Chafa
| |
| Tuesday, March 18, 2008 - 12:34 am: |
|
|
तुम्ही म्हणता ते खरय की कुठल्याही पिठाच्या पोळ्या छान करता यायला हव्यात >>> हे काही तितकंसं खरं नाही हा. कुठले पीठ वापरता त्याने नक्कीच फरक पडू शकतो. शिकागोमधूनही सुजाता, नेचर्स फ़्रेश वगैरे गायब झाली आहेत. थोड्या महिन्यांनी अव्वाच्या सव्वा किमतीने ती परत येतील असे ऐकले आहे.
|
पिठ हे चांगले असावेच लागते भले तुम्ही खूप masters or Phd असाल पोळ्या करण्यात कारण चवीत नक्की फरक पडतो. नुसते लाटण्यावर सुद्ध नसते वा भिजवण्यावर वा भाजण्यावर, ते पिठावर पण असते अवलंबून. गहू चांगला असेल तर पिट पाणी भरपूर पितो नी चपात्या मऊ असतात किंवा ज्यास्त त्रास नसतो पिठ भिजवणे मध्ये.
|
Suyog
| |
| Tuesday, March 18, 2008 - 1:27 am: |
|
|
pillsbury गहु पिठाच्या पोळ्या म ऊ होतात.
|
Manjud
| |
| Tuesday, March 18, 2008 - 10:56 am: |
|
|
रुनी, रेडीमेड कणकेच्या बाबतीत माझं ज्ञान अगदिच तोकडं आहे. पण एक प्रयत्न करून बघायचा असेल तर ती कणिक दोन तीनदा चाळून घे आणि दूधात भिजवून बघ. अगदी मऊसूत नाही पण निदान खाता येतील अश्या पोळ्या होतील.
|
Shonoo
| |
| Tuesday, March 18, 2008 - 12:03 pm: |
|
|
रुनी मला पण असंच कुठलंतरी 'नो नेम' गव्हाचं पीठ मिळालंय. थोड्या कोमट पाण्याने भिजवून पहा. शिवाय नेहमी पेक्षा जरा सैल भिजव कणिक, मळताना थोडं तेल घालून मळून पहा. नाहीतर मेथी,पालक,कोबी,दुधी इत्यादी चे पराठे कर
|
Chinnu
| |
| Tuesday, March 18, 2008 - 12:26 pm: |
|
|
रुनी माझा पण अनुभव काही चांगला नहिये. अशी कणीक बेताचीच सैल भिजवावी. नंतर लाटायला जमत नाही. आणि भिजवून जास्त वेळ ठेवायची नाही. दीप ब्रॅन्डच्या पीठाला अजिबातच काही चव नाही. त्यापेक्षा गोल्डन टेंपल तरी बरा.
|
Asami
| |
| Tuesday, March 18, 2008 - 12:51 pm: |
|
|
राणी कुठलातरी सोनाली नावाचा brand घेउन आली whole wheet चा , त्याच्या पोळ्या मस्त होताहेत. थेट सुजाता types
|
Shyamli
| |
| Tuesday, March 18, 2008 - 1:49 pm: |
|
|
सध्या गव्हाच्या पिठाचा जामच गोंधळ चाललाय पिल्सबरीच्या छान व्हायच्या पोळ्या पण सगळे चांगले brands गायब झालेत बाजारातून अगदि जे मिळेल ते पिठच वापरण चालल्य. उद्या पुरणाच्या पोळीचं काय करायच, मैद्याची पोळी आवडत नाहि
|
Upas
| |
| Tuesday, March 18, 2008 - 2:45 pm: |
|
|
सोनाली च्या प्रश्नाचं उत्तर कोणी तरी द्या ना.. एकाच वेळी पोळ्या लाटून टिकवता कशा येतात? स्वादचा भालीया म्हणून एक ब्रॅंड आहे तो सद्ध्या वापरतोय आम्ही, चांगल्या होतात पोळ्या.. मला वाटतं ज्या गव्हाच्या पिशव्यांवर Product of India लिहिलं असेल त्याच्या पोळ्या चांगल्या होतात बहुतेक..
|
इथे NJ मधे अपना बाजार चा आटा चांगला मिळतो. इथेच तयार होतो वाटते. सध्या महाग आहेच, पण available तर आहे निदान. मी पुरण पोळ्याना देखिल (केल्या तर) तोच वापरते, छान होतात. उपास, उत्साह अन वेळ असेल तर पोळ्या तयार करून (लाटून अन भाजून तयार) पेपर नेपकिन मधे ग़ुंडाळून फ़्रीझ मधे ठेवायच्या, रोज लागतील तश्या काढून तेवढ्याच मायक्रोवेव्ह मधे गरम करून खायच्या १ आठवडापर्यन्त तर नीट रहातात. तेवढेच मी try केलेय, छान फ़्रेश वाटतात खायला. पण मला तेवढा पेशन्स नाहिये इतक्य पोळ्या एकदम करायचा, त्यामुळे तो प्रकार करणं बन्द केलं आता
|
Upas
| |
| Tuesday, March 18, 2008 - 4:26 pm: |
|
|
अगं मी फक्त माहिती म्हणून विचारलं, गरम आणि ताज्या पोळ्यांसारखं दुसरं सुख नाही हेच खरं.. गृहमंत्र्यांचा विजय असो! :-)
|
उपास, गृह मंत्र्याचा विजय असो? का बरे? तु पोळ्या करायचे सोडून दीलेस? अशी practice सोडणे चांगले नाही. ह्याच्यावरून आठवले माझा एक मित्र मुलगी बघायला गेला की हाच एक प्रश्ण विचारायचा.. दुसरे काही विचारायचे सोडून, पोल्या येतात करायला? बर्याच वेळा नकार मिळाला कारण नक्की माहीत नाही पण जेव्हा हा प्रश्ण विचारायचे सोडून दिल्यावर मुलगी मिळाली(असे त्याचे म्हणणे). आता बायकोच चपात्या भाजत असते(लक्षकरासाठी नाही) त्याच्यासाठी. दिवे घे
|
Shonoo
| |
| Tuesday, March 18, 2008 - 5:17 pm: |
|
|
माझी आई जेंव्हा इथनं परत जाणार असे तेंव्हा मी फ्रीझर पूर्ण रिकामा करत असे. आइस क्रीम, समोसे, वटाणे सगळं संपवून टाकायचं. मग आई रोज थोड्या थोड्या पोळ्या किंवा फुलके करून ठेवत असे. ७-८ पोळ्या आधी बाउंटीमधे गुंडाळून अन मग झिपलॉकमधे घालून वर तारीख घालून थप्प्या रचायच्या. सहा सात महिने चांगल्या राहतात्- उरत नाहीत तितके दिवस फ्रीझरमधून काढून फ्रीझमधे १६-२४ तास थॉ करायच्या. बाहेर काउंटरवर ठेवलं तर ३-४ तास पुरतील. मग त्याच बाउंटीवर थोडं पाणी शिम्पडून २०-२५ सेकंद मायक्रोवेव्ह केलं की गरम गरम फुलके तयार.
|
Sonalisl
| |
| Tuesday, March 18, 2008 - 5:38 pm: |
|
|
गरम आणि ताज्या पोळ्यांसारखं दुसरं सुख नाही हेच खरं.>> अगदी अगदी. मी घरी असताना कधी विकतच्या पोळ्या आणायची वेळ नाही आली. पण आमच्या ह्यांना पोळ्या करायला नाही येत. (पाककलेत जेमतेम काठावर पास होतील ) आता मी नसताना जेवनाचे हाल होऊ नये म्हणुन हा प्रयत्न.
|
Shmt
| |
| Tuesday, March 18, 2008 - 7:53 pm: |
|
|
शक्तीभोग आटा कसा आहे? कोणी वापरला आहे का? धन्यवाद
|
Sonalisl
| |
| Tuesday, March 18, 2008 - 8:47 pm: |
|
|
शोनू, ७-८ पोळ्या एकत्र ठेवल्यावर फ़्रिज मधुन काढल्यानंतर पाणी सुटून चिकटणार नाही ना?
|
प्रत्येक पोळीच्या मध्ये एक पेपर टॉवेल आणि त्या बर्यापैकी थंड झाल्यावर हे करायचे नी झीपलॉक मध्ये ठेवून द्यायचे. एकदम बल्बच्या खाली नाही जिथे पाणी ड्रीप व्हायचे चान्सेस ज्यास्त आहेत. तिसर्या चवस्थ्या ड्रावर्मध्ये ठेव.
|
Jadoo
| |
| Tuesday, March 18, 2008 - 9:19 pm: |
|
|
Upas तुम्हि पोळ्या लाटुन अर्धवट कच्च्या भाजुन fridge मधे ठेवु शकता. पोळि दोन्हिहि बाजुने थोडि थोडि भाजुन घ्या आणि थंड झाल्यावर silver foil मधे wrap करुन प्लास्टिक च्या पिशविमधे घालुन ठेवा. जेंव्हा खायचि असेल तेंव्हा फ़क्त पुर्णपणे भाजुन घ्या. ह्या पोळ्या fridge मधे बरेच दिवस टिकतात.
|
Sonalisl
| |
| Tuesday, March 18, 2008 - 9:51 pm: |
|
|
धन्यवाद मन:स्विनी त्या खाली ठेवायच्या. पण जर १आठवड्यापेक्षा जास्त दिवस ठेवायच्या असेल तर डीप फ़्रिज कराव्या लगतील का?
|
Bee
| |
| Wednesday, March 19, 2008 - 2:09 am: |
|
|
घरी देशात जर आपण असे जगतो हे जर सांगितले तर ह्या लोकांना कळत नाही की खरेच खायचे प्यायचे असेही दिवस आलेत म्हणून. मग त्यावर उत्तर मिळते, देशात परत ये.. आता फ़क्त खायच्यासाठी देशात यायचे हेही पटत नाही. कधीतरी जायचेच आहे परत.. पण असो.. हे स्वैपाकचे गणित खरच काही केल्या धड जमत नाही. घरी जर गृहीनी असेल तर आणि तरच बरे आहे. तरी मी जिद्दिला पेटून खूप काही करतो..
|