Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 20, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » Microwave » Archive through December 20, 2007 « Previous Next »

Rajasee
Monday, October 08, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I want to purchase a Microwave oven. I m confused which combination to go for convection, solo or grill-microwave. What makes sense in India? The people who are already using it, can you elaborate what all functions their microwave perform and they let it perform?

I am a vegetarian. In US, I used microwave only for heating, roasting peanuts, rava, pohe (for making chivda) like this kind of basic stuff. With above functions, my microwave should be able to make pizza, cake, all roastings. Right now I can only think of these many things I want my microwave should have ability to do/

so please gals help me find perfect microwave. do share your experiances with particular brand and model.

Thanks in advance

Dineshvs
Monday, October 08, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेसिक पेक्षा विथ ग्रिल थोडा महाग आणि विथ कन्वेन्शन त्याहुन महाग अशी भारतात स्थिती आहे.
ग्रिल्ल चा घेतला तर पित्झा वैगरे करता येतो. गार्लिक टोस्टही करता येतो.
पण जर केक सारखे बेकिंगचे प्रकार वरचेवर करायचे असतील, तर मात्र तिन्ही प्रकार असलेला घ्यावा.
दाणे भाजणे, कोरडे मसाले वैगरे भाजणे, साध्या प्रकारातही करता येते.


Manuswini
Monday, October 08, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रजसि, सरळ otg घे, कीती वर्षे माझी आई वापरतेय देशात long lasting असतात, सगळे छान होते.
o=oven, t=toasting, g=grill


Chinnu
Monday, October 08, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजसी, मी पण OTG च सुचविणार होते.

Rajasee
Tuesday, October 09, 2007 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks, dinesh, manu and chinu.

kaal mi pan net var extensive search kela. aani asa vatale ki ithe OTG ch jast upayogacha aahe. aani mag have asalyas quick heating sathi ekhada basic microwave gheta yeil. kaay mhanata?

hi ek site mala bari vatali FYI & R

http://www.compareindia.com/

OTG konatya brand che changale asatat? kaay kaay baghoon ghyayache OTG ghetana?

Manuswini
Tuesday, October 09, 2007 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आईकडे कुठला आहे हे विचारून सांगते. अश्या सर्व गोष्टींची नावं विसरते मी

Rajasee
Tuesday, October 30, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mee bajaj cha OTG ghetala

Ja_wadekar
Tuesday, October 30, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बजाज चा घे. L.G. microwave with Grill (intelowave) is also good. If you intend to bake, roast more then OTG is better option.

Rads
Monday, December 10, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ओनिडाचा मायक्रोवेव्ह घेत आहे ( Wtih Grill & Convection ) पण किती कपॅसिटीचा घ्यावा तेच ठरत नाहीये. 20 ltrs की 25 ltrs? .

घरात रोजचे आम्ही चार जण आहोत, पण अधुन मधुन १५ ते २० जणांचे छोटे-मोठे get-together चालू असते.

प्लिज, कोणी काही सुचवेल का?


Rads
Wednesday, December 12, 2007 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा! ईकडे कुणीच कसे नाही काही सुचवायला....

Sanghamitra
Wednesday, December 12, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३० ltrs चा घे.
मोठा असलेला बरा. नाहीतर उगीच installments मधे करावं लागतं.


Prachee
Sunday, December 16, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे LG चा ३० ltr microwave आहे. खुप उपयोग होतो. ग़ॅस आणि Microwave एकाच वेळी वापरुन स्वैंपाक केल्यास पटकन होउन जातो. capacity जास्त असल्याने एकाच वेळी काम होउन जाते.

Rads
Monday, December 17, 2007 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks संघमीत्र आणि प्राची...

मी २५ ltr चा अणला. ३० Ltr चा माझ्या किचनमध्ये सुट होत नाहीये. माला तो खुपच मोठ्ठा वाटला.

आणि हो.. मी केनस्टारचा घेतलाय!

अजून एक प्रश्न.. मयक्रोवेव्ह मी फ्रिजच्या टॉपवर ठेवायचा विचार करते आहे. ती जागा योग्य असेल का? का काही risk factors आहेत?


Deepant
Tuesday, December 18, 2007 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rads,
फ़्रीजवर मायक्रोवेव्ह ठेवणे योग्य नाही. टेबलटॉप किंवा काउंटरटॉप वर ठेवल्यास उत्तम.

Psg
Wednesday, December 19, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

OTG मधे जास्त वेळ लागतो ना microwave पेक्षा कोणताही पदार्थ करायला?

दाणे, रवा भाजणे, केक करणे, चहा गरम करणे, (तयार) पोळ्या (फक्त) गरम करणे, करंज्या बेक करणे यासाठी OTG बरा की m/w ? प्लीज मार्गदर्शन करा..


Prachee
Wednesday, December 19, 2007 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेकिंगसाठी कधीही OTG च चांगला... त्याहीपेक्षा Round Oven चांगला. पण दाणे,रवा भाजणे, चहा करणे, पोळ्या गरम करणे यांसाठी Microwave चांगला.

Rads
Thursday, December 20, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायक्रोवेव्ह मधे हिटिंगसाठी ५ ऑपशन्स / कॉम्बिनेशन्स आहेत. त्याचे मॅन्युअल मी वचले पण तरीहि काही शंका....
प्रत्येक option मधे रोजच्या स्वयंपाकातील कोणती प्रोसेस होते ह्याचि जर कोणी माहिती दिली तर मला त्याचा खुप उपयोग होईल.

1. Micro : ? पदार्थ
2. Grill : ? पदार्थ
3. Convection : ? पदार्थ
4 Micro+Grill : ? पदार्थ
5. Micro+Convection: ? पदार्थ

उदा. गार कांदेपोहे गरम करायचे असतील तर ते micro मघे, पण पोहे भाजायचे असतील तर कोणते ऑपशन? पापड,रवा, पोहे, भाजणी,लाडूसाठी बेसन भाजणे,पावभजीचे ब्रेड भाजणे, ईत्यादि ईत्यादि........

जरा जास्तच शंका विचारते आहे पण अनुभविंच्या टिप्स लक्षात ठेवायला नक्किच आवडतील.



Thks deepant. मायक्रोवेव्ह्ची जागा मी बदलली... उगीच रिस्क नको घ्यायला.

Psg
Thursday, December 20, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके, अनेक धन्स प्राची :-)

Deepant
Thursday, December 20, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rads,तुम्ही वर लिहिलेले भाजण्याचे,गरम करण्याचे काम या micro option मधे करु शकता.शेंगदाणे,पोहे,रवा,बेसन,पापड कमी वेळात मस्त खमंग भाजले जातात. तसेच ढोकळा,वेज/नॉनवेज ,मोदकाचे सारण microwave मधे चांगले होतात.ग्रिल मधे चिकन,मासे,वेज bbq करु शकता.हेच पदार्थ micro+Grill वापरुन केल्याने बराच वेळ वाचतो. Convection वापरुन तुम्ही केक,बिस्कीट,नानकटाइ,खारी,कुकीज,पिझ्झा वगैरे बरेच पदार्थ करता येतील. micro+convection मी अजुन वापरलेले नाही.मायक्रोवेव्हचे बरेच फ़ायदे आहेत.
मध्यंतरी अल्फ़ा टीव्ही आणी सह्याद्री वाहिनीवर (हॅलो सखी मधे) सुधा कुलकर्णी यांचा 'मायक्रोवेव्ह ओव्हन फ़ॉर इंडीयन कुकींग' असा चांगला कार्यक्रम झाला होता.
www.youtube.com वर याची लिंक आहे. ज़रुर बघावा.त्यांचे याविषयावर पुस्तक देखील आहे.
I hope,तुम्हाला याचा उपयोग होइल.


Dineshvs
Friday, December 21, 2007 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rads मायक्रोवेव्ह नविन घेतल्यावर, सगळेच त्यात करुन बघायची इच्छा होते, पण कालांतराने आपले जुने मार्गच सोयीचे वाटतात.
उदा, वरणभातासाठी मायक्रोवेव्ह वापरणे कधीच योग्य ठरणार नाही. त्या ओव्हनसोबत जी पुस्तके येतात, त्यात बघा हे पण आमच्या ओव्हनमधे करता येते, असेच दाखवायचे असते.
त्यामुळे आपल्याया आवडणारे पदार्थ दोन्ही पद्धतीने करुन, जो पर्याय आपल्याला आवडतो, तो स्वीकारायचा.
कधी कधी आपल्याला नविनच उपाय सुचतात. उदा मी दुपारी घरी जेवायला येतो, त्यावेळी सगळे पदार्थ फ़्रीजमधे असतात. त्यावेळी सगळीच प्लेट वाढुन घेऊन, ती एकदम गरम करणे सोयीचे पडते. मसाल्याचे कोरडे जिन्नस, वा दाणे भाजणे, मऊ पडलेले वेफ़र्स कुरकुरीत करणे यासाठी मायक्रोवेव्ह चांगला.
पित्झा सारख्या पदार्थाना, वरुन सोनेरी रंग येणे आवश्यक असते तिथे ग्रिल वापरणे योग्य.
केक सारखे पदार्थ, जे आतुन शिजणे गरजेचे असते तसेच वरुनही कडक होणे गरजेचे असते, त्यासाठी पारंपारिक ओव्हनच हवा.
तीन चार कप चहा करायचा, असेल, तर चार कप मायक्रोवेव्ह मधे ठेवुन गरम केले तर चहा पटकन होतो.
मायक्रोवेव्ह साठी जी काळजी घ्यायची असते, ती घेऊन प्रयोग करणे जास्त योग्य ठरते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators