Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पाव - भाजी

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » पाव - भाजी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 07, 200631 02-07-06  11:58 pm
Archive through May 16, 200720 05-16-07  5:04 pm
Archive through September 03, 200720 09-03-07  5:11 am

Psg
Monday, September 03, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंच जबरी आहे. मला सर्वात आवडली ती पाव भाजायची ट्रिक. एकावेळी ८! आपण घरी बसतो आपले भाजत एकेक! :-) पावाला पण मसाला लावतात हे ठाऊक नव्हतं तुम्ही कोणी लावता घरी करताना?

Dhumketu
Monday, September 03, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

८ पाव भाजण्याएव्हढा तवा मिळायला पाहीजे ना? एकतर पसरट नसतात.. असले तर बाजूला कडा.
पाव मधोमध कापायचे कसे? मी पाव कापायचा प्रयत्न केला होता.. पण कापलाच जात नाही मधोमध.


Dineshvs
Monday, September 03, 2007 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुमकेतु, आठ नाही तर दोनतीन पाव तळण्याइतका तवा मिळतो कि.
मुंबईत पुर्वापार असे पाव तळुन व त्यावर मस्का व मसाला लावुन देतात.
पाव नीट कापण्यासाठी धारदार सुरी हवी. दातेरी कडांची मिळाली तर उत्तम. कढत पाण्यात सुरी बुडवुन, पुसुन घेतरी तर तिने पाव छान कापले जातात, पण सुरी कधीही थेट गरम करु नये वा तव्यावरचे जिन्नस परतण्यासाठी वापरु नये.


Maanus
Monday, September 03, 2007 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक मस्त तवा आहे. US च्या विजेवर चालणार्‍या शेगड्यांनसाठी तर एकदम उत्तम. एकदम जाड, दणकट, टिकावु. पटेल मधुन काहीही उचण्यापेक्षा खुपच बरा. :-)

http://www.amazon.com/gp/product/B00005AWCA/002-9856303-9943214

Antara
Monday, September 03, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरचा तो video पाहिला. मला अश्या स्टॉल वरची भेळ, वडे, पाव्भाजी खूप खूप खूप आवडते, पण तो video पाहून पोटात ढवळुन आले! कसले गचाळ पणे हाताला बरबटून करत होता तो माणुस! सर्वात हाइट म्हणजे ते पाव भाजताना बटर चे हात पुसत होता त्या पावाला, दोन्ही हातानी!! ई यक!
खर इतके हादडताना काही वाटल नवत कधी पण video वर बघतना इतके गलिच्छ वाटले!


Karadkar
Monday, September 03, 2007 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तो video बघताना कही वाटले नाही पण एवढे बटर घातलेली पावभाजी अता मी आयुष्यात नाही खाउ शकणार एवढे मात्र खरे.

भारतात मोठे मोठे तवे सहजी मिळतात.

पाव कापण्यासाठी ब्रेड नाईफ़ वापरावी लागते.
http://www.amazon.com/Henckels-International-Eversharp-8-Inch-Stainless/dp/B00004RFNU/ref=pd_bbs_sr_2/002-7531368-5063209?ie=UTF8&;s=home-garden&qid=1188836832&sr=8-2

ह्याप्रकारची असते ती सुरी.

Manuswini
Tuesday, September 04, 2007 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg
हो मसाला पावच देतात मुंबईत हवे असतील तर.

मी तो सुपर्णाने दीलेली video पाहीला. आई ग.ऽऽऽ. किलो किलो ने तो बटर टाकलेला पाहून चक्कर आली.

लहानपणी खाऊगल्लीत( vt station जवळ) अगदी आवडीनी हात मारून खायचो. पण आता ते daring नाही होणार.
पण इतके बटर न टाकता ही पाव भाजी चांगली होते व लागते. मी केलीय ना. आता तुम्ही म्हणाल काय हे आरोग्याचे नखरे पण चक्क olive oil टाकून. मस्त लागते. its all in mind की बटर टाकली की चांगली लागते.
for eg जो पर्यन्त freinds ना सांगीतले नाही तोपर्यन्त त्यांना oliva oil मधली पाव भाजी आवडली मग सांगीतल्यावर सगळे हो जराशी वाटलीच की वेगळी चव.(चारदा घेवून हादडल्यावर) एक मैत्रीण मला तशी olive oil ची चव आवडत नाही म्हणून इतकी खाल्ली नाही मी आज पाव भाजी मनु,



Cutepraju
Friday, September 14, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावभाजीच्या भाजीला चान्गला लाल रन्ग यायला हवा असेल तर लाल सुक्या मिरच्या टाॅमेटो बरोबर मिक्सर मधुन वाटाव्यात. अशी प्युरी करुन घातली की भाजीला चान्गला रन्ग येतो.

Sanyojak
Friday, September 21, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हौशी मंडळीनो!
तिकडे गणेशोत्सवातही पाककला स्पर्धा ठेवलीय. माहीती आहे ना?
तुमच्या आया, आज्ज्या, माम्या, मावश्या, काकवा आणि तुम्ही स्वतः अशा सुग्रणींच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवातून किंवा बाबा, काका, मामा अशा सुग्रणांच्या संडे स्पेशल प्रयोगांमधून तावून सुलाखून आलेले एखादे झटपट जेवण कॉंबी आठवतेय का?
चला तर आता पाचच दिवस राहिले स्पर्धा संपायला. त्वरा करा!


Manuswini
Friday, September 21, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो संयोजक, आधीच इथे काही पदार्थ लिहून ठेवल्याने नवीन काही शील्लक राहीले नाहे :-)

आणि स्पर्धेत बक्षिस मिळाले नाही तर

तरी पण टाकते एखादी ह्या weekend ला रेसीपी.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators