Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 13, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » ब्रेड, पोळी, पराठे » पोळ्या » Chapati » Archive through August 13, 2007 « Previous Next »

Arundhati_s
Tuesday, February 13, 2007 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi या वेळेस कणिक दळताना मि ५ KG गहु मधे १ KG soyabean आणि २०० GMS मेथ्या टाकल्या आणि मग पिठ दळुन आणलं

Dr मालति कारवारकर च्या वंशवेल पुस्तका प्रमाणे तर ४ KG गहु मधे १ KG soyabean आणि २५० GMS मेथ्या टाकायला पाहिजे.

पण तरि माझ्या पोळ्या कडक होत आहे. सकाळि जरा तरि बय्रा लागतात पण सकाळ च्या पोळ्या रात्रि एकदम कडक होतात आणि शिळ्या सारख्या लागतात. पोळ्याना किन्चित वास पण येतो आहे.

एरवि साध्य गव्हाच्या पोळ्या चान्गल्या होतात.
काहि चुकतय क? काहि समजत नाहि आहे. please suggest




Dineshvs
Tuesday, February 13, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोयाबीन जास्त झालेत हे खरे. ते दळण्यापुर्वी भाजुन घ्यायला हवे होते.
वास वैगरे येतोय तो त्याचमुळे.
या ताज्याच करुन खाव्या लागतील. गरम खाताना वास कमी येतो.
सुधारायचे तर, त्यात आणखी कणीक मिसळावी लागेल, किंवा भाजुन वड्या वैगरे कराव्या लागतील.
पिठ भिजवायला गरम पाणी घेतले तर कदाचित फरक पडेल.
बाजारात तयार सोयाबीनचे पिठ मिळते. ते मिसळणे जास्त सोयीचे पडते.


Arundhati_s
Tuesday, February 13, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

okay
पण मग किति प्रमाण घ्यायला पाहिजे. मला सध्या soyabean खाणं फ़ार गरजेचं आहे. आणि पोळ्या मधे mix करुन खाणं हा सोपा उपाय वाटतो कारण रोजच्या रोज पोळि खाल्लि जाते.

please suggest.


Dineshvs
Tuesday, February 13, 2007 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोयाबीनमधे एक पचायला कठिण असा घटक असतो. ( जसा चण्याच्या डाळीत असतो तसा. त्यामुळे आंबाडाळ खाऊन पोट जड होते. ) तो घटक काढुन बाजारात सोया चंक्स, मीन्स वैगरे मिळतात, ते अगदी रोजच्या भाजी आमटीतहि वापरता येतात.
बाजारात सोयाबीनच्या चकल्या, बिस्किटेहि उपलब्ध आहेत.
चपातीच्या पिठातच वापरायचे असेल तर डॉ मालती कारवारकरानी दिलेले प्रमाण योग्य आहे, पण सोयाबीन भाजुन घेतले तर चांगले.


Arundhati_s
Tuesday, February 13, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

okay. thanks a lot Dinesh

आत्ता जे पिठ आहे त्या मधे जास्त साधं गव्हाचं पिठ घलुन बघते so that हे पिठ वापरता येइल. 5kg अजुन दळुन आणते आणि mix करते. काय म्हणता? तुम्हि soyabean वापरायचे बाकि जे उपाय सान्गितले ते खरच खुप छान आहे Thanks



Dineshvs
Tuesday, February 13, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या पिठात मिक्स करण्यापेक्षा, दोन्ही पिठे वेगळीच ठेवुन, एक दोन दिवस आयत्यावेळी मिसळुन ट्राय केले तर चांगले.


Upas
Monday, August 13, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पोळ्या करायाला सुरुवात करून काही आठवडे झालेत.. गेल्या तीन चार दिवसांपासून पोळ्या कडक व्हायला लागल्यात.. म्हणजे खाकरा होतोय.. कुठेतरी चुकतय त्याचा शोध घेणं सुरु करतोय.. छान उपयुक्त माहिती मिळाली ह्या पुर्ण बीबीवर..
गोल्डन टेंपल आटा आहे...
लक्षणं :
१. कणीक घट्ट मळली जातेय. मी २० मिन आधी भिजवतोय.
२. पोळ्या कडेला जाड रहात आहेत
३. पापडासारख्या होतात काही काही.. आणि मधे बुडबुडे येतात..
कयास :
१. तेल कमी पडत असावे. किती कमी ते कळत नाहीये पण. दिनेशने सांगितल्या प्रमाणे प्रयोग सुरू आहेत.
२. पोळी लाटणे सफाईदार पणे जमत नाहीये.. सगळीकडून सारखी लाटली जात नाहीये.. मधे पातळ होते.. लाटताना जोर पडतोय बहुतेक :-(
तांदुळाची पिठी वापरतो पण जास्त होतेय पिठी बहुतेक.. झटकली जात नाही..
३. पापुद्रे सुटत नाहीयेत कारण घडीत वाफ कोंडली जात नाहीये.. बरेचदा कडांमधून वाफ निसटताना दिसते...
सुरुवातीला पोळ्या ठीक व्हायच्या पण आता कडक होत असल्याने दुसर्या दिवसापर्यंत ठेवता येत नाहीत..

आता एक आठवडा प्रयोग सुरु करेन आणि काही अडलं तर नेमकं काय चुकतय ते विचारेन.. सगळ्यांना thanks in advance!
You Tube वर इतके videos आहेत, एक कणीक कशी मळावी आणि पोळ्या कशा लाटाव्यात, भाजाव्यात ह्याचा video असता तर बरं झालं असतं.. any takers? ;)

Dineshvs
Monday, August 13, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, साधारणपणे दोन भाग कणीक, एक भाग पाणी असे प्रमाण पुरते. एक कप कणकेला एक टेबलस्पुन तेल घातले तर चांगले. कणीक मळुन मऊ करावी लागते. तसेच ती अर्धा तास झाकुन ठेवावी लागते.
लाटणे मात्र सरावानेच जमेल, लाटणे फ़ार जाड वा फ़ार बारिक असु नये. हाताचा दाब हलका असावा, तरच ती नीट लाटली जाते. लाटताना ती पोलपाटाला चिकटता कामा नये. तसे होत असेल तर कणकेत पाणी जात होतेय, असे समजावे. किंवा पोलपाट ओलाही असु शकतो.
तांदळाची पिठी एका चपातीला दोन चिमटी पुरते. तव्यावर टाकण्यापुर्वी ती दोन तळव्यावर एकदा उभी घेतली कि आपोआप जास्तीची पिठी झटकली जाते.
घडीत वाफ़ कोंडण्यासाठी घडीत ठोडी पिठी, अगदी चिमुटभर पण विखरुन घालायला हवी. घडी घालताना कडा नीट दाबल्या तर त्या सील होतात, आणि वाफ़ कोंडली जाते. घडीच्या मधे मात्र फारसा दाब द्यायचा नाही. दाब दिला तर पापुद्रे चिकटतात.
कणीक मळायचे जमेल तितके वर्णन करतो.
कणीक मळण्यासठी परात सर्वात योग्य पण नसेल तर उंचा काठाचा बोल घेणे चांगले. ताटात कणीक नीट मळता येत नाही.
घेतलेल्या कणकेत मीठ व तेल घालुन हाताने सारखे करुन घ्यावे. मग त्यात हळु हळु म्हणजे एका वेळी पाव ते अर्धा कप एवढेच पाणी घालावे. हाताने ते एकत्र करावे. यावेळी हाताला खुप कणीक चिकटणार, ते नॉर्मल आहे. ( बोटात अंगठ्या नसाव्यात ) दुसरा हात पाणी ओतण्यासाठी मोकळा ठेवावा. परत पाणी घालावे. त्या पाण्याने कणीक गोळा करत आणावी. त्याच गोळ्याने बोलच्या कडा पुसुन घ्याव्या. दोन तीन वेळा पाणी घातल्यावर पुर्ण कणीक गोळा व्हायला हवी. सर्व कणकेचा एकत्र गोळा व्हायला हवा. मग ती हाताने मळायला घ्यावी. उत्तम प्रतीची कणीक यावेळी बोटापासुन सुटुन येते. जर ती आली नाही तर पिठात जात ग्लुटेन आहे, असे समजावे. अगदीच जास्त चिकटली असेल तर उलथन्याने ती खरडुन घ्यावी. परत सगळ्याचा गोळा करावा.
उलट्या मुठीने, म्हणजे बॉक्सींग करताना जसे ठोसे मारले जातात तसे दाबत कणीक मळुन घावी. यावेळी कणकेला थोडीफार चमक आलेली असेल. तसेच ती सर्व एका रंगाची दिसेल. तिच्याच पांढरे कोरड्या कणकेचे गोळे असणार नाहीत.
यावेळचा तिचा पोत अत्यंत महत्वाचा आहे. लहान मुलाचा गालाला हात लावल्यावर जसे वाटते, त्या पोताची कणीक हवी. ( पुरीसाठी त्याहुन घट्ट लागते ) हा गोळा आता हाताच्या पुर्ण पंज्याने मळुन घ्यावा. असे मळताना परात वा बोल पुर्ण स्वच्छ झाले पाहिजे, तसे न झाल्यास अर्धा चमचा तेल कणकेवर घालुन परत मळावे. मग ती अर्धा तास झाकुन ठेवावी. व मग गोळे करुन लाटायला घावी.
दुधात कणीक मळली तर तेल घालावे लागत नाही. दुधाचे पातेले कोरड्या कणकेने पुसुन घ्यावे. आणि मग लागेल तसे पाणी घालावे.



Bee
Monday, August 13, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, परदेशात आपण जी कणिक विकत घेतो ती खूप चांगली नसते. त्यामुळे देखील पोळ्या बिघडतात. मला भाकरी येत नाही म्हणून मी आईला घरी भाकरी करून दाखवली तर ती उत्तम जमली कारण पिठ चांगले होते. इथे मात्र पिठ चांगले नसते म्हणून भाकरी नीट होत नाही.

पोळ्यांसाठी तू गरम पाणी वापर. मी पिल्सबरी वापरतो. आधी पिठात हात भाजेल इतके कडक पाणी ओततो. मग पळी किंवा मोठा चमचा घेऊन पिठ एकत्रीत करतो. हात अजिबात लावायचा नाही. मग १५ मिनिटाने कणिक हाताने मळतो. त्यावेळी तळहाताला तेल चोपडतो म्हणजे हाताला कणिक चिकटत नाही. अधुनमधुन लागलेच तर तेलापाण्याचा हात घ्यायचा कणिक मळताना. पोळी लाटताना मी गव्हाचेच पिठ वापरतो. सरावाने ती तुला जमेल. पोळी काठाने लाटत न्यायची, मघे लाटायची नाही. मधे जर लाटली तर कडा जाड होतात. मधला भाग पातळ होतो.

फ़ुलके जर करत असशील तर पोळी दुमडू देऊ नकोस. नाहीतर ती फ़ुलत नाही. फ़ुलक्याची पण रित आहे. ती वर कुणीतरी लिहिलीच असेल.

काही जण पाण्या ऐवजी दुध वापरतात त्यानी पोळी मऊ होते.


Shyamli
Monday, August 13, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. तेल कमी पडत असावे. किती कमी ते कळत नाहीये>>>तेल कमी पडल्यानी पोळी कडक होत नाही ,मी अजिबात तेल घालत नाही फक्त शेवटी हाताची कणिक सोडवून घेण्यासाठी हातावर जरास तेल घेते.

तवा नीट तापत नसणार,gas जास्त बारीक ठेवत असशील तरी पोळ्या कडक होतात.


Sayuri
Monday, August 13, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Upas,
youtube var chapati makingche videos kharach available ahet! see this
http://www.youtube.com/watch?v=4sZ_L-qAk_8&mode=related&search=

Dineshvs
Monday, August 13, 2007 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, त्यामधे बाईसाहेबानी फ़ूड प्रोसेसर वापरलाय, तरिही पाण्याचा अंदाज चुकलाय.
http://www.youtube.com/watch?v=Zg0p5TXi_Cc&;mode=related&search= इथेही या बाईनी खवा तोलणार्‍या बोक्यासारखे पाणी आणि पिठ अंदाजपंचे घातलय. लाटलेली चपाती म्हणजे गयाना देशाचा नकाशा वाटतोय. मग सुरळी करुन गोळा केलाय. तिचे पिठ फारच चिकट वाटतेय.
तव्याला फ़ुटकुळ्या आल्या आहेत. तेलही सढळ हस्ते वापरलय.
अरेरे आमची ही चपाती, काय विकृत रुपात लोकाना बघावी लागतेय.

श्यामले, गाणी रेकॉर्ड करतेस तसे तुझ्या चपातीचेही चित्रीकरण करुन टाक बघु.

Shyamli
Monday, August 13, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी दिनेशदा :-)
कसली कणिक भिजवलीन तिने,मग ती बिघडली तर म्हणे मी याच्या नाही पोळ्या बनवणार मी दुसरा डोव वापरणारे

उपासा अज्जिबात तो व्हिडिओ बघायला जाउ नकोस जेवढी पोळी येते तुला ती पण विसरुन जाशील



Karadkar
Monday, August 13, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, ते गोल्डन टेंपल बन्द कर. त्यात पिठापेक्षा मैदाच जास्ती असतो. (हा स्वानुभव आहे)

Chinnu
Monday, August 13, 2007 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोती, अगदी बरोबर गं. उपास, सुजाता आटा चांगला आहे. ट्राय करून पहा.

Manuswini
Monday, August 13, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, पोळ्या करायला शिकतोस आहे? वा, चांगले आहे. तयारी का आतापासुन? इकडून सांगीतले का?

just kidding, jokes apart, सुजाता आटा rocks ,

नाहीतर nature fresh सुद्धा चांगला आहे. ह्यावेळेला मी चक्क ५ किलो गहु दळुन आणले देशातुन. ते संपेल पण तोपर्यंत मज्जा.

उपास, तु दूध किंवा दही टाकुन बघ chapati making for dummies टीप्स प्रयोग म्हणून, खरे सांगतेय, चांगल्या मऊ होतात. मग सरावलास की कोमट पाण्यात भिजव. काय हाये काय नी नाय काय. goodluck!


Manuswini
Monday, August 13, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली करमणुक आहे ती video clip , food processor काय ने काय.

जरा हाताला व्यायाम द्या की, :-)
अश्या रीतीने चपाती करायला गेलो तर पाहुणे उठुन जातील (आजी हेच म्हणाली असती बघुन)
उपास,



Panna
Monday, August 13, 2007 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येस्स!! सुजाता, पिल्सबरी, नेचर्स फ्रेश खरचं चांगले आहेत. मी तीनही ट्राय केलेत. लक्ष्मी आट्याच्या पोळ्या थोड्या काळ्या वाटतात.

उपास, कणिक घट्ट भिजत असेल तर कणकेला बोटाने २-३ खड्डे पाडून त्यात पाणी घालायचे. आणि कणिक अर्धा तास झाकून ठेवायची. पोळ्या करायला घेताना कणिक परत एकदा मळुन घ्यायची. (माझ्या सासुबाईंची पद्धत)

अजून एक, पोळी तव्यावरुन उतरवली की लगेच डब्यात झाकून ठेव.
Casserole असेल तर उत्तमच! नाहितर स्टीलचा डबा पण चालतो.

Disha013
Monday, August 13, 2007 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>म्हणजे खाकरा होतोय
अगदी मंद गॅसवर भाजली ना चपाती की तिचा खाकरा बनतो.
आणि माझेही अनुमोदन.. सुजाता बेस्ट आहे. गोल्डन टेंपल च्या पिवळ्या चपात्या खावत नाहीत.


Ksmita
Monday, August 13, 2007 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

upaas, काही टिप्स देते स्वानुभवावरुन !

सुरुवातीला पुरी च्या आकाराच्या पोळ्या लाटायच्या (पुर्‍याच खरेतर ) तवा चांगला गरम पाहीजे in between high to medum temperature पोळी तव्यावर टाकली कि लगेच १ ते २ सेकंदात उलटायची मग या बाजुवर साधारण १५ ते २० सेकंद भाजायची जरासे काळे डाग पडले तरी हरकत नाही मग परत उलट्या बाजुने तव्यावर /बर्नरवर वा जाळीवर भाजायची हमखास टम्म फ़ुगते लगेच तुप लावून ठेवायची व खायची
तव्यावर एका वेळी अश्या ३ छोट्या पोळ्या सहज भाजता येतात नंतर सरावाने मोठि पोळी व घडीचीही जमायला लागेल २ ते ३ आठवडे रोज करत राहिले या प्रकारे कि आपोआप
tact कळते नंतर मोठी पोळी पण जमेल

त्यातूनही पोळ्या कडक वा वातड झाल्या तर खायच्या आधी १० सेकंद तुप लावून
microwave मधे गरम करायच्या .

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators