त्यात नेमके काय आहे हे समजले नाही... पण मी ते नक्कीच वाचणार आहे..
तुम्ही संगितलेली पुस्तके पण घेईन..


Prashantnk
Friday, August 18, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ//

निशंक हो, निर्भय हो मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठिशी रे,
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी,
अशक्य ही शक्य करतील,स्वामी.


Prashantnk
Sunday, August 20, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ//

जीथे स्वामी पाय,तीथे न्युन्य काय,
स्वयं भक्त प्रारब्ध,घडवी ही माय,
आज्ञे विना काळ ना नेइ त्याला,
परलोकीही ना भिती तयाला.


Mai
Friday, September 08, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगाचि भितोसि भय हे पळु दे
जवळी उभी स्वामी शक्ति कळु दे
जगी जन्म-मृत्यू असे खेळ ज्यान्चा
नको घाबरु तु असे बाळ त्यान्चा.

// श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


Prashantnk
Saturday, October 07, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश,माऊडी,
साद देती हिमशिख़रे वाचल का?


Mrdmahesh
Monday, October 09, 2006 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही प्रशांत... माझ्या एका मित्राकडे आहे.. ते कोणीतरी नेलेले आहे... ते यायची वाट बघतोय.. मिळाले तर ठीक नाहीतर विकत घेईन.. पुस्तक छानच आहे असा फीडबॅक मिळाला आहे..

Maudee
Monday, October 09, 2006 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही रे प्रशांत मला मिळालच नाहीये ते पुस्तक....
परत एकदा नव्याने प्रयत्न करुन मिळवेन... पण वाचेनच


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators