अरारारारारारा! एक नाव म्हणून धड लिहीता येत नाही कुणाला
|
Supermom
| |
| Wednesday, May 16, 2007 - 5:45 pm: |
|
|
काही खरं नाही हो देशपांडे तुमचं...
|
Alpana
| |
| Wednesday, May 23, 2007 - 9:48 am: |
|
|
कालच पाव भाजी केली होती. फ़्लोवर, कोबी,दुधी भोपळा, सिमला मिर्ची आणी बटाटे उकडुन घेतले...बटाटे कुकर मध्ये आणी बाकीची भाजी बारिक चिरुन १० मिनिटे Microwave मधे ठेवली. टोमटो, कान्दा बारिक चिरुन फ़ोडणीत घातला..त्यात आले-लसुण पेस्ट घातली... आईनी पठवलेला पाव-भाजी मसाला..आणी धण्याची पस्वडर घातली. सगळ्या भाज्या घालुन Blender ने blend केले. भाजी तर छान झाली पण तव्यावर पाव भाजायचा कन्टाळा आला म्हणुन मी त्याला लोणी लावुन microwaveमध्ये गरम केले..त्यमुळे पाव माउ लागले तरी खमन्ग नाही लागले.. सकाळी डब्यात पण तेच नेले...तेन्वा गरम केलेले पाव फ़ोइल मध्ये ठेवुन डब्ब्यात भरले...जेवताना त्याचा अगदी लगदा झाला होता...कय केल्याने पाव नीट राहु शकतिल?
|
Asmi1580
| |
| Tuesday, June 05, 2007 - 8:42 pm: |
|
|
Hello mybolikar..mee asmita ..ethe navin aahe..ethe sagle manapasun gappa martat...maja vatli sagle messege aaikun...pav bhaji kruti mast aahe....mee karun baghitali..chan taste yetey
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 06, 2007 - 6:01 pm: |
|
|
अल्पना, भाजलेले पाव ताजेच खावे लागतात. कुठे न्यायचे असतील तर नुसते बटर लावुन न्यायचे, आणि तिथे सोय असेल तर आयत्यावेळी गरम करायचे.
|
Alpana
| |
| Thursday, June 07, 2007 - 4:32 am: |
|
|
thanks dinesh पुढच्या वेळी सरळ पोळी घेवुन जाईन डब्ब्यात... ऑफिसमध्ये सध्या तरी गरम करायची सोय नाहिये
|
Manjud
| |
| Monday, June 18, 2007 - 11:59 am: |
|
|
बर्याच लोकांसाठी पाव्-भाजी केली असेल आणि सगळ्यानाच गरम पाव वाढायचे असतील तर सगळे पाव आधी खमंग भाजुन घ्यावेत आणि आयत्यावेळी cooker ची शिट्टी काढुन फ़क्त वाफ येउ द्यावी (जेमतेम २ मिनीटे) आणि गस बंद करून लगेच cooker चे झाकण काढावे. गरम गरम खमंग पाव होतात. फक्त पाव cooker मधुन काढले हे कोणाला सांगू नये कारण बर्याच जणांना ती कल्पना सहन होत नाही आणि उगाच का आपले sacret share करा?
|
Dineshvs
| |
| Monday, June 18, 2007 - 5:47 pm: |
|
|
मंजु, छान आयडिया आहे.
|
Bee
| |
| Tuesday, June 19, 2007 - 1:36 am: |
|
|
मंजु पण असे केले तर पावे खूप moist होत नाहीत का वाफ़ेमुळे? पाव कशात ठेवले होते, ज्यात भात लावतो त्या डब्यात का?
|
Psg
| |
| Tuesday, June 19, 2007 - 5:03 am: |
|
|
अजून एक- ते पाव कूकरमधे कशातही ठेवावेत, पण झाकून ठेवावेत. त्यावर वाफ़ेचे पाणी पडू देऊ नये. खरच पटापट सर्व्ह करता येतात.. गरम पावांसाठी खोळंबा होत नाही!
|
Leenas
| |
| Tuesday, June 19, 2007 - 6:32 am: |
|
|
इलेइक्ट्रीक कुकर मध्ये पण असेच छान होतात. आधी भाजुन घेउन कुकर मध्ये ठेवायचे, कुकर चालु करुन. गरम सर्व करता येतात.
|
Manjud
| |
| Tuesday, June 19, 2007 - 8:37 am: |
|
|
bee , कूकरची शिट्टी काढून एका उंच भांड्यात पाव ठेवायचे. आणि फक्त वाफ़ खेळली पाहीजे एवढा वेळच gas चालू ठेवायचा. आणि psg म्हणाली तसे वाफेचं पाणी त्यात पडू द्यायचं नाही. लगेच झाकण उघडायचं.
|
Bee
| |
| Wednesday, June 20, 2007 - 1:49 am: |
|
|
....... मन्जु, पूनम धन्यवाद आभार..
|
Manuswini
| |
| Wednesday, June 20, 2007 - 2:38 am: |
|
|
दुसरी idea सरळ बटर नी मसला लावुन एका जाळीदार ट्रेत ठेवुन ती जाळी खाली एक मोठा ट्रे ज्यात पाणी असेल नी सरळ वाढायच्या आधी १० मीनीटे आधी चालु केलेला oven broil वर ठेवुन द्यायचा नी ब्रेड आत ठेवला की oven बंद करा मस्त होतात. कूकर मधे पाव नरम होण्याची शक्यता असु शकते. माझ्या मैत्रीणीने भलत्याच शिट्या काढल्या बाहेर आलेल्या पाहुण्याच्या गप्पांमध्ये विसरुन जावुन.
|
Suparna
| |
| Friday, August 31, 2007 - 11:32 am: |
|
|
http://www.ifood.tv/video/pav_bhaji_at_juhu_beach ENJOY assal Mumbai pav bhaji!!!
|
Vrushs
| |
| Friday, August 31, 2007 - 12:27 pm: |
|
|
धन्यवाद सुपर्णा. एक चांगली साईट माहिती करुन दिल्याबद्दल. आता पावभाजी नक्की करुन बघवी लागेल इतकी ती tempting आहे.
|
Suparna
| |
| Saturday, September 01, 2007 - 9:23 am: |
|
|
vrushs , धन्यवाद कसले. पण मजा येते ना पाहाताना. अगदी पोट भरेस्तोवर रीप्ले केला मी.
|
Mrinmayee
| |
| Sunday, September 02, 2007 - 2:05 pm: |
|
|
मस्तच site आहे! Thanks सुपर्णा. मी पण आत्ताच (म्हणजे इथल्या वेळेनुसार breakfast करता करता) बघीतला विडिओ!!.. आणि मग हातातला उपमा अगदीच पांचट वाटायला लागला! भरपूर बटर घातलेली भाजी बघून की काय कोणजाणे, अचानक healthy choice food ची जाहीरात यायला लागली इथे.
|
Maanus
| |
| Sunday, September 02, 2007 - 3:05 pm: |
|
|
सुपर्णा भारी site आहे... किती मस्त भाजी आहे ही... हे बघुन मी पाव भाजीचा मसाला पन आणला... बघु कधी जमतेय करायला ते
|
Suparna
| |
| Monday, September 03, 2007 - 5:11 am: |
|
|
मानस, मृणमयी, लय भारी आहे ना व्हिडीओ...
|