Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 14, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » घरी भाज्यांची लागवड( cultivation ) » Archive through April 14, 2008 « Previous Next »

Sanash_in_spain
Monday, June 05, 2006 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी कधी घरी घोसाळ किंवा दूधी-भोपळ्याचा वेल लावायचा प्रयत्न(सफल किंवा असफल) केला आहे का? मी इकडे कुंडी मध्येच दोन्हींच्या बिया टाकल्या आहेत पण मला खरच माहित नाही, फळ काय पण फूल तरी येणार आहे कि नाही ते. मी थोडेसे खत पण आणले आहे येतांना. मला कुणीतरी काही idea द्या ना please . मला आपल्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला होता म्हणुन मी India हून येतांना काय काय बिया उत्साहने आणल्या आहेत.

Dineshvs
Monday, June 05, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या भाज्या अगदी व्यवस्थित रुजतात. फुले नर आणि मादी अश्या दोन प्रकारची येतात. नर फुलातला मधला भाग केशरी पिवळा असतो तर मादी फुलातला हिरवा. शक्य असेल तर हाताने परागीकरण करावे. वेलीची पिकलेली पाने खुडुन कुंडीतच टाकावीत. किडी वैगरे दिसल्या तर लगेच काढुन टाकाव्यात. वेलाचा विस्तार बघुन दोन तीन दुधीच ठेवावेत बाकिचे खुडुन टाकावेत.
घरगुती खत म्हणजे खरकटे, भाज्यांची साले वैगरे यांचे खत करावे.
वेल वाढवणे यातच खरा आनंद आहे. भाज्या लागल्या तर त्या बोनस समजायच्या.
शेवटी काय सांगितले आहे, मा फ़लेषु कदाचन. !


Sanash_in_spain
Monday, June 05, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, मन्:पूर्वक धन्यवाद! हो अगदी पटलं, वेल वाढतांना बघून जो आनंद होइल तोच खूप झाला. पण एक सांगा, माझ्या कुंड्या एक फूट व्यास आणि उंचीच्या आहेत. त्यात वाढतील ना वेल? मी ते खत आणलयं ना ते कधी घालू, वेल किती मोठे झाल्यावर? फूलं आल्यावर जर मला काही समजलं नाही तर पुन्हा विचारीन.
तुम्हाला कित्तीतरी गोष्टींची माहिती आहे ना! मी पहिल्यांदा बंगाली रेसिपी मध्ये पोस्ट लिहिलं ना तोपर्यंत मी इथे हितगुज नीट सगळं फिरले नव्हते. मग सगळ्या ठिकाणी तुमचे बरेच पोस्ट दिसले वाचले. You are Great!
-अश्विनी


Chingutai
Tuesday, June 06, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा
अश्वीनी ने विषय काढलाय, तर आपण सार्‍याच भाज्यांबद्दल लिहाल का? म्हणजे कोणत्या भाजीला कोणते हवामान योग्य, माती, खत, इतर काळजी, साधारण किती काळ लागतो वगैरे.....

-चिंगी


Dineshvs
Tuesday, June 06, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, ईथला अजुन एक अलिखीत नियम आहे. दिनेश " आपलाच " आहे त्यामुळे त्याचे आभार मानायचे नसतात.
या एवढ्या कुंडीत वेल नीट वाढेल. वेलीला आधार द्यावा लागेल. खत १० ते १५ दिवसानी द्यायचे. घरातील भाजीचा कचरा कुंडीत टाकायचा. पाण्याचा नीट निचरा होतोय याकडे लक्ष ठेवायचे. ऊनहि व्यवस्थित मिळायला हवे.
या आकाराच्या कुंडीत. पुदिना, मिरच्या, टोमॅटो अशी छोटी झाडे चांगली पोसतील.

चिंगी,
घरात भाज्या वाढवताना फार काळजी घ्यायची गरज नाही. रोज थोडा वेळ दिला कि झाले. रोज मायेने हात फिरवायचा पानावरुन, चार शब्द बोलायचे. झाडे अगदी छान प्रतिसाद देतात.
आपल्याला आवडते ती भाजी लावायची. छोट्या कुंडीत अलकोल, कोबी, मुळा फ़्लॉवर पण चांगले होतात.


Deepa_s
Wednesday, June 07, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरात भाज्या लावयला घरात खूप ऊन यायल हवे का? माझ्या घराला बाल्कनी नाहीये. खिडकी जवळ ठेऊन वाढतील का ही झाडं?

Dineshvs
Wednesday, June 07, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खिडकी पुर्वेला असेल आणि सकाळी चार पाच तास ऊन येत असेल तर कोथिंबीर, पुदिना, मेथी वैगरे वाढु शकेल.
यापेक्षा मोठ्या भाज्याना मात्र जास्त ऊन लागते. ऊनातच तर झाडे अन्न तयार करतात ना.
घरात वाढु शकतील अशी शोभेची झाडे मिळतात, पण भाज्या मात्र तश्या वाढणार नाहीत.


Agnihotry
Friday, August 04, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथल्या shopping center मधुन करेला आणुन त्याचे बीया पेरले, वेल तर उगवल / उगवलि, फ़ुल पण लागली आणी गळुन पडली :-( छान अगदि हिरवगार दिसत होत, पण उपयोग काय,कदाचित shopping centers मधल्या भाज्या genetically modified वगेरे असतिल म्हणुन तर नाही ना आलि फ़ळाला ?

Dineshvs
Friday, August 04, 2006 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग्निहोत्री, ते कारण नसावे. वेलावरची नर फुले गळुन पडणारच. पिवळ्या फुलातला मधला भाग केशरी असेल तर ते नर फुल आणि हिरवा असेल तर ते मादी फुल. मादी फुलाच्या मागे ईवलेसे कारलेहि असते. वेळ असेल तर त्या फुलाच्या मधल्या भागावर, नर फुलातले परागकण हलक्या हाताने चोळावेत.
कारल्यात सहसा एकाच वेलावर दोन्ही फुले येतात. त्यामुळे अजुनहि आशा आहे.
शिवाय कारल्याचा वेळ मुळातच फार देखणा असतो.त्यामुळे काहि नाही तरी नजरसुख आहेच ना. बायकांचा एक दागिना पण कारल्याचा वेल, या नावाने ओळखला जातो.


Agnihotry
Monday, August 07, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dinesh धन्यवाद, मी पुन्हा try करतो :-)

Sanash_in_spain
Wednesday, September 13, 2006 - 9:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, फुलं येत आहेत मी लावलेल्या घोसाळ्याच्या वेलाला . एका वेळी एकच फूल येत होते, पहिली ५ फूलं गळून गेली, थोडा मूड गेला होता. पण आज पहिल्यांदा २ फुलं एकदम आली आहेत आणि वेग-वेगळी दिसत आहेत. तुम्ही म्हणालात तसे परागीकरण केले आहे, बघु काय होते ते. फुलापासून फळं व्हायला किती दिवस लागतील अंदाजे?

Dineshvs
Thursday, September 14, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घोसाळी दोन तीन आठवड्यात तयार होतील. वेलाचे एक गणित असते. पुरेसा जोम येत नाही तोपर्यंत निसर्ग फळ येऊ देतच नाही.

Manuswini
Thursday, September 14, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सनश


कुठे असतेस तु? कारण हेच की अग मी लावले आहेत ना भोपळे ते सुद्धा रुंद कुडीत.

येतात ग छान. मी nursery तून खत आणले आहे.

वेल जस जशी वाढेल तसे तीला सुप्पोर्त करायला इथे काठ्या मिळतात त्या खोवायच्या. सुर्यप्रकाश खालपर्यन्त मिळेल असे बघायचे. कारण वेल वाढल्याने आणी पसरल्याने उन्हे मिळत नाहीत.



Sanash_in_spain
Thursday, September 14, 2006 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, मी मालागा, स्पेनला असते. वा! छान, भोपळे आले न म्हणजे कुंडीतही... अगं मी पण दूधी-भोपळ्याचा वेल लावला आहे पण इतका हळुबाई आहे न तो. घोसळ्याला फुलं पण आली आणि हा फक्त फूटभर वाढला आहे. बी च तर महिन्याभरानी रुजले होते त्याचे.
दिनेश, धन्यवाद.


Vkudtarkar
Thursday, April 10, 2008 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला घरी बाग करायचि आहे..कळ्ल नाही कुथे लिहु ते म्हनून इथे तaकतेय. मी सदाफ़ुलिच्य अन्द चमेलिच्या झाडाने सुरवात केलीय. घरच्या घरी लावता येतील अशी भाज्या फ़ळ कुणी सान्गेल का?

Itsme
Friday, April 11, 2008 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिरची चे बी टाका कुंडीत, छान रोपे येतात. आले लावा कोंब असलेले, टोमॅटो लावा, कांदा पण चांगला येतो, मेथी - कोथींबीर लाउ शकता, फ़क्त उन्हाची काळजी घ्यावी लगेल ... वेग - वेगळे प्रयोग करुन बघायचे, आपले आपल्यालाच कळते काय लावायला हवे आणि काय नको. मी तर मोसंबी, सिताफळाची पण रोपे लावली आहेत, अजुन फळे आली नाहीत त्यामुळे खत्रीने सांगु शकत नाही.

Vkudtarkar
Friday, April 11, 2008 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उन्हाचि काळजी म्हणजे...मिर्चिच बी म्हणजे लाल मिर्च्या कुस्करुन टाकल्या तर चालतील? ह्या भाज्याना जास्त उन लागत का? आमच्या खिडकीत खुप उन येत ४ ५ तास.
माहिती बद्दल आभरी आहे. मी सागेन झाड वाढली की त्याची प्रगती


Madhura
Friday, April 11, 2008 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुदिना लावु शकता.पुदिन्याची नुसति कांडी रोवली तरी पटकन येतो पुदिना.

Itsme
Saturday, April 12, 2008 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उन्हाची काळजी म्हणजे, कोथिंबीर, मेथी ला जास्त उन चालत नाही.

लाल मिरची कुस्करुन टाकलेली चालेल


Cinderella
Monday, April 14, 2008 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vkudtarkar, लसुण लावा.. लसणाच्या पातीची मस्त चटणी करता येते....

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators