Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 24, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » दिवाळी फराळ » करंज्या » Archive through October 24, 2006 « Previous Next »

Supermom
Friday, October 13, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणीतरी सांगेल का इथे us मधे करंज्या,शंकरपाळे वगैरे कशात तळता ते? साजुक तूप वापरले तर जळेल ना लवकर. अन डालडाचा इथे प्रश्नच नाही.मग काय वापरू? खारे पदार्थ तळायला मी canola oil वापरते पण गोडाला चालेल का ते?

Priya
Friday, October 13, 2006 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SM मी ते चक्क शेंगदाण्याच्या तेलातच तळते. vegetable oil ही वापरुन पाहिलय पुर्वी. पण शेंगदाण्याचे तेलच जास्त बरे वाटले मला.

Manuswini
Friday, October 13, 2006 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करंज्या मी शुद्ध तूपातच तळते. gas adjust करत रहावा लागतो इथे

छान होतात


Prady
Friday, October 13, 2006 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही मिक्सर मधून फिरवतो करंजीचं पीठ. कुटायचा त्रास वाचतो.

Swaatee_ambole
Friday, October 13, 2006 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, vegetable shortning म्हणतात इथे वनस्पती तुपाला. बेकिंगचे आयटम्स असलेल्या सेक्शनमधे मिळेल बघ.

Dineshvs
Saturday, October 14, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तळण्यासाठी काय माध्यम वापरायचे वैगरे, यावर उद्या सविस्तर लिहिन म्हणतोय.

Supermom
Saturday, October 14, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,मनु,प्रिया,
thanks ग.
vegetable shortening बद्दल इतके वाईट ऐकलेय तब्येतीच्या दृष्टीने.
अर्थात खरे खोटे नाही माहीत. पण वापरायला भीती वाटते त्यामुळे.


Prajaktad
Monday, October 16, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम! तु ' अमुल ' शुद्ध घी वापरुन बघ.मी तेच वापरतेय ३ वर्ष!.

Manuswini
Monday, October 16, 2006 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom
तु vegetabel shortning वापरु नकोस,

त्यात खुपच trans fats असतात.

cholesterol वाढण्यास हेच कारण असते


Supermom
Monday, October 16, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता,
कालच sams मधून चार मोठे unsalted butter चे packs आणून भरपूर तूप केलय. ते चालेल का तळणाला?
मनु,
माझे cholesterol borderline असल्याने डॉक्टर ने trans fats बंद केलेत.


Rujutajoshi
Tuesday, October 17, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Super mom me pan tasach waparte tup. Chan hota ekdum. Ani ho jar tyat tapawtana ek lawang wa ek chota gulacha khada takla tar kanidar tup hote...

Soanpari
Thursday, October 19, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्या मायबोली करांना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा!!!सगळ्यांच्या आयुष्यात ही दिवाळी सुख-समृद्धि घेऊन येओ.

मृण्मयी कानवल्या च्या रेसीपी साठी थ्यांक यु. छान झाले कानवले तुम्ही दिलेल्या पद्धतीने. मस्तं पापुत्र्या सुटल्या.


Prady
Tuesday, October 24, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pepperidge farm च्या puff pastry sheets वापरून बेक्ड करंज्या करता येतील का. कुणी केलय का ट्राय. सारण ओलं वापरावं लागेल की कोरडं. कुणी सांगेल का?

Mrinmayee
Tuesday, October 24, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, मी केला होता हा प्रयत्न. पण बेक करताना सगळा पाक बाहेर आला गुळसाखरेचा!

Arch
Tuesday, October 24, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, ही बघ मिनोतीच्या काकीची recipe pie shell वापरून.
http://massala.com/diwali-karanji.htm


Sami
Tuesday, October 24, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady , मी केल्या होत्या, छान झाल्या. सारण ओलंच वापरलं होतं पण खूप भरायचं नाही. आलाच तर किंचीत पाक येउ शकतो बाहेर पण काही फार messy होत नाही.
shelf life फार नसावं त्याचं. दोन दिवसात संपवून टाक. मी सहजच, dessert म्हणून केल्या होत्या. आणि serve करताना वर condensed milk चं zigzag design करावं.
याचप्रमाणे पुरण पोळीचं पुरण भरूनही sweet dish होते.... fusion food


Karadkar
Tuesday, October 24, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, ती माझी काकु आहे. आत्या नाही.

Prady
Tuesday, October 24, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks सगळ्यांना. आर्च छान आहे साईट. बघते करून

Chinnu
Tuesday, October 24, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा मी पण shells वापरुन केलेला हा प्रयोग. ओले खोबरे थोडे परतुन मग त्यात नट्स आनि गुळ किसुन(थोडा) आणि पीठीसाखर घातले. छान होतात.

Manuswini
Wednesday, October 25, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी करंज्या थोड्या abke करते आणी थोड्या तळते पण माझे मिश्रण सुख्या खोबर्‍याचे असते.

ते कधी बाहेर नाही आले bake करताना.

छान होतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators