Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 04, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पोळ्या » Chapati » Archive through September 04, 2007 « Previous Next »

Manuswini
Wednesday, August 15, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास,
तुझे मदतीचे विचार वाखाणण्यासारखे आहेत.
तुझी इकडची स्वारी खुष होईल हे सर्व वाचुन. :-)

मी माझ्या काही मैत्रिणींना(स्वंपाकात अतीशय ढ) पाहीले होते की लग्न ठरले की gas कसा पेटवायचा पासुन शिकताना, पण तुझी पोळी ची मेहनत पाहुन तु एक नवा पांयडा घालतोस आहेस. हे प्रत्येक तरुणाने केले पाहीजे. :-)






Maanus
Wednesday, August 15, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या... same माझ्याबरोबर... घर बदलले आणि रोज भाजीत जास्त मिठ.. का माहीत नाही, तेच मिठ तोच चमचा. शेवटी आता सोडुन दिले जेवन बणवने... समोर traders joe आहे, तिथे गव्हाचे handmade tortilla मिळतात...

विचार करतोय building मधे खाली एक ad टाकावी पोळ्या बनवुन पाहीजेत. पुर्वी रहायचो तिथे एक जन बनवुन द्यायची पोळ्या, her work is appreciable, she used to act in one of leading marathi drama... after coming to US she started to prepare food for others and never thought that I used to be actress and will not do this work.


Nakul
Wednesday, August 15, 2007 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा खुपच छान माहिती दिलीत. मला माझ्या लाटलेल्या पोळ्या सुधारायला मदत होईल :-)

Bee
Thursday, August 16, 2007 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनःस्विनी त्या दोन उभ्या टिंबांना मराठी व्याकरणाच्या भाषेत विसर्ग म्हणतात. तसा विसर्गाचा अर्थ होतो त्याग, दान इ.

Nandini2911
Thursday, August 16, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच मस्त माहीती. मी पोळ्या लाटायला जमत नाही म्हणून सरळ फ़ुलकेच बनवते. :-( पण त्याला पोळ्याची सर येत नाही. वरचं सर्व वाचून आता परत प्रयत्न करणार आहे.
(सध्या परत स्वयंपाकाचं भूत डोक्यात आहे तवर करायला सुरुवात करते.

एक शंका आहे. फ़्रीजमधे जर काणीक ठेवली तर ती दुसर्‍यांदा वापरताना एकदम सैल होते आणि चिकटपण. यावर काही उपाय आहे का?


Manuswini
Thursday, August 16, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी,
मी तर दोन दिवसाची(हो, फक्त दोन दिवसाची) कणीक भिजवून freez मध्येच ठेवते.

असे कर, कणीक दोन दिवस ठेवायची असेल तर रोजच्या fresh चापाती करण्यासाठी भिजवतेस तशी मऊ नको भिजवूस.
दुसरे म्हणजे चांगली मळून घे अर्ध्या तासाने बाहेर ठेवून मग aluminium foil मध्ये गुंडाळुन त्यावर paper towel ठेवून ziploc डब्यात ठेव freez मध्ये.
actually एवढे वरील सर्व करायची गरज नाही पण पाणी सुकु नये म्हणुन वरील खटाटोप.

करण्याच्या आधी २ तास बाहेर काढुन मळून घे.
छान होतात. माझ्या तरी चांगल्या होतात.:-)


Dineshvs
Friday, August 17, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्रीजम्धे ठेवलेल्या भिजवलेल्या कणकेला थोडेफ़ार पाणी सुटते. तपमानात जराही उणेपणा असला तर तिच्यामधे यीस्टही तयार होते.
त्यामुळे थोडी घट्ट भिजवुन, वरुन तेलाचा हात पुसुन, हवाबंद डब्यात ठेवणे चांगले. लाटायच्या आधी बाहेर काढुन ठेवावी. तरीही सैल वाटली तर आणखी कोरडे पिठ घालुन मळ्न घ्यावी.



Nayana
Friday, August 17, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एका माझ्या गुजराथी मैत्रिणिने चपाती लाटण्याबद्दल सांगितले ते असे की. दोन चपातिचे गोळे करुन घ्यायचे, मग एक गोळा छोटासा लाटायचा व त्यावर तेल बोटाने दाबुन लावायचे व वर चपातिचे पीठ भुरभुरायचे, नंतर दुसरा पण असाच गोळा लाटायचा तेल बोटाने दाबुन लावायचे व वर चपतिचे पीठ भुरभुरायचे नंतर दोन्ही गोळे एकमेकांवर ठेउन चपाती लाटायची, नेहेमी सारखी भाजायची आणी मग भाजुन काढल्यावर दोन्ही भाग वेगळे करायचे, अशी चपती खूप मऊ व छान लागते. करुन बघा.


Shonoo
Friday, August 17, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास
इकडे तांदळाची पिठी कधी चांगली मिळते आणि कधी नाही. पुष्कळदा फार खरखरित असते. त्या ऐवजी All purpose flour लाऊन पोळ्या लाटल्या तर चांगल्या होतात. मी फुलके, पोळ्या पराठे सगळ्यांना All purpose flour च वापरते.


Disha013
Friday, August 17, 2007 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, all purpose flour म्हणजे आपला मैदा ना?

Upas
Friday, August 17, 2007 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण नाही कळलं all purpose म्हणजे काय.. असो तूर्त कणीक वापरणे चालू आहे.. meeting needs is custmoer satisfaction! :-)

Ksmita
Saturday, August 18, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो nayana ,माझ्या एका जैन मैत्रिणीकडे खाल्ली होती अशी पोळी खास आमरसा बरोबर खातात म्हणे ते ! पुडि की असच काहीसे नाव असावे त्या पोळीचे !
काय मस्तं सुट्या व्हायच्या त्या पोळ्या तिची आई पटपट करत होती आणि एक वेळी दोन जणांना वाढत होती
बरं झाले आठवण करून दिलीस ते आता बघतेच करून
!

Ksmita
Saturday, August 18, 2007 - 1:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो , all purpose flour म्हणजे मैदा

Manuswini
Saturday, August 18, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कमाल आहे, मैदा माहीती न्हवते.:-)
all purpose flor असेच तर म्हणतात US मध्ये मैद्याला.

केक साठी नैका लिहिले असते all purpose flor, they dont spell 'flour' i guess


Upas
Saturday, August 18, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं थोडं confusion होतय, एकीकडे कणकीत मैदा असेल तर कणीक चांगली नाही म्हणाय्चं आणि पिठी म्हणून मैदा वापरायचा, हे कसं काय?
पोळ्या म्हणजे काहीतरी मोठी भानगड ही प्रत्येक बॅचलरच्या मनातली भीती आहे, पोळ्या करायच्या हे 15-20 मिनिटांचं काम इतक्या simplicity पर्यंत पोहोचाय्चय.. आणि खरच multitasking केलं नीट तर पोळ्या होतात देखील पटापट. कणीक भिजवून ठेवली असेल तर मग अगदीच लवकर!

Shyamli
Saturday, August 18, 2007 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास अरे पोळी पोळपाटाला न चिकट्ता नीट लाटली गेली पाहिजे
एवढा एकच हेतु आहे या मागे, मग तू मैदा वापर,किंवा तांदळाची पिठी. आपण भिजवण्यासाठी पिठ वापरतो ते कोंडा असलेलं असतं,याच पिठावर पोळी नीट नाही लाट्ली जाणार कोंडा असल्यामुळे.

थोडक्या पोळी लाट्ण्यासाठी लावायला अगदी बारीक पिठ हवं गव्हाचं पिठ देखील मैद्याच्या चाळणीनी चाळुन घेउन तु वापरु शकतोस.

कळलं का? :-)

Dineshvs
Saturday, August 18, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नयना, खास गुजराथी लोकांचा प्रकार आहे तो, पण त्या लाटताना भरपुर तेल घालावे लागते. आमरसाबरोबर खातात त्या गवसण्या.

आपण पुर्वी चक्कीवरुन गहु दळुन आणायचो त्यावेळी पुर्ण गहु दळला जायचा. पण जेव्हा मिलमधे गहु दळला जातो, त्यावेळी वेगळी पद्धत वापरतात. आपण घरी गहु निवडु शकतो, पण मिलमधे तसे शक्य नसते, म्हणुन गहु धुतला जातो. धुतल्यानंतर तो फ़ुगतो. मग तो दाबुन त्यातला गर बाहेर काढतात. हा गर बारिक केला कि त्याचा मैदा होतो. मिलमधुन काढलेले पिठ कणकेसारखेच लालसर दिसते. हवेमुळे ऑक्सिडेशन होवुन ते पांढरे पडते. याच गोळ्यांचे जाडसर पिठ करुन रवा करतात. रवा म्हणजे भरड दळलेला गहु नाही. भरड दळलेला गहु म्हणजे लापशी किंवा दलिया. तो खुपदा बायप्रॉडक्ट म्हणुन काढतात, किंवा मुद्दाम तयार करतात. दलियापेक्षा रवा लवकर शिजतो त्याचे हे कारण आहे.
आता वरच्या प्रक्रियेत जे टरफ़ल वेगळे होते, त्यात व्हीट ब्रान म्हणजेच कोंडा असतो. तो परत मैद्यात मिसळुन, बाजारी कणीक तयार करतात. अर्थात तो किती प्रमाणात मिसळला, त्यावर तो आटा, कि ऑल पर्पज फ़्लोअर ते ठरते. बाजारी पिठात १४ ते १६ टक्के पाणी असते. तेवढे नसेल तर ते घालावे लागते.
पोलपाटाला आणि तव्याला न चिकटणे यासाठी चपाती लाटताना पिठी वापरायची असते. ती कोरडीच असावी लागते.
तांदळाचे बाजारी पिठ फ़ारच खरखरीत असते. आपल्याकडे खास मोदकासाठी मिळते, तसे मिळाले तर छान. मला स्वतःला तांदळाचे पिठच लावलेले आवडते. त्याने चपात्या खमंग होतात.


Manuswini
Saturday, August 18, 2007 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, माझे हे personal मत आहे, no offense to anybody ,

माझी ही tips आहे जर तुला heath चा विचार करायचा असेल तर मैदा वगैरे वापरायची गरज नाही, पिठ चांगले भिजवले असेल तर काहीही चिकटत वगैरे नाही. नी तांदूळ पिठी गुजराती लोकं वापरतात कारण मी त्यांची पिठ भिजवायची पद्धत बघितली आहे जरासे चिकटच असते नी तांदूळ पिठ सरसरीत असते म्हणुन पोळी फटाफट लाटली जाते.

पण तेच जर तांदूळ पीठी जाडी भरड असेल तर चपात्या नंतर कडक होतील नी पांढर्‍या दिसतात.
दिनेशदा नी वरती एवढे Explaination दिले आहे ना,

तु आपली कणीकच भुरभुरव लातीमध्ये.


Upas
Tuesday, September 04, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुजाता गव्हाचे पीठ आणलय.. Golden Temple संपवलं..
सुजाताचं पीठ खूपच छान आहे ह्यात वाद नाही, बोटांनाच जाणवतं..
पोळ्यांना तेल नेमकं किती आणि कधी लावणं जास्त योग्य सांगाल का पुन्हा एकदा.. म्हणजे पोळ्या मऊ सूत रहाण्याच्या दृष्टीने तसच आरोग्याच्या दृष्टीने..


Manuswini
Tuesday, September 04, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, माझा हा अनुभव सांगते. तेल किंचीत गरम करून ठेव एका वाटीत.
मी तरी जरासे तेल लावते ते पण चपाती खाली उतरवून काढल्यावर काय कर काविलता(ज्याने चपाती काढतात तो(मला माहीत नाही दुसरा शब्द)) जरासा बुडवून वर वर लावायचे. मी चपाती तव्यावरून काढल्यावर जराशी आपटते.
मग छान त्रिकोणी घडी घालून ठेवून द्यायची. लगेच बंद नाही करायचा डब्ब्बा. अगदी छान मऊसूत राहतात दुसर्‍या दिवशी सुद्धा. try it .


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators