|
मिलिन्द आम्हा दोघा च्या डिटेल्स मी तूम्हाला २२ सप्टेबर ला मेल केल्यात. कृपा करून मला लवकर उत्तर देउ शकाल काय? मदती बद्दल आभार रुपाली
|
mnc ,मी आपल्याला संततिसंबंधी प्रशन विचारला होता. मला कळवण्यास आनंद होतो आहे की दि. २० रोजी रात्री ९.१४ वा. आम्हा उभयताना कन्यारत्न प्राप्त झाले. मला एक विचारायचे आहे की राशी वरुन नावाचे आद्याक्षर ठेवणे हे बरोबर आहे का? असल्यास माझ्या मुलीसाठी कुठले नाव ठेवावे? आणि तिच्या भविष्या बद्दल काही ढोबळ सांगु शकाल का? details असे आहेत तारीख्: २०-०९-२००६ वेळ्: २१:१४ स्थान्: रत्नागिरी
|
Moodi
| |
| Monday, September 25, 2006 - 11:58 am: |
| 
|
मिलिंदा तुझे अभिनंदन परत एकदा. तू MNC ना प्रश्न विचारलायस, पण त्याचे उत्तर मी सुद्धा देते. राशीच्या आद्याक्षरावरुन तिचे नाव जरुर ठेव. अगदीच अडचणीचे असेल तर दुसरे अक्षर घे. मुख्य म्हणजे मुलगा किंवा मुलगी ५ वर्षाचे होईपर्यंत त्यांची पत्रिका बनवु नये, किंवा भविष्यही विचारु नये असे म्हणतात. मिलिंद बरोबर आहे ना हो हे?
|
Lotus501
| |
| Monday, September 25, 2006 - 1:05 pm: |
| 
|
Mulga / Mulgi 5 year chi hoi paryant Horoscope banvu naye hey sagala tho tanda aahey. Sagalay thor lokan cha (Shri Ram etc.) patrika Brith nantar lagey cha mandalya cha aani thyan chey jatak vartava laya cha gosti anay aahet ki. Jyotish hey highly scientific aprroach as ley la shastra aahey.
|
Moodi
| |
| Monday, September 25, 2006 - 1:14 pm: |
| 
|
राम हे मी ऐकलय त्यावरुन सांगीतलेय. थोतांड आहे की नाही मला माहीत नाही.
|
नमस्कार मिलिंदजी, please मला मार्गदर्शन करावे. माझे details पूढे देत आहे. जन्मतारिख: 13-05-1979. जन्मवेळ: 06.10(सकाळी). जन्मठिकाण: Bhusaval. 1) मला चांगली नोकरी कधी लागेल? 2) माझे लग्न कधी होईल? 3) माझे वैवाहिक जिवन कसे असेल? 4) माझी आर्थिक स्थिती कशी असेल? Nilesh
|
मिलिंद, राग मानू नकोस. स्वाती, जर मन खंबीर असेल तर कधिच काही प्रोब्लेम येत नाही. आणि जर ते एकमेकांना आवडले आहेत तर मग त्यांचा संसार हा त्यांच्या समजुतदारपणावर आणि adjust करण्याच्या तयारीवर अवलंबून नाही का. स्विटी, तू जर तुझ्या आयुष्यात Sincerely अभ्यास केलास तर तुझे शिक्षण नक्कीच निट पूर्ण होइल ग. Knowledge छान असले तर job पण छान लागेल. हा, आता तुला लग्नाआधी प्रेम होते की ते प्रेम तुला तुझ्या नवर्याकडून मिळते हा भाग वेगळा. पण तुझे वैवाहिक जीवन हे तुझ्यावर आणि तुझ्या नवर्यावरच अवलंबून नाही का. राधिका, तुमचे घर घेणे हे तुमची आर्थीक परिस्थिती, घराची availability ई. वर अवलंबून आहे. Job तुम्ही काम कसे करता त्यावर अवलंबून आहे. US ला आहात म्हणजे आर्थिक स्थिती उत्तम असेलच. अजुन general काय सांगु... सुखात रहा म्हणण्याची गरज नाहिये त्यामुळे आनंदी रहा असे म्हणतो. आभा, वर राधिका ला सांगितलेले तुला पण उपयोगी पडेल. All the best... Prady, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे... आणि ही केवळ म्हण नाही तर हे खरे आहे. Bramar_vihar, नुकताच तर जन्म झाला हो तिचा. तिचे भविष्य काही अंशी तुमच्या आणी बरेचसे तिच्या स्वताच्या हातात आहे. Nilesh, अरे मित्रा तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. Sincere प्रयत्न, knowledge आणि समजूतदारपणा ह्यांनी बरेचसे प्रोब्लेम्स सुटतात रे. अर्थात, भाग्य चालते कर्मपदांनी... - एक कर्मनिष्ठ असामी
|
Swati
| |
| Wednesday, September 27, 2006 - 3:33 pm: |
| 
|
Aho Mr. Karmanishta ithe kuthe waat chuklat??? Bar chuklat te chuklat..ani war amhalach udesh...wa re wa..(DG - take it lightly)
|
Sms
| |
| Wednesday, September 27, 2006 - 4:38 pm: |
| 
|
Karmanistha: Maan khambir thevayala pan tase graha lagatat na.
|
Asami_asami, Did I ever ask any advice to you? Just don't try to answer me. Admin/moderator, I apologize as I know this is not the right place to answer this way. But this is my personal matter and I expect anybody other than milindaji should not answer it!
|
Moodi
| |
| Wednesday, September 27, 2006 - 8:53 pm: |
| 
|
असामी असामी तुमच्या मतांचा आदर राखुन तुम्हाला एक विनंती करते. तुमचा जसा कर्मण्येवाधिकारस्तेवर विश्वास आहे ना, तसाच आमचा पण आहे हो, पण प्लीज प्लीज जर तुमचा जर विश्वास भविष्यावर नाहीये, तर तुम्ही इथे कुणाला असे सांगण्यात वेळ घालवु नका. माणूस आशेवर जगतो, लहान मुल सुद्धा आई जवळ येऊन खाऊ कधी देईल किंवा कामावरुन घरी लवकर कधी येईल याची वाट आतुरतेने बघत असत. ती येणारच असते पण आजी आजोबा ती आत्ता येईलच अशी आशा दाखवतात आणि मग ते शांत होत. तशीच स्थिती मोठ्या माणसाची सुद्धा असते. ज्योतिष्यी कुणाचे भविष्य, कर्म आणि नशीब बदलु शकत नाही पण मार्ग नक्कीच दाखवतो. आणि MNC वर आमचा विश्वास आहे तर तुम्ही कृपया इथे V&C घडवु नका. वाटल्यास नवीन बीबी काढुन तिकडे वाद घाला, इतरांचा वेळ घेऊ नका हीच तुम्हाला विनंती.
|
Abha
| |
| Wednesday, September 27, 2006 - 9:17 pm: |
| 
|
मागीतल्या वर दिलेल्या सल्ल्याला महत्व असत असामी-असामी. न मागता दिलेल्याला नाही. तुम्ही म्हणता त्यात जरी तथ्य असल तरी मुडी म्हणाली तस उम्मीद पे दुनीया कायम है! तर तुमच्या कर्मवादा मधे हे असल्या बीबी वर लिहीण्या सारखे शुल्लक अडथळे येऊ न देता तो चालू ठेवा पाहू!
|
well said moodi! Thanks! The explaination is just superb!
|
आगंतुकासारखे ईथे येवुन उगाच (अती)शहाण्यासारखे, नको असतांना/मागितले नसतांना लोकांना सल्ले देणे हे योग्य नहिये हे काय मला कळत नाही . पण तशी पोस्ट टाकण्याचा माझा उद्देश असा की जीSSवनातील(हा शब्द लिहितांना मी पण बिचकतो ) गोष्टींकडे बघण्याचा असा एक वेगळा द्रुष्टिकोन पण असु शकतो. माझे भविष्य हे माझ्या वर्तमानात दडलेले आहे(बरोबर ना मिलिंद?) असा माझा विश्वास आहे. अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे म्हणा. पण माझा कोणालाही दुखविण्याचा हेतु नक्किच नव्हता. त्यामुळे मी तर दिवा घेतोच, तुम्ही पण घ्यावा . माझ्यासारखा विचार करणारे अजुनही काही ईथे असतिल अशी आशा. फ़रक इतकाच की ते बोलले नाही आणि मी बोललो. - एक आगंतुक असामी
|
तुमचे त्वरीत आलेले reply आणि झालेला थोडासा त्रागा ह्यावरुन तुम्हाला सुद्धा माझे म्हणणे काही अंशी का होईना पण कुठेतरी पटते आहे असा अर्थ काढता येईल का. कारण शेवटी आपण सगळेच बुद्धिजीवी आणि logically विचार करणारे आहोत. - एक .. असामी
|
Moodi
| |
| Thursday, September 28, 2006 - 1:08 pm: |
| 
|
असामी असामी असे धांदरटपणे कुठल्याही निष्कर्याप्रत येणे बरे नव्हे. त्राग्याचा प्रश्न नाहीच, कारण वर सगळे मी नीट शुद्ध पुणेरी मराठीत लिहुनही तुम्हाला समजले नाही हे माझे दुर्दैव. (आज चंद्र मला अनूकुल आहे तरीही ) दुसरे असे की पुलंच्या व्यक्तीचित्राचे नाव घेऊन देखील तुम्ही तुमचे खरे नाव घ्यायला सुद्धा इतका संकोच करीत आहात, पु ल तर त्यांची मते ठामपणे आणि आत्मविश्वासाने मांडत होते ते ही तुमच्यासारखे खरे नाव लपवुन नव्हे. अहं! तुमचे नाव तुम्ही गुप्तच ठेवा, आम्हाला नै ऐकायचे ते. नक्को!! राधा आणि इतर व्यावहारीक दृष्ट्या या तत्ववेत्त्यांचे कितीही बरोबर असले तरी आता मी उत्तर दिलेय, तुम्ही कुणी या वादात आता पडू नका. कारण इतके सांगुनही ते ऐकत नाहीत म्हटल्यावर निरुपाय आहे, दुर्लक्ष करा. त्यांना यापुढे उत्तर देऊ नका ही तुम्हा सगळ्यांना विनंती.
|
Moodi
| |
| Thursday, September 28, 2006 - 1:15 pm: |
| 
|
हो! असामी व्यावहारीक दृष्ट्या तुमचे बरोबर आहे, पण परत इथे येऊन विजयोन्मादात मोठ्या पोस्ट टाकु नका, MNC ना मागचे मेसेज सापडायला प्रॉब्लेम होईल. जिथे तुमचा दुरान्वयेही संबंध येत नाही किंवा बाकीच्याना ते जर पसंत नाही तर सांगुन काय उपयोग, मला तुमचा राग अजीबात आलेला नाही, पण काही गोष्टी या जर आपल्याला पटत नाहीत याचा अर्थ असा नाही की दुसर्यांनी आपले ऐकावे. 
|
Prashantnk
| |
| Thursday, September 28, 2006 - 2:21 pm: |
| 
|
ज्योतिष हे एक शास्त्र आहे. त्याविषयी विश्वास असणे-नसणे, हा ज्याचा,त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला असे प्रामाणिक पणे वाटते की हा बी.बी. ज्यांचा विश्वास आहे,फ़क्त त्यांच्या करिताच आहे. मी हे माझे अनुभवाचे बोल सांगतोय. श्री भृगूसहिंता,श्री अगस्तीऋषींनी लिहलेला नाडीग्रंथ,ते आधुनिक ज्योतिष्याचे भिष्माचार्य श्री म.दा.भट ह्यांचा समग्र ग्रंथ सांभार वाचुनच मी हे अभिमानाने सांगतो,की हे एक शास्त्रच आहे. आपण ५०० वर्षापूर्वी,नौस्ट्रडॅमस यांनी ढोबळमानांनी लिहलेल्या भविष्यावर पटकन विश्वास ठेवतो, पण ५००० वर्षापुर्वी श्री अगस्तीऋषिनी, प्रत्येकाच वैयक्तिक स्वरुपाच, (त्यात आपल नाव,आपल्या आई-वडिलांच नाव,लग्न झाल असेल तर बायकोच्-नवर्याच नाव,आपण ते भविष्य कधि बघायला जाणार ती तारिख,आपली जन्मकुंडली इ. फ़क्त हाताच्या अंगठ्याचा ठसा घेऊन सांगितल जात.)लिहलेल्या भविष्याविषयी ना आपल्याला माहिती असते,ना कौतुक! खरा विचारकरण्यासारख मुद्दा म्हणजे, पुर्णमुक्त असणार्या प.पू.श्री अगस्तिऋषिंना हे लिहण का गरजेच वाटल असेल आणि ते पण ५००० वर्षापुर्वी?
|
Zakki
| |
| Thursday, September 28, 2006 - 11:47 pm: |
| 
|
prashantnk, या भृगुसंहितेबद्दल मी अनेकदा ऐकले आहे. त्यात माझ्याबद्दल काय लिहिले आहे ते ऐकून घेण्याची इच्छा आहे, पण भारतात मुंबईत किंवा पुण्यात कुठे ते ऐकायला मिळेल? गतवर्षी पुण्यात असताना चौकशी केली, पण बरेच जण म्हणाले खात्रीलायक रीत्या खरी भृगुसंहिता कोणाकडे आहे हे सांगता येत नाही, कारण तोतये या क्षेत्रात (देखील) घुसले आहेत. तुम्हाला खात्रीलायक रीत्या माहित असेल तर आत्ताच नाव, पत्ता इ. कळवा. दोन वर्षानी भारतात जाईन तेंव्हा ऐकायची इच्छा आहे. धन्यवाद.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|