|
Upas
| |
| Wednesday, September 05, 2007 - 3:09 am: |
|
|
Thanks मनु.. मी हातानेच काढतो पोळ्या तव्यावरून.. उलथनं वापरत नाही, पोळीला टोचा पडू नये म्हणून.. आणि खर तर पोळी फिरवताना तिचा चटका सुखदच वाटतो.. तेलाचं तू म्हणतेयस तसच करतो आता.. तत्परतेने सांगितलस बरं वाटलं..
|
चपातीनं तुला चांगलंच हळवं केलंय म्हणायचं!
|
Vinaydesai
| |
| Wednesday, September 05, 2007 - 12:13 pm: |
|
|
गजा, मी वाचलं 'चपातीने तुला चांगलंच जळवलंय...'
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 05, 2007 - 8:05 pm: |
|
|
Thanks मनु.. मी हातानेच काढतो पोळ्या तव्यावरून.. उलथनं वापरत नाही, पोळीला टोचा पडू नये म्हणून.. उपास तुझ खरच कौतुक करायला हवय.. इतक्या नेटाने शिकतोयस .. चुकलच ! हाताने फ़िरवुन पोळी भाजता येतिय आणी चटका जाणवत नाहिये म्हनजे, तु आता expert झालास. विनय
|
Wel123
| |
| Tuesday, November 20, 2007 - 5:47 am: |
|
|
please mala madat kara....mala sujata ani pillsberry che pith bhetat nahi aahe store madhe wicharale tar te mhanat aahe ki te banda zale ata konte pith waparu....natures best cha pola khup kadak hot aahe please help.
|
शक्तिभोगचा आटा मिळाला तर छान पोळ्या होतील. नेचर्स बेस्ट आटा वापरते वेळी गरम पाण्याने कणीक भिजवली अन दोन ते तीन तास भिजवल्यानंतर तशीच राहू दिलीत, तर छान मऊ पोळ्या होतील. प्रयत्न करून पहा. Best luck!
|
खरं तर Brand Name आणि पोळी चांगली होण्याचा फारसा संबंध नाही.. Whole wheat मध्ये Nature Fresh घ्या नाहीतर चक्कीका आटा असं नांव असलेला local brand घ्या... पोळीचे पीठ मळणे, ती लाटणे, भाजणे या क्रिया तुम्हाला जमायला हव्यात, आणि त्या फक्त सवयीने येतात.. मी 87 साली आलो, तेव्हा पासून सतरा Brand वापरले असतील. पोळ्या सुरुवातीला बिघडल्या त्या सवय नसल्यामुळे, आणि आता बिघडत नाहीत ते सवय झाल्यामुळे.. हो, घरी बायकोच पोळ्या करते, पण ती एकाद दिवस नसेल, तर मी पण करतो...(आणि त्याही बिघडत नाहीत). मी खूप लोकांकडून ऐकलं आहे, की 'हे पीठ चांगलं आणि ते पीठ चागलं'. पण अश्या लोकांकडे कुठल्याही पीठाच्या पोळ्या मऊसुत वगैरे होत नाहीत... sorry बाकी चालूद्या...
|
Divya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 1:55 am: |
|
|
विनय तरीपण नेचर्स बेस्ट च्या आट्याच्या पोळ्या फ़ारच मौसुत होतात असा माझा experience आहे. पन मधेच त्यांच्या पण आट्याची quality बिघडली होती.
|
Sonalisl
| |
| Wednesday, November 21, 2007 - 6:04 pm: |
|
|
आन्नपुर्णा आटा पण चांगला आहे. सुजाता सारखाच.
|
Upas
| |
| Monday, December 31, 2007 - 6:29 pm: |
|
|
आईशप्पथ इथल्या देसी stores मध्ये विचारलं तर सांगण्यात आलं की ह्यापुढे natures fresh, natures best, sujata अशी गव्हाची पिठं मिळणं बंद होणार आहे.. फक्त लक्ष्मी आणि तत्सम brands मिळतील.. कितपत तथ्य आहे यात? Dallas मधे सगळीकडेच वानवा आहे सद्ध्या सुजाता तसेच nature's best ची.. :-(
|
Manuswini
| |
| Monday, December 31, 2007 - 7:02 pm: |
|
|
उपास, तु dallas ला आहेस का? नाही, विचारायचे कारण हेच की, काही विश्षीट State मधून ते ( sujata, natures fresh, natures best ) विकले जाणार नाही. NJ पहील्यापासून nature's fresh वगैरे विकले जात न्हवते वाटते तर तिथे बहुधा सुरु होईल असे मी काहीसे एकले आहे गुज्जु वाण्याकडून texas मधल्या. कारण? हेच की inspection मध्ये local dealers नी भेसळ केली ह्या पिठात so त्यांची जे brands like shaktibog वगैरे विकायचे बंद पडले होते सुजाता वगैरे मुळे ते सुरु होतील. हे एकीवात आले म्हणून लिहिले.
|
Upas
| |
| Wednesday, January 02, 2008 - 3:33 pm: |
|
|
मनु होय डॅलस ला आहे, तुला नक्की काय म्हणायचे ते कळलं नाही पण.. कोण भेसळ करत होता आणि कुठे आणि त्याचा TX मधे न मिळण्याशी काय संबंध..
|
Manuswini
| |
| Wednesday, January 02, 2008 - 6:58 pm: |
|
|
उपास, sorry for confusing, ok मी हे म्हणत होते की मला texas मधल्या गुज्जुने सांगीतले की ही पिठे(सुजाता, nature's fresh ) बंद होणार आहेत काही State मधून. मुख्यत ही पिठे Tx, dallas, CA,houston,CT,Boston मध्ये ज्यास्त विकली जायची. आणि त्यात texas,dallas,houston वगैरे सारख्या ठीकाणी काही local dealers in US पकडले गेले भेसळीकरता असे तो वाणी म्हणत होता. आणि शक्तीभोग वगैरे आटा विकणारे brnads आता आपले brand promote करणार कारण सुजाता वगैरे नी त्यांचा खप कमी केला होता. म्हणून आता दुकानदार पण सुजाता कमी ठेवतात. बरे, ही वाण्याने नी दीलेली news होती. (मी texas ला होते तेव्हा). मला regular सुजाता आटा नाही मिळाला तेव्हा मी सुजाताचाच पंजाबी आटा आणला. जरा जाड पिठ असते मस्त लागते चपाती. north indian जाठच पिठ वापरतात ना. तो try कर. " सुजाता पंजाबी आटा " हुशऽश कळले का?
|
Lalu
| |
| Wednesday, January 02, 2008 - 7:28 pm: |
|
|
कळ्ळं कळ्ळं... म्हणजे आता शक्तिभोग आट्यात भेसळ होणार, असंच ना? ~D
|
Manuswini
| |
| Wednesday, January 02, 2008 - 9:55 pm: |
|
|
लालु, इतकी सींबळ गोष्ट कॡ नाय.. छ्या!
|
Sms
| |
| Wednesday, January 02, 2008 - 10:31 pm: |
|
|
आरे बापरे. काय गोंधळ आहे. कुठेकुठे काय काय मिळणार आहे नाही ते परत नीट सांग पाहु!! दीवा घे!
|
Prady
| |
| Wednesday, January 02, 2008 - 11:07 pm: |
|
|
जॉर्जीया मधे पण 'सुजाता आटा' नाही मिळणार असं इथला वाणी म्हणाला. 'पार्ले जी आटा' मागवीन हवं असेल तर म्हणाला.
|
Upas
| |
| Thursday, January 03, 2008 - 5:40 am: |
|
|
ओह मनु.. धन्यवाद.. आता उलगडा वगैरे झाला
|
Sonalisl
| |
| Monday, March 17, 2008 - 6:05 pm: |
|
|
बाहेर मिळतात तश्या चपात्या, ज्या आयत्यावेळी गरम करुन खाता येतात, तश्या घरी बनवुन ठेवता येतील का? कश्या स्टोअर करायच्या? अन् किती दिवस टिकतात? मी बाहेरुन कधी आणल्या नाहीत, अन् त्या कशा लगतात हेही माहीत नाही. कृपया लवकर सांगा.
|
Runi
| |
| Monday, March 17, 2008 - 8:57 pm: |
|
|
मला कोणी तरी वाचवा रे.... आमच्या इथल्या देसी दुकानात कशीबशी आप की पसंद नावाची कणिक मिळाली. पहिल्यांदाच मी हे पीठ आणलय. सुजाता, नेचर्स बेस्ट, लक्ष्मी किंवा नेहमीचे कुठलेच ब्रॅन्डस मिळाले नाहीत. मनु म्हणतेय तसे ते बहुदा डीसीतुन पण गायब केलेत वाटते या आप की नापसंद कणकेच्या पोळ्या खुपच वातड होताहेत, म्हणजे अगदी तोंड दुखेल खाल्ल्यानंतर इतक्या . भरपुर तेल टाकुन, तासभर कणिक भिजवली तर ती मऊ (थोडीशी चिकट) होते पण पोळ्या मात्र एकदम भयानक होताहेत. मी अशात करायला शिकलेल्या ज्वारी-बाजरीच्या भाकरी चक्क छान मऊ होताहेत पण पोळ्या मात्र नाही. या कणकेच्या पोळ्या मऊ होण्यासाठी काही उपाय आहे का? त.टी. : विनय तुम्ही म्हणता ते खरय की कुठल्याही पिठाच्या पोळ्या छान करता यायला हव्यात, बहुदा माझी पोळ्यांची प्रॅक्टीस कमी पडतेय. पण हे पीठ खराब आहे ना म्हणुन बाकी काही नाही
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|